उतारवयात टीव्ही मालिकेतून हॉलीवूडच्या मुख्य चित्रप्रवाहात दाखल झालेल्या ब्रायन क्रॅन्स्टनला ‘ट्रम्बो’ चित्रपटासाठी ऑस्करच्या सर्वोत्तम अभिनेत्याच्या पारितोषिकाचे नामांकन मिळाले आहे. इतर चार तगडय़ा कलाकारांना मागे टाकत हा अभिनेता पुरस्कार पटकावतो का, याचे कुतूहल सध्या मोठे आहे..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जगभरातील आजच्या गुन्हेगारीपटांवर क्वेन्टीन टेरेन्टिनो या दिग्दर्शकाच्या ‘पल्प फिक्शन’ चित्रपटाचा जितका प्रभाव आहे, तितकाच प्रभाव अमेरिकेच्या छोटय़ा पडद्यावरच्या एका मालिकेने गेल्या दशकभरात सिने/मालिका-वेडय़ांवर पाडला आहे. २००८ ते १४ या काळात सुरू असलेल्या ‘ब्रेकिंग बॅड’ या टीव्ही मालिकेने प्रसिद्धीचे नवनवे विक्रम प्रस्थापित करून टीव्ही माध्यमाच्या सर्व शक्यतांना ढवळून टाकले.
रसायनशास्त्र शिकविणाऱ्या पापभीरू, कुटुंबवत्सल प्राध्यापकाचा परिस्थितीच्या रेटय़ात ड्रग माफियापर्यंत होणारा ‘वाल्मीकी ते वाल्या’रूपी उलटा प्रवास या मालिकेत दाखविण्यात आला होता. आजच्या अमेरिकी समाजाच्या जवळजवळ प्रत्येक घटकाची, प्रत्येक समस्येची आणि प्रत्येक पिढीची कहाणी अंगीकृत करीत जगण्याच्या संघर्षांची वैश्विक गोष्ट मालिकेने मांडली होती. या मालिकेने केवळ अमेरिकाच नाही, तर जगभरातील टेलिव्हिजन नेटवर्क, टोरंट्स, यू टय़ूबसारखी प्रसारण माध्यमे यांवरून प्रेक्षकांवर दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे लोकप्रियतेच्या बाबतीत मालिकेची मजल ‘गिनेस बुक’पर्यंत पोहोचली. गुणवत्तेबाबत उत्तम सिनेमाशी तुलना करता येईल इतकी निर्मितीमूल्य असलेल्या या मालिकेतील सर्वच गोष्टी दर्जाबाबत कसलीही तडजोड न करणाऱ्या होत्या. मालिकेचा परिणाम बाह्य़ जगतावर झाला. पण त्याहून एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे, या मालिकेतील प्रमुख भूमिका करणाऱ्या ‘ब्रायन क्रॅन्स्टन’ या अभिनेत्याचे तीसएक वर्षे सुरू असलेले ‘स्ट्रगलर’रूपी करिअर वयाच्या पन्नाशीनंतर वायूवेगाने फुलले. एका रात्रीत स्टारपद देणाऱ्या जगातील कुठल्याही चित्रनगरीतील परंपरेला छेद देत मालिकेच्या लोकप्रियतेगणिक ब्रायन क्रॅन्स्टन या अभिनेत्याचे सेलेब्रिटीपद विस्तारत गेले. जाहिराती, सिनेमात दुय्यम अभिनेता, मालिकांमध्ये तिय्यम व्यक्तिरेखा आदी साग्रसंगीत करून झालेला हा कलाकार ‘ब्रेकिंग बॅड’मुळे सिनेमात अग्रस्थानावर आला. यंदाच्या ऑस्करसाठी सर्वोत्तम अभिनेत्यांच्या नामांकन यादीत त्याचे नाव घोषित झाले आहे. हॉलीवूड दांभिकतेच्या काळ्या इतिहासाला उघड करणाऱ्या आणि शीतयुद्धकालीन अमेरिकेच्या साम्यवादविरोधी धोरणाची खिल्ली उडविणाऱ्या डाल्टन ट्रम्बोच्या चरित्रपटातील ‘ट्रम्बो’ साकारणाऱ्या ब्रायन क्रॅन्स्टनला समग्र अभिनयशक्तीची पावतीच ऑस्करने दिली आहे.
चरित्रपटासाठी अचाट आणि अतक्र्य व्यक्तिरेखा निवडण्यात अमेरिकी चित्रकर्ते सर्वात आघाडीवर आहेत. नाझी भस्मासुरात ज्यू लोकांना वाचविणाऱ्या ऑस्कर शिंडलर्सवरचा ‘शिंडलर्स लिस्ट’, जॉनी कॅश या संगीतकाराच्या सेलेब्रिटेड जगण्यातील चढ-उतार मांडणारा ‘वॉक द लाइन’, अॅण्डी कॉफमन या विनोदकाराचे अंतर्बाह्य़ आयुष्य उलगडणारा ‘मॅन ऑन द मून’ यासारख्या उदात्त प्रतिमांच्या व्यक्तिरेखांना जसे तेथे चित्रित केले जाते, त्या प्रमाणे लोकांलेखी नगण्य वा कुप्रसिद्ध व्यक्तिरेखांचा जीवनपटही आवर्जून मांडला जातो. आपल्याकडे ज्या पद्धतीने चरित्रपट म्हणजे अवगुणरहित व्यक्तिरेखेचा अतिरेक करून, माणूसपण नाहीसे करून त्याला देवत्वावर पोहोचविले जाते, तसा प्रकार हे चित्रकर्ते अंमळही करीत नाहीत. अमेरिकेची पहिली पिन-अप मॉडेल बेट्टी पेज हिच्या तथाकथित अश्लील छायाचित्रावरून अमेरिकी सिनेटने केलेले दांभिक आकांडतांडव आणि कोर्टात तिने जिंकलेला लढा यावरही (नटोरिअस बेट्टी) तेथे चित्रपट आला आहे. सर्वात वाईट दिग्दर्शक म्हणून हॉलीवूडच्या इतिहासात नोंद झालेल्या एड वूड यावरही त्याच नावाचा चित्रपट गाजला आहे. इतकेच काय प्लेबॉयच्या नग्नतेला लाजविणारे अश्लीलोत्तम ‘हस्लर मॅगझिन’ देणाऱ्या लॅरी फ्लिन्टचेही तत्त्वज्ञान मांडणारा चित्रपट आणला गेला आहे. हे सिनेमे त्या त्या व्यक्तींच्या आणि समाजाच्या सांस्कृतिक व सामाजिक प्रभावपरिस्थितीचे आकलन करू देणारे, म्हणून महत्त्वाचे ठरतात. देशासाठी भूषणावह नसणाऱ्या परंतु इतिहासात महत्त्व राखून असलेल्या व्यक्तिरेखांच्या अमेरिकी चित्रपरंपरेत आता ‘ट्रम्बो’ची भर पडली आहे. शीतयुद्धात कम्युनिस्टांना ठेचून काढण्याचा अमेरिकेचा बेगडी पवित्रा तर येथे दिसतोच, वर हॉलीवूडच्या उदात्त प्रतीमेच्या मुखवटय़ाआड असलेल्या खऱ्या रूपाचेही चौरस चित्रण येते.
हॉलीवूडच्या १९४० नंतरच्या सुवर्णयुगात युद्धविरोधी कादंबरीद्वारे राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा कथा-कादंबरीकार आणि सर्वाधिक मानधन घेणारा पटकथाकार म्हणून डाल्टन ट्रम्बो या अवलिया लेखकाचा दबदबा होता. हॉलीवूडच्या अभिनयेतर कामगारांना मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनाविरोधात आवाज उठविणाऱ्या साम्यवादी पक्षाला ट्रम्बोची सहानुभूती होती. त्याने रीतसर या पक्षाला पाठिंबा दिला आणि त्यात सहभागी होऊन स्टुडिओच्या दुजेभावाविरोधात लढाही उभारला. अमेरिकेच्या ‘अन-अमेरिकन अॅक्टिव्हिस्ट कमिटीने’ यावरून ट्रम्बो व आणखी नऊ संशयित कम्युनिस्ट पक्षाच्या लेखक-दिग्दर्शकांवर बंदी आणली. सगळ्या चित्रसंस्थांनी त्यांना काळ्या यादीत टाकले. कम्युनिस्टांना मुळापासून उखडण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या मोहिमेत ट्रम्बो आणि त्याच्या मित्रांना तुरुंगात डांबण्यात आले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मात्र शिखरावर असणारे लेखन करिअर ट्रम्बोने सोडून दिले नाही. तो आणि त्याच्या सहकाऱ्यांना स्टुडिओजकडून काम मिळणे बंद झाले. यावर त्याने विविध क्लृप्त्या लढवल्या. ‘रोमन हॉलीडे’, ‘द ब्रेव्ह वन’सारखे चित्रपट भलत्याच नावांनी पोहोचवून हॉलीवूडच्या चित्रसंस्थांना व दिग्दर्शकांना चकविले. त्या चित्रपटांनी सवरेत्कृष्ट चित्रपटाचे ऑस्कर मिळविले. ट्रम्बोचे नाव मात्र हयातभर या सिनेमाचा लेखक म्हणून गुप्तच राहिले. आपल्या लेखनक्षमतेने साऱ्या लढाया जिंकलेल्या ट्रम्बोची गाथा ब्रूस कुक याने १९७७ साली पुस्तकबद्ध केली होती. २००८ साली हॉलीवूडमध्ये कामगारांच्या वेतनासाठी प्रदीर्घ काळ चाललेल्या संपाच्या काळात दिग्दर्शक जे रोच आणि जॉन मॅकनमारा यांना डाल्टन ट्रम्बोवरील या पुस्तकावर अभ्यास करण्याची लहर आली. त्यातून ‘ट्रम्बो’ चित्रपट साकारल्याचे, या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत मॅकनमारा यांनी नमूद केले आहे.
ब्रूस कुक यांच्या वेगवान पुस्तकाप्रमाणे हा चित्रपट पहिल्या काही मिनिटांमध्ये ट्रम्बोची ओळख करून देत पुढे सरकू लागतो. वलयांकित ट्रम्बोच्या करिअर-अस्ताला आरंभ होणाऱ्या घटनांपासून. यात प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी जॉन वेनसोबत उडालेल्या शाब्दिक लढाईपासून त्याच्यावर चालविल्या जाणाऱ्या एकतर्फी खटल्यांचा भाग येतो. या प्रत्येक भागामध्ये कम्युनिस्ट-विरोधातील अमेरिकी द्वेषाची पातळी टोकाला विस्तारत जाताना आणि डाल्टन ट्रम्बोची सर्व बाजूंनी कोंडी होताना दिसते. या कोंडीतही न डगमगता तुरुंगात जाणारा आणि कुटुंबाला नवगरिबीच्या संकटातून तारून नेण्यासाठी झगडणारा ट्रम्बोतला नरपुंगव सिद्ध होतो.
ब्रायन क्रॅन्स्टनने ट्रम्बोच्या व्यक्तिरेखेला दिलेली तकाकी हा चित्रपटाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. डाल्टन ट्रम्बोची बाथटबमध्ये सिगार आणि मद्यासोबत तीव्र एकांतात चालणारी लेखन सवय, त्याची पत्नी आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याभोवती असलेली निष्ठा या खासगीपणाच्या बाबी क्रॅन्स्टनच्या ‘ब्रेकिंग बॅड’च्या प्रतिमेहून मोठी वाटते. साम्यवादी विचारसरणीच्या पगडय़ामुळे सार्वजनिक जीवनामध्ये त्याला सोसाव्या लागणाऱ्या खस्तांमधून बाहेर पडण्यासाठी झगडणाऱ्या ट्रम्बोचे रूप क्रॅन्स्टनने अधिकारवाणीने साकारले आहे. त्याच्या मुलीशी हळव्या संवादापासून ते हॉलीवूडच्या काळ्या यादीत असताना निव्वळ लेखनवकुबाच्या जोरावर टोपणनावी पटकथानिर्मितीचे आणि दुरुस्तीचे ‘ब्लॅक मार्केट’ तयार करण्याच्या झगडय़ापर्यंत क्रॅन्स्टनच्या अभिनयाची आतशबाजी पाहायला मिळते.
चित्रपट अनेकार्थानी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी देतो. अमेरिकेच्या आपमतलबी लोकशाही धोरणाची ट्रम्बोच्या गळपेचीनिमित्ताने खिल्ली उडविण्यात आली आहे. यातील संवादांमध्ये येणाऱ्या युद्धाच्या, शीतयुद्धावरच्या छोटय़ा छोटय़ा संवादातही ठोसायुक्त विनोद भरला आहे. अमेरिकी कम्युनिस्टविरोधी चळवळीचे स्पष्ट रूपही चित्रपटामधून दिसते. तात्कालीन खटल्यांच्या, मोर्चा आणि निदर्शनांच्या क्लिप्स येथे जोडण्यात आल्या आहेत. इतिहासात नोंदल्या गेलेल्या झंझावती राजकारण्यांपासून ते सिनेकामगारांच्या मानधनवाढीसाठी झगडू पाहणाऱ्या ट्रम्बोच्या छायाचित्रांचा, चित्रफितींचा चित्रपटाची डॉक्युमेण्ट्री बनू नये या चलाखीने वापर करण्यात आला आहे.
दुसरी महत्त्वाची सापडणारी गोष्ट म्हणजे हॉलीवूडच्या इतिहासाच्या डोक्यात असलेल्या सर्व माहितीज्ञानाचा येथे चक्काचूर व्हायला लागतो. मोठमोठय़ा विशेषणांनी रसग्रहण झालेल्या कलाकृतींमागच्या भलत्याच तरी खऱ्या माहितीची जाणीव होते. ‘स्पार्टाकस’, ‘एक्झोडस’ आदी ट्रम्बोला काळ्या यादी बाहेर काढून परमोच्च स्थानावर नेणाऱ्या कलाकृतींची जडणघडणही दिसते. वेगात दुसऱ्यांच्या पटकथा दुरुस्त करून स्वत:च्या पटकथांमध्ये बुडालेल्या ट्रम्बोची आफाट ऊर्जा चित्रपटामध्ये आणण्यात आली आहे. पटकथालेखक हा चित्रपटाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा घटक असतो, याचाही एक छानसा अभ्यास ट्रम्बोच्या निमित्ताने येऊ लागतो. त्याच्याच व्यक्तिरेखेवर केंद्रित आहे, म्हणूनच हे आल्याचे येथे वाटत नाही. लोकांच्या मनात बसलेल्या महान कलाकार, दिग्दर्शक, चित्रसंस्थांची फौज येथे ट्रम्बोवाचून अडलेली दिसते. या लेखकाचे हॉलीवूडच्या इतिहासातील स्थान दिग्दर्शक आणि लेखकाने अचूकरीत्या पटवून दिले आहे. निनावी किंवा टोपणनावी पटकथांचा डोंगर उभारून अलिप्त राहिलेल्या आणि अमेरिकेच्या दांभिक विचारसरणीचा हयातभर फटका बसलेल्या ट्रम्बोची गाथा या चित्रपटामध्ये उलगडली आहे. या चरित्रपटाद्वारे हॉलीवूडच्या अभ्यासकांपासून ते अमेरिकेचा इतिहास जाणकाऱ्यांसाठी भरपूर खाद्य उपलब्ध झाले आहे. याशिवाय डायन लेन, लुई सी.के., हेलन मिरन, जॉन गुडमन या कलाकारांच्या अभिनयाची क्रॅन्स्टनच्या अदाकारीपुढे प्रभाव पाडण्यास सुरू राहिलेली कसोटीही पाहायला मिळते.
यंदाच्या ऑस्करच्या इतर संभाव्य विजेत्या चित्रपटांहून जरा बऱ्यापैकी वेगवान आणि क्रॅन्स्टनच्या अजस्र अभिनयाची मेजवानी देणाऱ्या या चित्रपटाची अपेक्षेप्रमाणे (ट्रम्बोसारखीच) ऑस्कर अकादमीने कल्हई केली. सवरेत्कृष्ट चित्रपटांच्या नामांकन यादीतून चित्रपट आपसूक बाहेर राहिलेला आहे. मात्र क्रॅन्स्टनच्या भूमिकेला नामांकनातून डावलण्याचा प्रमाद अकादमीला करता आल नाही.
क्रॅन्स्टनच्या स्पर्धकांमध्ये लिओनाडरे डी कॅपरिओ (रेव्हनण्ट), एडी रेडमेन (द डेनिश गर्ल), मॅट डेमन (द मार्शन), मायकेल फासबेंडर (स्टीव्ह जॉब) आदी सर्वाच्याच भूमिका या एकपात्री प्रयोगासारख्या आहेत. अन् प्रत्येकाचा अभिनय गोळीबंद आहे. त्यात क्रॅन्स्टनच्या ‘ट्रम्बो’चा निकाल लागेल की नाही, याचे कुतूहल वाढले आहे.
पंकज भोसले