चित्रपटातील नायकाचा चेहरा ही संकल्पना बाद करून व्हिडीओ गेम खेळाप्रमाणे प्रेक्षकालाच नायक असल्याचा आभास निर्माण करू देणारा ‘हार्डकोअर हेन्री’ हा एक तद्दन व्यावसायिक चित्रपट सध्या चर्चेत आहे. विविध टप्प्यांमधून व्हिडीओ गेमसारखे कथानक पुढे सरकणाऱ्या चित्रपटांची प्रेक्षकांना आता पुरती सवय झाली असली, तरी दृश्यसंकल्पनांपासून ते िहसाचारात नवा पायंडा घालणाऱ्या या चित्रपटाविषयी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
व्हिडीओ गेमची लोकप्रियता संगणक युगात वाढली, कारण त्या आभासी दुनियेच्या नायकत्वाची जबाबदारी अधिक ठळक प्रमाणात खेळणाऱ्या व्यक्तीवर समोरच्या पडद्यामुळे आली. त्यामुळे गेमच्या जगात मर्दुमकी, कर्तबगारीच्या खुणा पेरत खेळणारी व्यक्ती पॉइंट्सच्या चढत्या आलेखानुसार आनंदी बनू लागली. कथा-कादंबऱ्यांमधल्या प्रथम पुरुषी निवेदनासारखे व्हिडीओ गेममधील कृत्य असल्याने खेळणाऱ्या नायकाकडून चूक न घडल्यास समाधानाच्या पुढील पातळीवर, म्हणजेच दृश्यनिवेदनाच्या अधिक कठीणतम अवस्थेत नेण्याचे काम व्हिडीओ गेम करतो. १९९९ साली ‘मेट्रिक्स’ चित्रपट आला तेव्हा त्यातील संगणकीय संकल्पना आणि त्याच्या व्हिडीओ गेमसारख्या वेगाने नंतर येणऱ्या चित्रपटांच्या दृश्यपरिणामांमध्ये क्रांती झाली. कारण संगणक त्या काळापर्यंत जगभरात सारख्याच प्रमाणात रुळला होता. त्याआधी मॉर्टल कॉम्बेट (१९९५), स्ट्रीट फायटर (११९३) हे वेगाची संगणकीय समीकरणे जुळविणारे सिनेमे केवळ अॅक्शनवेडय़ा गटांपुरते मर्यादित राहिले. अध्यात्माचा अंतर्भाव करणाऱ्या मेट्रिक्स या चित्रपटाच्या यशानंतर मात्र संगणक आणि व्हिडीओ गेमचा वापर करणाऱ्या स्मार्ट युगासाठी तितक्याच स्मार्ट चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. अॅक्शन, मारधाडीच्या देमार चित्रपटांमध्ये व्हिडीओ गेमच्या संकल्पनांचा सर्रास वापर होऊ लागला. तरीही चित्रपट हे चित्रपटासारखेच राहिले. त्यात नायकी चेहरा, एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूपर्यंत जाणारे कथानक या पारंपरिक चित्रपटीय घटकांचा अंतर्भाव कायम राहिला. जेसन स्टेथमच्या ‘ट्रान्सपोर्टर’, ‘क्रॅन्क’ या हाय व्होल्टेज अॅक्शन सिनेमांपासून ‘स्कॉट पिल्ग्रिम व्हर्सेस वर्ल्ड’ या कबुतरछाप तरुणाईच्या चित्रपटांपर्यंत किंवा निव्वळ मारधाड करणाऱ्या इंडोनेशियाच्या ‘रेड’ या मार्शल आर्ट्ससारख्या मेरान्तू युद्धखेळाची ओळख करून देणाऱ्या चित्रपटापासून ते पॉप्युलर कल्चरच्या सिनेमांचे कैक संदर्भ वापरणाऱ्या ‘सकर पंच’सारख्या चित्रपटापर्यंत याची कित्येक उदाहरणे देता येतील. आपल्याकडेही रा-वन या चित्रपटाद्वारे या परंपरेला अंगीकारण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्यातही नायकाला ‘रामो’जीराव बनविण्याचा बॉलीवूड अतिरेक सोडण्यात आला नसल्याने परिणामात तो सामान्यच राहिला.
गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपट व्हिडीओ गेमचा आधार घेऊ लागले, तसेच व्हिडीओ गेम अधिकाधिक सिनेमासारखे दिसू लागले. नुकताच आलेल्या ‘हार्डकोअर हेन्री’ या चित्रपटातील व्हिडीओ गेम इफेक्टवर उल्लेख केलेल्या आणि आत्तापर्यंत आलेल्या अशा प्रकारच्या कोणत्याही चित्रपटाला थिटा ठरविणारा आहे. यात नायकाचा चेहरा चित्रपटभर दिसत नाही. पाहणाऱ्याला व्हिडीओ गेम वापरकर्त्यांप्रमाणे आपणच चित्रपटाचे नायक असल्याची जाणीव दिली जाते. शब्दाचाही संवाद न साधता समोरचे अवघड टप्पे एकामागून एक पार पाडत असल्याचा प्रथम पुरुषी निवेदनाचा प्रकार चित्रपट घडवितो. कथानकाचा ऐवज प्रेक्षकाला अधिक लक्ष देऊन साठवावा लागतो. पण त्यात यशस्वी नाही झालात, तरी फरक पडत नाही. कारण पाहणाऱ्याला व्हिडीओ गेमप्रमाणे िहसेच्या अवघड पातळ्यांची द्रुतगती रपेट चित्रपट घडवून आणतो.
चित्रपटाला सुरुवात होते अवकाशात. अंतराळातील संशोधन केंद्रात अत्याधुनिक यंत्रणेद्वारे हेन्रीच्या शरीरात जीव आणण्याचे काम सुरू असते तेव्हापासून. हेन्रीच्या पूर्वायुष्याच्या खाणाखुणा, आठवणी नष्ट झालेल्या असल्या, तरी लहानपणाचे एक दृश्य काही केल्या पुसले जात नाही. त्याच्या तुटलेल्या हाताला, पायाला नव्याने जोडण्याची प्रक्रिया तपशिलामध्ये आपल्यासमोर वेगात घडते. हे काम करणारी अॅस्टेल (हेली बेनेट) हेन्रीला मी तुझी पत्नी असल्याचे सांगते. हेन्री म्हणजेच शरीराचे जोडकाम केल्यानंतर जिवंत झालेली व्यक्ती. तिच्या डोळ्याद्वारे आपण चित्रपटातील साऱ्या घटना पाहतो. अॅस्टेल सांगत असलेल्या गोष्टीतून हेन्रीचा आधी मृत्यू कसा झाला, याची किंचितही कल्पना मिळत नाही. मृत मानवाला पुनर्जीवित करण्याची यंत्रसंजीवनी मात्र समोर स्पेशल इफेक्ट्सह काम करू लागते. या जीव भरण्याच्या कार्यक्रमात शरीरामध्ये आवाजाचा अंतर्भाव करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मोठा अडथळा निर्माण होतो. अॅस्टेलाने हेन्रीला वाचविण्यासाठी तयार केलेले तंत्रज्ञान आपल्या मालकीचे असल्याचा दावा करीत अंतराळ संशोधन केंद्रात अकान (डॅनिला काझ्लॉस्की) हेन्रीला संपविण्यासाठी दाखल होतो. आता अॅस्टेला हेन्रीला घेऊन अंतराळ केंद्रातून पळ काढते. अंतराळ केंद्रातून यानाद्वारे ती हेन्रीला पृथ्वीवर आणते. यादरम्यान, पुनर्जन्म झालेल्या परंतु बोलता न येणाऱ्या हेन्रीच्या मनात िबबविलेल्या गोष्टींपैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे अकानपासून अॅस्टेलाला वाचविणे. अन् त्यासोबत पृथ्वीवर समोर येणाऱ्या कोणत्याही अडथळ्याला संपवून टाकणे.
मॉस्को शहराच्या मध्यभागी कोसळलेल्या यानातून बाहेर पडलेल्या हेन्रीचे हाणामारी करणारे, बंदुकीच्या करामती करणारे टॅटूने रंगलेले हात, स्पोर्ट्स शूज घातलेली पावले इतकीच दृश्यओळख कॅमेरामध्ये कैद राहते. बाकी पाहणाऱ्यावर तो जे काही करतोय, ते आपणच करीत असल्याचा तंतोतंत व्हिडीओ गेमसारखा परिणाम करायला चित्रपट सज्ज होतो.
नायक किंवा प्रोटोगॉनिस्ट चित्रपटाचा सर्वात मोठा घटक असल्यामुळे त्याचे सर्वगुणसंपन्न असणे, तो सर्वशक्तिमान असणे, नशीब आणि सारेच घटक त्याच्या बाजूने असणे आणि पामर प्रेक्षकांच्या मनात त्याचा आदर्श पेरणे ही शतकभराहून अधिक काळ टिकलेली चित्रपटीय परंपरा इलिया नैशहुलर या दिग्दर्शकाने नाकारलेली दिसते. जरी इथे प्रेक्षकाला समोर घडणाऱ्या घटना आपण करीत असल्याचा अनुभव दिला जात असला, तरी त्याच्यावर व्हिडीओ गेमप्रमाणे नियंत्रण मात्र प्रेक्षकाचे राहत नाही. दिग्दर्शकाने खुबीने या सगळ्या अवघड वाटणाऱ्या प्रकाराला सोपे करून ठेवले आहे.
चित्रपट पाहताना दोन खूप यशस्वी चित्रपटांची आत्यंतिक आठवण येते. यातील पहिला स्पाईक जोन्झचा ‘बिइंग जॉन माल्कोविच’. या चित्रपटात एका विशिष्ट भुयारात शिरल्यानंतर सुपरस्टार सेलिबेट्रीच्या डोक्यात प्रवेश करण्याची विचित्र कल्पना राबविली होती. प्रत्येक सामान्य माणसाच्या सेलिब्रेटी बनण्याच्या सुप्त आकांक्षेचे संशोधनच चित्रपटात अचाटरीत्या स्पष्ट झाले होते. दुसरा चित्रपट ख्रिस्तोफर नोलानचा उलटगतीने कथा चालविणारा सूडपट मेमेण्टो. ज्यात स्मृती हरविलेला नायक सूडगाठ उकलण्याची प्रक्रिया पूर्ण करताना दिसतो. हार्डकोअर हेन्रीमध्ये दोन्ही चित्रपटांतील संकल्पनांच्या वरताण कामगिरी केली गेली आहे. कारण या चित्रपटाची गती कथानकातील नायक हेन्रीला किंवा तो आपणच असल्याचे आभास निर्माण झालेल्या प्रेक्षकाला श्वास घेण्याची फुरसत ठेवत नाही.
मॉस्को शहरात उतरल्यानंतर अकान याने मागे लावलेले सैन्य आणि पोलीस या दोन आघाडय़ांचे टप्पे गाठताना हेन्रीला जिमी (शार्लटो कोप्ले) या व्यक्तीची(किंवा यंत्रमानव म्हणूयात) मदत मिळते. या जिमीचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचा चेहरा आपल्याला सर्वाधिक चित्रपटात दिसतो. तो हेन्रीला मदतही करतो आणि अकानपासून बचावासाठी ढाल म्हणूनही समोर येतो. यात त्याची अनेक प्रतिरूपे तयार होतात. रशियन कुंटणखान्यापासून ते अकानच्या यंत्रमानव घडविणाऱ्या प्रयोगशाळेपर्यंत आपल्याला जिमी कधी दुसऱ्या महायुद्धात लढणाऱ्या कॅप्टनच्या वेशभूषेत दिसतो, तर कधी रॉक गायकासारख्या विचित्र केशभूषा साकारलेल्या अवस्थेत. गंमत म्हणजे त्या प्रतिरूंपांचा मृत्यू झाल्यावरही दुसऱ्याच एखाद्या रूपात तो पुनर्प्रगट होतो. व्हिडीओ गेममधील लेव्हल्स पार करताना मिळणाऱ्या सपोर्टर पॉइंट्सप्रमाणे त्याची रचना करण्यात आलेली आहे. मात्र त्याचे स्पष्टीकरण नाही. तरी प्रतिरूपे आणि प्रत्यक्ष जिमी यांच्यामुळे हेन्रीसह आपलाही गोंधळ उडण्याची शक्यता नाही. इथले सगळे जगणे आणि वागणे व्हिडीओ गेमप्रमाणे अतिहिंस्र बनत राहते. यातील अकान या खलनायकाला गुरुत्वाकर्षण शक्तीवर ताबा मिळविण्याचे अन् तिचे रूपांतर करण्याचे कौशल्य आहे. त्याच्या करामती चित्रपटात थोडय़ाच असल्या, तरी त्या पुरत्या लक्ष वेधून घेतात. जादूगाराप्रमाणे निव्वळ हाताच्या हालचालींवर समोरच्या व्यक्तीला, वस्तूला उचलून त्याचे हत्यारात रूपांतर करण्याचे हे कसब हेन्रीच्या विरोधातही वापरण्यात येते. मात्र त्यातूनही हेन्री नायक म्हणून नाही, तर जिमीच्या मदतीमुळे निसटतो. पण पुढे हा पाठलाग आणि मारधाड व्हिडीओ गेमने निर्धारित केलेल्या आपल्या समजुतींनुसार चालत नाही.
चित्रपटाबद्दल पहिला प्रश्न असा पडू शकतो, की नायकाला चेहरा नसताना, नायक पारंपरिक हीरोछापाच्या गोष्टी करीत नसताना दीड तासांहून अधिक काळ प्रेक्षकाला गुंतवण्याची शक्यता दिग्दर्शकाने कशी निर्माण केली असेल? वर सांगितलेल्या अनेक चित्रपटांसारखा व्हिडीओ गेमचा परिणाम असला, तरी हा चित्रपट पाहणारा प्रत्येक व्यक्ती व्हिडीओ गेमशी संलग्न असेलच असे नाही. त्यामुळे दिग्दर्शकाने सिनेमाभर हाणामारीत नवकल्पनांचा चमत्कार केला आहे. अत्यल्प कथानकामध्ये भावनांचा आभासात्मक खेळ राखत त्याने चित्रपट धावता ठेवला आहे. इथे निर्णायक प्रसंगी अकान किंवा अॅस्टेल या भवतालात असणाऱ्या टीव्ही-संगणकीय स्क्रीनवर आपोआप प्रगट होऊ शकतात. हेन्री आपल्या शरीरातील बॅटरी रिचार्ज करण्यासाठी कोणत्याही क्रूर खटपटी राबवू शकतो. (स्वत:ची शस्त्रक्रिया करण्याचा एक प्रसंगही यात आहे.) इथे बंदुकीतून निघणाऱ्या गोळ्यांची संख्या मानवी श्वासाच्या गतीला मागे टाकू शकते. अन् हे पाहताना व्हिडीओ गेमच्या अंतिम लेव्हलपर्यंत जाण्याची दिग्विजयी अवस्था िहसाचाराची कार्टूनिश आवृत्ती असली तरी प्रेक्षकाला अस्वस्थ करून सोडते.
पारंपरिक अॅक्शन सिनेमातील नायकी कर्तृत्वाच्या मागे न जाणाऱ्या हार्डकोअर हेन्रीमध्ये आजच्या मानवी आयुष्यातील भावनांना आलेल्या अनावर वेगावर रूपक करण्यात आले आहे. संगणकीय, मायाजालीय विश्वात रमण्यातून किंवा व्हिडीओ गेम्स खेळण्यातून आलेली मानवी अवस्था अधिक कोलाहलाची आणि अधिक विध्वंसकतेला अनुसरणारी बनली आहे. त्यामुळे हेन्रीच्या फक्त नि फक्त मारधाडीच्या वागण्याला स्पष्टीकरण आहे. हळूहळू आपले होत जाणारे यंत्रिकीकरण आपल्याला भविष्यात कोणत्या टोकाला नेऊ शकते, याचा एक ठोकळ अंदाज येथे आहे.
इथला दृश्य िहसाचार हा यापूर्वी आपण पाहिलेल्या कोणत्याही देणार आणि वेगवान चित्रपटांना मागे टाकेल इतक्या टोकाचा आहे. नात्यांच्या जटिलतेपासून लादलेल्या एकारलेपणाचा विस्फोट चित्रपटात दाखविण्यात आला आहे. अन् त्या नायकाच्या रूपाने दिग्दर्शकाने प्रेक्षकांसमोर आरसाच उभा केला आहे. आपल्याच मनात विविध प्रसंगांत उमटणाऱ्या भावनांचे प्रतििबब यांतील विविध घटनांमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला, तर कुणालाही चित्रपट प्रचंड आवडेल. फास्ट अॅण्ड फ्युरिअस छापाचे मनोरंजनाला ‘चार चाँद’ लावणारे सिनेमे पाहण्याची सवय असलेल्यांनादेखील यात खूप गोष्टी मिळतील. व्हिडीओ गेम्सच्या संकल्पनेला चित्रपटात जशास तशे यशस्वीरीत्या राबविण्याच्या प्रकारामुळे मात्र पुढील काळात अशा सिनेमांना वळण लावण्यात हार्डकोअर हेन्रीचा बराच मोठा वाटा असेल. ते होण्याआधी सध्या प्रयोगात अव्वल म्हणून आवर्जून दखल घ्यावी असा हा चित्रपट आहे.
पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com