विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com
सर्वत्रच मोडकळीस आलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, त्यामुळे रस्त्यावर खासगी वाहनांची वाढलेली गर्दी, वीजनिर्मितीबाबत आजही कोळशावर असलेलं अवलंबित्व, तेलशुद्धिकरणाचे प्रकल्प, शहरांभोवती उभे राहिलेले आणि नियम धाब्यावर बसवूनच चालवले जाणारे औद्योगिक पट्टे, वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी सुरू असलेली अपरिमित बांधकामं, वर्षांगणिक वाढतच जाणाऱ्या उकाडय़ात दिलासा म्हणून अपरिहार्य ठरलेली वातानुकूलन यंत्रं, ‘युज अॅण्ड थ्रो’च्या जमान्यात साचत जाणारा घनकचरा, त्याच्या व्यवस्थापनात नापास झालेल्या पालिका आणि त्यामुळे कचराभूमींवर धगधगणारे ढिगारे, अग्निसुरक्षेचे नियम न पाळता उभारले जाणारे आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारे इमले, वर्षांनुवर्ष जनजागृती करूनही दर दिवाळीत फोडले जाणारे वारेमाप फटाके.. विकासाच्या भ्रामक कल्पनांच्या धुरात शहरं घुसमटू लागली आहेत. दिल्लीतलं प्रदूषण हा नेहमीच देशभर चर्चेचा मुद्दा ठरतो, पण १५ नोव्हेंबरला प्रदूषणात मुंबईने दिल्लीलाही मागे टाकलं. हे सध्या जरी तात्पुरतं संकट वाटत असलं, तरीही त्याकडे आजच गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. दिल्ली प्रदूषणामुळे टाळेबंदीच्या उंबरठय़ावर उभी असताना मुंबईने आणि महाराष्ट्रातील अन्यही महत्त्वाच्या शहरांनी आजच यातून धडा घ्यायला हवा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा