छायाचित्र – श्याम मणचेकर
छायाचित्रण या कलेला ललित कलेच्या अगदी निकट आणून ठेवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये श्याम मणचेकर यांचा समावेश होतो. प्रस्तुत छायाचित्रात एका झाडाच्या खोडावर आलेले शेवाळे मणचेकर यांनी टिपले आहे. ते अतिशय निकट जात टिपल्याने त्याचे बारकावे त्यात नेमके आले असून ते एखाद्या अमूर्त चित्राप्रमाणेच भासमान होते. कोणत्याही अमूर्त चित्राचे सर्व निकष या चित्रणालाही तेवढेच लागू होतात. जे समोर दिसते ते टिपणारे, असे म्हणून आजवर अनेकदा छायाचित्रणाला चित्र या ललित कलेपेक्षा कमी लेखले गेले. मात्र कॅमेऱ्यामागची कलात्मक नजर कलावंत कोण ते ठरवते, हे मणचेकर यांच्यासारख्या छायाचित्रकारांनी दाखवून दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा