लेह-लडाखचे निसर्गसौंदर्य म्हणजे छायाचित्रकारांसाठी पर्वणीच. हिवाळ्यात येथील बर्फाच्छादित डोंगररांगाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
त्या वेळेस असलेल्या उणे २२ अंशामुळे येथील धबधबेदेखील गोठून जातात. अशा निसर्गशिल्पाचे छायाचित्रण करायचे असेल तर आपल्याला देखील त्याच हाडे गोठणाऱ्या तापमानात बाहेर पडावे लागते. अशा थंडीत कॅमेऱ्यावर हात ठरत नाही, कधी कधी कॅमेरादेखील काम करेनासा होतो. गोठलेल्या धबधब्याचे सारे बारकावे टिपायचे असतील तर त्यासाठी ट्रायपॉड अत्यावश्यक असतो.
छायाचित्र : विवेक नागवेकर
क्लिक
लेह-लडाखचे निसर्गसौंदर्य म्हणजे छायाचित्रकारांसाठी पर्वणीच. हिवाळ्यात येथील बर्फाच्छादित डोंगररांगाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
First published on: 09-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व क्लीक क्लीक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Click