कच्छमधील विराणे गावाजवळील चराली या लुप्त झालेल्या नदीचा हा फोटो आहे. गावातील जुन्याजाणत्या मंडळींच्या म्हणण्यानुसार ही नदी हजारो वर्षांपूर्वीच लुप्त झाली आहे. समोर दिसणारा खडक हा एके काळी नदीपात्रात मध्यावर होता. नदीच्या प्रवाहाचा खडकावरील परिणाम छायाचित्रात जाणवतो आहे. त्यावर दिसणारा पांढरा थर म्हणजे कॉस्टिक सोडय़ाचा अंश आहे. सर्वसाधारणपणे जानेवारी महिना हा येथे भेट देण्यास योग्य काळ आहे. छायाचित्रकार : विवेक नागवेकर

Story img Loader