कॉम्प्युटरमध्ये शिरणारे व्हायरस ही अनेकांची डोकेदुखी असते. हे व्हायरस कॉम्प्युटरमध्ये का येतात, कसे येतात, ते कसे घालवायचे कसे आणि ते येऊच नयेत यासाठी काय करायचे याविषयी-
व्हायरस म्हणजे नेमके काय, याचं उत्तर द्यायचं झालं तर ज्याप्रमाणे संगणकात विविध क्रिया करण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स डिझाइन केले जातात त्याचप्रमाणे व्हायरस हादेखील एक छोटासा सॉफ्टवेअर प्रोग्रामच असतो, पण हा प्रोग्राम आपल्यासाठी डोकेदुखी ठरतो. खरं तर बायोलॉजिकल व्हायरस आणि संगणकाचा व्हायरस हे जुळे भाऊ असावेत. कारण दोघेही जवळपास सारखीच कामं करतात. विविध रोगांच्या व्हायरसप्रमाणेच कॉम्प्युटर व्हायरसही स्वत:ला रेप्लीकेट करण्याची क्षमता राखतो व अगदी कमी वेळात संपूर्ण संगणकात पसरून आपल्या क्षमतेनुसार नुकसान करू शकतो, तुमच्या संगणकावरील महत्त्वाच्या फाइल्स डीलीट करणे, त्यात काहीही बदल करून त्यांना निकामी करणे, तुमची पर्सनल इन्फोर्मेशन (उदा. तुमचा पासवर्ड) एखाद्याला पुरविणे, तुमच्या आय डीवरून कॉन्टॅक्ट लीस्टमधील व्यक्तींना मेल पाठविणे, काही व्हायरस तर तुमची हार्डडीस्कच करप्ट करू शकतात.
अशा विध्वंसक प्रोग्राम्सची निर्मिती कोण करतं?
सर्वसामान्यांना हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण स्वत:चा खप वाढावा म्हणून अनेक अॅन्टिव्हायरस कंपन्याच व्हायरसची निर्मिती करतात किंवा एखाद्या मोठय़ा कंपनीतील काही खासगी गोष्टी चोरण्यासाठी हॅकर्स असे प्रोग्राम्स बनवितात असे अनेक तर्कवितर्क आहेत, पण निश्चित उत्तर कुणाकडेच नाही. व्हायरसचा इतिहास गमतीशीर आहे. रीच नावाच्या १५ वर्षांंच्या मुलाने १९८२ साली एल्क क्लोनर नावाचा एक प्रोग्राम गंमत म्हणून गेम्समधून पसरविला ज्यानुसार गेमच्या पन्नासाव्या वापरानंतर अचानक स्क्रीन ब्लॅन्क व्हायची आणि रीचने लिहिलेली व्हायरसवरची कविता दिसायची. या गमतीतून व्हायरस नावाचा भयंकर प्रकार जन्माला येईल असा विचार खुद्द रीचने पण केला नसेल. सध्या अनेक प्रकारचे व्हायरस इंटरनेटवर घात लावून बसलेले असतात. इंटरनेटवरून डाउनलोड करताना योग्य ती काळजी न घेतल्यास, अपरिचीत व्यक्तीचे मेल्स डायरेक्ट ओपन केल्यास, मध्येच स्क्रीनवर येणाऱ्या जाहिरातींची खात्री केल्याखेरीज त्यावर क्लीक केल्यास व्हायरस तुमच्या संगणकात येण्याची दाट शक्यता असते. त्याशिवाय तुमच्या संगणकाला सपोर्ट न करणारे अॅप्लीकेशन्स जास्त काळ राहिले तरी त्यामुळे काही फाइल्सना धोका पोहचू शकतो.
व्हायरसचे प्रकार कोणते?
व्हायरसचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात, याचं मुख्य कारण म्हणजे दिवसागणिक व्हायरसच्या आणि ते बनविणाऱ्यांच्या संख्येत होत जाणारी वाढ. व्हायरसचे प्रकार हे तो व्हायरस संगणकाच्या कोणत्या भागावर परिणाम करतो यावर अवलंबून असतात. त्यातील काही मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे.
१. बुट व्हायरस : या प्रकारचा व्हायरस हा थेट जाऊन संगणक सुरू करणाऱ्या प्रोग्रामवरच हल्ला करतो आणि तेथेच रेप्लीकेट होतो. ज्यामुळे या प्रोग्राम्समधील काही फाइल्स खराब होऊन तुमचा संगणक सुरू होतानाच अडचणी निर्माण होतात. आणि मग तो सुरू झाल्यावर हा व्हायरस संपूर्ण संगणकात पसरतो आणि नुकसान करतो. उदा. टकीला नामक व्हायरस हा बुट व्हायरस वंशातील व्हायरस आहे. यामुळे तुमच्या हार्ड डीस्कला नुकसान पोहचू शकते.
२. मॅक्रो व्हायरस:- या प्रकारचे व्हायरस हे मुख्यत: नेहमी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर्सवर परिणामकारक असतात. उदा. मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेलशीट इ. यामुळे लिहिताना आपोआप जास्त स्पेस सोडली जाणे, आपोआप संगणक काहीही लिहिणं अशा चमत्कारिक घटना घडतात. इतर व्हायरसपेक्षा हा व्हायरस तुलनेने कमी घातक ठरतो. लव्ह बगसारखे व्हायरस या प्रकारात मोडतात.
३. वर्म:- हा प्रकार खरं तर एक प्रकारचा घातक प्रोग्राम असतो, याचं कामही व्हायरससारखंच असतं; फक्त स्वरूप जरा वेगळं असतं. म्हणजे वर्म एक असा प्रोग्राम जो अगदी जलद रेप्लीकेट होऊन लगेच संपूर्ण सिस्टिममध्ये पोहचतो. याला पसरण्यासाठी कोणत्याही पॅरेन्ट प्रोग्रामची गरज नसल्याने हा लवकरच तुमचा संगणक आपल्या ताब्यात घेतो. यामुळे तुमचा संगणक अतिशय संथ गतीने चालू लागतो, कोणत्याही फाइल्स तुमच्या परवानगी शिवाय डिलीट होतील. १९९९ साली आलेला मेलीस्सा हा वर्म टाइप व्हायरस स्वत:ला ईमेलशी जोडून आपोआप तुमच्या कॉन्टॅक्टलीस्ट मधल्यांना मेल पाठवायचा. अशा प्रकारच्या व्हायरसमुळे मोठय़ाप्रमाणावर नुकसान होऊ शकते.
४. ट्रोजन:- ‘काहींचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे वेगळे’ ही म्हण ट्रोजनला तंतोतंत लागू पडते ‘बेस्ट कॉम्प्युटर गेम’ असे लिहिलेली एखादी विंडो येते आणि ती डाउनलोड केल्यावर आपल्याला समजते की हा कोणताही गेम नसून ट्रोजन आहे, आणि मग तुमच्या संगणकावरील महत्त्वाच्या फाइल्स एक एक करून गायब होऊ लागतात. यामुळे तुमच्या सिस्टमवर सेव्ह केलेला पासवर्ड हा व्हायरस पाठविणाऱ्याच्या मेल आयडीवर मेल केला जाऊन सिस्टम हॅक होऊ शकते. याशिवाय सीडी ड्राइव्ह आपोआप उघडणे, संगणक आपोआप रिस्टार्ट होणे ही काही ट्रोजनची लक्षणे आहेत. व्हायरस, वर्म आणि ट्रोजन यांतील मुख्य फरक म्हणजे ट्रोजन स्वत:ला रेप्लीकेट करू शकत नाही.
५. पॉलिमॉर्फिक व्हायरस:- ‘डॉन को पकडना मुश्कील ही नही नामुमकीन है’ या व्हायरस प्रकारात डॉन मानला जाणारा व्हायरस म्हणजे पॉलिमॉर्फिक व्हायरस. हा व्हायरस एखाद्या फाइलला इन्फेक्ट करतो आणि पुढील फाइल इन्फेक्ट करण्यापूर्वी आपले रूप बदलतो ज्यामुळे बहुतेकदा याला अॅन्टिव्हायरस पकडूच शकत नाही, शिवाय इतर व्हायरसेसप्रमाणे सिस्टम बंद पाडण्याची ताकद याही व्हायरसमध्ये असते.
याशिवाय रूटकीट्स, लॉजिक बॉम्ब, स्पायवेअर असे अनेक प्रकारचे व्हायरस इंटरनेट सर्फिग करताना आपल्याला भेटू शकतात.
व्हायरसचा संगणकावर
होणारा परिणाम?
बरेचसे व्हायरस हे सी ड्राइव्हवर हल्ला करीत असल्याने काही महत्त्वाच्या फाइल्स करप्ट होऊन संगणक चालू होण्यात अडचणी निर्माण होतात, चालू झाल्यानंतरही आयकॉन दिसायला लागल्यावरही बराच वेळ संगणक काहीच प्रतिसाद देत नाही. बऱ्याचदा व्हायरसमुळे संगणक सारखा सारखा हँग होतो व आपोआप रिस्टार्ट होतो, सारखे एररचे मेसेज डिस्प्ले होणं, तुम्ही कधीही न टाकलेल्या फाइल्स किंवा आयकॉन डेस्कटॉपवर दिसू लागणे हीदेखील व्हायरसचीच काही लक्षणे आहेत. काही व्हायरस तुमचे अॅन्टिव्हायरस प्रोग्राम आपोआप डिसेबल करतात, ट्रोजनसारख्या व्हायरसमुळे तुमची हार्डडीस्क आपोआप रीफॉरमॅट होण्याचा धोका असतो. जर व्हायरसवर योग्य वेळी लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त केला नाही तर हार्डवेयरलाही हानी पोहचून संगणक निकामी होऊ शकतो.
व्हायरसवर उपाय काय..?
१. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुमच्या संगणकात अॅन्टिव्हायरस प्रोग्राम घालून घेणे. हा प्रोग्राम तुमच्या संगणकातील व्हायरस ओळखून त्यांना नाहीसं करतो, अॅन्टिव्हायरस प्रोग्राम कोणताही अनाहूत कोड तुमच्या संगणकात कॉपी होण्यापासून व इतरांना तुमची सिस्टम हॅक करण्यापासून वाचवितो.
२. तुमचे इंटरनेट कनेक्शन फायरवॉल हा प्रोग्राम वापरून आधी सिक्युअर करा व मगच सर्फिग करा बहुतांशी विंडोजच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये फायरवॉल प्रोग्राम अंतर्भूत केलेलाच असतो फक्त २३ं१३-ूल्ल३१’ स्र्ंल्ली’-ऋ्र१ी ६ं’’ मध्ये जाऊन ते ऑन असल्याची खात्री करून घ्यावी ज्यामुळे सर्फिग करताना व्हायरस येण्याची शक्यता कमी होते.
३. तुमचा अॅन्टिव्हायरस प्रोग्राम नियमितपणे अपडेट करत राहा, शक्य असल्यास ऑटोमॅटिक अपडेटिंग प्रोग्राम सेट करा. ज्यामुळे दर दिवशी नवनवीन येणाऱ्या व्हायरसपासून संरक्षण मिळू शकेल.
४. व्हायरस आल्यावर त्यावर उपाय करण्यापेक्षा तो येण्याआधीच त्याला रोखलेले बरे असते म्हणून कोणताही पेन ड्राइव्ह संगणकाला जोडण्याआधी स्कॅन करून घ्या, त्याचप्रमाणे कोणताही मेल उघडण्यापूर्वीही काळजी घ्या, अनोळखी व्यक्तींचे मेल उघडताना विशेष काळजी घ्या. कोणतेही गाणे, व्हीडिओ, सॉफ्टवेअर डाउनलोड करताना खात्रीलायक साइटवरूनच डाउनलोड करा.
५. साऱ्या उपायाअंती व्हायरस आलाच तर लवकरात लवकर सी ड्राइव्हमधील महत्त्वाच्या फाइल्स सुरक्षित ठिकाणी कॉपी करून घ्या व नेहमी शक्य तेवढय़ा गोष्टींचा बॅकअप ठेवा.
६. व्हायरस आला म्हणून सारखा सारखा संगणक फॉरमॅट मारणे चुकीचे असते त्यामुळे हार्डडीस्क निकामी होण्याची दाट शक्यता असते.
७. तुमच्याकडे अगदी अपडेटेड अॅन्टीव्हायरस नसेल व तुमच्या सिस्टममध्ये ट्रोजनसारखे व्हायरस आल्याच लक्षात आल्यास, ँ३३स्र्://६६६.२ूंल्ल६्र३ँ.ूे/६िल्ल’ं/िउेुा्र७.ँ३े वरील उेुा्र७ या सॉफ्टवेअरच्या सेटिंग मोफत डाउनलोड करून संपूर्ण संगणक स्कॅन करून व्हायरस फ्री करू शकता, पण त्याआधी आपल्याकडील उपलब्ध अॅन्टिव्हायरस डिसेबल करायला विसरू नका.
सर्वोत्तम अॅन्टिव्हायरसची निवड कशी करावी?
बाजारात सध्या अनेक अॅन्टिव्हायरस प्रोग्राम उपलब्ध असतात, पण सगळेच चांगले असतीलच असे नाही. चांगल्या अॅन्टिव्हायरस प्रोग्रामच्या काही सारख्या गोष्टी पुढे देत आहोत. अॅन्टिव्हायरस घेण्यापूर्वी पुढील गोष्टींची खात्री करून घ्यावी.
१. रियल टाइम स्कॅनिंग : चांगल्या अॅन्टिव्हायरसमध्ये रियल टाइम स्कॅनिंग असणे अत्यावश्यक आहे; ज्यामुळे तुम्ही सर्फिग करीत असताना अॅन्टिव्हायरस सर्व प्रोग्राम व फाइल्स सुरक्षित असल्याची खात्री करून घेतो व तेही तुम्ही त्या फाइल्स उघडण्यापूर्वी.
२. तुमच्या अॅन्टिव्हायरस प्रोग्राममध्ये संशयास्पद फाइल्स शोधून त्यांवर योग्य ती कारवाई करण्याची क्षमता असली पाहिजे.
३. आजच्या घडीला प्रत्येक मिनिटाला व्हायरसच्या यादीत वाढ होत असते. त्यामुळे तुमचा अॅन्टिव्हायरस अॅटोमॅटिक अपडेट्स मिळविणारा व लवकर अपडेट होणारा असावा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळी जास्तीत जास्त सुरक्षेची हमी असते.
४. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अॅन्टिव्हायरस खिशाला परवडणारा असावा. बहुतेक लोक महागातला अॅन्टिव्हायरस विकत घेतात, पण प्रत्येक महागातला अॅन्टिव्हायरस खात्रीलायक असतोच असं नाही. त्यामुळे खिशाला परवडेल व सर्वाधिक सुरक्षेची हमी देणारा अॅन्टिव्हायरस निवडायला हरकत नाही.
तुमच्या संगणकाची व्यवस्थित काळजी घेतल्यास व त्याला व्हायरसपासून वाचविल्यास संगणक देवता तुमच्यावर प्रसन्न होऊन चार वर्षे जास्त आयुष्य जगेल..
जाहिरातींचा हैदोस
अॅडवेअर:
सध्या एक नवीनच समस्या अनेकांना फार मोठय़ा प्रमाणावर सतावत आहे, ती म्हणजे संगणकावर इंटरनेट सìफग करताना विनाकारण येणाऱ्या जाहिरातींची. प्रत्येक वेळी उघडणाऱ्या नवीन पेजसह नवनवीन जाहिराती आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर आपल्याला दिसत असतात. या जाहिराती इतक्या मोठय़ा प्रमाणात आपल्या कामात व्यत्यय आणतात की संगणकावर काम करणे कठीण होऊन बसते. बऱ्याचदा अश्लील जाहिराती घालविण्यासाठी स्क्रीनच्या विशिष्ट भागावर क्लिक केल्याखेरीज त्या जाहिराती जात नाहीत. या अशा प्रकारे काम करणाऱ्या सॉफ्टवेअर्सना अॅडवेअर म्हणतात. आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर सतत जाहिरातींचा मारा करणं व व्यक्तीला त्यांच्या वेबसाइटवर घेऊन जाणं हे उद्दिष्ट या प्रोग्राम्सचे असते. इतर मालवेअर्सप्रमाणे हे सॉफ्टवेअर फारशी इजा करीत नसले तरी मालवेअर्स मध्येच गणले जातात.
सुटका कशी कराल-
१. सर्वप्रथम आपल्या संगणकातील कुकी फाइल्स वेळोवेळी डिलीट करीत राहाव्यात.
२. ँ३३स्र्२://ुिं’ू‘स्र्’४२.१ॠ या वेबसाइटला भेट द्या व यावर उपलब्ध असणारं ुिं’ू‘स्र्’४२ हे मोफत सॉफ्टवेअर वेब ब्राउझरसह वापरावे. या विनाकारण जाहिरातींपासून सुटका मिळू शकते.
स्पायवेअर:
अनेकदा या जाहिराती दिसण्याचे कारण स्पायवेअरही असू शकते. स्पायवेअर असे प्रोग्राम्स असतात, जे एखाद्या सॉफ्टवेअरसोबत अचानक आपल्या संगणकात शिरकाव करतात आणि आपल्या स्क्रीनवर सतत जाहिराती दाखविणे, आपला यूजर आयडी आणि पासवर्ड हॅकपर्यंत पोहोचविणे, आपला ईमेल आयडी वापरून इतरांना स्पॅम मेल पाठविणे, आपला संगणक बंद पाडणे, अथवा इंटरनेट आणि संगणकाचा वेग मंदावणे अशा अनेक करामती करू शकतात. त्यांना नष्ट करण्यासाठी स्पायबॉट नावाचे एक मोफत सॉफ्टवेअर अतिशय गुणकारी ठरू शकते. ँ३३स्र्://२स्र्८ु३-२ीं१ूँ-ीि२३१८.ील्ल.२ऋ३ल्ल्रू.ूे येथे हे सॉफ्टवेअर आपणास सहज उपलब्ध होऊ शकते.