वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक कार्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत. ५० टक्के कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावं असं सुचवण्यात आलं असून अनेक आस्थापनांनी त्याची कार्यवाही केली. देशभरात ते २० मार्चपासून सुरू झालेलं असलं तरी युरोपीय देशांमध्ये ते गेल्या १० मार्चपासूनच सुरू आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातलं कामाचं स्वरूप पाहता त्या मंडळींना अशा पद्धतीने काम करण्याची सवय आहे. मात्र बाकीच्यांना तशी सवय नाही. जिथे थेट उत्पादन घेतलं जातं अशा आस्थापनांमध्ये तर ते शक्यही नाही. तरी सध्याच्या परिस्थितीत ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरून काम करणं या संकल्पनेमुळे नेमकी काय परिस्थिती आहे याबाबतचे अनुभव भविष्यासाठी महत्त्वाचे ठरतील, त्याचा एक प्रातिनिधिक आढावा.

फायदेही आणि अडचणीही

पुण्यात राहणारे ऋषिकेश खोपटीकर हे आयटी कंपनीत काम करतात. त्यांनी वेगळ्या कारणांमुळे यापूर्वी घरून काम केलं आहे. पण आता करोनामुळे त्यांच्या कंपनीने २० मार्चपासून घरून काम करण्याची मुभा दिली. ऋषिकेश सांगतात, सध्या घरूनच काम करत असल्यामुळे जाण्यायेण्याचा वेळ वाचतो, श्रम वाचतात. काम करण्याची उर्जा टिकून राहते आहे. सर्वानाच याप्रकारे फायदा होऊन आपापल्या कामात चांगलं आऊटपुट देता येईल. घरून काम करत असल्यामुळे ऑफिसला पोहोचायला उशीर झाला वगैरे प्रकार कुणाच्याच बाबतीत होऊ शकत नाहीत. शिवाय ज्या ग्राहकांसोबत काम करतो, त्यांच्या टाइम झोनशी जुळवून घेऊन काम करणं शक्य होतं. उदाहरणार्थ सिंगापूरची कंपनी असेल तर ते आपल्या पूर्वेला असल्यामुळे अडीच तास आपल्यापुढे आहेत. त्यांचा हा ‘टाइम ओव्हरलॅप’ जुळवून घेणं आता अधिक सोपं झालं आहे. कंपन्यांना घरी बसून लोक काम करतील की नाही ही भीती बाळगण्याची गरज नसते. कारण लोकांच्या लॉगिननुसार त्यांच्या कामावर लक्ष ठेवता येतं. सॅपियन्स आणि इतरही अनेक सॉफ्टवेअर्समुळेपण ते शक्य होतं. समोरासमोर बसून बोलणं, मीटिंग्ज करणं या वेगळ्याच गोष्टी आहेत. पण व्हिडिओ कॉल करून त्यांना पर्याय देता येतो आहे. अर्थात ऑफिसमध्ये वीज, इंटरनेटचं कनेक्शन या गोष्टी अखंड असतात. घरी त्यामध्ये अडथळा येऊ शकतो. अर्थात सध्याच्या परिस्थितीत सर्व ग्राहक कंपन्यांना त्याची कल्पना आहे. शिवाय तुम्ही तुमच्या कामातून विश्वास निर्माण केलात की तुमच्या अडचणीही समजून घेतल्या जातात.

ऑफिसमध्ये असताना खायची वेळ झाली, सगळेजण उठले, त्यामुळे चला आता आपणही खायला हवं असं व्हायचं. आता घरी भूक लागल्यावरच खाल्लं जातं. पण हेच पीअर प्रेशर ऑफिसच्या कामाच्या बाबतीत फायद्याचं ठरतं. एखाद्याला एखादी गोष्ट लक्षात येत नसते, दुसऱ्याला ती माहीत असते. एकमेकांशी समोरासमोर बोलण्यातून पटकन तो प्रश्न सोडवला जातो किंवा दोघे बोलत असताना तिसरा ऐकतो आणि मला हे माहीत आहे, मी याआधी हाताळलंय असं म्हणून पटकन सोडवून देतो. कोणतीही गोष्ट एकटय़ाने शिकण्यावर मर्यादा येतात. पण ती ‘पीअर लर्निग’मधून चांगल्या पद्धतीने समजते.

घरून काम करण्यातली अडचण म्हणजे बहुतेकांची घरं लहान असतात. घरात लहान मुलं, वृद्ध माणसं असतात. घरून काम करणारी माणसं एखादी खोली अडवून बसली, त्यांचे कॉन्फरन्स कॉल सुरू झाले की इतरांच्या हालचालींवर मर्यादा येतात. घराच्या परिसरात बांधकामं, दुरूस्तीची काम सुरू असतात. वाहनांची ये-जा सुरू असते. या सगळ्याचे खूप आवाज येत असतात. सगळ्यांकडे घरी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असतोच असं नाही. एखादा असतो आणि घरून काम करणारे अधिक झाले तरी अडचण येते. अर्थात यावर सध्याच्या परिस्थितीत कंपन्यांनी लॅपटॉप देणं किंवा डेस्कटॉप देणं हा मार्ग काढला आहे. पण दुसरीकडे सगळ्यांच्याच घरात ब्रॉडबॅण्ड असतं असंही नाही, त्या जोडणीचीही अनेकदा शाश्वती नसते. अधूनमधून नेटवर्क जात राहतं. नेटवर्कचा वेग कमी असतो. ऑफिसमधून काम करताना वेळ संपली की आता बाकीचं उद्या येऊन बघतो, आता कॅबची वेळ झाली असं सांगता यायचं. आता तसं सांगता येतं नाही. अर्थात घरून काम करताना हवा तेव्हा ब्रेकही घेता येतो.

दुसऱ्या महायुद्धापूर्वी महिला घरीच असत. पण पुरूष युद्धावर गेले आणि सर्व सार्वजनिक व्यवस्था चालविण्यासाठी स्त्रियांना रस्त्यावर उतरावं लागलं. टूथपेस्टमधून काढलेली पेस्ट त्या टूथपेस्टमध्ये परत घालता येत नाही, तसंच एकदा घराबाहेर पडलेल्या महिला परत घरात बसणं शक्य नव्हतं. तसंच आता एकदा घरून काम हे मॉडेल नीट होतं आहे असं लक्षात आलं तर त्याचं प्रमाण वाढण्याचीच शक्यता आहे. आयटी क्षेत्रात आधीच ‘अंतर्गत फ्री लान्सिंग’ सुरू आहे. (एकाच कंपनीमध्ये ठरलेल्या नियत विभागाबरोबरच इतर विभागांसाठीही काम करताना त्याचा स्वतंत्र मोबदला मिळतो, याला ‘अंतर्गत फ्री लान्सिंग’ म्हणतात) घरून काम करणं या मॉडेलमुळे ते वाढण्याची शक्यता आहे.

व्हच्र्युअल क्लासरूम

एनएमएमसी कॉलेजच्या दूरशिक्षण विभागाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या नाईक वयाच्या सत्तरीतही दूरशिक्षण विभागातील मुलांना शिकवतात. ही मुलं नोकऱ्या करून शिकत असल्यामुळे त्यांची लेक्चर्स आठवडय़ातून दोनतीन दिवसच असतात. त्यातही करोनामुळे सगळं बंद असल्यामुळे ती बुडली तर मुलांची अडचण होईल म्हणून डॉ. विद्या नाईक यांनी ऑनलाईन वर्ग घेतले. यापूर्वीही त्यांनी अशी लेक्चर्स घेतलेली असल्यामुळे त्यांना हे तंत्रज्ञान माहीत होतं. झूम या अपचा वापर करून त्यांनी व्हच्र्युअल क्लासेस घेतले. त्यांच्या कोर्सचे सगळे विद्यार्थी नोकरी करणारे असल्यामुळे त्यांनी ते रात्री नऊ ते दहा घेतलं. व्हिडिओवर सगळी मुलं दिसल्यावर त्याचा एक स्क्रीन शॉट घेऊन मॅडमनी लेक्चर संपल्यानंतर त्यांची उपस्थिती नोंदवली. हा व्हच्र्युअल वर्ग एरवीच्या खऱ्या वर्गासारखाच असतो. वर ते लेक्चरची मुलांना रेकॉर्डेड फाइलही मिळू शकते.

एकुणात काय तर वर्क फ्रॉम होम सध्या सुरू असलं तरी कंपन्यांना हे सुरळीत चालतंय हे लक्षात आलं तर काय, अशी भीती अनेकांना आहे. काहींची त्यामुळे तारांबळ उडालेली आहे, काहींचं काम वाढलंय, काहिंना म्हणजे खास करून महिलांना एकाच वेळेस अनेक गोष्टी हाताळाव्या लागत आहेत. या योजनेत जशी सोय आहे, तशाच अडचणीही आहेत. करोनाचे संकट टळले की, त्यानंतरच्या सहा महिन्यांत कंपन्या काय करतात त्यावर याचे परिणाम जाणवतील, असे अनेकांना वाटते आहे.

ऑफिस हेच वर्कप्लेस

अंजली कलभंडे पोलंडमधील सायलेशियातील कातोविच शहरात त्यांचे पती संदीप कलभंडे यांच्यासह राहतात, दोघेही सीए आहेत. त्या एका स्टील कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांचं काम प्रामुख्याने संगणकाशीच संबंधित असल्यामुळे त्यांना घरून काम करणं सहज शक्य झालं. त्या म्हणतात, गेले दोन आठवडे घरूनच काम करते आहे. सकाळी साडेआठ वाजता टीमचा कॉन्फ रन्स कॉल होतो आणि दिवसभराचा प्लान ठरतो, त्यातच आदल्या दिवशीच्या कामाची उजळणीही होते. त्यामुळे कामात फारसा फरक पडला नाही. पण तरीही ऑफिसमध्ये असताना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची आपोआप माहिती मिळते, ती घरी बसून होत नाही. कॉफी कॉर्नर्सवर, लंच अवर्समध्ये गप्पांमधून इतर गोष्टी कळतात, त्या घरी बसून कळत नाहीत. चॅटिंगमुळे थोडय़ाफार इतर गोष्टी कळतात मात्र त्यांना मर्यादा येतातच. त्याउलट घरून काम विस्कळीत पद्धतीनं होतं, पण अधिक वेळ काम केलं जातं. घरून काम करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तयार होऊन ऑफिसला जावं लागत नाही. छान तेल बिल लावून, केसाची वेणी घालून घरातल्या कपडय़ांमध्येच मांडी घालून कामला बसता येतं! पण हे फायदेशीर आहे असं कंपन्यांना वाटलं तर करोनानंतरच्या काळातही घरून काम करण्याचं प्रमाण फार वाढेल असं मला वाटत नाही. कारण लीडर्स, मॅनेजर्सवर काम वेळेत पूर्ण करण्याचा अतिरिक्त ताण  येतो आहे. शिवाय अशी अनेक कामं आहेत जी केवळ ऑफिस मधूनच करता येणं शक्य आहे, त्या कामांची समस्या मोठीच जाणवते आहे. मी किंवा पती संदीप पांढरपेशा व्यवसायात आहोत म्हणून आम्हाला घरून काम करणं शक्य आहे. शिवाय इथे इंटरनेटही अखंड चांगल्या वेगात उपलब्ध आहे. म्हणजे ६० ते ७० टक्के पोलिश लोक घरूनच काम करत असले तरी नेटच्या वेगावर परिणाम झालेला नाही. संदीप ज्या कंपनीत काम करतो ती दक्षिण इटलीमध्ये आहे. तिथे परिस्थिती अजूनतरी उत्तर इटलीसारखी नाही, लॉक डाउन आहे पण गरजांसाठी आणि कामावर जाण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांकडून परवानगीचे पत्र घेऊन लोक कामावर जाऊ शकत आहेत. त्या म्हणतात, इथले लोक खूप घाबरले आहेत. परंतु ते सरकारी आदेशांचे फार काटेकोर पालन करतात. सुदैवाने पोलंड मध्ये पॅनिक खरेदी नाही. अजूनही नित्योपयोगी वस्तू दुकानांमधून मिळतात, आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. (म्हणजे टॉयलेट पेपर्सवरून मारामारी होईल अशी परिस्थिती नाही) सीमा सील केल्यामुळे ट्रक्सद्वारे आयात केल्या जाणाऱ्या मालासाठी ट्रक्सच्या मोठय़ा रांगा सीमाभागात लागल्या आहेत. रस्त्यावरची वर्दळ ८० टक्के कमी झाली आहे. वृद्धांच्या मदतीसाठी सरकारी पातळीवर काही योजना आखल्या जात आहेत. आमच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच स्त्रियांच्या मुलांना त्यांचे आजी-आजोबा सांभाळतात. माझ्या माहितीत असणाऱ्या सर्वानी ही मदत घेणं थांबवलं आहे. बहुतांश लोक घरून काम करत आहेत. दोन व्यक्ती एकमेकांमध्ये एक मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवून उभ्या राहतात. औषधांच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्ती, सुपर मार्केट्स मधील कॅशियर्स प्लास्टिक शिल्डच्या आडून काम करत आहेत. सर्व रेस्टॉरंट्स, शाळा गेले दोन आठवडे बंद आहेत. डॉक्टर्स शक्यतो फोनवरून रुग्णांशी बोलतात. माझा मुलगा नचिकेत कलभंडे, कॅनडामध्ये शिकतो आहे. तो आर्ट युनिव्हर्सटिीमध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षांला आहे. ऑनलाइन वर्ग सुरू झाल्याने त्याचा मित्रांशी असणारा थेट संवाद थांबला आहे. अनेक कल्पना संवादातून सुचू शकतात ते पूर्णपणे थांबलं आहे. शिक्षकांना काही शंका विचारायच्या असतील, मदत हवी असेल तर ईमेलवर अवलंबून राहावं लागत आहे. अन्यथा शिक्षक समोर असतील तर ते पटकन होऊ शकतं.

पती संदीप कलभंडे यांचं ऑफिस दक्षिण इटलीमध्ये आहे. ते गेले तीन आठवडे घरून काम करत आहेत. ते ज्या पोलाद कारखान्यासाठी  सीए म्हणून काम करतात, तो बंद करता येत नाही,  कारण तसं केलं तर त्यांचे फरनेसेस निकामी होतील. तिथे कामगार रोज कामाला जात असल्यामुळे बाकी ऑफिसमध्ये काम करणारे देखील कामावर जात आहेत. संदीप म्हणतात, पोलंडमध्ये घर असल्याने इथून कंपनीत अप-डाऊन करत असतो. इटलीमधले सध्याचे मृत्यूतांडव सर्वज्ञात आहेच. फेब्रुवारीत ते सुरू झाले तेव्हा आपण दक्षिण इटलीत असल्याने लोंबार्डीपासून हजार किमी दूर आहोत असे सुरूवातीला वाटले. थोडय़ाच दिवसांत हा भ्रम दूर झाला. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात मला घरून काम करायला सांगण्यात आले, त्यामुळे एक मार्चपासून मी घरी आहे. केवळ आयटी तंत्रज्ञानामुळे दूर राहून काम करणे शक्य आहे. बहुतांश संवाद इमेल्सवर तर मीटिंग्ज स्काईप, गोटूमीटिंग यासारख्या साधनांद्वारे होत आहेत. खरं सांगायचं तर हे तेवढं अवघड नाही, पण प्रत्यक्ष जागेवर हजर नसल्याचे परिणाम होतातच. मुख्य प्रवाहापासून तुटल्याची भावना होते. त्यातून सर्वजण इटालियन भाषेत बोलणारे. मध्येच इटालियन, मध्येच इंग्लिश यातून एरवीही  गोंधळ होत असतात, आता ते सगळं फोनवर होत असल्याने गोंधळात भर पडते. इटलीची परिस्थिती दारूण आहे, इथे कंत्राटी कामगार वर्ग मोठय़ा प्रमाणात आहे. सध्यातरी पोलंड मध्ये उत्पादन क्षेत्र बंद नाही. त्यामुळे मोठे आर्थिक दुष्परिणाम पोलंडमध्ये दिसत नाहीत. परंतु युरोप मात्र मोठय़ा आर्थिक संकटाच्या दाराशी उभा आहे हे नक्की.

वैयक्तिक वेळापत्रक बिघडलं

आयटीमध्ये काम करणारे जिग्नेश कर्णिक अ‍ॅमस्टरडॅमला राहतात. पण त्यांना दर आठवडय़ाला त्यांच्या प्रोजेक्टसाठी व्हिएन्नाला जावं लागतं. सोमवारी गेले की ते गुरूवारी अ‍ॅमस्टरडॅमला परत येतात. पण गेले दोन आठवडे ते घरातूनच काम करत आहेत. ते सांगतात, आयटीक्षेत्रात बहुतेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सवय असते. पण मीटिंग्ज सहसा समोरासमोर होतात. पण गेले दोन आठवडे त्याही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून होतात. सगळेच घरून काम करत असल्यामुळे बॅण्डविड्थची, कनेक्टिव्हिटीची समस्या अधूनमधून येते आहे. पण युरोपात सरकारने त्यावर काम केलं आहे. आपलं बॅण्डविड्थ कंपन्यांसाठी दिलं आहे. नेटफ्लिक्स वगैरेंनीही आपलं बॅण्डविड्थ या कामांसाठी दिलं आहे. त्यामुळे आता काम अधिक परिणामकारकपणे करणं शक्य झालं आहे.

सगळ्यांचं वैयक्तिक टाईमटेबल मात्र बिघडलं आहे. नवराबायको घरून काम करत आहेत. मुलंही घरीच आहेत. त्यामुळे स्लॉट ठरवून घेऊन काम सुरू आहे. म्हणजे एकाने लवकर उठून आपलं काम करायचं, त्या काळात दुसऱ्याने मुलांकडे बघायचं. पहिला मोकळा झाला की त्याने मुलांना बघायचं आणि दुसऱ्याने ऑफिसचं काम करायचं असं सुरू आहे. अनेक लोकांना सुट्टीदिवशीही काम करावं लागतं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू असताना मध्येच मुलं डोकावली तरी चालेल अशी मुभाही काही कंपन्यांनी दिली आहे. अर्थात मुलं घरी आहेत म्हणजे ती मोकळी नाहीत. त्यांचे व्हच्र्युअल वर्ग सुरू आहेत. त्यांनाही सकाळी नऊ ते दुपारी तीन ऑनलाइन रहावं लागतं. त्यांना गुंतवून ठेवायचं म्हणून दर तासाला काम दिलं जातं. त्यामुळे घरी राहून अभ्यास वाढलाय असं त्यांनाही वाटायला लागलं आहे. करोनानंतरच्या काळात घरून काम करण्याचं मॉडेल अनेक ठिकाणी अधिक प्रमाणात वापरलं जाईल अशी शक्यता आहे. पण इथे ऑस्ट्रियात मात्र ते वाढण्याची शक्यता कमी वाटते.