32-lp-prashant-dandekarएकदा एक आलिशान क्रूझ (जहाज) वादळात सापडते व लाटांच्या तडाख्याने उलटे होते. त्यामुळे क्रूझवर प्रवास करणारे अनेक धनाढय़ प्रवासी, समुद्रामध्ये गटांगळ्या खाऊ  लागतात. त्यातील एक धनाढय़ उद्योगपती, अर्धमेल्या स्थितीमध्ये एका निर्जन बेटाच्या किनाऱ्यावर वाहून येतो. त्या बेटावर घायपाताचे जंगल, केळीची व नारळाची झाडे, काटेरी निवडुंग यांचेच साम्राज्य दूरवर पसरलेले असते. विषारी सापांचे वास्तव्य असलेले बांबूचे बन व अणकुचीदार खडकांचे कातळदेखील त्या बेटाला अधिकच भयावह बनवत असतात.

वडिलोपार्जित संपत्तीमुळे धनाढय़ झालेल्या त्या माणसाचे आयुष्य, वादळाच्या एका तडाख्यामुळे, एका क्षणात भकास व आव्हानात्मक झालेले असते. भूक लागल्यावर तो धनाढय़ माणूस केळी तोडून भूक भागवायचा, तर नारळ फोडून पाण्याची तहान भागवायचा, सापांच्या भीतीमुळे व अणकुचीदार कातळामुळे पावले सोलवटून रक्तबंबाळ होतील या भीतीमुळे तो वाळूचा किनारा सोडून कुठेच भटकायचं नाही. दिवसा झोप आली की किनाऱ्यावरच तो निळ्या आकाशाखाली झोपायचा व रात्री चांदण्या मोजत जागायचा. जागा असताना समुद्रामध्ये कोणते जहाज दिसते का किंवा आकाशात विमान दिसते आहे का ते शोधायचा. हेतू हाच की इशारे करून कोणाच्या तरी नजरेस तो पडावा व त्याची तिथून सुटका व्हावी.

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
Female Chinese Tourist Miraculously Survives After Falling From Running Train In Colombo Chilling Videos
धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral
mp theft viral video
VIDEO : दुकानात चोरी करण्याआधी चोराने घेतले देवाचे आशीर्वाद, नंतर लॉकरमधील पैसे चोरून झाले पसार; घटना CCTV मध्ये कैद
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Senior citizens mobile phone stolen in front of Narayan Peth police post
नारायण पेठ पोलीस चौकीसमोर ज्येष्ठाचा मोबाइल चोरीला

चार महिने या माणसाचा हाच दिनक्रम असतो पण एके दिवशी समुद्रातून एक बांबूचा तराफा त्याच्या दिशेने येताना दिसतो. एक तरुण स्त्री तो तराफा वल्हवत असते. त्याला हे दृश्य बघून अत्यानंद होतो. प्रत्यक्षात ती मुलगी पण त्याच बुडालेल्या क्रूझमधील एक प्रवासी असते जी त्याच निर्जन बेटाच्या पलीकडील बाजूला वाहवत आलेली असते. पण गेल्या चार महिन्यामध्ये तिने या बेटावर आपले छोटेसे विश्व थाटलेले असते. पण याबद्दल त्या माणसाला काहीच माहीत नसते. तो माणूस त्या सुंदर मुलीला म्हणतो की, ‘तू भाग्यवान! तुला हा तराफा मिळाला जीव वाचवायला.’ त्यावर ती तरुणी म्हणाली, ‘अरे मीदेखील तुमच्यासारखीच अर्धमेली होऊन या बेटावर वाहवत आले होते. पण मी बांबू तोडले व घायपातापासून दोर वळले. दोरांनी घट्ट बांधून मी बांबूचा तराफा तयार केला. बांबूला नारळाची झावळी बांधून तराफ्यासाठी वल्हे बनविले. तू चल माझ्याबरोबर बेटाच्या दुसऱ्या बाजूला.’

तो माणूस त्या तरुणीबरोबर बेटाच्या दुसऱ्या भागावर जातो आणि जे बघतो त्याने थक्क होऊन जातो. त्या तरुणीने एक सुंदर घर बांधलेले असते. बांबूचे घर व झावळ्यांनी शाकारलेले छप्पर दुरून एकदम टुमदार दिसत असते. पिनाकोलाडा हे वेलकम ड्रिंक रम, अननस व नारळापासून बनते; पण या तरुणीने केळे व नारळ वापरून पिनाकोलाडा सारखेच ड्रिंक बनविण्याची कला अवगत केली होती. कातळामधून कालवं व खेकडे पकडण्यात पण ही तरुणी पटाईत झाल्याने, त्या तरुणीमुळे आज बऱ्याच दिवसांनी या धनाढय़ माणसाला जरा चमचमीत खाण्याचे व पिण्याचे सुख मिळाले. होते. दुर्दैवाला दोष न देता स्वयंपूर्ण बनलेल्या व सुखी जीवन जगणाऱ्या तरुणीचे, त्याला फार अप्रूप वाटले, तर आपण कोणतीही रिस्क न घेता हातावर हात ठेवून बसून राहिल्याचा त्याला पश्चात्ताप झाला.

आता हीच गोष्ट आपण करिअरमधील आव्हानांच्या दृष्टिकोनातून पाहू या.

अगदी असेच काहीसे अनुभव आपल्याला करिअरमध्ये येतात. करिअरमध्ये बॅड-पॅच येतो, तेव्हा काही जण हात-पाय गाळून बसतात व स्वत: यातून काही मार्ग काढण्याऐवजी ते दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करत समय वाया घालवत बसतात. याउलट काही जण मात्र विपरीत परिस्थितीतदेखील हिम्मत न हरता व उपलब्ध साधने व स्रोतांमधून आपल्याला हवे ते साध्य करून घेतात; कोणाच्याही मदतीवर अवलंबून न राहता स्वत: अडचणीत सापडलेल्यांसाठी तारणहार बनून समोर येतात.

समस्यांच्या चक्रव्यूहात सापडले असताना, गोष्टीतील तरुणीसारखे बनण्यासाठी हे करून बघाच. जेव्हा एखादी समस्या आपल्या समोर येते तेव्हा आपण एक छोटासा एक्सरसाइज करावा. समस्या पेपरच्या डाव्या साइडला लिहून काढावी व त्या समस्येमुळे निर्माण झालेली संधी उजव्या साइडला. आता पाहू या काही सक्सेस स्टोरीज; ज्यांनी आपल्या दुर्दैवालाच आपला हुकमी एक्का बनविला.

एकदा एका उमद्या व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या तरुणाबरोबर दुर्घटना घडली. कारच्या बॅटरीमधील बिघाड शोधत असताना तिचा स्फोट होऊन त्याचा चेहरा कायमचा विद्रूप झाला. पण त्याने हिम्मत न हरता त्या विद्रूप चेहऱ्याचेच भांडवल करायचे ठरविले. त्याने वाचले होते की चेहरे रीड करणारे (ओळखणारे) सॉफ्टवेअर अशा विद्रूप चेहऱ्यांना नीट रीड करू शकत नाही. त्याने लगेच गुप्तहेर यंत्रणेमध्ये करिअर करण्याचे निश्चित केले; ज्यायोगे तो शत्रू राष्ट्रामध्ये सहज घुसखोरी करून कामगिरी फत्ते करू शकेल. अशा प्रकारे सकारात्मक विचार केल्याने आज तो एक नावाजलेला गुप्तहेर बनला आहे.

व्हर्जिन ग्रुपचे रिचर्ड ब्रॅनसन हे स्वत: ‘Dyslexia’ या व्याधीने पीडित असल्याने त्यांना वाचायला, समजायला खूप कष्ट पडायचे. त्यांना होत असलेल्या या वेदना, नकळतच त्यांना सुलभ संवाद, सुस्पष्टता यांचे जीवनातील महत्त्व पटवून देत होत्या. त्यांनी म्हणूनच आपल्या कंपनीच्या ब्रॅण्ड (उत्पादन)बद्दल ग्राहकांना अत्यंत साध्या, सोप्या, स्पष्ट व मजेशीर भाषेत सांगायचे ठरविले. आज हे कम्युनिकेशनच त्यांच्या ग्रुपची खास ओळख ठरले आहे. त्याचप्रमाणे स्वत:ला समजायला अडचण येत असल्याने त्यांनी स्वत:चे काम दुसऱ्याकडून कसे करून घ्यायचे याचीही कला अवगत केली होती. स्वत:चा बिझिनेस वाढवायला त्यांनी याच कलेचा म्हणजे डेलिगेशन स्किल्सचा सर्वोत्तम वापर करून घेतला.

डेव्हिड बौएस हे अमेरिकेतील एक प्रसिद्ध ट्रायल लॉयर किंवा लिटिगेटर आहेत. त्यांनीच जस्टिस डिपार्टमेंटने आयबीएमच्या विरुद्ध आणलेल्या एन्टी ट्रस्टमध्ये कमालीचा युक्तिवाद करून आयबीएमला केस जिंकून दिली होती. त्यांनीच २००० साली अल गोर यांची बाजू लढवून बुश यांना कोंडीत पकडले होते. आपल्या कायदेशीर लढायांमधील यशाचे श्रेय ते आपल्या आजाराला ‘Dyslexia’ देतात. त्यांच्या म्हणण्यानुसार या आजारामुळे त्यांच्या वाचनशक्तीवर विपरीत परिणाम झाला, पण त्यामुळेच प्रत्येक गोष्ट बारकाईने ऐकणे त्यांच्यासाठी गरजेचे होऊन बसले. सवयीने परफेक्ट लिसनर झाल्यामुळेच मी लोकांना त्यांच्याच शब्दांमध्ये पकडून, माझ्या अशिलासाठी कायदेशीर लढाया जिंकू शकलो, असं ते म्हणतात.

डेरिक कोलमन या बहिऱ्या तरुणाला फुटबॉलपटू व्हायचे होते. पण कोणीही त्याला गंभीरपणे घेत नव्हते. कोच त्याला शिकवायला पण तयार नव्हते, कारण त्यांच्या सूचना, सल्ले डेरिकला कळले तर पाहिजेत. कोच, मित्र सर्व जण त्याला तू फुटबॉल सोड असे सारखे सांगायचे पण हे तरी त्याला कुठे ऐकू यायचे? आपल्या अंगभूत कौशल्याच्या जोरावर डेरिक एक दिवस फुटबॉल प्लेयर झाला. त्याच्या टीमला जाणवू लागले की डेरिक तर त्यांच्यासाठी वरदान आहे, कारण स्टेडियममध्ये प्रतिस्पर्धी टीमला प्रेक्षकांचा कितीही मोठा सपोर्ट असला तरी किंवा कितीही गोंधळ असला तरी डेरिकचे चित्त एकाग्र राहू शकायचे ते त्याच्या बहिरेपणामुळेच. एकाग्र डेरिकमुळेच त्याच्या संघाला यश मिळू लागले.

थोडक्यात काय तर प्रत्येक समस्येमध्ये एक नवीन संधी दडलेली असते. ती संधी शोधा, दुर्दैवावर फोकस न करता आपल्या स्वप्नावर, जमेच्या बाजूंवर लक्ष केंद्रित करा; तुमचे करिअर विपरीत परिस्थितीमध्ये देखील उजळून निघेल.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader