पूर्वी आशियातील हुशार विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी लंडनला जात. त्या काळी काही गोरे प्राध्यापक काळ्या/ आशियाई लोकांना दुय्यम वागणूक देण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्यापैकीच एक होते प्रो. पीटर्स. त्यांच्या वर्गातील सर्वात हुशार विद्यार्थी हा आशियाई होता, याचेच वैषम्य प्रो. पीटर्स यांना होते. ते शक्य तेव्हा त्याचा पाणउतारा करण्यात धन्यता मानायचे.
एकदा हा तरुण कॅन्टीनमध्ये, जेवणाचे ताट घेऊन प्रोफेसर महाशयांच्या टेबलवर प्रोफेसरांजवळ बसला. हे पाहून पीटर्स महाशय रागाने म्हणाले, ‘‘तुला कळत नाही, डुक्कर व राजहंस एकत्र जेवायला बसत नाहीत?’’ त्यावर तो तरुण अदबीने म्हणाला, ‘‘माफ करा तुम्हाला त्रास दिल्याबद्दल; पण हरकत नाही, मी क्षणार्धातच दुसऱ्या टेबलवर उडून जातो, तुम्ही इथेच बसा.’’
या अपमानाचा बदला घेण्यासाठी लंचनंतर प्रो. पीटर्स यांनी वर्गात या तरुणाला एक गुगली टाकला. ते म्हणाले, ‘‘वाटेत तुला दोन बेवारस पिशव्या सापडल्या; एकात चातुर्य व बुद्धिमता असेल व दुसऱ्यात खूप सारे पैसे; तर तू कोणती उचलशील?’’ त्या तरुणाने उत्तर दिले, ‘‘मी पैशांची थैली उचलेन.’’ त्यावर ते कुत्सितपणे म्हणाले, ‘‘तुमच्यासारख्यांकडून हे असे मूर्खपणाचेच उत्तर अपेक्षित होते. मी तिथे असतो तर चातुर्य व बुद्धिमत्ता निवडली असती.’’ तो तरुण म्हणाला, ‘‘बरोबर आहे तुमचे, ज्याच्याकडे जे नसते तेच तो निवडतो.’’
प्रोफेसरसाहेब आता जाम खवळले होते. या तरुणाला अपमानित करायचेच या उद्देशाने त्यांनी परीक्षेच्या वेळी या तरुणाला प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देताना, उत्तरपत्रिकेवर ‘इडियट’ लिहिले. त्या तरुणाने प्रश्नपत्रिका शांतचित्ताने सोडविली व वेळ संपल्यावर उत्तरपत्रिका परत देताना प्रो. पीटर्सना सांगितले, ‘‘सर, तुम्ही माझ्या उत्तरपत्रिकेवर सही केली, पण तारीख लिहायला विसरलात, तेवढी फक्त लिहाल का?’’
बिझनेस क्षेत्रालादेखील हेच लागू पडते. विचारांमध्ये आपण, आपल्या प्रतिस्पध्र्यापेक्षा नेहमी एक पाऊल पुढे असणे अत्यावश्यक असते, तरच समोरच्याचा डाव त्याच्यावरच उलटवून कुरघोडी करता येते. पीएनजी (P&G), नेस्ले, टोयोटा, गुगल यांनी आपल्या प्रतिस्पध्र्यापेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी आयटी क्षेत्र निवडले. ग्राहकाभिमुख आयटी प्रोसेसेस निवडून किंवा आपल्या सर्व शाखांमध्ये, उपकंपन्यांमध्ये एकच प्रकारची आयटी सॉफ्टवेअर वापरून त्यांनी इतरांवर कुरघोडी केली.
कधी कधी आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीकडे, आपल्यापेक्षा चांगले प्रॉडक्ट व तेही स्वस्त दरात उपलब्ध असते अशा वेळी समोरच्या कंपनीवर बाजी उलटविण्यासाठी आपण आपल्या प्रॉडक्टवर एक्स्टेन्डेड गॅरंटी देऊन ग्राहकाला खेचून घेऊ शकतो.
पण एकमेकांवर कुरघोडी करण्याची खरी मजा येते ती कल्पक जाहिरातींमधून. बीएमडब्ल्यू, ऑडी यांतील जाहिरातयुद्ध असो की कोक व पेप्सीमधील युद्ध. सगळीकडे हीच मजा पाहायला मिळते. एकदा ऑडीने बीएमडब्ल्यूची खोडी काढली. त्यांनी आपल्या जाहिरातीमध्ये ‘वर्ल्ड कार ऑफ २००६’ हा किताब मिळाल्याबद्दल बीएमडब्ल्यूचे अभिनंदन करताना आपण स्वत: (ऑडीने) २००० ते २००६ अशी सलग सहा वर्षे ‘ले मान्स २४ अवर रेसेस’ जिंकल्याची शेखी मिरवली होती. त्यावर बीएमडब्ल्यूने एक जाहिरात काढून त्यात ऑडीचे ‘साउथ आफ्रिकन कार ऑफ २००६’चा किताब मिळाल्याबद्दल अभिनंदन केले, पण सोबत हेही स्पष्ट केले की ते स्वत: (बीएमडब्ल्यू) ‘वर्ल्ड कार ऑफ २००६’ आहेत. ऑडी व बीएमडब्ल्यू या दोन्ही ब्रॅण्डना एका झटक्यात चितपट करण्यासाठी सुबारु (Subaru) कारने नामी शक्कल लढवली. त्यांनी जाहिरात दिली ‘ऑडी व बीएमडब्ल्यू या दोघींचे ब्युटी कॉन्टेस्ट २००६ जिंकल्याबद्दल अभिनंदन पण ‘इंटरनॅशनल इंजिन ऑफ २००६’ हा किताब मात्र आम्हाला मिळाला आहे हे लक्षात असू द्यात. बारूपापेक्षा कारचे अंतरंग म्हणजे इंजिन हे महत्त्वाचे असून त्यात आम्ही बाजी मारली आहे हे दाखवून सुबारुने जखमेवर मीठच चोळले.
मर्सिडीझ व बीएमडब्ल्यू या दोन ब्रॅण्डमधीलपण कुरघोडी सर्वज्ञात आहे. नुकतीच बीएमडब्ल्यूला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मर्सिडीझने त्यांचे कौतुक केले, पण त्याचबरोबर आपण या क्षेत्रामध्ये त्यांच्या आधी ३० वर्षे कार्यरत आहोत ही बढाईही मिरवली. आपली पहिली तीस वर्षे स्पर्धाच नसल्याने कंटाळवाणी गेली असे मर्सिडीझने म्हटले होते. त्यावर बीएमडब्ल्यूचे उत्तर होते, हे खरे आहे की तुमच्या जन्माच्या वेळी मी नव्हते, पण हेही तितकेच खरे आहे की माझ्या जन्माच्या वेळी तुम्ही म्हातारे झाला होतात.’ यातून बीएमडब्ल्यूला हेच सुचवायचे होते की, बुजुर्ग मर्सिडीझचा जमाना सरला आहे व नवीन तुर्काचा म्हणजे बीएमडब्ल्यूचा बोलबाला आहे.
असेच काहीसे शीतपेयांच्या दुनियेमध्येही घडत असते. कोक कंपनीने आपले मार्केटिंग व सेल्स ऑफिस एका बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावर थाटले होते. लोकांना ऑफिसचा पत्ता कळावा म्हणून कोकने होर्डिग लावले ‘कोका कोला ऑन सेकंड फ्लोअर.’ त्यावर संधी साधत पेप्सीने होर्डिग लावले ‘पेप्सी इज एव्हरी व्हेअर.’ असेच एकदा पेप्सीने ‘वुई लव्ह कोका कोला’ असे मोठे बॅनर लावले, पण त्यावर तारीख टाकली एक एप्रिल २०००. ‘एप्रिल फुल डे’चा असा कल्पक वापर करून कुरघोडी केल्याने कोक कंपनीचा मात्र तिळपापड झाला.
मॅक्डोनाल्ड व बर्गर किंग या दोन ब्रॅण्डमधील कुरघोडीही अशीच मशहूर आहे. मॅक्डोनाल्डचे बोधचिन्ह एक जोकर (क्लाऊन) आहे. बर्गरकिंगने जाहिरात केली की जर राजाबरोबर मेजवानीची संधी असताना क्लाऊनबरोबर पंगत कशाला?
हट्र्झ (Hertz) व एवीस ही रेंटल कार बिझनेसमधील दोन बडी नावे. हट्झ नंबर वन कंपनी तर एवीस नंबर दोनची कंपनी. एवीसने आपल्या या दोन नंबरचेच भांडवल करावयाचे ठरविले. त्यांनी जाहिरात केली, ‘जेव्हा आम्ही दोन नंबर असतो तेव्हा आम्ही खूप कडी मेहनत घेतो अन्यथा छोटय़ा माशाला मोठा मासा गिळून टाकेल ना! म्हणूनच आमच्या कारमधील ‘ash-tray’ नेहमी स्वच्छ असतात. कारच्या बॅटरीज नेहमी १०० टक्के चार्ज असतात व फ्यूएल टँक भरलेल्या असतात..
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com