एकदा एका राजकन्येचे एका गुलामावर प्रेम जडले. तिच्या डोक्यातून गुलामाचे भूत कायमचे उतरविण्यासाठी प्रधानाने राजाला सुचविले की राजकन्या व गुलामाला दोन दिवस एकमेकांच्या सहवासात व्यतीत करण्याची परवानगी द्या. राजाने प्रधानाच्या सल्ल्यानुसार केले. आणि काय आश्चर्य! तिसऱ्या दिवशी राजकन्या राजाला येऊन म्हणाली की, यापुढे मला गुलामाचे तोंडदेखील पाहायचे नाही. राजाने प्रधानाला विचारले की ही किमया कशी घडली. तेव्हा प्रधानाने उत्तर दिले, ‘‘महाराज, आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी जे आपल्याकडे नसते ते मिळविण्याचा हव्यास असतो, हा मनुष्यस्वभाव आहे. एकदा ते मिळाले की थोडय़ाच काळात नव्याची नवलाई संपून त्या गोष्टीमध्ये उणिवाच उणिवा दिसू लागतात व ती गोष्ट नजरेसमोर नकोशी वाटू लागते. राजकन्येला मेहनती गुलामाच्या पीळदार देहयष्टीचे, त्याच्या ताकदीचे आकर्षण वाटत होते. पण ती त्याच्या सहवासामध्ये आली तेव्हा तो किती अरसिक, बुद्धीने सामान्य आहे याची जाणीव होऊन तिचे मन उडाले.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा