‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग’ हा आजकाल व्यवस्थापन क्षेत्रातील परवलीचा शब्द झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रत्येक माणसाकडे करिअरच्या रणसंग्रामात लढण्यासाठी नऊ प्रकारची आयुधे असतात. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाकडे ‘थ्री बाय थ्री’चे ग्रीड (मॅनेजमेंट संकल्पना) आवश्यक असते. ग्रीडच्या पहिल्या ओळीत असतात, तुमचे शिक्षण, मिळवलेली कौशल्य व अनुभव. दुसऱ्या ओळीत असतात, करिअरमधील ध्येय गाठण्यासाठी आवश्यक मनुष्य बळ, आर्थिक बळ व पुरेसा वेळ. तिसऱ्या ओळीमध्ये असते निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, करिअरमधील ध्येय (किंवा महत्त्वाकांक्षा) व क्रियाशीलता.
पण कधी कधी करिअरमधील क्लिष्ट पेच सोडविण्यासाठी किंवा वादविवाद टाळून विन-विन सिच्युएशन क्रिएट करण्यासाठी या नऊ गोष्टींव्यतिरिक्त अजून एका गोष्टीची गरज असते ती म्हणजे ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग.’
यात नऊ बिंदू दिले आहेत जे तुम्हाला फक्त चार रेषा काढून एकसंध जोडायचे आहेत. असे करणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा रेषा या बिंदूंच्या पलीकडे जाऊन माघारी फिरतील. आखलेल्या परिघाच्या किंवा चौकटीच्या बाहेर जाऊन एखादा सुज्ञ निर्णय घेणे म्हणजेच ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग.’
करिअरमध्येही असे चाकोरीबा जाणे अपेक्षित असते. विपरीत परिस्थिती अनुकूल करण्यासाठी ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग’ गरज पडू शकते. उदाहरणार्थ बनारस विश्व हिंदू युनिव्हर्सिटीसाठी, वर्गणी गोळा करण्यासाठी पंडित मदनमोहन मालविय हैद्राबादच्या निजामाकडे गेले. निजामाने पैसे देण्याऐवजी पंडितजींच्या दिशेने आपला बूट भिरकावला. पंडितजींनी त्याच बुटाचा हैद्राबादच्या बाजारात जाहीर लिलाव करून अपेक्षेपेक्षा जास्त वर्गणी गोळा केली. मजा म्हणजे निजामालाच स्वत: सर्वाधिक बोली लावून स्वत:चा बूट खरेदी करण्यासारखी परिस्थिती मदनमोहन मालवियांनी निर्माण केली.
कोलगेट कंपनी टूथपेस्ट मार्केटमध्ये नंबर वन होती व आहे. पण एक काळ असा आला की कोलगेटला मार्केट शेअर वाढविण्यासाठी झगडावे लागत होते. कच्चा माल जितका स्वस्त मिळू शकेल तितके प्रयत्न कंपनीने आधीच केले होते, मार्केटिंग नेटवर्क जितके सुदृढ करता येईल तेवढे केले गेले होते, जितकी नवनवीन मार्केट कव्हर करता येतील तेवढी केली होती. मग आता कंपनीचा नफा कसा वाढवायचा हा यक्ष प्रश्न होता. तेव्हा मदतीला आले ते ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग’! टूथ पेस्टच्या नोझलचा व्यास वाढविला तर आपसूकच प्रत्येक वेळी ब्रश करताना जास्त टूथपेस्ट बाहेर येईल व त्यामुळे ती लवकर संपेल. ग्राहकाला मग लवकर टूथपेस्ट खरेदी करावी लागेल; यामुळे खप वाढून नफा वाढेल असे एक अफलातून सोल्युशन शोधण्यात आले.
या समस्येवर एक भन्नाट उपाय शोधण्यात आला. कंपनीने आपल्या प्रत्येक ग्राहकाशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना पुढील १८ महिन्यांची मागणी आजच्या भावाने नोंदविण्याची विनंती केली व त्याची डिलिव्हरी पुढील तीन महिन्यांमध्ये टप्प्या टप्प्याने घ्यायची परवानगी दिली. यामुळे झाले काय की ग्राहकांना भविष्यातील पुरवठा वर्तमान किमतीमध्ये झाल्याने फायदा झाला, तर कंपनीला दुहेरी फायदा झाला. नवीन कारखान्यासाठी लागणारे भांडवल अनासायास उपलब्ध झाले तर भविष्यात, मार्केटमध्ये फिजिकली प्रेझेंट नसूनदेखील त्यांनी प्रतिस्पर्धी कंपनीसाठी मैदान मोकळे ठेवले नाही व आपल्या ब्रॅण्डची सवय विस्मृतीमध्ये जाणार नाही याचीदेखील तजवीज करून ठेवली. काळाच्या पुढे जाणारा हा निर्णय ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग’ नाही तर अजून काय आहे?
कधी कधी आपण इतके प्रगत ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात केले असते की साध्या सरळ सोप्या मार्गाचा आपल्याला विसरच पडलेला असतो. त्यामुळे कधी कधी ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग’ टाइपचे सोल्युशन शोधण्यासाठी बालमनाचा किंवा निरक्षर मनाचा आधार घ्यावा.
एकदा जपानी कंपनीच्या ग्राहक कक्षाकडे तक्रार आली की एका टॉयलेट सोपच्या रॅपरमध्ये साबणाची वडीच नव्हती. हा प्रॉब्लेम भविष्यात परत उद्भवू नये यासाठी अनेक महागडे उपाय सुचविण्यात आले जसे की असेम्ब्ली लाइनवर एक्स-रे मशीन लावावे ज्यामुळे रिकामा रॅपर ओळखता येईल किंवा इलेक्ट्रॉनिक वजन-काटा ठेवावा ज्यायोगे असा रॅपर वेगळा काढता येईल. पण शॉप फ्लोअरवरील अर्धशिक्षित झाडूवाल्याने साधा फ्लोअर पंखा लावायला सांगितले ज्यायोगे रिकामा रॅपर वाऱ्याने उडून जाऊन दूर पडेल.
थोडक्यात काय ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग’साठी ज्ञान व अनुभवाच्या पारंपरिक वातावरणातून जाणीवपूर्वक बाहेर पडा व अनंत अशा संधींनी युक्त असलेल्या अंतरिक्षामध्ये पाऊल टाका. व. पु. काळेंच्या भाषेत सांगायचे झाल्यास, ‘गुरुत्वाकर्षणाच्या जोखडातून बाहेर पडेपर्यंत उपग्रहाची धडपड असते, एकदा तो यातून बाहेर पडला की त्याचे पुढील मार्गक्रमण सहज व आपोआपच होते.’
प्रशांत दांडेकर