करिअरमध्ये कधी कधी आपल्याला जटिल समस्यांना सामोरे जावे लागते. त्या समस्या खरे तर जटिल नसतात, पण त्या समस्येशी निगडित लोकांना फक्त मीच जिंकावे व दुसऱ्याने हरावे असे वाटत असते. विन-विन सिच्युएशनपेक्षा सर्वाना आपला अहंकार सुखविण्यासाठी विन-लूज सिच्युएशनमध्ये जास्त रस असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तुम्ही ही कथा ऐकली असेलच की एका माणसाकडे १९ गायी असतात व आपल्या पश्चात त्याला त्या आपल्या तीन मुलांमध्ये ठरावीक प्रमाणात वाटायच्या असतात. मोठय़ाला अर्धा वाटा, मधल्याला एकतृतीयांश तर धाकटय़ाला एकषष्ठांश असे हे डील असते. आता मोठय़ाला अर्धा भाग द्यायचा तर साडेनऊ गाई द्याव्या लागतील. हे शक्य नसते.
अशीच एक दुसरी कथा आहे ज्यात एका व्यापाऱ्याकडे १७ उंट असतात व त्यालाही आपल्या तीन मुलांमध्ये मोठय़ाला अर्धा वाटा, मधल्याला एकतृतीयांश तर धाकटय़ाला एकनवमांश या प्रमाणातच वाटणी करायची असते. आता अर्धे उंट द्यायचे म्हणजे साडेआठ होतात. म्हणजे इथेही हाच तिढा!
आता पहिल्या कथेमध्ये हा तिढा सोडवायला गावातील एक प्रतिष्ठित पुजारी आले. त्यांनी १९ मधील एक गाय बाजूला काढली; आता राहिल्या १८ गाई. मोठय़ाला अध्र्या म्हणजे ९ मिळाल्या, मधल्याला ६ मिळाल्या व धाकटय़ाला ३ मिळाल्या. उरलेली एक गाय वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देवळाला दान द्या असा प्रस्ताव पुजाऱ्यांनी तिन्ही मुलांपुढे ठेवला, जो त्या तिघांनी हसत हसत मान्य केला.
करिअरमध्येदेखील मॅनेजर म्हणून व्यवस्थापनाला आपल्याकडून नेमकी हीच अपेक्षा असते. वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवून ज्या मुद्दय़ांवर सहज सहमती होऊ शकते, ते मुद्दे निकालात काढल्याने समस्येचा आकारदेखील कमी होतो व बहुतांश स्टेक होल्डर्सचे हितदेखील जपले जाते. जो वादग्रस्त मुद्दा आहे तो जर मनाच्या कप्प्यातून कायमचा हद्दपार केला तर मानसिक समाधान मिळून एकाग्रतादेखील वाढीस लागते.
दुसऱ्या कथेमध्ये व्यापाऱ्याचा मित्र मदतीस आला. त्याने आपल्याजवळील एक उंट त्या १७ मध्ये सामील केला. आता १८ उंट झाले होते. मग मोठय़ाला ९, मधल्याला ६ व धाकटय़ाला २ उंट मिळाले. राहिलेला एक उंट स्वत:चा म्हणून त्या व्यापाऱ्याने परत घेतला.
करिअरमध्येदेखील कधी कधी आपल्या कुवतीबाहेरचे प्रॉब्लेम सोडविण्यासाठी बाहेरच्यांची मदत घ्यावी लागते. पण ही मदत एखाद्या ‘ूं३ं’८२३’ प्रमाणे असावी. कधी कधी तटस्थ माणसाच्या दृष्टिकोनातून एखाद्या समस्येकडे पाहिल्यास एखाद्या जटिल प्रश्नावरचे उत्तर चटकन सापडते.
तर कधी कधी आपल्या मनामध्येच द्वंद्व चालू असते. आपल्याला एकाच वेळी अनेक गोष्टी हव्या असतात, पण प्रथमदर्शनी कोणती तरी एकच गोष्ट पदरात पडेल असे दिसत असते. याला कारण असते ती आपली रिस्क न घेण्याची वृत्ती किंवा काही मोठेतरी मिळवण्यासाठी छोटेदेखील न गमविण्याचा अट्टहास!
मला काय म्हणायचे आहे ते या गोष्टीवरून कळेल. नचिकेतचे स्वप्न होते की एखादी महागडी टु सीटर रेसिंग कार खरेदी करून मोठय़ा टेचात इथे तिथे मिरवावे; सोबत शेजारच्या सीटवर त्याच्यासोबत स्वप्नातील सुंदरी असावी. एक दिवस त्याचे स्वप्न साकार होते. तो गाडी खरेदी करतो व लाँग ड्राइव्हला निघतो. शहराबाहेरच्या डोंगरावरील रस्त्यांवर कार पळविताना अचानक वाटेत त्याला तीन व्यक्ती, निर्जन रस्त्यावर कातरवेळी लिफ्टच्या प्रतीक्षेमध्ये दिसतात. त्यात एक वृद्ध बाई असते जिला प्रकृती अस्वास्थ्यामुळे मेडिकल अटेन्शनची नितांत गरज असते, दुसरी व्यक्ती त्याच्या स्वप्नातील सुंदरी असते जिची कार बिघडलेली असते व तिसरी व्यक्ती एक डॉक्टर असतो ज्याने भूतकाळामध्ये नचिकेतला जीवघेण्या अपघातामधून वाचविलेले असते. नचिकेत आता संभ्रमात पडतो की मदत करावी तर कोणाला? एकाच वेळी जीव वाचविण्याचे कर्तव्य, उपकाराची परतफेड व भावी जोडीदाराशी ओळख या तिन्ही गोष्टी नचिकेतला मनापासून करायच्या होत्या.
पण नचिकेत व्यवस्थापन शास्त्राचा विद्यार्थी असल्याने ‘टु फाईंड कॉमन ग्राऊंड’ फंडा त्याने वापरण्याचे ठरविले. महागडी कार त्या डॉक्टरच्या हवाली करत नचिकेत म्हणाला, ‘डॉक्टर तुम्ही आजींना घेऊन हॉस्पिटलमध्ये जा. तुम्हाला लिफ्टही मिळेल व आजीवर वेळेवर उपचारदेखील होतील. मी व ही तरुणी आम्ही एकत्र शहराच्या वेशीपर्यंत चालत येतो; तिथून आम्हाला काही तरी वाहन मिळेलच.’ नचिकेतच्या या प्रसंगावधानाने त्या तरुणीचे मत नचिकेतबद्दल सकारात्मक होते व वाट तुडविताना, गप्पागोष्टींमधून एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्याने प्रेमदेखील फुलते. थोडक्यात काय तर महागडी रेसिंग कार डॉक्टरच्या हवाली करण्याचा इमोशनल व रिस्की डिसिजन घेऊन नचिकेतने एकाच दगडामध्ये तीन पक्षी मारले. गाडीच्या छोटय़ाशा चावीमध्येच भले मोठे कॉमन ग्राऊंड दडलेले आहे हे नचिकेतने वेळीच ओळखले होते; नाही का?
कॉमन ग्राऊंड शोधणे म्हणजे काय तर आपणच आखलेली लक्ष्मण रेषा फक्त एक पाऊल ओलांडणे व दुसरे पाऊल आपल्या रेषेआतच ठेवणे, ज्यायोगे आपण जास्त काही न गमावता बरेच काही कमवू शकतो.
प्रशांत दांडेकर –