lp-09शेअर बाजारात गुंतवणूक करणे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय असला तरी कुणीतरी सांगतं म्हणून, मित्रावर विश्वास आहे म्हणून, एखादा शेअर खूप स्वस्त मिळतो आहे म्हणून गुंतवणूक करू नये. शेअर बाजाराचा नीट अभ्यास करून, आपल्याला जे योग्य वाटेल तेच करावे.
लेखाचे शीर्षक वाचून आश्चर्य वाटले ना? परंतु ‘शेअर बाजार’ हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे हे सिद्ध झाले असले तरीही या गुंतवणुकीत किती जण यशस्वी झाले आहेत ते तपासणे महत्त्वाचे आहे. इतर पारंपरिक गुंतवणुकीप्रमाणे या गुंतवणुकीवर हमखास परतावा नसल्याने किंबहुना भांडवल परतीची हमी देखील नसल्याने शेअर बाजारातील गुंतवणूक ही कायम धोकादायक मानली जात असावी. रेस, लॉटरी, जुगार या सर्वच प्रकारात परताव्याची कुठलीच हमी नसल्याने त्यांना सट्टा मानले जाते. रियल इस्टेट, सोने इ. गुंतवणूक पर्यायात परताव्याची हमी नसली तरीही तुमची मालमत्ता तयार होत असते किंवा ती तुमच्या ताब्यात असते आणि तुम्ही तिचा उपयोग करू शकता. शेअर्समधील गुंतवणुकीतील नुकसान म्हणजे मात्र निव्वळ तोटा हे एकच उत्तर. कदाचित याच साधम्र्यामुळे शेअर बाजारापासून मध्यमवर्गीय गुंतवणूकदार पूर्वी दूर राहत असावा. हल्ली मात्र बऱ्यापकी मराठी माणूस शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळला असला किंवा आकर्षति झाला असला तरीही त्या पकी किती गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात खरोखर नफा कमावला आहे ते तपासणे गरजेचे आहे. मी खरोखर हा शब्द इथे या साठी वापरला आहे की शेअर बाजारातील गुंतवणुकीतील धोका लक्षात घेता केवळ दहा ते बारा टक्के नफा इथे उपयोगी नाही, कारण तितका परतावा तुम्हाला रोखे किंवा मुदत ठेवीतूनही मिळत असतो. शेअर्समधील गुंतवणुकीवर वार्षकि किमान १८ टक्के वार्षकि परतावा मिळाला तरच संपत्ती निर्माण करता येऊ शकतो. चलन वाढीवर मात करणे हा महत्त्वाचा उद्देश या गुंतवणुकीमागे आहे. वॉरेन बफे, पीटर लिंच, बेंजामिन ग्राहम, वॅल्टर श्लोस तसेच राकेश झुनझुनवालासारख्या गुंतवणूक गुरूंनी किती पसा शेअर्सच्या माध्यमातून कमावला हे आपण विविध वाहिन्यांवरून, पुस्तकांतून, अभ्यासातून वाचत असतो पाहत असतो. साहजिकच झटपट पसा कमवायचा एक उत्तम पर्याय म्हणून शेअर बाजाराकडे अनेक जण वळताना दिसतात. संपूर्ण माहिती किंवा सखोल अभ्यास नसल्याने टिप्सवर विश्वास ठेवून, मासिकातील वाचून किंवा सीएनबीसीसारखी चॅनेल्स बघून थेट शेअर बाजारात खरेदी केली जाते सुदर्शन सुखानीचा कार्यक्रम बघून डे ट्रेिडग करायला जातात आणि नुकसान झालेले हे आरंभशूर गुंतवणूकदार मूग गिळून बसतात. ‘‘दर रोज ट्रेिडग करून हमखास नफा कमवा,’’ अशा जाहिराती देऊन क्लास घेणारे अनेक धुरंधर आकर्षक जाहिराती देऊन भाबडय़ा गुंतवणूकदारांकडून भरपूर फी वसूल करताना दिसतात. टेक्निकल्सचे सॉफ्टवेअर विकून पसे कमावणारे अनेक दिसतात परंतु ते सॉफ्टवेअर वापरून किती जण प्रत्यक्षात नफा कमावतात? कुठलेही कष्ट न करता कधीच पसे मिळवता येत नाहीत ही मूलभूत गोष्टच सामान्य माणूस विसरतो आणि म्हणूनच अशांचे फावते.
शेअर बाजार हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय असला तरीही त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे आवश्यक आहे. हा अभ्यास तितका सोपा नाही आणि त्याकरिता तुम्हाला शेअर बाजाराची आवड असणे तसेच रोज थोडा वेळ देणे हे दोन्ही आवश्यक आहे. शेअर बाजार म्हणजे झटपट आणि भरपूर पसा हे काही अंशीच खरे आहे, कारण सगळ्याच कंपन्या मल्टिबॅगर नसतात. तसेच प्रत्येक वेळी तुम्ही कितीही अभ्यास करून किंवा संशोधन करून एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असली तरीही तो शेअर तुम्हाला फायदा देईलच, असे बिलकूल नाही. तुमच्या पोर्टफोलियोमधील २०-३० टक्के शेअर्सनी तुम्हाला बम्पर नफा दिला तरी भरपूर. पोर्टफोलियो करण्याचे मुख्य उद्दिष्टच नफा तोटय़ाचे संतुलीकरण करणे असते. म्हणूनच एका वेळी एकाच कंपनीत सर्व गुंतवणूक करू नये. पोर्टफोलियो कसा करावा किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करू नका हे सांगण्याचा हा या लेखाचा उद्देश नसल्याने गुंतवणूक कधी, कशी आणि कुठे करावी हे लिहीत बसत नाही. परंतु आपल्याला शेअर्सच्या गुंतवणुकीत सामान्य गुंतवणूकदार सहसा कुठल्या चुका करतो आणि त्या कशा टाळता येतील ते अभ्यासता येईल.
सर्वसामान्य गरसमज
* कमी बाजार भावात उपलब्ध असलेला शेअर म्हणजे तो स्वस्त.
अनेक गुंतवणूकदार एखादा शेअर केवळ दहा रुपयांच्या आत उपलब्ध आहे म्हणून विकत घेताना दिसतात. आज न उद्या तो शेअर दुप्पट- तिप्पट होईल या भाबडय़ा आशेवर केलेली ही खरेदीनंतर तुमच्या भांडवलासहित रसातळाला जाताना दिसते. एखादा शेअर कमी किमतीत उपलब्ध आहे याचा अर्थ तो स्वस्त आहे, असे मुळीच नाही. ९० टक्के पडलेला शेअर अजून किती खाली जाणार? असा प्रश्न हे स्वत:ला विचारतात आणि समाधान करून घेतात. मात्र आपण खड्डय़ात पसे गुंतवत आहोत हे यांच्या ध्यानीमनीही नसते.
* आयपीओ म्हणजे झटपट पसे.
हल्ली बहुतांशी आयपीओ अधिमूल्याने बाजारात येतात त्यामुळे लिस्ट झाल्यावर नफा व्हायची शक्यता कमी असते. आयपीओ कितीही चांगला असला तरीही मुक्त अधिमूल्यामुळे गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये लगेच नफा पदरात पडण्याची शक्यता तशी कमीच.
* मी लकी ( नशीबवान) आहे.
मला जुगारात नेहमीच फायदा होतो. मी तसा नशीबवान आहे असा विचार करून शेअर बाजारात गुंतवणारे जास्त नुकसान करताना दिसतात.
* मी या शेअरबद्दल सीएनबीसी वर पाहिलेय
सीएनबीसी किंवा तत्सम चॅनेलवर अनेक चर्चा होत असतात आणि प्रत्येक तज्ज्ञ स्वत:ची मते मांडत असतो. मात्र चॅनेल वर सांगितलेले म्हणजे पूर्व दिशा आणि खरेच असते असे नाही.
* माझे भांडवल परत मिळेपर्यन्त मी हा शेअर विकणार नाही
आपला प्रत्येक निर्णय कायम अचूक असेल याची शाश्वती खरे तर कुणीच अगदी कुठलाही तज्ज्ञ देऊ शकत नाही. त्यामुळे एखादा शेअर खरेदी केल्यानंतर पडायला लागला तर लगेच विक्री करून तोटा कमी करावा. मात्र बहुतांशी सामान्य गुंतवणूकदार तो शेअर संपूर्ण पडताना बघतात परंतु विक्री करत नाहीत. तो पुन्हा आपण घेतलेल्या किमतीतच विकण्याची जिद्द मनात ठेवून तो शेअर बाळगून ठेवतात. काही वेळा तो शेअर वर्षां-दीड वर्षांत त्या किमतीला जातोही आणि गुंतवणूकदार तेव्हा विकतोही परंतु त्या काळातील व्याजचे नुकसान तो विसरून जातो.
* लार्ज कॅप शेअर्समधील गुंतवणूक सुरक्षित असते
लार्ज कॅप शेअर्स म्हणजे सुरक्षित गुंतवणूक असा एक मोठा गरसमज बहुतांशी गुंतवणूकदार आणि सल्लागारांचा आहे. निफ्टी किंवा सेन्सेक्समधील गुंतवणूक म्हणजे उत्तम आणि सुरक्षित असे नाही. अशा कंपन्यादेखील मोठा तोटा आणि पर्यायाने तुमचे नुकसान करू शकतात. सध्या काही बँक समभागांच्या बाबतीत हे उदाहरण सार्थ ठरेल.
* उत्तम शेअर्स कायम ठेवून द्यावेत.
जागतिक बाजारपेठेतील घडामोडी, बदलती जीवन शैली आणि टेक्नॉलॉजी या साऱ्याचा परिणाम कंपन्यांच्या कामकाजावर होताच असतो. कुठलेही उत्पादन सातत्याने कायम फायद्याचे ठरू शकत नाही. कोडॅक, नोकिया, िहदुस्तान मोटर्स, प्रीमियर, एचएमटी अशी काही उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेतच.
* ब्रोकर माझा चांगला मित्र आहे
अनेकदा शेअर ब्रोकर्स मार्केट टिप्स देत असतात. तुमचा ब्रोकर हा तुमचा कितीही जवळचा मित्र असला तरीही तो सांगतो त्यावर संपूर्ण विश्वास ठेवणे चुकीचे ठरू शकते. शेवटी ब्रोकर किंवा सल्लागार ही देखील तुमच्या-आमच्यासारखी माणसेच आहेत हे लक्षात ठेवा.
* आज न उद्या ही कंपनी कुणी तरी ताब्यात घेणार आहे.
वर्षांनुवर्षे एखाद्या कंपनीत गुंतवणूक करून ती कंपनी कुठली तरी मोठी कंपनी ताब्यात घेणार आहे या आशेवर गुंतवणूक करणे बरेचदा नुकसानीचे ठरते. अंदाज बरोबर ठरला तरीही मर्जर रेशो त्या वेळेच्या परिस्थितीवर आणि बाजारभावावर अवलंबून असल्याने तो तुमच्या फायद्याचेच ठरेल असे नाही.
* नफा पदरात पाडून, तोटय़ातील शेअर्स आणखी खरेदी करून सरासरी कमी करणे
ही चूक बहुतांशी सामान्य आणि क्वचित जाणकार गुंतवणूकदारदेखील करताना दिसतात. रास्त भावात घेतलेले चांगल्या कंपनीचे शेअर्स विकून ती रक्कम तोटय़ातील शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरणे हा त्यांचा आवडीचा छंद. खरे तर सरासरी करण्याच्या नादात आपण आपला तोटा टक्केवारीत कमी करीत असलो तरीही रकमेत वाढवतच असतो. या उद्योगात पोर्टफोलियोमधील चांगले शेअर्स घालवून बसतो आणि कचरा ठेवून देतो.
गुंतवणूकदारांनी काय करायला हवं?
शेअर बाजारातील गुंतवणूक हा आकर्षक आणि सध्याच्या परिस्थितीत आवश्यक पर्याय असल्याने ही गुंतवणूक करताना सामान्य गुंतवणूकदाराने पुढील तत्वे पाळल्यास त्याचा फायदा होऊ शकेल.
* मार्केट टिप्सवर विश्वास ठेवू नका.
* पडणारे शेअर्स खरेदी करू नका, सरासरी करणे टाळा.
* स्वत: अभ्यास करून गुंतवणुकीचा निर्णय घ्या.
* कळत नसेल तर थेट गुंतवणूक न करता म्युचुअल फंडांत गुंतवणूक करा. त्यातही चांगला परतावा मिळू शकेल.
* भावनावश न होता तोटय़ातील शेअर्स विक्री करून तोटा कमी करा तसेच उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर शेअर्सची विक्री करा. खरेदी-विक्री टप्प्याटप्प्याने करा.
* एकाच क्षेत्रात आणि एकाच कंपनीत एकूण पोर्टफोलियोच्या १५ टक्के जास्त गुंतवणूक करू नका.
* दीर्घकालीन गुंतवणूक आणि प्रदीर्घ गुंतवणूक यातील फरक समजावून घ्या.
* आपल्या गुंतवणुकीचा वारंवार आढावा घ्या आणि योग्य नियोजन करा. अनेकदा शिल्लक रोख ठेवणे किंवा कर भरणेदेखील योग्य ठरू शकते.
* ऑनलाइन व्यवहार करा, ब्रोकरला व्यवहारासाठी मुखत्यारपत्र (POA) देऊ नका.
* वार्षकि अहवालाचा अभ्यास करा.
वरील मुद्दय़ांखेरीज तुमचे स्वत:चे असे काही मुद्दे आत्मपरीक्षण केल्यास मिळू शकतील. चुका समजल्या आणि त्या मान्य केल्या तरच सुधारता येतात. म्हणून चक्क कागद-पेन्सिल घेऊन बसा, आपलं कुठे चुकतंय ते लिहून काढा आणि मग बघा चुका सुधारताहेत का? यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी अपयशाची ही पायरी पार पाडा.
जाता जाता जॉर्ज सोरोस यांचे एक महत्त्वाचे वाक्य नुकतेच वाचनात आले तर या लेखाला खूपच समर्पक आहे. ते म्हणतात, ‘सम टाइम्स इट इज मोअर रिस्की टू नॉट टेक अ रिस्क.’
(लेखक कंपनी सचिव व भांडवली बाजार तज्ज्ञ आहेत.)
अजय वाळिंबे –  response.lokprabha@expressindia.com

Consumer Protection Act 2019, defects in goods and services., Consumer Protection, Consumer Protection news,
ग्राहक राजा सतर्क हो…!
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Loksatta kutuhal Artificial Intelligence and Research Institute
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता व संशोधन संस्था
UPSC Preparation Overview of GST System and Tax Collection career news
upscची तयारी: जीएसटी प्रणाली आणिकर संकलनाचा आढावा
wastage of food grains
विश्लेषण: शेतमालाची नासाडी केव्हा थांबणार?
about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation
MPSC मंत्र : कृषी घटकाचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व
changing health economics and management are overburdening our government health system
आरोग्यव्यवस्थेचे बदलते अर्थकारण रुग्णाला मेटाकुटीला आणणारे
loksatta kutuhal handwriting recognition intelligent character recognition technology
कुतूहल : हस्ताक्षर ओळख – वैविध्यातून शिक्षण