प्राची परांजपे – response.lokprabha@expressindia.com
दिवाळीला कपडय़ांपाठोपाठ खरेदी करायची असते ती दागिन्यांची. या वेळच्या दिवाळीसाठी तुमच्या कपडय़ांना आणि व्यक्तिमत्त्वाला अनुसरून बोहेमियन दागिने निवडलेत तर एकदम हटके दिसू शकाल.

शॉिपग करणं हल्ली केवळ सणांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. वर्षांतले सगळे महिने हल्ली शॉिपगचेच असतात. हल्लीच्या तरुणाईच्या मते शॉिपग हे कोणत्याही समारंभाचा अविभाज्य भाग आहे. आता दिवाळी जवळ येत आहे. तिच्या शॉिपगचे वेध सगळ्यांनाच लागले आहेत. तुमचं दागिन्यांचं शॉिपग मनाजोगं व्हावं यासाठी हल्लीच्या इमिटेशन दागिन्यांचे ट्रेण्ड्स आणि ते वापरायच्या काही टिप्स-

बोहेमिअन ज्वेलरी :

सोने, चांदी, हिरे, मोती अशा मौल्यवान धातूंपासून बनविलेले अत्यंत नाजूक, सुंदर कलाकुसर केलेले दागिने म्हणजे ‘खरे’ दागिने असाच दागिन्यांबद्दल समज आहे. पण या साचेबद्ध कल्पनेपलीकडे जाऊन काळपट दिसणारे, भरगच्च, लांबीला, जाडीला मोठाले दिसतील असे, रंगीबेरंगी स्टोन्स, चिवटेबावटे गोंडे यांनी सजलेल्या ज्वेलरीला सध्या खूपच मागणी आहे. या दागिन्यांना बोहेमिअन ज्वेलरी म्हटले जाते. पारंपरिक दागिन्यांना हा पर्याय उपलब्ध झाला आहे. फॉर्मल किंवा इन्फॉर्मल कपडय़ांबरोबर बोहो दागिने छान टीम अप करता येतात. दिवाळीसाठी तुम्ही असे दागिने नक्की घ्या. त्यांच्यामुळे तुम्ही गर्दीत उठून दिसू शकता. बोहेमिअन पद्धतीची ज्वेलरी मिळण्याची अनेक ऑनलाइन वेब पोर्टल्स उपलब्ध आहेत. अनेक एथनिक वस्तूंच्या ऑनलाइन वेब साइट्सवर बोहेमिअन पद्धतीची ज्वेलरी उपलब्ध असते. तसंच हल्ली अनेक शॉिपग स्ट्रीट्सवर बोहो दागिने विकत मिळतात.

मिरर ज्वेलरी :

इमिटेशन ज्वेलरीमधील सध्याचा लोकप्रिय ट्रेण्ड म्हणजे आरशांची ज्वेलरी. हल्ली बऱ्याच ऑनलाइन पोर्टल्सवर ही ज्वेलरी विकली जाते. एखाद्या आकारातील आरसा आणि मग त्याला लावलेले गोंडे, घुंगरू, चेन्स असं या ज्वेलरीचं स्वरूप असतं. त्यात कानातले आणि अंगठय़ाचे विविध आकार आणि डिझाइन्स उपलब्ध आहेत. त्यांची किंमत अगदी ५० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत आहे. यंदाच्या दिवाळी शॉिपगसाठी हा एक अतिशय चांगला आणि वेगळा पर्याय आहे.

गोंडेदार ज्वेलरी :

वेगवेगळ्या ब्राइट कलर्सचे गोंडे या ज्वेलरीमध्ये वापरले जातात. थोडय़ा मोठय़ा आकाराच्या गोंडय़ांची इअिरग्स, त्याचबरोबर ब्रेसलेट्स, नेकपीसेस, गोंडेदार चप्पल्स सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. या ज्वेलरीचं वैशिष्टय़ म्हणजे फॉर्मल शर्टस्वरही गोंडय़ांची ज्वेलरी खूप क्लासी दिसते. याखेरीज कुर्तीज, पलाझो पँट्स, डंगरी, स्कर्ट्स, साडी किंवा अगदी अनारकली अशा पारंपरिक तसंच इंडो वेस्टर्न आऊटफिट्सवरही ही ज्वेलरी खूप उठून दिसते. हा ज्वेलरी ट्रेण्ड एक दीड वर्षांपूर्वी बाजारात आला होता, परंतु अजूनही तो सरलेला नाही. त्यात नवनवीन प्रयोग होत आहेत. गोंडय़ांऐवजी हल्ली बऱ्याचदा दोऱ्यांचे झुपके ज्वेलरीमध्ये वापरतात. टॅसल ज्वेलरी असं त्याला म्हणतात. ज्वेलरीबरोबरच ते ब्रोच किंवा ओढण्यांच्या सजावटीसाठीही वापरले जातात.

ऑक्सिडाइज ज्वेलरी :

ऑक्सिडाइज ही संज्ञा खरंतर चांदीच्या दागिन्यांमध्ये प्रसिद्ध आहे. पण इमिटेशन ज्वेलरी इज ऑल अबाऊट लुक अ‍ॅण्ड फील. त्यामुळे चांदीच्या ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा फील आणण्यासाठी पितळ किंवा कांस्य या  धातूंचा वापर करतात. आणि त्याला तसं रंग आणि रूप देण्यात येतं. यामध्ये हल्लीच्या काळात भरपूर डिझाइन्स आणि प्रकार आलेले आहेत. अगदी मांगटिकापासून ते पायातल्या पंजणांपर्यंत या दागिन्यांमध्ये वैविध्य आढळून येतं. सध्याच्या काही ट्रेण्ड्सवर एक नजर टाकूया.

टायपोग्राफी केलेले दागिने :

एखादा शब्द किंवा वाक्य चेनमध्ये ओवून ते घालण्याचा ट्रेण्ड मागच्यावर्षी खूप चालत होता. यंदा काही अंशी हा ट्रेण्ड गेला आहे पण आता झुमक्यांवर टायपोग्राफी केलेली आढळून येते. एखादा श्लोक, एखादं नाव, देवादिकांची नावं, ओम अशा आध्यात्मिक प्रकारची टायपोग्राफी कानातल्यांवर केलेली दिसून येते. अँकलेट्समध्ये ही टायपोग्राफी केलेली आढळून येते.

नेकलेस :

गळ्यातल्यांचा ट्रेण्ड बदलला आहे असं म्हणता येणार नाही, पण एक नवा ट्रेण्ड म्हणजे विविध भौमितिक आकारांची मोठी पेण्डंट सध्या वापरली जातात. त्यात एखादा पौराणिक प्रसंग चित्रांद्वारे दाखविलेला असतो. राधाकृष्ण डिझाइन्स या गळ्यातल्यांमध्ये जास्त आढळते.

चोकर्स :

चोकर सध्या खूप ट्रेण्डमध्ये आहे. सुरुवातीला एक बारीक पट्टी गळ्याभोवती घालायचा ट्रेण्ड होता. पण आता एथनिक चोकर्सचा जमाना आलेला आहे. कुंदन वर्क आणि मोत्यांनी सजलेले चोकर्स खूप ट्रेण्ड इन आहेत. त्याबरोबर बोहो स्टाईल किंवा इमिटेशन ऑक्सिडाइज चोकर्ससुद्धा मिळतात. एक सुंदर नेकपीस तयार करण्यासाठी गळ्यावर रुळणारे काही एलिमेंट्स त्यात जोडले जातात. आणि त्यामुळे ते चोकर सुंदर दिसू लागतं.

दागिन्यांसाठी काही टिप्स

  • कॉलर असलेलं ब्लाऊज किंवा कुर्ता घाला. त्या कॉलरच्या भोवती मस्त मोठा नेकपीस घाला. त्याला पेअर करण्यासाठी लहानसे कानातले आणि जाड ब्रेसलेट्स घाला. हा लूक खूपच मस्त दिसेल.
  • नॉर्मल सलवार कमीज किंवा साडी असेल तर त्यावर गळेबंद कलरफुल नेकपीस घाला. नेकपीस जाडसर असेल तर कानातले घालण्याची गरज नाही. त्यामुळे संपूर्ण लक्ष तुमच्या कपडय़ांवर आणि नेकपीसवर राहील.
  • बोहेमिअन पद्धतीचे हेवी कानातले घालणार असाल तर नेकपीस घालणे टाळा.
  • खूप लहान अंगठय़ा, ब्रेसलेट्स किंवा अँकलेट्स तुम्ही रोज वापरू शकता.
  • आपल्या चेहऱ्याच्या आकाराला अनुसरून चोकर्स घालावेत. काही वेळेला चेहरा खूप लहान वाटू शकतो. आणि ते वाईट दिसू  शकतं.
  • अनेक दागिने एकावेळी घालायचा अट्टहास टाळा. त्याऐवजी लेयिरग मेथोडचा वापर करून उत्तम दिसता येईल.
  • कानातले निवडतानाही आपल्या शरीरयष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या चेहेऱ्याला किती मोठे कानातले शोभतील त्याप्रमाणे ते निवडावे. कारण काही काही वेळा, हेवी कानातले घेण्याच्या नादात त्यांचं वजन आपण विचारात घेत नाही, आणि मग कान चिघळतो.
  • या टिप्स वापरून दागिने विकत घेतलेत तर नक्कीच तुमची शॉिपग सोप्पी होईल.  हॅप्पी शॉिपग!

    (छायाचित्र सौजन्य –  बदामझ्र्राणी इन्स्टाग्राम पेज)

Story img Loader