lp04‘गणपती बाप्पा.. मोरया..!’ असं म्हणत सगळेच बाप्पाचं धूमधडाक्यात स्वागत करतात. कलाकार मंडळीही यात मागे नाहीत. कोणी शूटिंगपासून ब्रेक घेतं, कोणी नवीन कामाला त्याच दरम्यान सुरुवात करतं, कोणी सजावटीत कलाकौशल्य दाखवतं, तर कोणी खाद्यपदार्थाची जय्यत तयारी करतं. बाप्पाच्या आगमनामुळे कलाकारांचाही उत्साह द्विगुणित होतो. गणेशोत्सवाच्या आठवणी, महत्त्व, गमतीजमती अशा सगळ्या भावना कलाकारांनी व्यक्त केल्यात.

lp66करिअरचा श्रीगणेशा – अमृता खानविलकर</strong>
गणेशोत्सवामुळेच माझ्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं मी म्हणेन. १९९४-९५ मध्ये मी पुण्याला राहायले गेले. तिथे बिल्डिंगमध्ये गणेशोत्सव साजरा केला जायचा. या दिवसांमध्ये आम्हा बच्चेकंपनीची धमाल असायची. खेळ, नृत्य, गायन, वेशभूषा अशा अनेक स्पर्धा व्हायच्या. मी तेव्हा साधारण पाचवी-सहावीत असेन. तेव्हापासून नृत्यस्पर्धेत मी सहभाग घ्यायला लागले. कधी ग्रुपमध्ये तर कधी एकटीच असं परफॉर्म करू लागले. अशा प्रकारे माझ्या नृत्याच्या आवडीचा विस्तार झाला. त्या वेळी कॉलनीत नृत्य सादर करणं मला खूप महत्त्वाचं आणि प्रतिष्ठेचं वाटायचं. म्हणूनच मी आधीपासूनच परफॉर्मन्सची तयारी करायला लागायचे. गणेशोत्सवाच्या दोनेक महिने आधी गाण्याची निवड करून नृत्य बसवण्याची तयारी करायचे. बहिणीला तर कधी आईला समोर बसवून माझा परफॉर्मन्स बघायला सांगायचे. बहिणीला तर यासाठी मी खूप त्रास द्यायचे. पण, ही सगळी मजा तेव्हा खूप आनंद द्यायची. म्हणूनच बाप्पा माझ्या खूप जवळचा आहे. आता पुन्हा मुंबईत आल्यानंतर पुण्यातल्या माझ्या काही नेहमीच्या गणपतींना मी जात नाही असं कधीच झालं नाही. आजही मी तिथल्या गणपतींना आवर्जून भेट देते. लहान असताना माझ्या घरी गणपती असावा अशी माझी खूप इच्छा असायची. पण, आम्ही दोघी बहिणी असल्यामुळे नंतर पुढे घरगुती गणेशोत्सवाच्या प्रथेत खंड पडायला नको म्हणून घरी गणपती आणला नाही. पण, आता माझ्या नवऱ्याकडे म्हणजे हिमांशूकडे गेली चार र्वष गणपती आणला जातो. दीड दिवसांचाच असला तरी आम्ही बाप्पाची खूप सेवा करतो. गणपतीची आरास करण्यात माझा मोठा वाटा असतो. टेबल लावण्यापासून ते लाइटिंग करण्यापर्यंत मला सगळं एकदम व्यवस्थित लागतं. मोदकांवर ताव मारण्यातही माझा मोठा सहभाग असतो. एका वेळी मी १०-१२ उकडीचे मोदक खाऊ शकते. मोदक करण्याचा प्रयत्न फसला असला तरी त्याचा आस्वाद घेण्यात मी कुठेही कमी पडत नाही. गणपती घरी बसवण्याची माझी लहानपणीची इच्छा आता पूर्ण झाली. प्रत्येक वर्षीचा गणेशोत्सव तसा खासच असतो. पण, यंदाच्या गणेशोत्सवाला चार चांद लागलेत. कारण या वर्षांत खूप काही चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या आहेत. लग्न झालं, ‘नच बलिये’ हा शो मंी आणि हिमांशू जिंकलो.

pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; “आमच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आंदोलन, मराठ्यांना…”
BJP boycotts visit of Buldhana Guardian Minister and Rehabilitation Minister Makarand Patil
बुलढाणा : पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपचा बहिष्कार! युतीत विसंवाद
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा
Abhishek Bachchan
“आराध्याकडून कोणत्या अपेक्षा…”, अभिषेक बच्चन पालकत्वावर बोलताना म्हणाला, “फक्त आई-वडिलांनी…”
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”
Shiv Sena is unhappy after Yogesh Kadam from Ratnagiri district was left out of the list for the post of Guardian Minister
योगेश कदम यांना डावलले

lp63पुणेरी गणपतींचं दर्शन – प्रसाद ओक</strong>
पुण्याच्या घरी गौरी-गणपती असतात. घरातलं वातावरण एकदम प्रसन्न असतं. मी पहिलीत असल्यापासून दगडूशेट गणपतीसमोर बसून अथर्वशीर्ष म्हणायचो. कॉलेजनंतर या प्रथेत खंड पडला. पण, गेल्या ५-७ वर्षांपासून ही प्रथा पुन्हा सुरू केली. ऋषीपंचमीच्या दिवशीचं मी रीतसर नियोजन करतो. बायको मंजिरीसोबत सकाळी लवकर घराबाहेर पडतो आणि दगडूशेट, कसबा पेठ, केसरीवाडा अशा अनेक पुण्यातल्या महत्त्वाच्या मंडळांतल्या गणपतीचं दर्शन घेतो. गणपतीचं दर्शन घेतं संध्याकाळी शाळेतल्या काही मित्रांना भेटतो. भरपूर गप्पा मारतो. बेडेकरची मिसळ खातो आणि मग पुन्हा घरी येतो. एरव्ही कामानिमित्त मित्रांच्या भेटीगाठी होत नाहीत. गणपतीत मात्र भेटीचं नियोजन करतो. गणपतीच्या पहिले दोन दिवस मी शूटिंग घेतच नाही. शेवटच्या दोनेक दिवशी मुळातच शूटिंग फार कमी होतं. प्रश्न उरतो तो मधल्या दिवसांचा, तर त्या वेळी शूट असेल तर ते मी करतो. पुण्यातल्या गणपती मंडळांच्या दर्शनाची एक आठवण आजही ताजी आहे. माझी मुलं माझ्याकडून पुण्याच्या गणपतीचं अनेकदा कौतुक ऐकायची. तीन वर्षांपूर्वी माझ्या मुलाने पुण्यातले गणपती बघण्याचा हट्ट केला. आता त्यांना गणपती दाखवायला मी घेऊन गेलो तर मला लोक ओळखणार, मग गर्दी होणार, सत्कार-स्वागत समारंभ होणार अशी शक्यता होती. यात भरपूर वेळ गेला असता आणि गणपतीदर्शन तितकंसं चांगलं झालं नसतं. मला हे टाळायचं होतं. मुलांना गणपती तर दाखवायचे आहेत पण, गर्दीत थेट जाऊही शकत नव्हतो. मला कल्पना सुचली. मी बाइकवरून मुलांना पुण्याचे गणपती दाखवले. मी मंडळाबाहेर बाइकवर थांबायचो आणि मुलं आत जाऊन दर्शन घेऊन यायचे. मला कोणी ओळखू नये म्हणून मी संपूर्ण वेळ हेल्मेट घालून होतो. हा अनुभव माझ्यासाठीही वेगळाच होता. गणपती आणि उकडीचे मोदक हे समीकरणच आहे. उकडीचा मोदक माझाही आवडता पदार्थ आहे. सजावटीत माझ्या बायकोचाच महत्त्वाचा वाटा असतो.

lp65सजावट आणि खवय्येगिरी – प्रार्थना बेहेरे
मी महाराष्ट्रीय असले तरी माझं बालपण बडोद्यामध्ये गेलंय. त्यामुळे मुंबई-पुणेसारखं गणेशोत्सवाचं चित्र बडोद्यात बघायला मिळायचं नाही. पण आमच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. घरात मराठमोळं वातावरण असल्यामुळे सणवारांचे संस्कार आपसूकच आम्हा बहिणींवर होत गेले. म्हणूनच गणेशोत्सवाबाबत आम्हाला पुरेशी माहिती होती. आरत्या, मंत्रपुष्पांजली, या सणाचे पदार्थ, गणपतीसाठी आरास, सजावट असं सारं काही माहीत होतं. या सगळ्यात मला आकर्षण वाटायचं ते सजावटीचं. सजावटीच्या सामानाची जमवाजमव आधीपासून करायची, पण सजावट करायला बसायचं ते आदल्या दिवशी जागूनच. गणेश चतुर्थीचा आधीचा दिवस म्हणजे हरितालिका. माझी ताई या दिवशीचा उपास करायची. तिचं बघून मीही तो उपास करू लागले. आम्ही निर्जळी उपास करायचो. हा उपास नवऱ्यासाठी करायचा असतो हे कळल्यानंतर मात्र मी हा उपास करणं थांबवलं. या उपासाची एक गंमत सांगते. जेव्हा मी उपास करायचे त्या वेळची गोष्ट. आदल्या दिवशी सजावटीसाठी आम्ही सगळे भावंडं रात्री एकत्र जमायचो. तेव्हा मी प्रत्येकाला आधी सांगायचे की रात्री ११-११.३० वाजता घरी या सजावटीसाठी आणि येताना तुमच्याकडचा एकेक पदार्थ आणा. याचं कारण असं की, रात्री १२ नंतर माझा उपास संपायचा आणि मला खूप भूक लागलेली असायची. म्हणून मी सगळ्यांना असे पदार्थ आणायला सांगायचे. आता हे सगळं आठवून आम्ही सगळेच खूप हसतो. आजही मला माझी भावंडं ‘आज काय आणायचं खायला’ असं विचारतात. मोदक, करंज्या, पुरणपोळी असं सगळं मला आवडतं. सुरुवातीला आमच्याकडे उकडीचे मोदक फारसे होत नव्हते, नंतर आईने उकडीचे मोदक शिकून घेतले. आता आमच्याकडे दरवर्षी न चुकता उकडीचे मोदक बनवले जातात. उकडीच्या मोदकात तूप टाकून त्याचा मनमुराद आनंद घेणं म्हणजे सुख आहे. खूप गोड खाण्याचाही अशा वेळी कंटाळा येतो. मग तेव्हा मी पुरणपोळी आणि फ्लॉवरची भाजी असं कॉम्बिनेशन खाते. गोड-तिखट चव येण्यासाठी मी हा प्रयोग करते. गेले तीन र्वष माझ्या शूटिंगच्या तारखा नेमक्या गणपतीच्या दिवसांमध्येच लागताहेत. पण दरवर्षी त्यात ऐन वेळी बदल होतोय. तसा याही वर्षी झालाय. त्यामुळे गणपतीचे पहिले दोन दिवस मी बडोद्याला घरी असणार आहे.

lp62आनंद, उत्साह आणि जल्लोश – आदिनाथ कोठारे
माझ्यासारखाच गणपतीबाप्पा अनेकांचा लाडका देव आहे. मुंबईत पूर्वी राहात असलेल्या सोसायटीत गणपती बसायचा. पंचवीसएक र्वष मी तिथल्या गणपतीचा आनंद अनुभवला. प्रचंड उत्साह असायचा. सकाळी लवकर उठून सोसायटीतले आम्ही सगळे गणपती आणायला जायचो. त्या वेळी माझे बाबा थोडा वेळ गणपतीची मूर्ती माझ्या मांडीवर ठेवायचे. मूर्ती जपून व्यवस्थित मांडीवर ठेवणं ही मला मोठी जबाबदारी वाटायची. मी ते खूप एन्जॉय करायचो. वाजत-गाजत आम्ही गणपतीचं स्वागत आणि विसर्जनही करायचो. आम्ही जिथे राहायचो तिथून विसर्जनाचं ठिकाण जवळ होतं. सोसायटी ते विसर्जनस्थळ हे अंतर कमी असल्यामुळे धमाल करायला तसा कमी वाव मिळायचा. म्हणून आम्ही लांबच्या रस्त्याने विसर्जनस्थळी पोहोचायचो. लांबून गेल्याने आणि हळूहळू पुढे जात असल्यामुळे नाचायला बराच वेळ मिळायचा. इतक्या वर्षांच्या बाप्पाच्या आठवणी अजूनही ताज्याच आहेत. एकेक दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा असायचा. आपल्या घरी पाहुणे आले की त्यांना खूश ठेवण्यासाठी आपण जसे नानाविध प्रयत्न करत असतो, तसंच बाप्पाला आपल्या घरी प्रसन्न वाटावं म्हणून त्याच्यासाठी केलेल्या अनेक गोष्टी करताना मनापासून आनंद होत असतो. गिरगावात माझी एक मावशीआजी राहते. तिच्याकडच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला तेव्हापासून तिच्या घरी गणपती आहे. तिथल्याही गणपतीच्या विविध आठवणी मनात घर करून आहेत. खरं तर देव आपल्या मनातच असतो. अमुक एका देवाचं दर्शन करायचंय म्हणून विशिष्ट स्थळीच जाण्याची काहीच गरज नसते. गणेशोत्सवात खाद्यपदार्थाची मेजवानीच असते. त्यात विशेष असतात ते मोदक. उकडीच्या मोदकांवर मी ताव मारतो. पुण्यात एफसी रोडवर नुरानी हॉटेलमध्ये मोदकांचे विविध प्रकार मिळतात. त्यात सिझलिंग मोदक हा एक वेगळा प्रकार मला अनुभवायला मिळाला. गेल्या वर्षी कोकणात हिंदीतल्या ‘काकस्पर्श’ सिनेमाचं शूटिंग करत होतो. तिथल्या एका काकांचा मी डबा लावला होता. गणपतीचेच दिवस होते ते. त्यामुळे एक दिवस डब्यात मोदक दिले. अहाहा.. काय स्वाद होता त्या मोदकांचा. मी पट्टीचा खवय्या असल्यामुळे सणासुदीला माझी ऐश चालू असते.

lp61गावाकडचा बाप्पा – सुनील तावडे
राजापूरमधलं विलये हे माझं गाव. तिकडे गावात आमचा गणपती असतो. आम्ही सहा भाऊ. दरवर्षी सगळ्यांनी एकत्र गावाला गणपतीसाठी भेटायचं हे ठरलेलं असतं. पण आम्ही एक वर्ष एकाने गणेशोत्सवाचं नेतृत्व करायचं, असं ठरवलंय. म्हणजे त्यानेच सजावट कशी करायची, कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य करायचा, आरास कशी असावी अशा सगळ्या गोष्टी त्यानेच ठरवायच्या. आम्ही फक्त त्याला मदत करायची. मग त्यानुसार आम्ही सगळे कामाला लागतो. या निमित्ताने गावाकडचं घर जिवंत आणि प्रसन्न राहतं. अलीकडे या सणांनाही व्यावसायिक रूप आलंय. ते मला खटकतं. त्याचं व्यावसायिक होणं कुठे तरी थांबायला हवं असंही वाटतं. पण तातडीने हा बदल होईल की नाही, अशी शंका वाटते. सगळीकडे श्रद्धेचं वातावरण असतं. देवाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा तो प्रयत्न असतो. लोकांचा उत्साहही या दिवसांमध्ये दिसून येतो, पण तो व्यक्त करण्याची पद्धत काही वेळा चुकते. आम्ही भाऊ गावी जाताना काही ना काही पदार्थ घेऊन पोहोचतो. अनेकदा गावी पोहोचल्यानंतर काही पदार्थ बनवण्यासाठीचं साहित्य घेऊन जातो. जेणेकरून गणपतीच्या दिवसांमध्ये दररोज एकेक असं करून ते पदार्थ बनवता येतील. यात नेहमी होणारा पदार्थ म्हणजे तांदळाचे घावने. गरमागरम घावने खाण्यातली मजा काही औरच. माझी बायको हे घावने बनवण्यात माहीर आहे. शेवयाही बनवल्या जातात. गणेशोत्सव म्हणजे बाप्पासोबत आमचीही खाण्याची चंगळ असते. शूटिंगमुळे कधी मला जाणं शक्य झालं नाही तर घरचे इतर सदस्य गावी जातात. अशा वेळी मला माझ्या घरचे खूप समजून घेतात. गणपतीच्या पहिल्या दिवशी आम्ही मुंबईतच असू तर वेगवेगळ्या ठिकाणच्या गणपतीचं दर्शन घेत रात्री घरी जातो. केवळ मंडळांच्या गणपतीचं दर्शन न घेता मित्रपरिवारापैकी कोणाकडे गणपती असेल तर त्यांच्याकडे जातो. त्यानिमित्ताने मित्रांनाही भेटणं होतं, तर काही नातेवाईकांकडेही जाण्याचं ठरवतो. इतर वेळी असा वेळ काढून कोणाकडेही सहज जाणं शक्य होत नाही, पण बाप्पासाठी जायला पाय आपसूकच वळतात.

lp64बाप्पामुळे भेटीगाठी – शशांक केतकर
ठाण्यात माझ्या काकांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो. त्यामुळे दोन-तीन दिवस आम्हा भावंडांचा कल्ला असतो. आम्ही आदल्या दिवशीच तिथे पोहोचतो. सजावट, लाइटिंग वगैरे करताना धमाल करतो. दरवर्षी आमच्याकडे इको फ्रेंडली सजावट केली जाते. विशिष्ट थीमनुसार सजावट करतो. फुलांची आरास, मनोऱ्याचा आकार, वेगवेगळ्या आकारांच्या पानांची सजावट अशा वेगवेगळ्या थीम ठरवतो. गेल्या वर्षी केवडय़ाच्या मोठय़ा पानांची सजावट केली होती. व्हॉट्सअॅपमुळे एकमेकांच्या संपर्कात असलो तरी प्रत्यक्ष भेटण्याचं प्रमाण कमी होत चाललंय. त्यामुळे या सजावट आणि गणपतीच्या निमित्ताने आम्ही वर्षांतून किमान एकदा भेटतो. दीड दिवस बाप्पाच्या सान्निध्यात असल्यामुळे घरात प्रसन्न वातावरण असतं. मोठमोठय़ाने आरत्या म्हणणं हा आमचा आवडता प्रकार. रात्री आपोआपच गप्पा रंगत जातात. आमच्याकडे कामांचं वाटप करून दिलेलं असतं. सोपवलेलं काम ती-ती व्यक्ती जबाबदारीने पूर्ण करते. गणपतीत मोदक खाल्ले नाहीत तर या सणाची तुम्ही खऱ्या अर्थाने मजा घेतलीच नाही असं मी म्हणेन. आमच्या घरी तर माझ्या आईच्या हातच्या उकडीचे मोदक, पुरणपोळ्या सगळ्यांच्याच आवडीच्या आहेत. त्यामुळे त्यावर ताव मारणं हे केतकरांचं ठरलेलं काम. विसर्जन झाल्यानंतर ठाण्यातली झणझणीत मिसळ खाण्याचा आमचा बेत असतो. ही सगळी मजा मी चुकवू नये यासाठी पहिल्या दोन दिवस मी सुट्टी घेतो. या प्रसन्न वातावरणात एक गोष्ट मात्र खटकते. ती म्हणजे सणाचं झालेलं व्यावसायिकीकरण. रस्ते बंद करणं, वाहतूककोंडी होणं, मंडळांच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू असणं हे सगळे प्रकार बंदच व्हायला हवेत. गणेशोत्सवाची सुरुवात ज्या हेतूने झाली तो हेतू बाजूला सारून त्याचं रूपच पालटून गेलंय. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन द्यायचंच असेल तर सरकारने ठिकठिकाणी एक मैदान द्यावं आणि तिथे या मंडळांना सण साजरा करू द्यावा. मोठमोठय़ा आवाजात विचित्र गाणी लावत जो काही गोंगाट केला जातो तो सहनशक्तीच्या पलीकडे आहे.

lp60‘एकत्रित व्हा’ हा संदेश जपतोय – गश्मीर महाजनी
लोकांनी एकत्र यावं या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली. माझ्या घरी गणपतीच्या निमित्ताने दरवर्षी अनेकजण एकत्र येतात. त्यामुळे टिळकांनी दिलेला एकत्रित होण्याचा मंत्र माझ्यापरीने मी पुढे नेतोय. माझ्या घरी गौरी-गणपती असतात. पुण्यात माझ्या घराखालीच माझा डान्स स्टुडिओही आहे. तिथली माझी सगळी टीम हे सगळे दिवस माझ्या घरीच ये-जा करत असतात. गणपतीची रोजची आरास ही मंडळी करतात. सजावटीत माझा सहभाग फारच कमी असतो, पण गणपतीत आम्हा सगळ्यांची खूप धमाल सुरू असते. या सणात विशेष आकर्षण असतं ते म्हणजे उकडीचे मोदक. मी प्रचंड वेडा आहे उकडीच्या मोदकांसाठी. एका बैठकीत दहा-बारा मोदक मी खाऊ शकतो. तो मोदक मधोमध फोडून त्यात तूप घालून त्याचा आस्वाद घेण्याचा आनंद म्हणजे अहाहा..! पुण्याच्या चितळेंचा पेढय़ाचा मोदकही माझा आवडीचा आहे. पूर्वी मी सिनेमांमध्ये काम करत नव्हतो, त्यामुळे विशेष सुट्टी घेऊन घरी बसण्याचा कधी प्रश्न आला नाही. गणपतीच्या दिवशी मी घरीच असायचो. पण आता सिनेमांमध्ये काम करायला लागल्यापासून मला शूटिंगच्या तारखा बघाव्या लागतात. या वर्षी मात्र एक-दोन दिवस शूटिंग असल्यामुळे त्या दिवसांमध्ये मी घरी नसेन. पण खरं सांगू का, तर मला अशी कामं बाजूला ठेवून सुट्टी घेऊन सण साजरे करणं फारसं पटत नाही. देवावर माझीही श्रद्धा आहे, पण कामं बाजूला ठेवून माझ्यासमोर बसा असं देवही सांगत नाही. तुमची श्रद्धा कामातून व्यक्त करा, असं मला वाटतं. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गणेशवंदनेने केली जाते. मग एखाद्या कामाची सुरुवात गणेशोत्सवात केली तर काय हरकत आहे? ‘काम करणं हीच देवपूजा आहे’ हे आपण ऐकत, वाचत, लिहीत आलोय, मग ते आचरणात आणण्यात आपण कमी पडायला नको. तसंच गणेशोत्सवात रस्ते बंद करणं, वाहतुकीची कोंडी होणं, गर्दीत लहान मुलं, बायकांची गैरसोय होणं असे प्रकार घडतात. हे थांबायला हवं. श्रद्धेच्या नावाखाली मोठमोठय़ा आवाजात गाणी, धिंगाणा, गोंगाट चालू असतो. रात्रीप्रमाणे दिवसभरही या आवाजाला विशिष्ट मर्यादा हवी.
शब्दांकन : चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com @chaijoshi11

Story img Loader