गोरक्षक आणि िहदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना विव्हळणाऱ्या गाईमुळे झाल्या नाहीत इतक्या वेदना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांविषयी केलेल्या विधानामुळे झाल्या आहेत. मोदी यांनी ज्यांना अनुलक्षून विधान केले आहे, अशा ढोंगी गोरक्षकांना मिरच्या झोंबल्या आहेत. करवीर नगरीत गोरक्षणाचे काम केवळ प्रामाणिकपणाने नव्हे, तर प्राण पणाला लावून करणाऱ्यांना इतके कठोर विधान झाल्याने निराशा लपवता येत नाही. पण, घरचाच अहेर मिळाल्याने मोजक्या ढोंगी गोरक्षकांवर कठोर कारवाई होण्याची गरज निस्सीम भावनेने गोरक्षा करणारे कार्यकत्रे बोलून दाखवत आहेत. प्रशासन आणि पोलीस यांच्या ढिसाळ, हलगर्जी, भ्रष्ट कारभारामुळे गोरक्षा होण्याऐवजी त्यांची कत्तलखान्याकडे रवानगी होत असल्याचे वास्तव गोरक्षक बोलून दाखवतात. किंबहुना पोलिसांनी भाकड गाई कत्तलखान्याकडे जाण्यापासून रोखल्या तर आम्हाला गाईंची बेकायदा होणारी वाहतूक रोखण्याची गरजच पडणार नाही, असे सांगत करवीर नगरीतील गोरक्षक आणि िहदुत्ववादी संघटनांचे कार्यकत्रे सध्याच्या गोहत्यांचे पाप प्रशासन आणि पोलीस यांच्या पदरात टाकताना दिसतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा