लग्नात चार साडय़ा नेसून, लेहेंगा घालून मिरवायची हौस पूर्ण करून घ्यायची, ही मानसिकता आता मागे पडतेय. खर्चाचा विचार किंचित बाजूला ठेवून लग्नसोहळे देखणे आणि वेगळे करायचा प्रयत्न हल्ली सगळेच करतात. लग्नाच्या कपडय़ांनासुद्धा हाच नियम लागू होत आहे.

स्वतचं लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा प्रसंग आहे. त्यामुळे लग्नात आपली सगळी हौसमौज पूर्ण करून घ्यायची असते. भारतीय मुलींना तर लग्नानंतरच फिरायची, नटण्यामुरडण्याची, मित्रमत्रिणींसोबत फिरायची हौसमौज करायला मिळेल, अशी स्वप्नं दाखवली जातात. त्यामुळे त्यांच्या बऱ्याच आशा या सोहळ्याकडे लागून राहिलेल्या असतात. बरं लग्नं आली, म्हणजे लग्नातले कपडेही आले. त्यातही प्रथा, परंपरा, संस्कृती आल्या. मध्यंतरी यूटय़ूबवर एक व्हिडीओ पाहण्यात आला होता. पाश्चात्त्य लग्नसोहळ्यात सफेद गाऊनला अनन्यसाधारण महत्त्व असतं. आपल्याकडे लग्नातला शालू किमान नंतर इतरांच्या लग्नात वापरता तरी येतो. पण तिथे मात्र हा गाऊन नंतर वापरताही येत नाही. कारण तो ‘वेिडग गाऊन’ असतो. नव्या नवरीने लग्नात घालायचा. तरीही हौस आणि परंपरेच्या नावाखाली त्याच्यावर लाखो डॉलर्स खर्च केले जातात. लग्न करायचं म्हणजे सफेद गाऊन घालायचा ही संस्कृतीच आहे, या समजुतीपोटी. पण त्या व्हिडीओत नेमकी हीच समजूत खोडायचा प्रयत्न केलेला. मध्ययुगीन युरोपात खरंतर वेिडग गाऊन ही संकल्पनाच नव्हती. लोक  रहाटगाडग्यात इतके गुंतलेले असायचे की, लग्नसोहळे वगैरे करायची फुरसत त्यांच्याकडे नसायची. मग घरातील सगळ्यात चांगला ड्रेस घालून चार लोकांच्या साक्षीने  लग्नाला उभं राहायचं. सुंदर कपडे, मोठे गाऊन घालून लग्न करायची पद्धत श्रीमंत लोकांमध्ये होती, पण त्यात सफेद वेिडग गाऊन ही संकल्पना नव्हती. १५५९ मध्ये स्कॉटलंडची राणी मेरीने केवळ तिला सफेद रंग आवडायचा म्हणून लग्नात सफेद गाऊन घातला होता. त्यानंतर १८४०मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या सफेद गाऊनने मुलींना भुरळ घातली. तिथपासून ‘लग्न करायचं तर सफेद गाऊन हवाच,’ ही परंपराच जन्माला आली. असंच भारतीय लग्नांच्या कथित ‘परंपरां’च्या बाबत मागे वळून पाहिलं तर आपल्या कथित ‘परंपरांची’ भलतीच पंचाईत होईल. त्यामुळे मूळ मुद्दय़ावर परत येऊया. लग्नातील कपडे, दागिने, थाट म्हणजे सगळ्यांचाच हौसेचा सोहळा असतो. साहजिकच या हौसेचं स्वरूप काळानुसार बदलत जातं. पूर्वी लाल शालूसाठी लग्नं केली जायची, मग महागडा लेहेंगा, डिझायनर ड्रेसचा हट्ट पुरा केला जाऊ लागला. आताच्या पिढीला या गोष्टी एरवीही सहज मिळतात. त्यामुळे आता हौस केवळ महागडे कपडे, दागिन्यांची उरत नाही. अख्ख्या लुकला ‘लार्जर दॅन लाइफ’ करण्याची हौस निर्माण होते.

Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Youth Addiction, Young Generation, Nagpur Police ,
तरुणांनो प्रेम करा, पण…
गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य,उच्च न्यायालयाची टिप्पणी; मुलगी गतिमंद असल्याच्या दाव्यावरूनही ताशेरे
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल
Couples who are ineligible for marriage due to age restrictions are eligible to live-in
वयाच्या अटीमुळे लग्नास अपात्र जोडपे लिव्ह-इन करता पात्र!
Marathi actress Tejaswini Sunil married to Shreeram Nijampurkar
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नाच्या आठवणी अजूनही पुसट झाल्या नसतीलच. त्यांचं लग्न, पोशाख, लुक यावर इतकं बोललं गेलंय की आता काही वेगळं बोलायची गरज नाही. पण एक बाब आवर्जून नमूद करावी लागेल. ज्यांनी अनुष्काची पडद्यावरची प्रत्येक प्रतिमा नीट निरखून पहिली आहे, त्यांना लग्नातील तिच्या पारंपरिक पोशाख निवडीबद्दल नक्कीच आश्चर्य वाटलं. चुलबुली, स्पष्टवक्ती, नव्या विचारांची अनुष्का तिच्या लग्नात काहीतरी हटके, सुटसुटीत ड्रेसिंग करेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती. पण झालं नेमकं उलट. कारण कारकिर्दीच्या सुरुवातीपासून अनुष्काने स्वत वेगवेगळ्या पद्धतीचे लग्नाचे पोशाख घातले आहेत. सिनेमे, रॅम्पवॉक, जाहिरातीच्या निमित्ताने कितीतरी सुंदर कपडे, दागिने तिने घातलेत. साहजिकच स्वतच्या लग्नात तिला ‘हटके लुक’, स्टाइल स्टेटमेंट मिरविण्याची हौस नव्हती. तिला लुकमध्ये वेगळेपणा हवा होता, पण तो करताना कुठेही चच्रेला निमित्त होणार नाही याचीही काळजी घ्यायची होती. साहजिकच डिझायनर सब्यसाचीच्या हातात तिने ही जबाबदारी सोपवली. तिच्या कपडय़ांपासून दागिने, शूज, लुक सगळ्याची काळजी त्याने घेतली. चार वेगवेगळ्या लोकांच्या हातात काम देऊन गोंधळ करण्यापेक्षा एकाच्या हातात सगळं देऊन निर्धास्त राहणं तिनं पसंत केलं. त्यामुळे लग्नाबाबतची गुप्ततासुद्धा पाळता आली.

आजच्या नववधूंच्या बाबतीत हीच बाब आवर्जून पाहायला मिळते. लग्नातील शालू, महागडय़ा साडय़ा, लेहेंगे ही संकल्पना आता मागे पडतेय. लेहेंगा, गाऊन असे कपडय़ांचे प्रकार एरवीही समारंभात घातले जातात. पारंपरिक साडय़ाही आवर्जून नेसल्या जातात. त्यामुळे लग्नापर्यंत त्याचं कौतुक राहात नाही. मग इच्छा असते, इन्स्टाग्राम, फेसबुकवरील असंख्य लग्नांच्या फोटोच्या गर्दीत आपले लग्नाचे फोटो उठून दिसावेत. साहजिक लुक्समध्ये प्रयोग होतात. काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न होतो. त्यातूनच एखादी लग्नाच्या काही तास आधी ‘चीप थ्रिल’च्या ठोक्यात शॉर्ट आणि लेहेंगा चोलीत नाचताना दिसते. तर कोणी प्रिन्सेस गाऊनमध्ये मिरवते.

लाल रंगाचं उतरतं कौतुक

पूर्वी लग्न म्हणजे लाल साडी, शालू किंवा लेहेंगा हे समीकरण असायचं. परत हा लाल रंग प्रत्येकीसाठी वेगळा हवा म्हणून केशरी लाल, डार्क लाल, टोमॅटो रेड, चेरी रेड, पिंक रेड, मरून रेड असे लालचे किती तरी उपप्रकार येऊ लागले. पण आता मात्र लाल रंगाचं स्तोम कमी होऊ लागलं आहे. हल्ली स्वत:च्या स्कीन टोननुसार वेगवेगळे रंग वापरायचा प्रयोग आवर्जून केला जातो. लग्नाची थीम, ठिकाण याचाही विचार होतो. जांभळा, हिरवा, निळ्या, पिवळा, ब्राऊन, चंदेरी, सफेद रंगांचा वापरही हल्ली नववधूच्या कपडय़ांमध्ये होऊ लागला आहे. अगदी राखाडी रंगही लग्नात वापरला जाऊ लागला आहे. मिरर वर्क, पिटा वर्क, जरदोसीसारखी एम्ब्रॉयडरी अशा रंगांवर उठून दिसते. त्याला छान इंग्लिश टच मिळतो. लाल रंगाच्या बोल्डनेसची जागा आता कोबाल्ट ब्ल्यू, नेव्ही, गडद नारंगी, राणी पिंक अशा रंगांनी घेतली आहे. पाहुण्यांच्या कपडय़ांमध्ये काळ्या रंगाचासुद्धा समावेश होऊ लागला आहे.

गेल्या काही वर्षांत लग्नात वधूच्या कपडय़ांशी मिळतेजुळते कपडे तिच्या मत्रिणी, बहिणी आणि जवळच्या लोकांनी घालायची पद्धतसुद्धा प्रचलित झाली. अशा वेळी मंडपात सगळीकडे लालेलाल रंगाची उधळण करण्यापेक्षा सटल रंग वापरण्याकडे कल जाऊ लागला. वधू आणि वराच्या कपडय़ांमध्येही सारखेपणा ठेवण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होऊ लागला. त्यामुळे मुलाला शोभून दिसतील असे रंग निवडण्याकडे कल जाऊ लागला. एकाच रंगातील लेहेंगा आणि चोली किंवा साडी आणि ब्लाऊज अशी जोडीही सध्या पाहायला मिळते. लग्नाच्या कपडय़ांमध्ये दोन-तीन रंग भरण्यापेक्षा एकाच रंगाला उठाव देण्यात येतो.

* स्टोरी टेलिंग

प्रेमविवाह ही संकल्पना आता नवी राहिली नाही. अगदी अ‍ॅरेंज मॅरेजमध्येही हल्ली मुलामुलींना एकमेकांना समजून घेण्यासाठी एक-दोन वर्षांचा कालावधी मिळतो. अशा वेळी त्यांची प्रेमकथा फुलते. त्यांची स्वतंत्र गोष्ट बनते. पहिली भेट, प्रपोज करणं, पहिलं भांडण, लग्नाची अंगठी अशा किती तरी आठवणी जमा होतात. या सगळ्यांना एकत्र रंगविण्यासाठी लेहेंग्याशिवाय उत्तम कॅनव्हास असूच शकत नाही. त्यामुळे कित्येक नववधू त्यांची गोष्ट एम्ब्रॉयडरीच्या माध्यमातून लेहेंग्यावर रेखाटून घ्यायला पसंती देताहेत. प्रत्येकाची गोष्ट वेगळी त्यामुळे प्रत्येकीचा लेहेंगा वेगळा. त्यामुळे कपडय़ांना पर्सनल टचसुद्धा मिळतो. याशिवाय रासलीला, कृष्णकथा, शिवपार्वती, रामसीता, विष्णूलक्ष्मी असे पुराणातील संदर्भसुद्धा लेहेंग्यावर पाहायला मिळत आहेत. क्रीम रंगाच्या कापडावर अशा प्रकारच्या एम्ब्रॉयडरीला तरुणी पसंती देतात. गडद रंगांवर कॉन्ट्रास एम्ब्रॉयडरीसुद्धा उठून दिसते.

* नेमकेपणातलं समाधान

गेल्या काही वर्षांत लग्नातील हटके, वेगळ्या लुकची इतकी स्पर्धा रंगली, की त्यात कपडय़ांमधील गुंतागुंत वाढू लागली. साहजिकच नकळतपणे खर्चही वाढू लागला. लग्नात डिझायनर ड्रेस हवा तर तो एरवीच्या टेलरला शिवणं जमत नाही. म्हणजे डिझायनरकडच्या वाऱ्या वाढल्या. त्यात डिझायनर आपल्या कल्पनाशक्तीनुसार ड्रेसला वेगळा, देखणा करायच्या प्रयत्नात जुंपले आणि वधूचा कम्फर्ट हा मुद्दा बाजूला पडू लागला. कारण एखादा ड्रेस रॅम्प किंवा सिनेमात मिरवणं वेगळं आणि स्वतच्या लग्नात सगळ्या विधींमध्ये सावरणं वेगळं असतं. शिवाय मॉडेलची देहयष्टी वेगळी असते आणि वधूची वेगळी असते. त्यामुळे मॉडेलवर उठून दिसणारा ड्रेस वधूवर छान दिसेलच असं नसत. मग लुकमध्ये फसगत होण्याच्या शक्यताही वाढू लागल्या. ओघाने पुन्हा कपडय़ांमधला नेमकेपणा हा मुद्दा मूळ धरू लागला. लग्नातली नऊवारी साडी तशीच ठेवत तिला टसर किंवा ब्रोकेड सिल्कच्या मल्टििपट्रच्या ब्लाऊजची जोड दिली आणि कमरेला छान बेल्ट बांधला तर? एरवीच्या घेरेदार लेहेंगासोबत स्वच्छ पांढरा शर्ट आणि गळ्यात मोत्यांचा नेकपीस घातला तर? असे छोटे पण उठून दिसणारे बदल कपडय़ांमध्ये होऊ लागले. त्यामुळे मूळ कपडय़ांचं देखणेपण वाढलं आणि त्यांच्यामागे करावा लागणारा अतिविचारसुद्धा मागे पडला.

एम्ब्रॉयडरी लेहेंग्याऐवजी बनारसी साडीचा लेहेंगा, केसात भरजरी हेअरस्टाइलऐवजी नाजूक गजरा किंवा ताजी फुलं माळण्याची पद्धत पुन्हा सुरू झाली. अगदी चांदीचे किंवा सोन्याचे पाणी चढवलेले मोगऱ्याचे गजरे बाजारात मिळू लागले. नथ, हातफुलं, बाजूबंद, कमरपट्टा यांचे प्रयोग होऊ लागले. एकाच लग्नात दोन वेगवेगळ्या पद्धतींचा मिलाफ कपडय़ांमध्ये होऊ लागला. दाक्षिणात्य साडीसोबत पंजाबी पद्धतीचे कानातले डूल, त्यावर महाराष्ट्रीय नथ असं फ्यूजन सध्या ट्रेण्डमध्ये आहे. अगदी सिल्कची महागडी साडी, भरजरी एम्ब्रॉयडरी यापेक्षा कॉटन किंवा खादीची छान सुटसुटीत साडीही लग्नात नेसली जाते. बॉबकट, पिक्सल कट अशा छोटय़ा केशांच्या स्टाइल लग्नामध्ये आवर्जून केल्या जातात. प्रसंगी केस रंगविलेही जातात.

*  डिस्ने प्रिन्सेसचं गारूड

आपल्या लग्नात आपण राजकन्येसारखं दिसावं, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. मग या राजकन्येच्या प्रतिमेत डिस्नेच्या प्रिन्सेसची छबी येऊन बसणं कठीण नाही. सध्या अनेक लग्नांमध्ये रिसेप्शनची थीम एखाद्या डिस्ने कथेची ठेवून त्यानुसार ड्रेसिंग करायची पद्धत मूळ धरते आहे. अर्थात त्यामुळे पोशाखाचं कॉस्च्युम होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे गोष्टीतील पात्रानुसार ड्रेसिंग करण्याऐवजी त्यातील काही बाबी हेरून त्यांच्याभोवती ड्रेसिंग करावं लागत. मग पुरुषांच्या टक्ससिडोला युरोपीय स्टाइल रफ्लस किंवा बिल्ले येतात. वराची हेअरस्टाइल युरोपियन प्रिन्सप्रमाणे होते. वधूचा लेहेंगा किंवा गाऊन प्रिन्सेसच्या मूळ गाऊनच्या रंगसंगतीला धरून बनविला जातो. त्यामुळे सिंड्रेलाचा निळा गाऊन, बेलाचा पिवळा किंवा स्लििपग ब्युटीचा लाल, पिवळा आणि निळा गाऊन अशा रंगसंगतीचे कपडे वधूसाठी बनविले जातात.

लग्नाच्या पेहरावाची हौस करावी तितकी थोडीच आहे. पण त्याला आपला टच दिला तर नावीन्य उठून दिसत. याची जाणीव हल्ली होऊ लागली आहे. समाजमाध्यमे,  डिझायनर्सची कलेक्शन्स यांच्यामुळे हल्ली किती तरी पर्याय आपल्यापुढे असतात. त्या ट्रेण्ड्सच्या मागे पळण्यापेक्षा स्वतंत्र विचार केला, तरच काही तरी नवेपण मिळू शकते याचा विचार आता जोर धरू लागला आहे.

Story img Loader