पाककलेची कितीही आवड असली तरी शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे कलाकार स्वयंपाक घरापासून काहीसे दूरच असतात. सणाच्या दिवसांमध्ये मात्र त्यांची ही आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. दिवाळीच्या फराळात मदत करणं आणि त्याचा आस्वाद घेणं हे तर त्यांचं हक्काचं काम. मग कोणी घरी आई, आजीला मदत करतं तर कोणी फराळाचा मनमुराद आनंद घेत असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मऊसर चकली आवडीची – अश्विनी कासार
मी प्रचंड खवय्यी आहे. माझ्या घरी सगळेच शाकाहारी आहेत. मी मात्र मांसाहारीसुद्धा आहे. घरी मांसाहारी पदार्थ खाता येत नाहीत, त्यामुळे मग बाहेर खाणं होत असतं. आवडत्या शाकाहारी पदार्थाची तर मोठी यादीच तयार होईल. त्यातही दिवाळीचा फराळ म्हणजे माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. दिवाळीच्या आधी फराळ करण्यापासून ते दिवाळीत पहिल्या दिवशी त्याचा आस्वाद घेण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचा अनुभव घ्यायला मजा येते. फराळातली चकली माझ्या सगळ्यात आवडीची. ती एकच खाऊन थांबणं हे माझ्यासाठी केवळ अशक्य! ‘माझ्यासमोरचं चकल्यांचं ताट उचला आता’; असं इतरांना मला सांगावं लागतं. इतकी फॅन आहे मी चकल्यांची. माझ्या घरी दोन प्रकारे चिवडा होतो. पोह्य़ांचा आणि मक्याचा. चिवडय़ासह लाडू, करंजी असे फराळाचे सगळे पदार्थ दिवाळी सुरू होण्याआधी केले जातात. चकली मात्र मुद्दाम शिल्लक ठेवली जाते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी पहिली आंघोळ वगैरे झाली की नाश्ता म्हणून गरमागरम चकल्यांचा बेत असतो. ताज्या ताज्या चकल्या खाण्यात जी मजा असते ती शब्दांत सांगणं खरंच कठीण..अहाहा.! एकीकडे चकल्या तळण्याचा कार्यक्रम असतो तर दुसरीकडे त्या फस्त करण्याचा. मग कोणी लोणी चकली खातं तर कोणी दही चकली; तर आणखी कोणी काही तरी वेगळाच प्रयोग करतं. चकल्या तळण्याचं काम मला फार आवडतं. त्यामुळे ते करण्यात मी पुढे असते. खरं तर अनेकांना कुरकुरीत चकली आवडते. मलाही आवडते तशी. पण, त्याहीपेक्षा मला थोडी मऊसर चकली जास्त आवडते. हा मऊसरपणा ताज्या चकल्यांमध्ये जास्त असतो. त्यामुळे अशा चकल्या माझ्यासमोर आल्या तर मी त्यावर ताव मारलाच म्हणून समजा. आमच्या घरचे लाडू हीदेखील खासियत आहे. माझ्या काकांना खिलवण्याची फार आवड आहे. त्यामुळे पदार्थ बनवण्याची प्रक्रिया आणि नंतर त्याचा स्वाद घेण्याचा कार्यक्रम याचं काका खूप चांगल्या प्रकारे नियोजन करतात. माझ्या आई आणि काकूला पाककलेची आवड असल्याने त्याही उत्साहाने नवनवीन पदार्थ करत असतात. याशिवाय दिवाळीत त्या-त्या वेळी पदार्थ ठरवले जातात. मग कधी पावभाजी, छोले पुरी तर कधी वेगवेगळ्या भाज्या केल्या जातात. तर कधी कधी मोर्चा बिर्याणीकडे वळतो. माझं एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे पदार्थ कोणताही असो आम्ही सगळे मिळून त्याचा आनंद घेतो.

लाडूचा मी चाहता – मयूरेश पेम
कलाकार असल्यामुळे डाएट जरा सांभाळावंच लागतं. माझं सध्या तेच चालू आहे. पण, मी प्रचंड फुडी असल्यामुळे सण असला की डाएट वगैरे बाजूलाच आहे. थोडय़ाच दिवसांवर दिवाळी आली आहे. त्यामुळे डाएट काही दिवस बाजूला ठेवण्याची वेळ आलीय खरी! आमच्या घरी बाहेरून फराळ अजिबात आणला जात नाही. माझी आई आणि आजी घरीच सगळा फराळ करतात. मी आणि माझा भाऊ मनमीत दोघंही त्यांना मदत करतो. विशेषत: बेसनाचे लाडू करताना आईला मदत करण्यासाठी आम्ही दोघंही सज्ज असतो. याचं कारणंही तसंच आहे म्हणा.. फराळातला माझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे लाडू. मग तो कसलाही असो, बेसनाचा, रव्याचा, खोबरं-रव्याचा किंवा आणखी कसला. लाडू म्हणजे माझा जीव की प्राण! मला गोड पदार्थ खूप आवडतात. त्यात लाडू म्हणजे पर्वणीच. साधारणपणे लोकांना सतत गोड खायचा कंटाळा येतो. पण, मला जिथे जाई तिथे फराळातला मी पहिले लाडूच खातो. आईला ही गोष्ट चांगलीच माहिती आहे. त्यामुळे ती आम्ही दोघा भावांसाठी लाडवांचा एक डबा वेगळाच भरून ठेवते. फराळ करताना आई आणि आजीला मदत करण्यामागे एक कारण आहे. फराळ करत असताना सगळे एकत्र भेटणं होतं. बराच वेळ फराळ बनवणं सुरू असल्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होतात, मस्ती, मजा सुरू असते. ही सगळी धमाल मला आनंद देते. फराळाचं काम बराच वेळ सुरू असलं तरी इतर गोष्टींमुळे कामाचा थकवा अजिबात जाणवत नाही. यंदाही दिवाळीच्या फराळाची तयारी आता सुरू झाली आहे. नाटकांचे प्रयोगही आहेत पण, प्रयोग नसला की आईला मदत करण्याचा माझा ठरलेला कार्यक्रम असतो. तो मात्र मी अतिशय आनंदाने, समाधानाने पार पाडतो.

फराळाची मेजवानी – अर्चना निपाणकर
काही लोक प्रयोगशील असतात. मीही आहे. पण, खाण्यात. वेगवेगळे पदार्थ खायला आणि तयार करायलाही मला खूप आवडतं. नवनवीन पदार्थ खाऊन बघायला, त्याच्या चवीचा अनुभव घ्यायला मला आवडतं. खवय्यी असल्यामुळे गोड, तिखट असं सगळंच माझ्या पसंतीचं आहे. जसं, जेव्हा, जे छान होईल किंवा जसा मूड असेल तसे पदार्थ खायला मला आवडतं. ‘हेच खाऊ या, तेच हवं, हे नको’ असं ठरवून पदार्थाचा आनंद कधीच घेता येत नाही असं मला वाटतं. दिवाळीच्या फराळाबाबतही असंच आहे माझं. विशिष्ट एक पदार्थच माझ्या आवडीचा आहे असं नाही. पण, त्यातल्या त्यात सांगायचंच तर साटोरी हा फराळातला पदार्थ मला प्रचंड आवडतो. त्यात खव्याचं सारण असतं. गोल पुरीसारखा दिसणारा हा पदार्थ तळल्यावर खुसखुशीत होतो. थंड झाल्यानंतर खुसखुशीत साटोरीची मजा येते ती काही औरच! फराळात करंजी, लाडू, चकली हे इतरही पदार्थ मस्त असतात. पोह्य़ांचा आणि चुरमुऱ्यांचा असे चिवडय़ाचे दोन प्रकार असतात. दोन्ही प्रकार चविष्ट. पदार्थ खाण्यासोबत तयार करण्याचीही मला आवड आहे. करंजी आणि लाडू करायला आवडतात. करंजी करताना तिचा आकार फार आकर्षक वाटतो. त्यानंतर ती तळायला आणखी मजा येते. लाडू वळायला आवडतात. माझ्या घरी नाशिकला नवरात्र असते. त्या वेळी दिवाळीसारखाच फराळ होतो. त्यामुळे आमच्यासाठी वर्षांतून दोनदा फराळाची मेजवानी असते. या सगळ्यात आईला माझी थोडीफार मदत होत असते. आता शूटिंगमुळे वारंवार नाशिकला जाणं मला जमत नाही. पण, माझं तिथे जाणं ठरलं की मी आणि आई कोणत्या दिवशी कोणता फराळाचा पदार्थ करू या असं ठरवतो. रीतसर तसं प्लॅनिंग असतं आमचं. विकतचा फराळ आणणं आम्ही टाळतो. दोन गोष्टी कमी करू पण, घरीच फराळ करू; असं माझ्या आईचं म्हणणं असतं.

खाण्याची विविधतेत एकता – सिद्धार्थ मेनन
मी मूळचा केरळचा. त्यामुळे नेहमीच्या जेवणाबरोबरच मासेही आलेच. पण, माझ्या घरी सगळ्या प्रकारचे पदार्थ होत असतात. मलाही पदार्थ तयार करण्याची आवड आहे. डाएटचा मी फारसा विचार करत नाही. कारण मला जंक फूडची इतकी क्रेझ नाही. त्यामुळे इतर जे पदार्थ मी खातो ते बऱ्यापैकी पौष्टिक असतील याकडे माझं थोडं लक्ष असतं. दुसरं म्हणजे माझं एक तत्त्व आहे की, माणसाने आनंदाने खावं. उगाच टेन्शन घेऊन कशाला खायचं? काहींचं असं असतं की, थोडा जरी भात जास्त खाल्ला तर लगेच टेन्शन येतं त्यांना. पण, तेच तुम्ही कसलाही विचार न करता आनंदाने खाल्लं तर काहीही होत नाही. एखाद्या भूमिकेसाठी वजन कमी-जास्त करणं हा मुद्दा वेगळा झाला. त्यासाठी काळजी घेणं आवश्यकच असतं. माझं असं मत असल्याने डाएटचा प्रश्न माझ्यासमोर फारसा येत नाही. मी फुडी असल्याने खाण्याच्या बाबतीत कसलीही तडजोड होत नाही. आमच्या घरी माझी आजी फराळ करते. आजीच्या हातच्या करंज्या मला खूप आवडतात. या करंज्या तळणीच्या नसून बेक केलेल्या असतात. आजीला या कामात मदत करण्याचं माझं आवडीचं काम असतं. मला वाटतं, सणांमध्ये मुख्य भूमिका बजावतात ते खाद्यपदार्थ. दिवाळीत फराळासाठी मी माझ्या मित्रांच्या घरी जातो. प्रत्येकाकडे एकच पदार्थ करण्याची वेगवेगळी पद्धत असते. विविध पद्धतींमुळे त्या पदार्थाच्या चवीत झालेला थोडाफार फरक मजेशीर वाटतो. आमच्याकडे सणासुदीच्या पदार्थाबाबत एक गंमत असते. गुढीपाडवा, दिवाळीत मराठमोळे पदार्थ, ईदच्या दिवशी बिर्याणी; तर ख्रिसमसच्या वेळी केक असतो. थोडक्यात काय तर, आम्ही खाण्यामध्ये विविधतेत एकता जपतो.

खाण्यातला आनंद घ्यावाच – प्राजक्ता हणमघर

‘खाणं आणि मस्त जगणं’ हे असंच माझं असतं. वेगवेगळे पदार्थ खाऊन बघणं, त्यात काहीना काहीतरी प्रयोग करणं हे माझ्या आवडीचं काम असतं. शाकाहारी असले तरी त्यातही प्रयोग करत खाद्यपदार्थाचा मी आस्वाद घेत असते. त्यात श्रावणापासून सुरू झालेल्या सणांची साखळी म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच असते. त्या त्या सणांची वैशिष्टय़े असलेले खाद्यपदार्थ तेव्हा खायला मिळतात. आता दिवाळी येतेय. त्या दरम्यानही फराळातल्या विविध पदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. मला पोह्य़ांचा चिवडा भयंकर आवडतो. त्याला एक वेगळीच चव असते. तिखट, थोडं आंबट, थोडं गोड अशी मिश्र चव असते. ही चव जिभेवर बराच काळ रेंगाळत असते. दुसरं म्हणजे बिस्किटं, चॉकलेट्स हे सगळं आमच्या घरीच होतं. घरी केलेली कणकेतली साजूक तुपातली बिस्कीटसुद्धा माझ्या आवडीची आहेत. दिवाळीतही ही बिस्किटं आवर्जून होतात. दिवाळीत आपण नातेवाईक, आप्तेष्ट यांना छोटी का होईना काहीतरी भेट देतो. तसंच माझ्या घरी माझी वहिनी चॉकलेट्स तयार करते. मग ते छान सजवून, त्याचा बुके करून भेट म्हणून त्यांना देते. ही आमच्याकडची दिवाळीतली खासियत आहे. माझ्या घरी माझे आई-बाबा, दादा-वहिनी उत्तम स्वयंपाक करतात त्यामुळे माझ्यावर काही करायची फारशी वेळ येत नाही. तरी कधी वेळ मिळालाच तर मी नक्की करते. मला मानसिक स्वयंपाक उत्तम येतो असं मी म्हणेन. मी हे असं ‘मानसिक स्वयंपाक’ असं नेहमी सांगते कारण, जेव्हा तुम्हाला मानसिक खूप काही छान येत असतं ना तेव्हा प्रत्यक्षात करताना ते फार चांगलं जमून येतं. माझा असा अनेक गोष्टींच्या बाबतीतला अनुभव आहे. त्यामुळे  मी जेव्हा स्वयंपाक करेन तो उत्तमच असेल, हे मला माहीत आहे.
शब्दांकन : चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com