लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना. त्यामुळे आपले लग्न कधी होईल, कुणाशी होईल, कसे होईल याविषयी प्रत्येकाच्याच मनात प्रश्न असतात. ज्योतिषशास्त्र या प्रश्नांविषयी काय सांगतं?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे विवाह. प्रत्येकालाच आपला विवाह केव्हा व कुठे होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. आपला जोडीदार कसा असेल, तो काय करत असेल, त्याची शारीरिक- मानसिक- आíथक क्षमता कशी असेल. कुंडलीतील सातव्या स्थानावरून विवाहाची माहिती कळते, कारण सप्तम स्थानाला वैवाहिक स्थान मानले गेले आहे. परंतु लग्न पाहत असताना कुंडलीतील १, २, ५, ७ या स्थानांचा विचार करावा. किंवा अशा ग्रहांचा विचार करावा लागतो की, ज्यांच्या दशा अंतर्दशात विवाह होऊ शकतो. मुलांच्या बाबतीत शुक्र व मुलींच्या बाबतीत गुरू ग्रहाच्या दशा अंतर्दशेत विवाह होऊ शकतो.
जोडीदार कुठला असेल याचा विचार करायचा, तर पत्रिकेत १-४ स्थानात शुक्र चंद्र रवी असल्यास जन्मस्थानापासून २५ कि.मी.च्या दरम्यान जोडीदार असेल. ५-७ या स्थानात शुक्र चंद्र रवी असल्यास जोडीदार परिचित, ओळखीचा अथवा नात्यातील असेल. ८-११ स्थानात शुक्र चंद्र रवी असल्यास जोडीदार व्यवसाय अथवा नोकरीनिमित्ताने ओळखीचा असेल. ९-१२ स्थानात शुक्र चंद्र रवी असल्यास जोडीदार परदेशात राहणारासुद्धा असू शकतो.
गोचरी गुरू लग्नी तिसऱ्या पाचव्या अथवा अकराव्या स्थानात येतो त्यावर्षी लग्न होण्याची शक्यता जास्त असते, परंतु त्यावेळेस शनीची दृष्टी लग्नावर किंवा सप्तमावर नको. अडचणी येतात. जन्म राशीवरून गोचरी राहूचे भ्रमण असताना लग्न होण्याची शक्यता असते. शनी व गुरू गोचरी केंद्रात येतील त्यावेळेस लग्न होण्याची शक्यता असते. मुलांच्या कुंडलीत गोचरी गुरू जेव्हा चौथ्या स्थानी येतो त्या वेळेस विवाह होण्याची शक्यता असते. गोचरी बुध व शुक्र दुसऱ्या अथवा सातव्या स्थानात येतो त्यावेळेस विवाह होण्याची शक्यता असते.
१ मार्च १९२७ -धनू लग्न.
– रवी गुरू युती तृतीयात.
– बुध शुक्र युती मीनेची चतुर्थात.
– सप्तमेश बुध उच्चराशीतील शुक्राच्या युतीत.
– लग्नेश गुरू भाग्येश रवीच्या युतीत.
– लग्न वीस वर्षांच्या आत होऊन श्रीमंत स्थळ मिळाले.
२२ ऑक्टोबर १९३३, सकाळी ९.२०
– वृश्चिक लग्न, लग्नी चंद्र मंगळ शुक्र.
– लग्नेश भाग्येश सप्तमेश अशी युती लग्नी असल्यामुळे विवाह विनात्रास लवकर होऊन जोडीदार आíथकदृष्टय़ा उत्तम. परदेशात राहणारा मिळाला.
– चंद्र शुक्र जल राशीत असल्यामुळे विवाह लवकर झाला.
१. मेष राशी शुक्र मंगळ यांच्या दशेत किंवा अंतरदशेत विवाह होऊ शकतो.
२. वृषभ राशी शुक्र मंगळ बुध यांच्या दशेत किंवा अंतरदशेत विवाह होऊ शकतो.
३. मिथुन राशी गुरू चंद्र बुध यांच्या दशेत किंवा अंतरदशेत विवाह होऊ शकतो.
४. कर्क राशी शनी किंवा चंद्र यांच्या दशेत किंवा अंतरदशेत विवाह होऊ शकतो.
५. सिंह राशी शनी बुध किंवा रवी यांच्या दशेत किंवा अंतरदशेत विवाह होऊ शकतो.
६. कन्या राशी गुरू शुक्र बुध यांच्या दशेत किंवा अंतरदशेत विवाह होऊ शकतो.
७. तुळ राशी शुक्र किंवा मंगळ यांच्या दशेत किंवा अंतरदशेत विवाह होऊ शकतो.
८. वृश्चिक राशी शुक्र मंगळ गुरू यांच्या दशेत किंवा अंतरदशेत विवाह होऊ शकतो.
९. धनू राशी बुध शनी किंवा गुरू यांच्या दशेत किंवा अंतरदशेत विवाह होऊ शकतो.
१०. मकर राशी चंद्र किंवा शनी यांच्या दशेत किंवा अंतरदशेत विवाह होऊ शकतो.
११. कुंभ राशी रवी गुरू किंवा शनी यांच्या दशेत किंवा अंतरदशेत विवाह होऊ शकतो.
१२. मीन राशी बुध मंगळ किंवा गुरू यांच्या दशेत किंवा अंतरदशेत विवाह होऊ शकतो.
वैवाहिक सौख्य
विवाहाचा विचार करताना कुंडलीतील सप्तम स्थानाचा विचार केला जातो हे आपण पाहिलेलं आहे. परंतु कुंडलीतील वैवाहिक सौख्य पाहत असताना प्रणय कारक शुक्र या ग्रहाचा विचार केला जातो. जर कुंडलीमध्ये शुक्र कोणत्याही स्थानात उच्च राशीत स्वराशीत शुभग्रहयुक्त असता वैवाहिक जीवन अतिशय सुखदायक असते. सूर्य स्वराशीत किंवा उच्च राशीत मार्गी असेल, शुक्राच्या सप्तमात कोणताही शुभग्रह किंवा शुभग्रहांच्या युती असाव्यात. हे शुभग्रह वैवाहिक सुख चांगल्या प्रकारे देतात. वैवाहिक जीवन पाहताना पुरुषांच्या कुंडलीत चंद्र आणि स्त्रियांच्या कुंडलीत रवी या ग्रहांचा अभ्यास आवश्यक असतो. धन स्थान हे कुटुंब स्थान असल्याने या स्थानातील शुभग्रह वैवाहिक जीवन समाधानी ठेवतात. चतुर्थ स्थानातील शुभग्रह सप्तम स्थानाच्या दृष्टीने पोषक असतात. सप्तम स्थान शुभ कर्तरीत असल्यास शुभ फळे मिळतात. सप्तमेश स्वराशीत शुभ स्थानात अथवा शुभ नक्षत्रात असता वैवाहिक सौख्य चांगले मिळते.
१४ सप्टेंबर १९४७ – कुंभ लग्न.
– ही कुंडली उत्तम वैवाहिक सौख्य लाभलेल्या स्त्रीची आहे.
– पती प्रेमळ, कामात मदत करणारा, रसिक, नि:संशयी आहे.
– मुलगा, मुलगी, सून, जावई उच्चशिक्षित, दोन्हीकडची नातवंडे सौख्य असून कोणाची काळजी नाही, प्रकृती चांगली आहे.
– कुंभ लग्नाचा राजयोग कारक व सप्तमाचा कारक ग्रह सप्तमात आहे.
– शुक्रावर कोणत्याही ग्रहाची पापदृष्टी नाही. उलट भाग्य शुक्र सप्तमात असल्याने लग्न नंतर भाग्योदय झाला.
– कुटुंबेश गुरू भाग्यात त्यामुळे कुटुंबातले लोक चांगले मिळाले.
– पतीचा कारक रवी सप्तमात म्हणजे सप्तमेश सप्तमात बलवान आहे, सोबत चंद्र शुक्र सप्तमात, चंद्रामुळे पतीची लाडकी.
रवी रवीच्या उत्तर नक्षत्रात, त्यामुळे ही कुंडली वैवाहिक सौख्यास अतिशय उत्तम.
१. सप्तमेश सप्तमात, शुभ ग्रहांच्या दृष्टीत.
२. सप्तमाचा कारक ग्रह शुक्र सप्तमात, शुभ ग्रहांच्या दृष्टीत.
३. मंगळ रवी शुक्र चंद्र लाभ योगात.
४. रवी चंद्र शुक्र सप्तमात.
५. गुरूचा रवी-चंद्राबरोबर लाभ योग.
६. मंगळ हर्शलचा गुरूबरोबर कोनस्थानातून नवपंचमयोग
७. वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह शुक्र चतुर्थात.
८. सप्तमेश सप्तमेशाच्या भाग्यात.
९. शुक्र चंद्र गुरूच्या नवपंचमयोगात.
१०. शुक्र ज्या राशीत आहे त्याचा स्वामी उच्चराशीत.
प्रेमविवाह योग
अविवाहित मुला-मुलींच्याकडून असा प्रश्न असतो की, प्रेमविवाह होईल का? प्रणयाचा कारक शुक्र आहे आणि सप्तम स्थान प्रणयाचे महत्त्वाचे स्थान आहे आणि प्रेमासाठी पंचम स्थान. शुक्रासारखा अगर चंद्रासारखा ग्रह सप्तम स्थानात असेल तर तो प्रेमविवाहास कारक ठरतो. या दोन स्थानाचे एकमेकांशी संबंध प्रेमविवाहास जास्त कारणीभूत ठरतात. म्हणजे पंचमेश सप्तमात सप्तमेश पंचमात हा दोघांचा अनन्ययोग किंवा युती महत्त्वाची आहे. त्याचबरोबर पंचमेश सप्तमेश शुक्राच्या युतीत असणे. शुक्र स्वत:च्या राशीत म्हणजे तूळ आणि वृषभ त्याचबरोबर मंगळाच्या राशीत म्हणजे मेष वृश्चिक शुक्र मीन या उच्च राशीत, मंगळ हा शुक्राच्या राशीत असणे, मिथुन कर्क राशीतसुद्धा हा योग आढळतो. शुक्राचे नेपच्यूनशी शुभयोग म्हणजे लाभयोग त्रिकोणयोग, या योगामध्ये बरेचसे प्रेमविवाह झालेले आढळले आहेत. नेपच्यून हा ग्रह प्रेमाच्या भावनेसाठी जास्त संवेदनशील भावनाशील असल्यामुळे शुक्र नेपच्यूनच्या शुभयोगांत प्रेमविवाह होण्याची जास्त शक्यता असते. हर्षल हासुद्धा ग्रह शुक्राच्या युती-प्रतियुतीमध्ये असेल तर प्रेमविवाह घडतात.
१. शुक्र तूळमध्ये, चंद्र मेषमध्ये, सप्तमेश व पंचमेश युती वृश्चिकेत.
२. सप्तमेश पंचमात, पंचमेश सप्तमात, शुक्र-हर्षल युती वृषभ राशीत.
३. सप्तमेश-शुक्र युती व मंगळ तूळ राशीत.
४. पंचमेश व शुक्र युती मीन राशीत, मंगळ त्रिकोण नेपच्यून.
५. सप्तमेश-शुक्र युती व मंगळ वृश्चिकेत.
६. वृषभेचा शुक्र सप्तमेशाच्या सप्तमात त्रिकोण नेपच्यून.
७. मंगळ शुक्र युती तूळ राशीत व पंचमेश पंचमात.
८. तूळ राशीचा मंगळ व पंचमेश सप्तमेश युती.
९. पंचमेश रवी, मीन राशीचा शुक्र व सप्तमेश यांची युती.
१०. शुक्र मेषेचा पंचमात, त्रिकोणात नेपच्यून
११. सप्तमेश पंचमेश अनोन्ययोग, मिथुन राशीत शुक्र व त्रिकोणात हर्शल.
१२. पंचमेश शुक्र मेष राशीत, सप्तमेश सप्तमात. कर्कराशीत पुष्य नक्षत्रात.
प्रेमात अपयश
बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये प्रेम प्रकरणात अपयश आलेले आपण पाहतो. काही काही जण खूपच निराश होतात. सप्तमेश मेष राशीमध्ये कृतिका नक्षत्रात शुक्र तूळ राशीमध्ये वर्गोत्तम असून शुक्र रवी हर्शलच्या पूर्ण प्रतियोगात, चंद्र हा मनाचा कारक ग्रह वक्री शनी बुधाच्या केंद्र युगात किंवा वक्री शनी लग्नी व त्याची दृष्टी शुक्रावर व चंद्रावर त्यामुळे मानसिकदृष्टय़ा कुमकुवतपणा येतो. तूळ राशीमध्ये मंगळ शुक्र राहू युती, शुक्र वक्री हर्शलच्या प्रतियोगात, चंद्र केतू हर्शलच्या युतीत पंचमेश वक्री असणे हे प्रेमात अपयश देतात. सप्तमेश शनी मूळ नक्षत्रात षष्ठात असेल चंद्र शनीशी युती करीत असेल, शुक्र वक्री हर्शलशी केंद्र योग करेल, मंगळ शनी केंद्र योग असेल आणि शुक्र आद्र्रा नक्षत्रात असेल तरीही प्रेमात अपयश देतात. सप्तमेश मंगळ असेल व तो वृषभ राशीत असेल आणि तो शुक्राच्या पूर्ण युतीत चंद्र नेपच्यून युती नेपच्यून वक्री चंद्राचा रवी हर्शलशी त्रिकोण योग प्रेमात अपयश देतात.
१. चंद्र नेपच्यून युती व नेपच्यून वक्री.
२. चंद्राचा रवी हर्शलशी त्रिकोण योग.
३. पंचमेश पाप स्थानामध्ये.
४. पंचम स्थान पाप्कर्तर योगात.
५. शुक्र वक्री हर्षलशी केंद्र योगात.
६. शुक्र आद्र्रा नक्षत्रात, मंगळ शनीचा केंद्रयोग.
७. तूळ राशीमध्ये मंगळ शुक्र राहू युती व शुक्र वक्री.
८. शुक्र रवी युती वक्री हर्शलच्या प्रतियोगात.
९. मनाचा कारक चंद्र ग्रह केतू हर्शलच्या युतीत.
उशिरा विवाह योग
सहसा विवाहाचा विचार केला असता, चंद्र शुक्र रवी मंगळ या ग्रहांना जास्त महत्त्व दिले जाते. पुरुषाच्या पत्रिकेमध्ये चंद्र शुक्र याचा विचार केला जातो, आणि स्त्रीच्या पत्रिकेमध्ये रवी मंगळ यांचा विचार केला जातो. परंतु स्त्री-पुरुष दोघांचीही पत्रिका पाहत असताना या चारही ग्रहांचा विचार केलेला उत्तम. जन्माच्या वेळी पत्रिकेमध्ये हे चारही ग्रह बलवान असतील व शुभ ग्रहांच्या दृष्टीमध्ये किंवा शुभ ग्रहांच्या युतीमध्ये असतील, सप्तमात शुभ ग्रह आणि सप्तमेश चांगल्या स्थितीमध्ये शुभ ग्रहांच्या युतीत असून लग्नी शुभ ग्रह असता विवाह लवकर होतो.
उशिरा होण्यास कारण काय असते, सप्तमामध्ये शनी मंगल हर्षल नेपच्यूनसारखे ग्रह असणे, रवी मंगळ हे हर्षल शनीच्या कुयोगात असणे, वक्री शनी किंवा चंद्र शुक्राच्या केंद्रयोगात प्रतियोगात विवाहास विलंब करतो. चंद्र रवी शुक्र हे अशुभ ग्रहांच्या युतीत असणे, शुक्र नीच राशीत असणे, चंद्र शुक्रावर शनी मंगळाची दृष्टी असणे. रवी मंगळाशी शनीचे अशुभ योग. शुक्र राहू केतू हर्षल यांच्या युतीत असणे, चंद्र शुक्र यांच्या सप्तमात दोन पाप ग्रह असणे हे योगसुद्धा उशिरा विवाहाचे कारण बनतात.
वय र्वष ३४. अजूनही विवाह नाही.
१. शुक्र शनी युती, चंद्र शनीच्या दृष्टीत, शुक्र मंगळाच्या दृष्टीत.
२. चंद्राच्या सप्तमात रवी मंगळ आणि त्याच्या प्रतियुतीत नेपच्युन हर्षल युती शनीच्या दृष्टीत.
३. चंद्र शुक्र शनीच्या केंद्रयोगात. शुक्र नेपच्यून युती शनीच्या प्रतियोगात, लग्नी मंगळ सप्तमावर शनी मंगळाची दृष्टी.
४. लग्नी रवी शनी युती, त्याच्या प्रतियोगात सप्तमात नेपच्यून.
५. सप्तमात शनी, शनी नेपच्यून युती.
६. चंद्र मंगळ दृष्ट, शुक्र नीचेचा, शनी दृष्ट.
७. चंद्राच्या केंद्रयोगात शनी, शनी मंगळ केंद्रयोग, चंद्र मंगळ युती.
८. शनी चंद्र युती, शनी वक्री, शुक्र नीच राशीत, शनीशी षडाष्टकयोग.
९. शुक्र शनी युती. सप्तमात वक्री मंगळ, नेपच्यून केतू.
१०. शुक्र शनी युती, रवी मंगळ सप्तभावारंभी.
११. चंद्र शुक्र केंद्रयोग वक्री शनी.
विवाह मोडणे
१. शुक्र वक्री, सप्तमेश वक्री, चंद्र युती शनी मंगळ.
२. सप्तमात वक्री मंगळ, सप्तमेश वक्री, शुक्र केंद्रयोग हर्षल.
३. सप्तमेश हर्षल युती, शुक्र केंद्रयोग शनी हर्षल.
४. शनी हर्षल युती लग्नात.
५. हर्षल वक्री, केतू सप्तमात, सप्तमेश वक्री.
६. सप्तमात नेपच्युन, वक्री सप्तमेश हर्षलच्या केंद्रयोगात.
७. पाप नक्षत्रामध्ये रवी मंगळ युती सप्तमात.
८. सप्तमात वक्री मंगळ नेपच्युन केतू बरोबर.
९. लग्नी शनी व नेपच्युन युती, धन स्थानात वक्री मंगळ, सप्तमेश वक्री, शुक्र हर्षल युती.
१०. मंगळ हर्षल युती लग्नात, शुक्र प्रतियोग वक्री शनी, रवी केंद्रयोग हर्शल.
द्विभार्या – बहुभार्या / लग्नबाह्य़ संबंध
शुक्र मंगळ पाप नक्षत्रात. चंद्र मंगळ केंद्र योग. शनी राहू षडाष्टक. सप्तम स्थान पापग्रह कर्तरी योगात. सप्तमातील केतू हर्षल नेपच्युनच्या प्रतियोगात असतील व शुक्र नीच राशीत केंद्र योगात असेल आणि मंगळ व शनी दोघांची सप्तमावर दृष्टी. शुक्राच्या सप्तमात शनी वक्री, असे योग असतात. सहसा सप्तम स्थान आणि शुक्र पाप ग्रहांच्या कर्तरी योगात येतात त्याच बरोबर धन स्थान म्हणजे कुटुंब स्थान या स्थानाचा विचार करता तिथे जर पाप ग्रह असतील तर ते स्थान पापग्रहांच्या दृष्टीत पाप कर्तरी योगात येत असेल तरीही द्विभार्या बहुभार्या योग संभवतो.
सप्तमेशाचा विचार शुक्रप्रमाणेच करावा. सप्तमात शनी मंगळ राहूसारखे पाप ग्रह असून शुक्र बिघडलेला असेल तर (उच्च कामवासना) किंवा शुक्र हर्षल नेपच्युनचे अशुभ योग असता, शुक्र हा मंगळाच्या राशीत किंवा स्वत:च्या राशीत पाप ग्रहाच्या युतीत योगात किंवा दृष्टीत असता, शुक्र मंगळ अशुभ संबंध असता किंवा शुक्राच्या राशीत मंगळ अशुभ संबंधात असता, पंचमात शुक्र नेपच्यून राहूसारख्या ग्रहांच्या योगात असता. रवी चंद्र हे षष्टेशांनी युक्त असता.
जन्म २६-२-१९५४ धनू लग्न
– सप्तमात केतू हर्षल अंशात्मक युतीत.
– सप्तमावर राहूची दृष्टी.
– लग्न मूळ नक्षत्रात गंडांतर योगात.
– हर्षल केतूबरोबर मंगळाचा षडाष्टक योग.
– सप्तमेश बुध वक्री प्लुटोच्या प्रतियोगात.
– मंगळ शुक्र केंद्र योग.
– पत्नीचा करग्रह चंद्र जन्मताच साडेसातीत.
जन्म ३-१०-१९३२ कर्क लग्न
– सप्तमात सप्तमेश शनी वक्रीस्तंभी अवस्थेत असून मंगळाच्या दृष्टीत आहे.
– मंगळ कर्क राशीत लग्नी असून पुष्य नक्षत्रात आहे. मंगळ चंद्राचा सप्तमेश आहे.
– शुक्राचा हर्षलशी केंद्र योग.
– कुटुंब स्थान मध्ये सिंहेचा शुक्र, केतू नेपच्युनच्या युतीत व राहूच्या दृष्टीत.
– दशमात मेषेचा हर्षल वक्री.
१. शुक्र शनी युती असून त्यांच्या अंशात्मक प्रतियोगात पाप ग्रह.
२. सप्तमात पाप ग्रह व लग्नीही पाप ग्रह या योगास विचित्र वळण देणारा योग म्हणजे सुखस्थानामध्ये शुक्र पाप ग्रहाबरोबर.
३. वाली नेपच्युनच्या पूर्ण त्रिकोण योगात मंगळ शुक्र युती चंद्र नेपच्युन युती बरोबर.
४. तृतीय स्थानात स्वराशीतील शुक्र बरोबर मंगळ.
मानसी पंडित -response.lokprabha@expressindia.com