गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com
पर्यटन विशेष – भव्य दिव्य वास्तू
प्राचीन काळातील समृद्ध अशा इजिप्तमधील ऐश्वर्यसंपन्न राजे ऐषोआरामात जगत. तर त्यांच्या मृत्यूनंतरदेखील दिमाखदार अशा भव्य कबरी बांधण्यात आल्या. खुफू राजाचा पिरॅमिड जगातील सात आश्चर्यामधला एक मानला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पिरॅमिड्स म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर इजिप्त उभे राहते. असे पिरॅमिड्स जगात कंबोडिया, मेक्सिको, इंडोनेशिया या देशांमध्ये आहेत, पण इजिप्तची भव्यता त्यात नाही. हे पिरॅमिड्स चौकोनी दगडविटांच्या बांधकामाचे आहेत. त्यांचा पायथा रुंद असून वर निमुळते होत सर्व बाजू शेंडय़ाला एकाच बिंदूला मिळतात. सर्वच पिरॅमिड्स असे निमुळते नाहीत तर काही वर सपाटही आहेत.
साऊथ अमेरिकेत अॅमेझॉन नदी आहे तशीच आफ्रिकेत नाईल नदी. ४५०० हजार मैल वाहणाऱ्या नदीचा काठ काळ्या मातीचा आहे. नाईल ही वाळवंटातील नदी असली तरीही तिला दरवर्षी पूर येत असे. पूर्वापार पुराच्या पाण्याबरोबर आलेला गाळ किनाऱ्यावर पसरून तो परिसर काळा पण सुपीक झाला आहे. त्यामुळे आफ्रिकेसारख्या वाळवंटी भागातील इजिप्तमध्ये पाणी किंवा धनधान्याचे दुर्भिक्ष कधीच नव्हते. म्हणूनच नाईलला ‘फादर ऑफ इजिप्त’ म्हटले जात असे.
इजिप्तचा इतिहास चार ते पाच हजार वर्षांपूर्वीचा. वरील भौगोलिक कारणांमुळे तेथे पूर्वीपासूनच सुबत्ता होती. नाईलच्या किनारी गवतासारख्या पातळ पात्याच्या पाणवनस्पतीचा उगम होता. पुढे त्याच्यावर लिहिण्याचे प्रयोग सर्वप्रथम इजिप्तमध्येच झाले. त्यावर काढलेली चित्रे, नकाशे, लिखाण म्युझियममध्ये ठेवले आहेत. रोम, ग्रीस, पर्शिया अशा आणि आसपासच्या काही अरब देशांतून लोक येऊ लागले. शहरात सुधारणा, सोयी, कामधंदा वाढू लागला. जनतेचा ओढा शहराकडे सरकू लागला. इतर देशांच्या उपस्थितीमुळे संस्कृतीवर त्यांचा प्रभाव पडू लागला.
राज्यकर्त्यांकडे संपत्तीला तोटा नव्हता. फार पूर्वीपासूनच अरबस्तानात सोन्याच्या खाणी होत्या असे म्हटले जाते. मग त्यांच्याकडे दागदागिन्यांना तोटा असूच शकणार नाही. आजही आपण काही अरब देशांच्या गोल्डसुकमध्ये फिरताना तिथला झगमगाट दिसतोच. जगातल्या प्रत्येक भागात तिथली संस्कृती होऊन गेली. जशी रोमन, मायन वगैरे. पण इजिप्तची संस्कृती श्रीमंत होती. त्या काळी हा देश सर्वच बाबीत फार पुढारलेला होता.
इजिप्तमध्ये राजाला फारोह असे म्हटले जाई, म्हणजे देवाने पाठवलेला दूत. आपल्या हयातीत राजा ऐषोरामात राही व मृत्यूनंतरही त्याने त्याच इतमामाने रहावे असे रयतेला वाटे. मृत्यूपश्चात मानवी शरीरात जिवाचा थोडा अंश राहतोच असा समज असल्याने त्याच्या पार्थिवाची नेहमीप्रमाणेच सर्वतोपरी काळजी घेतली जाई. खाण्याचे वेगवेगळे पदार्थ, मद्य, दागिने, याशिवाय सेवेसाठी नोकर, थोडेफार सैन्य हा सर्व जामानिमा राजासह कबरीमध्ये रवाना होई.
त्या काळी राजाची कबर म्हणजे कोरलेल्या कातळावर राजाला ठेवून त्यावर आडवी संगमरवरी फरशी घातली की झाले. कबर बांधण्याचा सिलसिला तिसऱ्या राजवटीपासून सुरू झाला. सर्वात प्रथम स्थापत्यविशारद इत्मोह याने खुफ्रू राजाची चहूकडून उंच पायऱ्यांची चौकोनी कबर, मस्तबा बांधली. तिची उंची होती २०० फूट. त्याकाळची सर्वात उंच इमारत होती. यामध्ये आत काही कक्ष होते. पुढे प्रत्येक राजवटीत सोयीनुसार त्यात बदल होत गेले. राजा फारोह खुफ्रू याच्या काळात पायऱ्या जाऊन चौकोन वर निमुळता होणाऱ्या पिरॅमिडचा जन्म झाला. हे राजे हयात असतानाच आपली कबर बांधायला घेत. बऱ्याच वेळा कबर पूर्ण होण्याआधीच राजा मृत्यू पावत असे. ती मुलांनी किंवा घराण्यातल्या लोकांनी पूर्ण केली नाही, तर तशीच पडून राहत असे. एक तर तिथल्या वाळूत गाडली जात असे किंवा दगडांचा ढिगारा होत असे. इजिप्तचे लोक सूर्यपूजक होते. सूर्याचा अस्त पश्चिमेला होत असल्याने राजाच्या मृत्यूनंतर त्याचाही अस्तच होतो म्हणून नाईलच्या पश्चिम किनारी पिरॅमिड्स आहेत. रुंद पायथ्याचा पिरॅमिड वर हळूहळू निमुळता होत जाऊन एका बिंदूभोवती सर्व बाजू एक होत. समजा काही कारणाने बांधकाम ढासळले तर जास्त हानी, नुकसान होऊ नये हा हेतू असावा असे सांगितले गेले. या वास्तू इजिप्तमध्ये फक्त कैरोतच आहेत असे नाही तर त्या इतर प्रांतांतही आहेत. सकारा येथील उनास पिरॅमिड आहे. मस्ताबा याच काळातला. गिझा परिसराजवळ दाशूर भागात पहिला व्यवस्थित गिलावा असलेला बेंट पिरॅमिड आहे. याचा पहिला अवतार पायऱ्यांचा, पण नंतर पायऱ्यांवरील सर्व रिकाम्या जागा भरून उभारलेला, बाहेरून नितळ सपाट गिलावा असलेला रेड पिरॅमिड. पण गिझा खुफ्रूपेक्षा लहानच. सकारा येथील फारोह जोसेरचा पिरॅमिड सर्वात जुना मानला जातो. या भागात लहान-मोठे पिरॅमिड भरपूर असल्याने त्या भागाला पिरॅमिड कॉजवे म्हटले जाते.
कैरोमधील गिझा भागात अजूनही पाच भव्य पिरॅमिड्स चांगल्या अवस्थेत आहेत. पिरॅमिड्सचे लोण पुढे अरबस्तानात पसरत गेले आणि वेगवेगळ्या देशांत पिरॅमिड्सची निर्मिती होत गेली. पण त्यातील सर्वात मोठा पिरॅमिड फारोह खुफूचा आहे. तो ४५० फूट उंच असून त्याचे क्षेत्रफळ २५० मी. आहे. या अवाढव्य कामासाठी दोन-दोन टन वजनाचे दगड लाखांच्या संख्येने लागले. ते तिथे कसे आणले असतील याची काहीच माहिती नव्हती. शास्त्रज्ञांनी तेथे सापडलेल्या चित्रांवरून प्रयोग करून पाहिले. त्यांची लहानलहान मॉडेल्स करून त्यांचे प्रात्यक्षिक करून पाहिले. दगडाच्या खाणीतले अवाढव्य दगड नाईल नदीच्या प्रवाहातून तराफ्याच्या साहाय्याने वाहत आणले जात. हा प्रदेश वाळवंटाचा असल्याने हे दगड बांधकामाच्या जागेवर रेतीतून ढकलत नेले जात. यामध्ये प्रचंड घर्षण होऊन समोर होणारा वाळूचा ढिगारा उपसत बसावे लागणार म्हणून लाकडाच्या फळीवर दगड ढकलत नेताना सर्वात पुढे असणारा हमाल वाळूत प्रमाणशीर पाणी मारी. पाणी जास्त झाले तर चिखल होऊन दगड वाहून नेणे शक्य होणार नाही. कमी पाणी वापरले तर घर्षण होऊन दगड खराब होण्याचा संभव असे. वाळू खाली दाबली जाईल आणि काम सोयीचे होईल एवढाच पाण्याचा उपयोग केला जाई. दगड बांधकामाच्या जागेवर आणल्यानंतर हळूहळू वर चढवण्याचे काम उतरंडीचा उपयोग करून केले गेले असावे. हे एकूणच महाजिकिरीचे काम असणार.
या नमुन्यांची चित्रे आपल्याला म्युझियममध्ये पाहायला मिळतात. आता एवढे मोठे दगड चौकोनी आकारात उपकरणांशिवाय तासायचे म्हणजे हळूहळू फोडायचे. त्यासाठी किती वेळ लागेल त्याची कल्पनाच केलेली बरी. आतले दगड काही तासलेले नसत, ते आतमध्ये जवळजवळ चिकटवून ठेवत. पण दर्शनी भागावरचे चुन्याचे दगड मात्र आयताकृती करून सिमेंटसारख्या गिलाव्याने जोडीत. पिरॅमिडचा गिलाव्याचा दर्शनी भाग गुळगुळीत असून टोकावर त्यात सोनेचांदी एकत्र केलेले असे. सूर्याचे किरण त्यावर पडल्यावर पांढरा स्वच्छ, चकाकणारा पिरॅमिड कसा दिसेल ही कल्पना करून बघा. मोठी कबर बांधण्यासाठी वर्षांनुवर्षे लागत. त्यामुळे फारोह आपल्या हयातीतच आपली कबर बांधण्यास सुरुवात करीत. खुफू फारोहची कबर तयार होण्यास २० वर्षे लागली असे म्हणतात. नंतरच्या काळात म्हणजे पाचव्या, सहाव्या राजवटीत राज्यकर्त्यांना अशा बांधकामात किंवा त्यांची निगा राखण्यात रस नसावा, त्यामुळे दुर्लक्ष होऊन पडझड झाली. काही दगड इतर बांधकामासाठी वापरले गेले. काही चोरीला गेले. काही रेतीच्या ढिगाऱ्याखाली दडले गेले. सध्या मात्र एकाच पिरॅमिडवर शेंडय़ाचा गुळगुळीत व चकचकीत पृष्ठभाग दिसतो तो म्हणजे खुफूचा पिरॅमिड.
कबरीच्या पोटात खोलवर राजाचे पार्थिव ठेवले जाई. बरोबर खाण्याचे पदार्थ, मद्य, जडजवाहीर आणि राजाची काळजी घेण्यासाठी काही नोकरही असत. वरील शेंडय़ापासून खाली भुयारात सूर्यप्रकाशाची तिरीप येण्यासाठी पोकळी असे. रात्रीच्या वेळेस भ्रमण करणाऱ्या ग्रहांच्या मार्गाच्या मध्यावर ही पोकळी उघडत असे. जेणेकरून राजाला स्वर्गात जाण्यास मदत होईल, असे मानले जात असे. राजाच्या आसपास राणी, परिवारातील सदस्य, सरदार यांच्याही कबरी असत.
त्याच आवारात आपण काही इंग्लिश सिनेमात पाहिलेला स्फिंक्स दिसतो. स्फिंक्स ही पुराणातील काल्पनिक रक्षकदेवता. ती सर्वाचे रक्षण करते असा समज आहे. तिचा चेहरा मानवी आणि शरीर सिंहाचे असते. इथे तिचा ७० मी. लांब व २० मी. उंच पुतळा आहे. इजिप्तशिअन लोक सूर्यदेवतेला मानणारे असल्याने या पुतळ्याचे तोंड पूर्वेकडे आहे. हा चेहरा मऊ दगडाचा असल्याने हवामान, वाळवंटातील रेतीची वादळे यामुळे खराब झाला आहे. पण पंजापासून बैठकीपर्यंत पायऱ्यापायऱ्यांचा भाग फरशीचा असल्याने चांगल्या स्थितीत आहे. रात्रीच्या वेळेस तेथे साऊंड अॅण्ड लाइटचा सुंदर प्रयोग आम्ही पाहिला होता.
अजूनही तिथे संशोधन सुरू आहे. सापडलेले अवशेष संशोधक हळुवारपणे हाताळत होते. हळूहळू पिरॅमिड्स बांधण्याचे प्रस्थ कमी झाले. पुढे-पुढे लोकांनी नासधूस करण्यास सुरुवात केली. काही दगड, भुयारातील सांगाडय़ांवरील जवाहिरे चोरीला गेले. तेव्हा तिथल्या ममीज् उचलून कैरो येथील म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या. पिरॅमिड्सची भुयारे बंद करण्यात आली. आता फक्त फारोह खुफूच्या भुयारात जाता येते. त्यासाठी अगदी निमुळता, तिरका जिना वाकून उतरावे व चढावे लागते. ज्यांना क्लॉस्ट्रोफोबिया किंवा कमरेचा त्रास असेल त्यांनी न गेलेलेच बरे. पिरॅमिड्सची दुर्दशा होत गेली असली तरी फारोह खुफूच्या पिरॅमिडची आजही मानवनिर्मित सात आश्चर्यामध्ये गणना केली जाते.
कसे जावे, केव्हा जावे?
पिरॅमिड्स पाहण्यासाठी इजिप्तची राजधानी कैरो येथे जावे लागते. कैरो जगातील सर्व महत्त्वाच्या शहरांशी विमानाने जोडले आहे. कैरोमध्येच मुक्काम करावा. कैरोपासून जवळच हे पिरॅमिड्स आहेत. जाण्यासाठी उत्तम कालावधी : ऑक्टोबर ते एप्रिल.
(सर्व छायाचित्रे : विजय दिवाण)