गणपती म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, तर गणेशोत्सव म्हणजे मराठमोळा लोकोत्सव. लोकमान्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात आणला आणि महाराष्ट्राच्या पटलावर एक अखंड सांस्कृतिक पर्व सुरू झाले. मुळातच गणपती ही देवता विद्य्ोची देवता, कलेची देवता.. त्यामुळे गणेशोत्सव म्हटला की, सांस्कृतिक, कला महोत्सव वाटावा एवढी प्रचंड ऊर्जा, उत्साह, आनंद. अगदी लालबागच्या राजापासून तर सिद्धिविनायकपर्यंत गणेशभक्तीची नाना उदाहरणे. असंच एक उदाहरण डोंबिवलीच्या राज कांदळगावकर या तरुण कलाकाराचं. या अक्षरगणेश कलाकाराने सहा वर्षांपासून तब्बल दहा हजारांच्या वर विविध नावांतून अक्षरगणेशशिल्प रेखाटत बाप्पांच्या भक्तीचा अनोखा
नावातून गणेश साकारणाऱ्या राजने आजवर कुणाकडूनही या कलेचे पसे घेतलेले नाहीत. या कलाकृतीचा मोबदला घेतला तर तो माझ्या गणेशभक्तीचा व्यापार होईल. त्यामुळे मला पसे मिळाले असते पण माझ्या अक्षरगणेश भक्तीची किंमत कमी झाली असती. त्यामुळे अर्थार्जनासाठी माझा रेडिअम ग्लोसाइन बोर्डचा व्यवसाय आहेच, असे राज सांगतो. अवघ्या एका मिनिटात राज मनमोहक विघ्नहर्त्यांचे चित्र रेखाटून बाप्पांचे दर्शन घडवतो. राजला ही अक्षरगणेश कलाकारी त्याच्या मित्रांपुरती किंवा डोंबिवलीकरांपुरती मर्यादित ठेवायची नव्हती. त्यामुळे त्याने फेसबुकसारख्या समाजमाध्यमावरदेखील आपली कला समस्त गणेशभक्तांकरिता खुली ठेवली आहे. बाप्पांचा आशीर्वाद, अक्षरशिल्पावरची मेहनत आणि गणेशभक्तीचे वेड यामुळे राज यांच्यावर लाइक्सचा पाऊस पडायला लागला. अनेकांनी आपल्या नावात श्रींचे दर्शन घडविण्याची इच्छा व्यक्त केली आणि या अक्षरगणेश कलेने राजला समाजमाध्यमांमध्ये हजारो मित्र मिळाले.
जगात विविध ठिकाणी राहणारे गणेशभक्त त्यांच्या नावात गणरायाचे चित्र रेखाटण्याची विनंती राजला करतात. आजपर्यंत १४३ नावांमधून गणेशरूप साकारून ते परदेशात पाठवल्याचे राज सांगतो. राजच्या कलेने सहा देशांत आपला कलाविष्कार रेखाटला आहे. राजने आजवर १६० पेक्षा जास्त सेलिब्रेटीजला आपल्या अक्षरगणेश कलाकृतीची भेट दिली आहे. या सेलिब्रेटींच्या यादीत अनेक दिग्गज िहदी, मराठी सिनेकलावंत, नाटय़कलावंत, अनेक आंतरराष्ट्रीय कलावंत, राजकारणी, समाजसेवक आदींचा सहभाग आहे.
राजच्या अक्षरगणेश कलाकृतींची संख्या दहा हजार १२६ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. या प्रवासात प्रत्येक एका विशिष्ट संख्येच्या टप्प्यावर राजने त्याची कलाकृती व्यक्तिविशेषांना भेट दिली आहे. ज्यामध्ये ५००वी कलाकृती बाळासाहेब ठाकरेंना, हजारावी कलाकृती महानायक अमिताभ बच्चन यांना, एक हजार एक क्रमांकाची कलाकृती ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांना भेट. २००५वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेट, तीन हजारावी कलाकृती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भेट, तीन हजार एक क्रमांकाची कलाकृती गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भेट, तर पाच हजारावी कला त्याने मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरला भेट दिली आहे.
भविष्यात सीमेवर जाऊन लढणाऱ्या सनिकांना त्यांच्या नावातील कलाकृती भेट देण्याचा त्याचा मानस आहे. राजने आपल्या कलेत समाजातील वंचित वर्गालासुद्धा सहभागी करून घेतले आहे. बाळगोपाळांना गणपती बाप्पा कायमच आपलासा वाटतो त्यामुळे राज विविध शाळांमधून बाळगोपाळांची ही हौस पूर्ण करतो. तसेच रुग्णालये, वृद्धाश्रमे, अनाथालय येथेही त्याने आपली कला सादर केली आहे. अपंग व्यक्तींच्या समोरच त्यांच्या नावात गणपतीचे रेखाटन करून त्याने त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवला आहे. मी जरी ही कला छंद म्हणून जोपासत असलो तरी सामान्य गणेशभक्तांना कलेच्या माध्यमातून आनंद देणे हाच माझा उद्देश आहे असे राज सांगतो.
हजारो अक्षरगणेश कलाकृती
गणेश वेडाने झपाटलेल्या राजने ३६५ दिवसांत दोन हजार ९९९ अक्षरगणेश साकारले आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी आठपेक्षा जास्त अक्षरगणेश. याशिवाय त्याने एका तासात ४३पेक्षा जास्त अक्षरगणेश साकारले आहेत. म्हणजे दीड मिनिटात एक अक्षरगणेश! त्याने मराठी भाषेसह िहदी, इंग्रजी या भाषांमधून अक्षरगणेश रेखाटले आहेत. सोबतच राज चिन्ह आणि विविध संख्या यातूनसुद्धा अक्षरगणेश रेखाटण्याचा सराव करत आहे. यापुढे राजला ५० सेकंदात एक अक्षरगणेश रेखाटन साकारायचा आहे.
रोजच गणेशोत्सव…
राजची ही अक्षरगणेश कलाकारी गणेशभक्तांसाठी फेसबुकवर वर्षभर सुरू असते. फेसबुक वॉलवर सेल्फी किंवा घडामोडी अपडेट करणाऱ्या तरुणाईला या कलाकारीचं अप्रूप आहे. त्यामुळे आपल्या नावात ही कलाकारी करून मिळावी अशी गणेशभक्तांकडून त्याला सतत फेसबुकवर मागणी केली जाते. कुणी ही कलाकृती वाढदिवसाची भेट म्हणून मागतो, तर कुणी लग्नाची भेट म्हणून. त्यामुळे फेसबुकवर राजचा रोजच गणेशोत्सव सुरू असतो.
संतोष विणके – response.lokprabha@expressindia.com