नोकरी-व्यवसायासाठी मराठी माणसं सातासमुद्रापार जायला लागली ती आपले सण, उत्सव, परंपरा बरोबर घेऊनच. अनोळखी समाजात जाऊन स्थायिक होताना आपल्या परंपरांची मुळं अधिकच घट्टपणे रुजायला लागली. त्यातूनच आज जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होताना दिसतो आहे. कुठे तो जसा आपल्या भारतातल्या घरात साजरा होतो, तसाच्या तसा साजरा करण्याचा प्रयत्न आहे, तर कुठे आपला परिसर लक्षात घेऊन जमतील तशा तडजोडी करत, पण उत्सव साजरा करण्याचा उत्साह आहे. आरत्या, मोदकांसह साग्रसंगीत मराठी मेजवानी, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक पेहराव, वाजतगाजत काढलेल्या विसर्जन मिरवणुका हे जगभरात साजऱ्या होणाऱ्या या गणेशोत्सवाचं लोभस रूपडं ‘लोकप्रभा’च्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या अंकातून केला आहे.
देशोदेशीचा गणेशोत्सव
जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होताना दिसतो.
Written by दीपक मराठे
First published on: 18-09-2015 at 01:31 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worldwide ganesh utsav celebration