हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवीन वर्षांची चाहूल लागली की दोन प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांची ठळकपणे जागा व्यापू लागतात. एक म्हणजे विविध प्रकारचे अॅवॉर्ड सोहळे आणि दुसरे म्हणजे कंपन्यांचे ताळेबंद. अर्थात दोन्ही भिन्न गोष्टी असल्या तरी असादेखील एक सोहळा असतो की ज्यात ह्य़ा दोहोंचा संगम असतो. या कलाकृतींचा फायदा थेट ताळेबंदालाच होत असतो. सर्वसामान्यांपासून काहीसा दूर असणारा हा पुरस्कार सोहळा असतो जाहिरात क्षेत्राचा. पासष्टावी कला म्हणून गौरविलेल्या या कलेचा हा सोहळा तसा सर्वसामान्यांच्या फारसा चर्चेत नसतो. त्यांनी केलंलं काम जाहिरातींमधून सर्वसामान्यांना माहीत असतं. पण त्यामागचे चेहरे माहीत नसतात.
उत्पादकाच्या गरजेनुसार केलेल्या जाहिरातीचा आर्थिक फायदा उत्पादकाला होत असतोच. पण त्यापलीकडे जाऊन आपल्या कलेचं कौतुक आपल्याच क्षेत्रातील दिग्गजांनी करावं हे प्रत्येकाच्या मनात दडलेलं एक स्वप्न असतं. त्याची पूर्तता गोवाफेस्टमध्ये होत असते. त्यामुळेच येथेदेखील निवेदकाच्या ‘अॅण्ड द अॅवॉर्ड गोज टू ..’ या घोषणेनंतरची स्तब्धता असते आणि त्यानंतरचा धम्माल जल्लोषदेखील. गोव्यासारख्या सदाउत्साही ठिकाणी संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात अर्थातच एक भन्नाट जल्लोष सामावलेला असतो, जो त्यांच्या क्रिएटिव्हिटीचाच जल्लोष असतो. फक्त सिनेक्षेत्राच्या पुरस्कारांप्रमाणे तो आपल्यासमोर येत नाही. हा स्वप्नपूर्तीचा सोहळा म्हणजेच गोवाफेस्ट. अॅडव्हर्टायझिंग क्लब आणि अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन ऑफ इंडियामार्फत दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या अॅबी अवार्डसना जाहिरात क्षेत्रात मानाचं स्थान आहे. अर्थातच जाहिरात क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळीच येथे जमलेली असते.
– प्रसून जोशी, चेअरमन, एशिया पॅसिफीक, सीईओ अॅण्ड सीसीओ, इंडीया, मॅकॅन वर्ल्डग्रुप
चित्रपट लेखक, गीतकार म्हणून मी ओळखला जात असलो तरी माझी मुळं ही जाहिरात क्षेत्रातच आहेत. जेव्हा मी कोणीच नव्हतो तेव्हा मला या क्षेत्रानेच आधार दिला. मला सतत काहीतरी सांगायचं असतं. हीच माझी प्रेरणा असते. जाहिरात क्षेत्रात आलो नसतो तर मी लिखाण करत राहिलो असतो.’’
गोवाफेस्टचं यंदाचं हे दहावं वर्ष. ९ ते ११ एप्रिल या दरम्यान झालेल्या अॅबी अॅवार्डसच्या या सोहळ्यात पदकांची लयलूटच झाली होती. जाहिरातींच्या विविध वर्गवारीत तब्बल ३४४ पदकं देण्यात आली. संपूर्ण भारतातून सुमारे २५० जाहिरात एजन्सीज्नी आपल्या जाहिराती स्पर्धेत पाठविल्या होत्या. ६९ गोल्ड, १०२ सिल्व्हर, १७२ ब्रॉन्झ पदकं आणि एक ग्रँड प्रिक्स अॅवॉर्ड असा घसघशीत गौरव या सोहळ्यात करण्यात आला.
खरं तर आपण पाहात-वाचत असणाऱ्या जाहिरातींच्या मागे अशी काही उलाढाल असेल याची जाणीव सर्वसामान्यांना फारशी नसतेच. त्यामुळे एखाद्या जाहिरातीला एकच अॅवॉर्ड दिलं की काम झालं असंदेखील अनेकांना वाटू शकेल. पण हे गणित तसं साधं-सोपं नाही. जाहिरातीचं कॉपी रायटिंग, त्याचा लेआऊट, त्यात वापरलेले फोटो अशी सूक्ष्म वर्गवारी यात असते आणि अशीच वर्गवारी रेडिओ आणि टीव्हीवरील जाहिरातींना लागू पडते.
तीन दिवस चाललेल्या या गोवाफेस्टचा पहिला दिवस होता तो प्रसारमाध्यमांचा आणि त्यांना जाहिराती मिळवून देणाऱ्या मीडिया एजन्सीचा. (जाहिराती तयार करणाऱ्या क्रिएटिव्ह एजन्सीज आणि त्या प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचविणाऱ्या एजन्सीज म्हणजे मीडिया एजन्सीज.) उत्पादकाच्या गरजेनुसार सर्जनशीलता वापरून जाहिरात तयार करणे हे जितके क्रिएटिव्ह काम तितकेच ती जाहिरात योग्य त्या पद्धतीने प्रसिद्धिमाध्यमांच्याद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचवणे हेदेखील क्रिएटिव्ह काम असते. अर्थात हा व्यावसायिक कामाचा भाग असला तरी या मीडिया एजन्सीजमध्येदेखील अॅवॉर्डसाठी मोठी चुरस असते. लोडस्टार यूएम या स्पर्धेत तीन सुवर्णपदकांवर आपलं नाव कोरेल. टाटा मोटर्सच्या जाहिरातींसाठी टेलिव्हीजन व सिनेमा माध्यमाचा सवरेत्कृष्ट वापर केल्याबद्दल लोडस्टारने मीडिया एजन्सीजमध्ये सर्वाधिक सुवर्णपदकं पटकावली. तर माईंडशेअर या एजन्सीने एकूण अकरा पदकं मिळवत सर्वाधिक पदकांचा मान मिळवला.
दुसरा दिवस होता तो रेडिओचा. एकेकाळी ग्राहकाशी संवाद साधणारं हे माध्यम दूरदर्शनच्या आगमनाबरोबर मागे पडलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा एफएमच्या माध्यमातून उसळी मारून वर आलं आहे. रेडिओ जाहिरातींसाठी एक वेगळा दिवसच देणं ही ह्य़ा माध्यमाची वाढती ताकदच अधोरेखित करणारं आहे. स्केअरक्रो कम्युनिकेशन, जेडब्ल्यूटी आणि कॉन्ट्रॅक्ट या क्रिएटिव्ह एजन्सीचा वरचष्मा या वर्गवारीत दिसून आला. ‘रेडिओ सिटी’ या ब्रॅण्डसाठीच्या जाहिरातींनी अनेक पारितोषिकं पटकावली. लखनवी, उत्तर हिंदुस्थानी ढंगातील आवाजातील या रेडिओ जाहिरातींनी अपेक्षित ग्राहकाला आकर्षित करण्याचं काम चोख केलं होतं. तर वाघ बकरी चहा आणि केनस्टारच्या जाहिरातींनी सुवर्णपदकाची कमाई केली. रेडिओ माध्यमात आपल्याकडे संकल्पना चांगल्या असल्या तरी त्या योग्यप्रकारे कार्यान्वित होत नसल्याचे मत मुख्य परीक्षक आणि कॉन्ट्रॅक्ट इंडियाचे नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर आशीष चक्रवर्ती यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले की, रेडिओचं माध्यम सध्या खूप विस्तारलं आहे. आपल्याकडे संकल्पना खूप चांगल्या आहेत. विषय आहेत, पण सध्यातरी आपण त्याच्या कार्यवाहीमध्ये खूपच मागे आहोत. परदेशात ज्या प्रकारे हे माध्यम वापरले जात आहे, ते पाहता आपण बाल्यावस्थेतच आहोत.
प्रशांत गोडबोले
तिसरा दिवस हा या सोहळ्याचा अंतिम आणि महत्त्वाचा दिवस. मुद्रित माध्यमातील जाहिराती, आऊट ऑफ होम म्हणजेच होìडग्ज, बॅनर, पोस्टर इ. आणि टेलिव्हिजन माध्यमातील जाहिरातींचा कस पाहणारा हा दिवस. येथे ‘अॅण्ड अॅवॉर्ड गोज टू..’च्या पुढे आपलंच नाव असावं अशी प्रत्येकाची मनीषा असते.
संतोष पाढी (पॅडी)
आऊट ऑफ होम माध्यमाच्या विविध वर्गवारीत तब्बल नऊ सुवर्णपदकांसोबत, १४ रौप्य आणि १७ ब्रॉन्झ पदकं देण्यात आली. अगदी काही क्षणांत आपलं लक्ष वेधून घेण्याचं सामथ्र्य असणारं हे माध्यम. चार भिंतींच्या बाहेर असताना लक्ष्य वेधून घेणारं हे माध्यम अत्यंत प्रभावीपणे वापरता येते. निर्भया प्रकरणानंतर दिल्लीत केवळ कोऱ्या होìडग्जवर प्रकाश टाकण्यात आला होता. ही होìडग्ज ज्या रस्त्यावर लाइट नाही तेथे लावण्यात आली होती. सांगायचं इतकंच होतं की, येथे आम्ही तुमच्या सोबतीस आहोत. अशा होर्डिग्ज प्रभावी ठरतात.
मात्र आजही आपल्याकडून आऊटडोअरचं पोटेन्शिअल पुरेपूर वापरलं जात नाही असं मत या विभागाचे मुख्य परीक्षक आणि ‘आयडीयाज् अॅट वर्क’चे प्रशांत गोडबोले यांनी व्यक्त केलं. ते सांगतात की आऊटडोअर जाहिराती हे सर्वात प्रभावशाली आणि आव्हानात्मक माध्यम आहे. ग्राहकास आपल्या उत्पादनाचं महत्त्व अगदी कमी वेळात आणि प्रभावीपणे पटवून द्यायचं असतं. पण हे माध्यम खर्चीकदेखील आहे. एखादा ताकदवान ब्रॅण्ड असेल आणि देशव्यापी कॅम्पेन केलं तर त्याचा प्रभाव हा खूप मोठा असतो. मात्र त्याची नस पकडणं कठीण आहे.
मुद्रित माध्यमातील जाहिरातींमध्ये सवरेत्कृष्ट जाहिरातींचा मान मिळवला तो डीडीबी मुद्रा ग्रुपच्या फोक्सव्ॉगन कॅम्पेनने. फोक्सव्ॉगनच्या लोगोचाच कॅनव्हास प्रभावी वापर यामध्ये करण्यात आला होता. डोंगरउतारावर अथवा चढावर गाडीवर नियंत्रण मिळवणारी यंत्रणा, दोन वाहनांमधील अंतर स्वयंचलितरीत्या सुरक्षित राखणारी यंत्रणा दाखविण्यासाठी फोक्सव्ॉगनच्या लोगोमधील टोकदार, जाडसर अशा रेघांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे गाडीची वैशिष्टय़ं आणि कंपनीचा लोगो हे दोन्ही एकाच वेळी ठसविले जाते.
आशीष चक्रवर्ती
पुब्लिसिस कम्युनिकेशन्सने ‘हमारा फाऊंडेशन’साठी केलेल्या सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिरातीनेदेखील सुवर्णपदक पटकावलं. मुलं आपल्या भोवतालच्या वातावरणातूनच शिकत असतात. त्यामुळे त्यांची एबीसीडी ‘ए फॉर अॅपल’ अशी नसून ‘ए फॉर बोले तो अपुन’ अशी असते. अशाच प्रकारे २६ अल्फाबेटस् भाईगिरीच्या भाषेत मांडून रस्त्यांवरील मुलांना योग्य त्या पद्धतीचे शिक्षण देण्याची गरज या ‘अल्फाबाइटस्’ या जाहिरातीतून दर्शविण्यात आली होती. मुद्रित माध्यमात विविध वर्गवारीत एकूण २२ पदकं देण्यात आली. इतर माध्यमांच्या तुलनेत हे प्रमाण तसं कमीच होतं.
मुद्रित माध्यम ही जाहिरात क्षेत्रातील सुरुवात. मात्र एकेकाळी प्रचंड दबदबा असणारं हे माध्यम रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या काळात काहीसं मागे पडतंय की काय अशीच एक सर्वसाधारण धारणा या वर्षीच्या परीक्षकांनी व्यक्त केलेल्या मतांवरून दिसून येते. प्रिंट क्राफ्ट या वर्गवारीचे मुख्य परीक्षक आणि टॅपरुट डेन्सूचे को-फाऊंडर व चिफ क्रिएटिव्ह ऑफिसर संतोष पाढी (पॅडी) यांनी सांगितलं, ‘‘टेलिव्हिजन, रेडिओ, डिजिटल अशी अनेक नवी माध्यमं विकसित आणि लोकप्रिय झाली असली तरी प्रिंट माध्यमाचं महत्त्व हे राहणारच. पण आज या माध्यमाकडे काहीसं दुर्लक्ष होतंय असं खेदानं म्हणावं लागतंय. आपण वर्तमानपत्र घेतो ते बातम्या वाचण्यासाठी, जाहिराती पाहण्यासाठी नाही. अशा वेळी जाहिरातींनी आपलं लक्ष वेधून घ्यावं लागतं. आज असं होत नाही. बातम्यांमधून जाहिराती लक्ष वेधून घेत नाहीत. ज्या पद्धतीने प्रिंटवर मेहनत घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो तेवढा दिला जात नाही. त्यामुळेच यंदाच्या प्रिंट क्राफ्टमध्ये आम्ही कोणालाच सुवर्णपदक दिलं नाही. तुलनेनं टेलिव्हिजन जाहिरातींचं माध्यम सध्या चांगल्यापैकी सुधारणा करत आहे. अर्थात त्यातून मिळणारी त्वरित प्रसिद्धी हेदेखील कारण असू शकेल. डिजिटलमध्ये म्हणावा तेवढा अजूनतरी वेग पकडला नाही.’’
संपूर्ण सोहळ्यातील उत्कंठतेचा असा प्रसंग म्हणजे टेलिव्हिजन जाहिरातींचा. येथे सुवर्णपदकावर नाव कोरलं ते कॉट्रॅक्ट अडव्हर्टायझिंगच्या टाटा डोकोमोच्या ‘भलाई की सप्लाय’ या कॅम्पेनने. कॉट्रॅक्ट इंडियाचे नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर आशीष चक्रवर्ती यांनी यासंदर्भात सांगितलं की डोकोमाच्या पिचसाठी ही जाहीरात आम्ही सादर केली होती. फॉरवर्ड्स करण्याचा आजचा जो ट्रेंड आहे त्यावर बेतलेली आहे. आपल्याला कळलेली चांगली गोष्ट, किस्सा, बातमी, माहीती दुसऱ्यापर्यंत पोहचावी हाच त्यातला महत्त्वाचा मुद्दा. तोच उचलून आम्ही ‘भलाई की सप्लाय’ या टॅग लाइनवर ह्य़ा जाहिराती केल्या.
स्पर्धा आणि पुरस्कारांच्या पलीकडे जाणारा असा एक हृदय सोहळा म्हणजे प्रसून जोशी यांचा विशेष सत्कार. अनेक पुस्तकांचे, चित्रपटांचे लेखक, गीतकार म्हणून सर्वसामान्यांमध्ये परिचित असणारे प्रसून जोशी सध्या मॅकॅन वर्ल्डग्रुप या एजन्सीचे एशिया पॅसिफीक चेअरमन, व भारताचे सीईओ आणि सीसीओ आहेत. जाहिरात क्षेत्रात तर त्यांनी उदंड काम केलंच आहे पण त्यांच्या सर्जनशीलतेचे अनेक आविष्कार इतर क्षेत्रांतदेखील उमटताना दिसतात. पद्मश्रीने त्यांच्या कार्याचा गौरव याआधीच झाला आहे. प्रसून जोशी यांच्या या कारकीर्दीचा यथोचित सन्मान गोवाफेस्टमध्ये करण्यात आला.
तीन दिवस सुरू असणारा हा सोहळा म्हणजे खरं तर जाहिरात क्षेत्राचं एक मिनी इंडिया संमेलनच म्हणावं लागेल. अॅवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने अनेक परिसंवाद, व्याख्यानांचं आयोजनदेखील करण्यात आलं होतं. कॉपरेरेट क्षेत्रातील दिग्गजांच्या व्याख्यानांतून लिडरशिपचे धडेदेखील गिरविण्यात आले. लोकप्रिय लेखक चेतन भगत, क्विनसारख्या वेगळ्या वळणाच्या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक चेतन बहल यांची वाटचाल मांडणाऱ्या मुलाखतींनी उपस्थितांची दाद मिळवली. तीन दिवस सुरू असणाऱ्या या सोहळ्यात देशभरातील अनेक दिग्गज एकत्र आले असले तरी ‘ओअॅण्डएम’ आणि ‘मॅकॅन’सारख्या बडय़ा एजन्सीज्नी यात भाग न घेणं हे अनेकांना काहीसं खटकणारंच वाटत होतं.
पदकांची लयलूट
क्रिएटिव्ह एजन्सीज् सुवर्ण रौप्य कास्य
१. जेडब्ल्यूटी इंडिया (३५) ९ ८ १८
२. कॉन्ट्रॅक्ट इंडिया (२२) ४ ८ १०
३. टॅपरुट डेन्स्यू (१५) १ ७ ७
मीडिया एजन्सीज् सुवर्ण रौप्य कास्य
१. माइंडशेअर (११) १ ४ ६
२. मॅडिसन मेडिया (१०) ० ५ ५
३. लोडस्टार यूएम (९) ३ ४ २
– सुहास जोशी