जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही प्रवासाला गेलात तरी, एक-दोन वेळा मोठी शहरं पाहिली की सर्व ठिकाणी तोच तो पणा जाणवतो.
सात-आठशे वर्षे इतिहासाची जोड असलेल्या युरोपातील लहानलहान गावांमध्ये गेलात तर खरोखरच वेगळेपण जाणवतं. ही लहानलहान गाव वजा शहरं त्यांच्यात टिकून राहिलेल्या सौंदर्यामुळे थेट, दिलमे जगह पाते है. आमचंही तसंच झालं..
प्रागची भेट संपल्यानंतर हातात दोन-तीन दिवस होते ते कुठे घालवायचे हा प्रश्न होता. त्यामुळे नेट सर्फिग करताना सापडलेली चेस्की क्रुमलोव्ह व टेल्च ही प्रागजवळची ही अचानकपणे आम्हाला गवसलेली लहान गावं. थोडी विचारपूस केल्यावर विशेष अशी माहिती मिळाली नाही, पण म्हटलं, ठरवलं ना, तर जाऊयाच.
चेस्की क्रुमलोव्ह व टेल्च या सोळा, सतराव्या शतकातल्या वास्तू म्हणजे परीकथेतील शहरंच म्हणाव्यात अशाच नदीच्या दोनही तीरांना जोडणारा लाकडी पूल व पलीकडे टेकडीवर शंखाकृती मनोऱ्यांचा राजवाडा. टेहळणी बुरूज व राजवाडय़ाला जोडणारा कमानींचा रस्ता. युरोपमध्ये सर्वच पुरातन वास्तू म्हणजे अगदी रम्य नगरीच म्हणायला हरकत नाही. चेस्की क्रुमलोव्ह येथे जाण्याच्या रस्त्यावरदेखील पुरातन काळातील लाकडी स्टेव्ह चर्च. अगदी सोळाव्या-सतराव्या शतकातील या चर्चमध्ये आजतागायत पूर्वीप्रमाणेच व्यवहार चालतात. चर्च लहानसंच आहे, पण आत पूर्वीची बोहेमिअन झुंबरं, त्यात मिणमिणारी मेणबत्ती, बाजूलाच मोठा ऑर्गन व भिंतीवर बायबलमधील टेन कमांडमेंटस् दाखवणारी चित्रे आणि सर्वात भावली ती तेथील शांतता. नन्स् किंवा पाद्रींची लुडबूड नाही. आम्ही आलो असे कळल्यावर धर्मगुरूने चर्चचा दरवाजा उघडून व्यवस्थित माहिती दिली, एवढंच नाही तर विचारलेल्या प्रश्नांना कपाळावर आठय़ा न आणता सुहास्य वदनाने उत्तरं दिली. जाताना माहितीपत्रक हातात देऊन वाटल्यास काही द्यायचे असल्यास पेटीत टाकण्यास सांगितले. तिथल्या नीरव शांततेने मन प्रसन्न झालं. नाहीतर आपल्याकडे पुजाऱ्यांची अरेरावी, दर्शनासाठी धक्काबुक्की आणि पावलापावलावर पैशासाठी हात पुढे.
बोहेमिया येथील ऱ्हाडेक घराण्यातील झ्ॉकरियाज् राजे व व्हालडीनची राणी कॅथरीन यांनी वसवलेली टेल्च ही टुमदार नगरी. त्या काळानुसार टेल्च गावाभोवतीची वेस आणि शत्रूपासून संरक्षणासाठी पुढे पाण्याचे खंदक अशी रचना. शत्रूपासून धोक्याची शंका आल्यास खंदक लगेचच बाहेरच्या लहानलहान तलावातील पाण्याने भरून टाकीत. गावात प्रवेश फक्त सशस्त्र पहारेकरी असलेल्या चांगल्या दहा-बारा फूट रुंदी असलेल्या दगडी प्रवेश द्वारातूनच. शत्रू जर पुढे झालाच तर प्रवेशद्वारावर वरच्या बाजूला भलेमोठे धोंडे असत, त्यांचा मारा करायचा. अशी दोन गेटस् होती. त्यापैकी एक जे थोडे लहान होते ते पुढील शतकांत जसे शहर वाढू लागले तसे रस्ता रुंदीच्या वेळेस काढून टाकण्यात आले. आता अस्तित्वात असलेल्या गेटवर दगडांवरील ग्रॅफिटीचे काम आहे. तर वर छतावर पाच पानी रोझेट आहे. बाहेरचा परिसर त्या काळाच्या मानाने आता खूपच मोठा आहे. प्राग शहरातून येताना इंग्रजी येत नसल्याने चुकून आम्ही जुन्या टेल्चच्या परिसरापासून जरा लांबच उतरलो. कम्युनिझमच्या दबावाखाली असल्याने रशियन भाषेशिवाय दुसरी भाषाच नव्हती. आजही तिथे इंग्लिश भाषा बोलणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असावेत. पण शहरातले लोक आपल्यापरीने मदत करायला असतात. एका सभ्य गृहस्थाने आमच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून गावाच्या वेशीपर्यंत आणून सोडले.
आत प्रवेश केल्यावर घरांच्या आगळ्यावेगळ्या नमुन्याने लक्ष वेधतेच. टाऊन स्क्वेअरच्या मध्यावर जवळच्या जिल्हावा गावातल्या डेव्हिड लिपार्ट या शिल्पकाराने २५ फूट उंच असा दगडी मनोरा आपल्या शिल्पकृतीने बनवलेला आहे. वर टोकावर मेरीचा पुतळा आहे, तर खाली मनोऱ्याभोवती गोलाकार रचनेत आठ पऱ्या आहेत, अगदी तळाला समुद्री शिंपल्यासारखा सेंट जेम्स, भाल्यांनी टोचला जात असलेला सेंट सॅबेस्टीन आणि मध्ये सेंट रॉक असे तत्कालीन धर्मगुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूला सेंट फ्रान्सिस झेविअर व सेंट जॉन यांच्यामध्ये लहानशा कमानीसारख्या गुहेत सेंट रोझेलीस आहे. समोरच असलेल्या हौदात, जो मुळात लाकडाचा होता, त्यात जवळच्याच तळ्यातून पाणी आणून ओतले जाई. पुढे एकोणीसाव्या शतकात दगडाचा बनवला गेला. त्यात ग्रीक जलदेवता सायलीनस हातात डायनीसस, जी ग्रीक वारुणी देवता मानली जात असे तिचा बालक स्वरूपातील पुतळा आहे. आजही या सर्व कोरलेल्या पुतळ्यांवरील भाव स्पष्ट दिसतात.
जरी सर्व घरांची बोरोक स्टाइल बांधणी असली तरी त्यातील काही घरं आज आवर्जून दाखवली जातात. अर्थात तिकीट देऊनच. घराचा तळ मजला मेझोस, हा लांबच्या लांब कॉरीडोर, प्रवेशापासून मागील बागेत किंवा किचन गार्डनमध्ये जात असे. त्यात कुटुंबापुरती लागणाऱ्या भाज्या, लसूण, बटाटा, कोबी वगैरे, बरोबरीने मांजरं, कोंबडय़ा, कुत्रे यांची व्यवस्था. कॉरीडोर हा वेगवेगळ्या कामांकरिताच म्हणजे सुतारकाम, टोप्या विणणारा विणकर, लोहारकाम, मोची, शिवणकाम वगैरेंसाठीचा एक प्रकारचा वर्कशॉपच असे म्हणा ना. एका लहान खिडकीत केलेले काम विक्रीसाठी ठेवले जाई. जे कुणी बिअर घरी बनवीत तिथे बाहेर एक मोठा लाकडी चमचा भिंतीवर टांगलेला असे. त्या ठिकाणी बिअर बार व क्वचित प्रसंगी जेवण मिळत असे. सोनार मात्र चोरांपासून सावधानता म्हणून आपले काम व सामान ठेवण्यासाठी वरचा मजला वापरीत असत.
मेझोसमध्ये गोलाकार जिन्याने वरच्या मजल्यावर जायचे. वरचा मजला म्हणजे आपला दिवाणखाना किंवा लिव्हिंग रूम. या ठिकाणी टेबल, बसायला बाकडे, कपाटं. उच्चवर्गीयांकडे खास प्रतीचे फर्निचर, भिंतीवर कॉटन टॅपेस्ट्रिज, बाकडे जनावरांच्या चामडय़ांनी आच्छादलेले जेणे करून थंडीपासून जरा उबदार वाटण्यासाठी व वेळप्रसंगी झोपायलाही वापर होत असे. या घरांमध्ये काही ठरावीक घरं प्रतिष्ठित लोकांची असल्याने त्यांचे डेकोरेशनही खास होते. अशा घरांना नंबर देऊन ती अजून जतन करून ठेवली आहेत. दोन घरं एकत्र करून केलेला टाऊन हॉल चौकातील सर्वात मोठे घर. घरातले खांब गॉथिक स्टाईलचे भक्कम दगडाचे. बाहेरील भिंतीवर ग्राफिटी चित्रे. तसेच ती भिंत मजल्यापेक्षा उंच. त्या उंच भागाला गेबल्स असे म्हटले जाई. गेबल्समुळे घर उंच असल्यासारखे वाटे. घराचे छत लाकडाचे असे. कधीकाळी घराला आग लागली तर गेबल्समुळे आग पसरण्यास थोडा प्रतिबंध होईल असे म्हणत असत.
सोळाव्या शतकातले मायकेल बेकरचे गावातील सर्वात सुंदर घर. त्या घराच्या अर्ध कमानी गेबल्सनी एक वेगळाच उठाव आला आहे. एका घराला हाऊस ऑफ टेल्चचा मान होता. हे त्या काळचे कोर्ट होते. एकाचे घराचे वैशिष्टय़ म्हणजे त्या घराला गोलाकार सज्जा होता. ही अशी एकमेव रचना होती की ज्यामुळे बाजूच्या रस्त्यावरील हालचाल कळत असे. खालच्या बाजूला पाकिटासारखी दिसणारी बोहेमिअन चित्रकला आहे. या प्रकारच्या चित्रकलेत समांतर रेषा मिळण्यासाठी दोऱ्याचा उपयोग केला जात असे.
झाकरीयाज् राजवटीत बांधलेला राजवाडा आजपर्यंत जशाचा तसा जपून ठेवलेला आहे. त्याच्या सफरीत फक्त शनिवार, रविवारीच इंग्लिशमध्ये वर्णन ऐकायला मिळत असल्याने आम्ही त्याबाबत जरा कमनशिबी ठरलो. तरीपण हातातल्या ब्रोशरवरून काही कळले ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे. राजवाडय़ात प्रवेश केल्यावर आपण लगेच तेथल्या गोल्डन बॉलरूममध्ये येतो. हा दिवाणखाना काही खास आमंत्रितांसाठी व समारंभासाठीच वापरण्यात येत असे. छतावर सोन्याच्या प्लेटस्वर धार्मिक तत्त्वे लिहिली आहेत, तर भिंतींवर अँटवर्प येथून आणलेल्या रेशमी टॅपेस्ट्रिज आहेत. चांदीचे जेवणाचे टेबल, तर बसायला सोन्याच्या खुच्र्या आहेत. समारंभाप्रसंगी असंख्य प्रकारच्या मेजवानींच्या ताटांनी भरलेले टेबल कसे दिसत असावे याची आपण नुसती कल्पनाच केलेली बरी. पण राजाचा पुतण्या अॅडम हा पळपुटय़ा असल्याने लहानशा लढाईनंतर प्रागचा गव्हर्नर स्लावाटा याने तो राजवाडा काबीज केला. पण पुढे गव्हर्नर स्लावाटाला आणि त्याच्याबरोबर दोघांना प्रोटेस्टंट धर्मगुरूंनी राजवाडय़ाच्या उंच खिडकीमधून खाली फेकले. पण त्यांच्या सुदैवाने अंगावरील दणकट चामडय़ाच्या पोषाखामुळे किरकोळ जखमांवरच निभावले. राजवाडय़ामध्ये शाही घरातील लोकांचे कॅथड्रिल आहे, बाहेर एकच षटकोनी बेल टॉवर असलेले चर्च आहे. हा टॉवर त्या काळी गावात सर्वात उंच टॉवर होता. प्रार्थनेच्या वेळेस तेथून होणारा घंटानाद ऐकून गावातील लोक तेथे जमत. पुढे प्रत्येक राजवटीत त्या त्या चालींप्रमाणे चर्चमध्ये बदल होत गेले. चर्चची एका बाजूची भिंत रोमन काळातील बांधकामाचा नमुना म्हणून जतन करून ठेवली आहे.
चेस्की क्रुमलोव्ह येथे तीनशे वर्षे राज्य करणाऱ्या रोझेंबर्क घराण्याने गॉथिक स्टाइलमध्ये बांधलेला भव्य राजवाडा रस्त्यावरूनच दिसतो. पण तिथे पोहोचायचे तर नदीच्या पात्रावरील पूल पार केल्यानंतर त्या काळातील भव्यता जाणवते. पंधराव्या शतकापासून सतत परिस्थिती बदलत असतानाही, त्या धकाधकीतही आजपर्यंत जपलेली या राजवाडय़ाची नजाकत अगदी खासच म्हटली पाहिजे. सुदैवाने दोनही महायुद्धात राजवाडय़ाला नुकसान पोहोचले नाही. ब्रिज पार केल्यावर कॉबल्ड स्टोनने बांधलेल्या रस्त्यावरून आपण भव्य वॉच टॉवरमधून अति विशाल राजवाडय़ात येतो. त्याचा काही भाग आता युरोपिअन शातू व पुढील सुबक बगिच्यात रूपांतरित झाला आहे. प्राग शहराला जवळपास समुद्र नसल्याने बाल्टीक सीमधून डोनुब नदीतर्फे व्यापार चालत असे. त्यामुळे क्रुमलोव्ह हे त्याकाळी व्यापाराचे प्रमुख ठिकाण होते. येथे फिरताना १६, १७व्या शतकातली भव्य निवासस्थाने दिसतात त्यावरून गावाच्या संपन्नतेची कल्पना येते. अशीच काही घरे एकत्रित करून सुशोभित टाऊन हॉल बांधला आहे. त्याच काळातील सेंट व्हीटस् चर्च, जेसुइट कॉलेज, बेलेर समर पॅलेस आहे. त्याच्या काही भागांचे रायडिंग स्कूल व थिएटर झाले आहे. मोठमोठय़ा संगीत कार्यक्रमांना युरोपमधून बरेच लोक येतात तिथे वावरणारे प्रजाजनही मूळ पोशाषात वावरताना आपण त्याच काळात आहोत असेच क्षणभर वाटते.
ही अशी निसर्गत: सुंदर असलेली ठिकाणं पाहून आम्ही आमच्या या भेटीचा मनमुराद आनंद लुटला. यापुढेही जमल्यास अशी ठिकाणं शोधून एन्जॉय करायचे ठरवले आहे.