मला एक सांगा; चुरमुरे, फरसाण, कांदा, बटाटा, कैरी, चिंच हे सगळे पदार्थ नुसते खायला चांगले लागतातच, त्यांना स्वत:ची अशी खास चव असतेच; पण या सगळ्या गोष्टी एकत्र करून जेव्हा त्याची ‘भेळ’ बनते तेव्हा त्याची मजा काही औरच!! तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना. खरं तर ‘चाट’मध्ये येणारे सगळेच प्रकार अशी भन्नाट कॉम्बिनेशन करून बनवलेले असतात; ज्यांच्या नुसत्या विचारानेच आपल्या तोंडाला पाणी सुटतं! अनेक गोष्टींच्या बाबतीत आपण असे विविध घटक एकत्र केलेले बघतो, अनुभवतो. जेवण हा तर त्यातील मुख्य प्रकार; विविध पाककृतींमध्ये विविध जिन्नस एकत्र करूनच एखादी छानशी डिश बनवली जाते. दूरदर्शनवरील विविध पाककृतींच्या कार्यक्रमांतूनसुद्धा आपण हे बघतच असतो. त्यासाठी शेफसुद्धा सतत वेगवेगळे प्रयोग करत असतात. वेशभूषेच्या बाबतीतसुद्धा आपण असे वेगवेगळे प्रयोग करून बघतो. इंडो-वेस्टर्न वेशभूषा करण्यासाठी जीन्सवर एकदम पारंपरिक भारतीय कुर्ता किंवा वेस्टर्न टॉप खाली भारतीय पद्धतीचा लांब स्कर्ट आपण घातलेला पाहिला असेल. जीन्स आणि लेगिंग्जचे मिश्रण ‘जोिगग्ज’ म्हणून प्रसिद्ध झालं! भाषांच्या बाबतीतही अशी सरमिसळ झालेली आपण अनुभवतोच. हिंदी आणि इंग्लिशचं समीकरण ‘हिंग्लिश’, तर मराठी आणि इंग्लिशची ‘मिंग्लिश’ भाषा आपण रोजच्या व्यवहारात अगदी सहजपणे वापरत असतो. संगीत आणि इतर कलाही याला अपवाद नाहीत. विविध प्रकारची वाद्ये वापरून, भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतींचा उत्तम मिलाप विविध कार्यक्रमांत बघायला मिळतो. हाच प्रकार ‘फ्युजन’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. नृत्यकलेमध्येसुद्धा असे अनेक प्रयोग केले जात आहेत आणि ‘फ्युजन नृत्य’ म्हणून ते ओळखले जात आहे व लोकप्रिय ठरत आहे.
नाचू आनंदे : फ्युजन, नो ‘कन्फ्युजन’
मला एक सांगा; चुरमुरे, फरसाण, कांदा, बटाटा, कैरी, चिंच हे सगळे पदार्थ नुसते खायला चांगले लागतातच, त्यांना स्वत:ची अशी खास चव असतेच; पण या सगळ्या गोष्टी एकत्र करून जेव्हा त्याची ‘भेळ’ बनते तेव्हा...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-02-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dance fusion