मुंबईत नुकतीच इटालियन नाटककार दारिओ फो यांची ‘वच्र्युअस बग्लर’ आणि ‘द ओपन कपल’ ही दोन नाटकं दीर्घाक स्वरूपात सादर झाली. रवी शर्मा दिग्दर्शित हे दीर्घाक दिल्लीच्या नाटय़भारती या संस्थेने हिंदी भाषेत सादर केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भ्रष्ट समाजव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारी आणि वास्तवाला भिडणारी नाटकं ते रचतात. एक मजेशीर उघडा-नागडा, काही वेळा असभ्य वाटेल असा विनोदी फार्स आपल्यासमोर सादर करतात. बुद्धिवाद्यांबरोबरच त्यांची नाटकं सर्वसामान्यांनाही कळणारी असतात. १९९७ साली साहित्यातलं नोबेल पारितोषिक मिळवणारे असे हे इटालियन नाटककार म्हणजे दारिओ फो. १९५८ ते २००९ अशी अर्धशतकी कारकीर्द गाजवणारे ते केवळ लिहीत नाहीत तर-ते नट आहेत, विदूषक सोंगाडय़ा, दिग्दर्शक, नाटककार आहेत आणि क्रियाशील कार्यकर्तासुद्धा. जगात सगळ्यात जास्त रंगमंचावर सादर झालेल्या नाटककारांपैकी ते एक आहेत. सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर भाष्य करणारी फार्सिकल नाटकं त्यांनी लिहिली. त्यांची बायको (नटी-लेखिका-कार्यकर्ती) प्रँका रॅमे हिच्या साथीनेही त्यांनी महिलांविषयी खूप लिहिलंय. ते दोघे मिळून इटलीत एक छोटीशी नाटक कंपनीही चालवत असत. त्यांच्या बायकोचं २०१३ साली निधन झालं आणि फो हे आता ८९ वर्षांचे आहेत. वयोमानानुसार आता ते कार्यरत नसले तरी त्यांनी केलेलं लिखाण अद्यापही नाटककारांना आणि प्रेक्षकांनाही भुरळ घालतं.
नुकतीच मुंबईत ‘वच्र्युअस बग्लर’ आणि ‘द ओपन कपल’ ही दोन नाटकं दीर्घाक स्वरूपात सादर झाली. रवी शर्मा दिग्दर्शित हे दीर्घाक दिल्लीच्या नाटय़भारती या संस्थेने हिंदी भाषेत सादर केले.
कॉमिडिया डेलआर्टे हा इटलीमध्ये १६ व्या शतकात उदयास आलेला नाटय़प्रकार. चेहऱ्यावर मुखवटे चढवून यातील पात्रे नाटकातील प्रसंग फुलवतात. या नाटय़प्रकाराचा प्रभाव फ्रेंच पॅन्टोमाइम आणि आधुनिक स्लॅपस्टिक कॉमेडीवरही दिसून येतो. दारिओ फोची नाटकं ही तो कुठेही सादर करत असे, रंगमंचावर आणि पार्कीगच्या जागेतसुध्दा. परंतु, सादर करत असे म्हणण्यापेक्षा ती कुठेही सादर होऊ शकतात, असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. त्यामुळे या नाटकांमध्ये कमीतकमी नेपथ्याचा वापर करून मोकळ्या जागेचा किंवा रंगमंचाचा जास्त वापर केला जातो. तसेच प्रकाशयोजनेचाही मर्यादित वापर यामध्ये पाहावयास मिळतो. दारिओ फोच्या नाटकांना साधारणपणे तो लाइव्ह संगीत देतो. म्हणजे कधीकधी रंगमंचावरील पात्रच काही वाद्यं वापरतात. ‘वच्र्युअस बग्लर’सारख्या नाटकात ते तो करत असे. परंतु येथे सादर झालेल्या प्रयोगामध्ये लाइव्ह संगीत नसलं तरी पाश्चात्त्य धाटणीचं संगीत आहे. त्यामुळे त्यातील प्रसंग आणखीन रंगत आणतात. यातील पात्रेही अपेक्षेपेक्षा जास्त शारीरिक हालचाली आणि हावभाव करतात. स्टाइलाइज कॉमेडीचाच हा एक प्रकार. त्यामुळे हा नाटय़प्रकार कालसुसंगत वाटतो. ‘द ओपन कपल’चा विषय आणि बाज वेगळा असला तरी यामध्येही संगीत, प्रकाश आणि नेपथ्याचा वापर मर्यादितच आढळतो.
‘द ओपन कपल’ हे १९८३ साली लिहिलेलं नाटक. हा दिर्घाक, पुरुष आणि स्त्रीच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. स्त्री-पुरुषांचे विवाहबाह्य़ संबंध हा फार पूर्वीपासूनच चवीने चर्चीला जाणारा विषय. नाटकातील नवरा आपल्या बायकोचा सर्व प्रकारे आदर करतो. परंतु आपली शारीरिक गरज भागवण्यासाठी तो नेहमीच नवनवीन स्त्रियांच्या शोधात फिरत असतो. विशेष म्हणजे स्वत:पेक्षा वयाने बऱ्याच लहान असणाऱ्या. या गोष्टीला विरोध करणाऱ्या आणि सतत आत्महत्येची धमकी देणाऱ्या पत्नीलाही तो ‘ओपन कपल’ ही संकल्पना अंगीकारण्यास सांगत असतो. परंतु तिला ते पटत नसतं. एका ठरावीक काळानंतर त्यांच्या मुलाला आई-वडीलांमधील ही गोष्ट माहीत पडते. तो वडिलांना याबाबत काही बोलत नाही, परंतु खूप मोकळेपणाने आपल्या आईला स्वत:साठी नवीन साथीदार शोधण्याचा सल्ला देतो. खूप विचाराअंती आणि नकळत ती एका तरुण अणुवैज्ञानिक शास्त्रज्ञाच्या प्रेमात पडते. तो तरुण, हुशार, कलेशी बांधिलकी सांगणारा असतो. त्याच्या सर्व गोष्टींना ती भुलते. केवळ शारीरिक ओढीच्या पुढे एक वेगळं नातं त्यांच्यात निर्माण होतं. एक दिवस हे सर्व ती आपल्या पतीला सांगते तेव्हा मात्र त्याला ते पचनी पडत नाही. तो अस्वस्थ होतो. आपल्या पत्नीला मिळालेल्या सर्वगुणसंपन्न साथीदाराबाबत त्याच्या मनात द्वेश निर्माण होतो. आपल्या हातून बायको निसटतेय हे त्याला सहन होत नाही आणि तो तिच्याकडे अचानक शारीरिक संबंधांची मागणी करायला लागतो. पण आता बायको या गोष्टीला तयार नसते. या गोष्टीचा त्याला राग येतो आणि तो बाथरूममध्ये जाऊन आत्महत्या करण्याची धमकी देतो. बायको घाबरते आणि हे सर्व खोटं, कवीकल्पित असल्याचं सांगते. यावर नवरा खूश होऊन आपणही खोटी धमकी देत असल्याचं सांगतो. परंतु अचानक पत्नीचा तोच प्रियकर घरी येऊन ठेपतो आणि नवऱ्याला मोठा धक्का बसतो. तो बाथरूममध्ये जाऊन खरोखरच आत्महत्या करतो. या प्रसंगावर नाटक संपतं.
स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेवर भाष्य करणाऱ्या अतिशय प्रभावी नाटकांमध्ये याचा समावेश होतो. नाटकातील बायको ही नवऱ्याशी, कधी स्वत:शी तर कधी प्रेक्षकांशी संवाद साधते. सुरुवातीला आपल्या बायकोला मागास ठरवणारा नवरा स्वत:वर तो प्रसंग ओढवताच मात्र सर्व त्राण गमावून बसतो. इतके दिवस आपला नवरा असंख्य स्त्रियांसोबत असताना तिच्या मनाला काय वाटत असेल याची काडीचीही पर्वा न करणारा नवरा आपली बायको एकासुद्धा परपुरुषासोबत आहे हे स्वीकारण्यास मात्र तयार होत नाही. या पुरुषी मानसिकतेमध्ये तीन दशकांनंतरही बदल झालेला नाही. नाटक लिहिलं गेलं तेव्हा ‘ओपन कपल’ ही संकल्पना कदाचित बोल्ड वाटली असेल पण आजही पुढारलेल्यांना ती कितपत मान्य होईल याबाबत शंकाच आहे. म्हणूनच दारिओ फो यांचं लिखाण काळाच्या पुढचं ठरलं आणि त्याला जगमान्यताही मिळाली.
जगातील विकसित देशात आणि भारतीय समाजातही या सर्व गोष्टी सर्रास चालतात. पण त्यावर खुलेपणाने भाष्य केलं जात नाही. स्वत:ला मॉडर्न म्हणवणारेही आतून तेच बुरसटलेले विचार घेऊन जगत असतात. म्हणूनच या दोन दीर्घाकांच्या माध्यमातून हे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न दिग्दर्शक रवी शर्मा यांनी केला आहे. अलीकडे आलेलं ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’, हे नाटक लोकांना आवडलं. त्यामुळे या दबलेल्या गोष्टींवर आपल्या देशातही मोकळेपणाने बोलायला सुरुवात झालेली आहे, हे इथे नमूद करायला हवं. अशी नाटकं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्यास समाजात निषिद्ध मानल्या जाणाऱ्या गोष्टींवर खुलेपणाने चर्चा होण्यास हातभारच लागेल यात शंका नाही.
प्रयोगशील दिग्दर्शक
रवी शर्मा हे दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. गेली चाळीस वर्षे रंगभूमी, चित्रपटांत काम करणारे शर्मा मायकल चेकाव्ह, अॅस्टाला यांची अभिनय पद्धती शिकवतात. या दोन नाटकांच्या तालमीत आणि वर्कशॉपमध्ये कानपूर, कॅनडा आणि इंग्लंडमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. जगप्रसिद्ध ‘हॅम्लेट’चं उर्दूमध्ये रुपांतर त्यांनी केलं असून ते पारसी फॉर्ममध्ये करण्याचा त्यांचा मानस आहे. शेक्सपीअरला पारसी स्टाइलमध्ये फार कुणी केलेलं नाही, त्यामुळे हा प्रयत्न वेगळा आणि प्रयोगशील ठरेल व नाटय़प्रेमीना तो आवडेल असा त्यांना विश्वास आहे.
‘वच्र्युअस बग्लर’ आणि ‘द ओपन कपल’ या दोन्ही नाटकांच्या मुंबईतील पहिल्याच प्रयोगाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तरीही अधिकाधिक प्रयोग करण्याची शर्मा यांची इच्छा आहे. मुंबईत प्रयोगशील नाटकासाठी जागा मिळणं ही कठीण गोष्ट असल्याची खंतही शर्मा बोलून दाखवतात. दिल्ली, चंदिगड, पटियाला, कुरूकक्षेत्र, उदयपूर येथे होणाऱ्या या नाटकांच्या प्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळेल अशी त्यांना आशा आहे.
– प्रशांत ननावरे