बृहन्महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषदेचे दहावे अधिवेशन फग्र्युसन महाविद्यालय, पुणे येथे अलीकडेच पार पडले. या अधिवेशनामध्ये इंग्रजी आणि तमिळ मुळाक्षरांच्या नावाचा मागोवा घेणाऱ्या शोधनिबंधाच्या निमित्ताने तयार केलेला भाषा आणि लिपी यांच्या विकासक्रमासंबंधीचा अभ्यासलेख-
मध्य-पूर्वेतील इसवीसन पूर्व २८व्या शतकापासून सुमेरियन, अक्काडियन हे लोक क्युनिफॉर्म या लिपी प्रकारात लेखन करीत असत. पुढे इसवी सनापूर्वी १५ व्या शतकानंतर हित्ती लोकांच्या क्युनिफॉर्म प्रकारातील द्विअक्षरी चिन्हांच्या दिसण्यातील सारखेपणामुळे आणि त्यांच्या ‘द्विअक्षरी उच्चारामुळे’ अनेक भाषांतील लिपी-मुळाक्षरांची नावे द्विअक्षरी उदा. तमिळ लिपीमध्ये इम्म, इन्न, इक्क, रोमन लिपीमध्ये एम, एन, के म्हणून रूढ झाली असावी असा सारांश आहे. शीर्षकातील मुद्दा इतिहासातील नंतरच्या कालखंडातील असल्यामुळे स्पष्टता यावी म्हणून आदिम युगापासून सुरुवात केली आहे.
१- बोलीभाषांची सुरुवात –
अतिशय आदिम काळामध्ये, एक-दीड लाख वर्षांपासून आधुनिक मानवाचे पूर्वज रानटी / शिकारी अवस्थेमध्ये वैयक्तिक वा दोघे जण, युग्म/ युगूल, आणि मग समूह/ टोळी/ तोली करून राहू लागले. साधारणपणे ७० हजार वर्षांपूर्वी ते स्थलांतरसुद्धा करू लागले. सुरुवातीला आपल्या जोडीदारास अंगविक्षेप करून आदिमानव खुणावत असावा. त्याची वाचा अजून स्पष्ट झाली नसावी. हुंकार, नकार असे ध्वनी तो करीत असावा. दृष्टीस आलेले निसर्गातील दिव्यत्व तसेच पंचमहाभूतांचे अक्राळविक्राळ दर्शन, यामुळे त्याला त्यांची भीती वाटत असे. अशा वेळी वा शिकारीमध्ये एकमेकांस बोलावणे, आरोळ्या, हुंकार, नकार, चित्कार अशा पद्धतीने त्याची मूकपणापासून भाषिक प्रगती होऊ लागली. त्या काळी शब्दसंख्या अतिशय सीमित होती.
अगदी नजीकचे हिमयुग संपल्यानंतर या मन्वन्तरात नियमित सृष्टिचक्र पुन्हा सुरू झाले. भरपूर पाण्यामुळे तसेच आद्र्र हवामानामुळे निरनिराळ्या प्रकारचे गवत, वनस्पती वाढू लागल्या. गवत-बियाणे पेरण्याची युक्ती सुचू लागली. त्यातून शेतीतंत्र अवगत झाले. अन्न म्हणजे कंदमुळे, फळ फुले, बिया व पाने गोळा करण्यासाठीची वणवण बंद झाली. मनुष्यसमाज साधारणपणे गेल्या दहा हजार वर्षांपूर्वी पुन्हा स्थिर होऊ लागला. मग टोळीतून नंतर ग्राम, नगरे निर्माण झाली. सामूहिक जीवनपद्धतीमुळे / ग्राम/ नगरांमुळे भीती जाऊन सुरक्षितता आली.
धान्य उत्पादनाची वाढ झाली. निसर्गाची कृपा होऊन अन्न उत्पादन वाढावे तसेच त्याच्या अवकृपेतून वाचावे, रक्षण व्हावे यातून देवता कल्पना सुचू लागल्या. आधी भीतीतून आणि नंतर आराधनेसाठी देवतेच्या मूर्तीची कल्पना आली. देवतेच्या कृपेमुळे वाढलेले धान्य / उत्पादन देवतेचे आहे आणि सामूहिक मालमत्ता आहे म्हणून वेगळे जतन करणे सुरू झाले. त्याकरिता मंदिरे आणि त्यांची कोठारे सुरू झाली.
१.१- लेखनाची गरज
सर्व वस्तूंचा तपशील (वस्तूचे नाव, संख्या, दाता, दान प्रसंगाचा समय, देवता अशी माहिती किंवा खरेदी-विक्रीचे तपशील) ठेवण्याकरिता सुमेर मातीची प्रतीक-चिन्हे (token) तयार करीत आणि एकत्रितपणे ती प्रतीक-चिन्हे मातीच्या भांडय़ामध्ये सीलबंद करून ठेवीत. मातीच्या सीलबंद भांडय़ात काय आहे हे दाखविण्याकरिता मातीचे भांडे ओले असताना त्याच्या बाह्य़ भागावर ते प्रतीक दाबून त्याची खूण करून ठेवीत. पुढे प्रतीक-चिन्हे बनवून भांडय़ात ठेवण्यापेक्षा मातीच्या फलकावर/ वस्तूवर त्यांच्या खुणा करणे आणि याप्रमाणे मजकूर, अक्षर कोरणे त्यांना जास्त सोपे वाटू लागले. प्राचीन इजिप्त, इराक, सीरिया या भागामध्ये असे प्रथम घडले. त्याचे वास्तुशास्त्रीय पुरावे उत्खननात मिळतात.
त्या कालापासून पुढे खुणा-लेखनाचा प्रवास सुरू झाला. तो कसा झाला हे अभ्यासताना त्यातूनच मला काही नव्या व्युत्पत्ती आणि नव्या कारणमीमांसा मिळाल्या. त्यापैकी काहींचा उल्लेख या निबंधात करणार आहे. म्हणून लेखन-प्रक्रियेच्या इतिहासाचा धावता आढावा –
पायरी-१ : प्रासंगिक चित्रे- जगातील इतर खंडातील आदिवासींनी, मध्य भारतातील नर्मदा-किनारी, माळवा उजैन भागात, तसेच विन्ध्य आणि सातपुडा पर्वतरांगांमधील आदिवासींनी भीमबेटका आणि इतर ७५० च्या वर संख्या असणाऱ्या शैलाश्रयांमध्ये / गुहांमध्ये २५-३० हजार वर्षांपासून चित्रे काढायला सुरुवात केली. त्यावर पद्मश्री विष्णू श्रीधर वाकणकर, प्रा. सांखालिया, पद्मश्री म. के. ढवळीकर आणि त्यांच्यासह मध्य भारतातील, तसेच डेक्कन कॉलेज पुणे येथील अनेक पुरातत्त्व संशोधक यांनी प्रचंड संशोधन करून हराप्पापूर्व काळापासून (४७०० वर्षांपासून) कायथा, अहाड, माळवा, जोर्वे आदी संस्कृतींचा अभ्यास करून भारतातील धार्मिक कल्पना, पूजा विधी, यज्ञपूजा, लिंगपूजा, पशुपूजा, त्या काळातील शेती-जीवन, कुंभार-काम, कांस्य-तांबे खनिज कर्म याचा विकासक्रम निश्चित केला आहे. भारतातील ही चित्रे शैलीदार, रेखीव, गतिशील असली तरी त्यातून संदेशवहन होत नाही असे वाटते. त्यापेक्षा जास्त स्पष्टता दर्शवणारी चित्रे इराक, सीरिया प्राचीन इजिप्तमध्ये सर्वप्रथम सात हजार वर्षांपासून सुरू झाली. चित्रांद्वारे माहिती भिंतीवर, मातीमध्ये, चर्मावर, स्र्ंस्र्८१४२ (पापिरस)/ पाम पत्रावर, कोरली जाऊ लागली. परंतु त्यातूनही भावना, कल्पना आणि भाषिक मुद्दे म्हणजेच क्रियापदांचे कार्य, काळ, कर्ता, कर्म यांचे दर्शन होत नसे.
पायरी-२ : भावना-चित्रे/ Ideograms – पुढील अवस्थेमध्ये भावना/ कृती चिन्हे, लोगो-चिन्हे आली. उदा. पायाचे रेखाचित्र हे भावनाचित्र दाखवून ‘जाण्याचे’ निदर्शन केले जाई. भावनाचित्र / Ideograms पूर्ण शब्द किंवा पूर्ण विचार दर्शवितो. परंतु त्याचा उच्चार कसा करायचा हे सांगू शकत नाही. उदा. ‘आणि’ हा अर्थ दाखविणारे भावना-चित्र / ideogram, इंग्रजीत ‘&’ पण स्पॅनिशमध्ये ‘८’असे दाखविले जाते. भावना-चित्रातून पुढे क्रियापदे, कर्ता, कर्म असा विकास झाला असावा.
(Ideograms are symbols that represent entire words or concepts, but don’t give a clue as to how the word is pronounced. An example of an is & (pronounced as “AND” in English and “Y” in Spanish, but has the same meaning = “and” in both languages)
पायरी-३ : ध्वनी चित्र फोनोग्राम – वस्तू/ पदार्थ/ प्राणी/ पक्षी/ शरीराचे भाग यांची चित्रे सोपी करून रेखा चित्रे काढली जाऊ लागली व त्या चित्रांच्या नावांचा उच्चार करून अर्थनिष्पत्ती करणारा ध्वनी वापरला जाऊ लागला. यालाच ध्वनिचित्र/ फोनोग्राम म्हणत. त्या काळातील एखाद्या संस्कृतीमध्ये अशी साधारणपणे १०००-२००० चित्रे आवश्यक वाटू लागली. उदा. पद्माकर = पद्म + कर = हातामध्ये कमलाचे चित्र.
(Phonetic alphabets only have symbols that represent sounds, not words.)
पायरी-४ : शल्याबोल syllables- पुढे चित्रांच्या नावामधील फक्त आद्य अक्षराचा उच्चार/ ध्वनी = आबोल शल्य करणे / वेगळा करणे सुरू झाले. (शल्य आ बोल ) ही सोपी चित्रे त्या आद्याक्षरांचा उच्चार दाखवू लागली. अशा प्रकारे चित्रांची संख्या मर्यादित करण्यात आली. याला शल्याबोल म्हणतात. ‘क’ उच्चार/ ध्वनी = कमल चित्र.
पायरी ५ : इथपासून जगातील वेगवेगळ्या संस्कृतींच्या भाषा आणि लिप्यांचा विकास- विस्तार पुढे अनेक टप्प्यांत होऊन त्यांना आजचे आधुनिक रूप प्राप्त झाले. असा हा प्रवास आहे.
आधुनिक रूपाचा पायरी क्रमांक कोणता असेल?
(The evolution of writing cannot be fully appreciated (comprehended, even) in isolation. Its stories are woven deep into the fabric of histories and civilisations, its paths steered by politics, religion, economics, and by innumerable other factors. By John Boardley 1a Caligrapher and Script Expert ILT-2011)
३- क्युनिफॉर्म
अक्काडियन, सुमेरियन लोक या पद्धतीमध्ये धातूच्या चाकूने दाबून (क्युनिफॉर्म पद्धतीने) अशी एक किंवा दोन अक्षरांची ू४ल्ल्रऋ१े संयुक्त चिन्हे (पायरी चारचे पूर्वरूप) ओल्या मातीच्या विटांवर खोदून त्या विटा भाजून वेगवेगळा मजकूर लिहू लागले. अशी १०००/ ११०० संयुक्त अक्षरे उत्खननात मिळाली आहेत.
(Cuneiforms are highly stylized ideograms, using a tool that creates little, wedge-like strokes. Some cuneiforms (in the later history of languages that use them) are phonetic.)
सुमेरियन, लोकांनी प्रथम उभ्या ओळीमध्ये अशी चित्रे मातीत कोरली. गोलाकार असे आकार काढण्यामध्ये वेळ जातो म्हणून इसवी सनपूर्व २९ व्या शतकाच्या सुमारास सुमेरियन आरेखकांनी चित्रे काढण्याचा वेळ वाचावा म्हणून या सर्वाची चित्रे सरळ रेषा/ त्यांच्या तुकडय़ांनी दाखवायला सुरुवात केली. इसवी सनपूर्व २२ व्या शतकाच्या दरम्यान चित्रे आडव्या रेषेत काढणे सुरू झाले. याचे कारण स्पष्टपणे दिसत नाही. परंतु या पद्धतीमध्ये वेळ वाचत असावा. (पायरी १ ते पायरी ३)
अशा २० लाखा(!)पेक्षा जास्त विटा उत्खननामध्ये मिळाल्या असून त्यापैकी फक्त ५० हजाराचेच वाचन झाले आहे. त्यापैकी काही संयुक्त अक्षरांचा मागोवा घेऊ. त्या काळातील वापरातील वस्तूंच्या आकारावरून ही संयुक्त अक्षरे चिन्हे/ चित्रे घेतली असावीत. ‘सरळ रेषांच्या खिळ्यांनी’ चित्रे काढल्यामुळे, या मूळ चित्रामधील गोलाकार, वक्रता नष्ट झाल्या. तसेच त्या प्राचीन भाषेचा पूर्ण अंदाज आज येत नसल्यामुळे, त्याचप्रमाणे क्युनिफॉर्ममधील कील/ खिळे बरेच ओबडधोबड वाटत असल्यामुळे, या संयुक्त अक्षरात ‘कोणत्याही मूळ वस्तू’च्या आकाराचा /चित्रांचा भास होत नाहीत. ती केवळ लिपी चिन्हे म्हणूनच उरली. आधुनिक लिपीतज्ज्ञांनी उत्खननामध्ये मिळालेल्या द्विभाषिक/द्विलिपीमधील शिलालेखांच्या तुलनात्मक अभ्यासातून ही क्युनिफॉर्म चिन्हे ‘द्विअक्षरी-शल्याबोल (di syllable)आहेत हे ओळखले. हित्ती आणि मित्तानी या दोन संस्कृतीच्या लोकांचे लिखाण देवनागरी लिपीप्रमाणे ‘डावीकडून उजवीकडे’ आहे तर अक्काडियन, उगरीतिक आणि इतर सेमेटिक भाषेची लेखने उर्दूप्रमाणे ‘उजवीकडून डावीकडे’ आहेत.
हित्ती आणि मित्तानी या दोन संस्कृती इंडो-युरो आर्य लोकांशी संबंधित असल्यामुळे त्यांना ही स्वर-व्यंजन कल्पना म्हणजेच ‘द्विअक्षरी-शल्याबोल (disyllable) याचे आकलन होते असे दिसते. इ.स.पूर्व १६०० मधील हित्ती-मितानी समुदायाच्या एका युद्धसमेटाच्या शिलालेखात असणारे आर्य/ वैदिक देवता यांचे उल्लेख युरोपियन संशोधकांनी मान्य केले आहे. त्यात आढळणाऱ्या द्विअक्षरी-शल्याबोलांची (disyllable) क्युनिफॉर्म चिन्हे यांचा तक्ता काही लिपी अभ्यासकांनी दिला आहे. (Book: kSumerian Lexiconl, Version 3.0, by John A. Halloran2 and http://en.wikipedia.org/wiki/Hittie Cuniforms)
तो तक्ता क्रमांक १ ‘हित्ती द्विअक्षरी- शल्याबोलांची (disyllable) क्युनिफॉर्म चिन्हे’ सोबत जोडलेला आहे.
विकासक्रम भाषा आणि लिपीचा!
बृहन्महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषदेचे दहावे अधिवेशन फग्र्युसन महाविद्यालय, पुणे येथे अलीकडेच पार पडले. या अधिवेशनामध्ये इंग्रजी आणि तमिळ मुळाक्षरांच्या नावाचा मागोवा घेणाऱ्या शोधनिबंधाच्या निमित्ताने तयार केलेला भाषा आणि लिपी यांच्या विकासक्रमासंबंधीचा अभ्यासलेख-
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-03-2014 at 01:00 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Developments in the language and script