00gajananमधुमेह झाला की हृदयरोग होतोच इतकं त्यांचं एकमेकांशी जवळंच नातं आहे. पण म्हणूनच हे दोन्ही विकार का होतात ते समजून घेऊन ते टाळण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी करायलाच हव्यात.

सध्या मधुमेही मंडळींची संख्या जोरात वाढते आहे. आपल्या देशाला मधुमेहाची राजधानी म्हणण्याचे दिवस मागे पडावेत इतक्या मोठय़ा प्रमाणात नवनवे पेशंट आपला शुगरचा रिपोर्ट फडकवत दवाखाने गाठू लागले आहेत. त्याचबरोबर कमी वयात हृदयरोग होणाऱ्यांचा आकडाही फुगतो आहे. याचे कारण साधे आहे. मुळातच मधुमेह आणि हृदयरोग ही सख्खी जुळी भावंडे आहेत. आमच्या वैद्यकीय भाषेत तर मधुमेह झाला म्हणजे हृदयरोग झाला असे समीकरणच मांडले जाते.
मधुमेह आणि हृदयरोग यांचा इतका घनिष्ठ संबंध का या प्रश्नांचे उत्तर मधुमेहाच्या एकंदर स्वरूपात दडले आहे. तशी रक्तातली साखर वाढण्याची कारणे खूप असली तरी सामान्य जनात ९८ टक्के लोकांना असतो तो ‘टाइप टू (ळ८स्र्ी 2) प्रकारचा मधुमेह. मधुमेहाचा हा प्रकार मुळातच ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ (टी३ुं’्रू र८ल्ल१िेी) या थोडय़ा गुंतागुंतीच्या प्रकरणाचा एक भाग असतो. वरकरणी वेगवेगळय़ा वाटणाऱ्या परंतु तरीही एकमेकांची सतत सोबत करणाऱ्या समस्या एकत्र आल्या की त्याला आपण ‘सिन्ड्रोम’ म्हणतो. शरीराच्या रासायनिक क्रियांशी निगडित असलेले प्रश्न म्हणजे ‘मेटाबॉलिक सिन्ड्रोम’.
 यात पोटाचा घेर वाढणे, रक्तातली साखर नॉर्मलपेक्षा अधिक असणे, रक्तदाब असणे, कोलेस्टेरॉल कुटुंबातील ट्रायग्लिसराईड वाढणे आणि चांगले उपयुक्त असे एच.डी.एल कोलेस्टेरॉल कमी होणे अशा अनेक गोष्टी एकत्र आल्या म्हणजे त्यास ‘मेटाबॉलिक सिन्ड्रोम’ म्हटले जाते. वरवर पाहता हे आजार एकच वाटत नाहीत. तसे त्यांचे स्वरूप आणि ते होण्यासाठी लागणारी पाश्र्वभूमी निरनिराळी असतेच. पण तरीही त्यांच्यात एक अत्यंत महत्त्वाचे असे समान सूत्र आहे. या सगळय़ा हृदयरोगांपर्यंत नेणाऱ्या वाटा आहेत. हे सर्वच आजार माणसाचे हृदय कमकुवत बनवतात. आता या सगळय़ा वाटा एकत्र आल्या म्हणजे त्याचा राजरस्ता होणार आणि हायवेवरून जशी वाहने भरधाव वेगाने जातात तसाच ‘मेटाबॉलिक सिन्ड्रोम’ असलेला माणूस वेगाने आणि लवकर हृदयरोगापर्यंत जाणार हे निश्चित झाले.
एकटय़ा मधुमेहाचा विचार केला तर या सगळय़ांमधला तो ‘दादा’ ठरतो. एकदा रक्तातली साखर वाढली म्हणजे एक प्रकारे रक्तात गुलाब जामचा जसा पाक असतो तसा काहीसा प्रकार होतो. तेवढा दाट नसला तरी बऱ्यापैकी साखरेचा पाक आपल्या रक्तवाहिन्यांमधून धावतो. मुळातच पाक चिकट त्यामुळे धावून धावून किती वेगात धावणार! त्यात त्याचा गुणधर्मच चिकटण्याचा. त्यामुळे रक्तातून वाहणाऱ्या प्रत्येक प्रोटीनला किंबहुना आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक पेशीला या पाकातील साखर चिकटते. आम्ही डॉक्टर्स याला ‘ग्लायकेशन’ (ॅ’८ूं३्रल्ल) म्हणतो. याचा उपयोग मधुमेहाच्या निदानात, त्याचे नियंत्रण जोखण्यात करतो. तुम्ही मधुमेहासाठी दोन महिन्याची साखरेची सरासरी जाणून घेण्यासाठी ‘एच.बी.ए. वन. सी’ नावाची तपासणी करता ती याच तत्त्वावर आधारलेली आहे. लाल पेशींमधल्या हिमोग्लोबिनला किती साखर चिकटली आहे याचेच मोजमाप या तपासणीत होते.
 या चिकटपणाच्या आणि ग्लायकेशनच्या कारणाने रक्तवाहिन्यांना त्रास होतो. रक्तातल्या साखरेचे प्रमाण वाढले की रक्ताचा प्रवाह अल्पसा मंदावतो आणि शरीराचा गुणधर्मच आहे की जेव्हा रक्त हळू धावेल तेव्हा तेव्हा रक्ताच्या गुठळय़ा व्हायचे प्रमाण वाढणारच. मधुमेह अनियंत्रित राहिला तर थोडय़ाच वर्षांत मोठय़ा रक्तवाहिन्यांची पाळी येते. पायाच्या, हृदयाच्या किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे होतात. त्यातून पायाची बोटे कापायला लागणे, हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ‘ब्लॉक्स’ होणे किंवा लकवा मारणे असे प्रकार घडतात.
छोटय़ा सूक्ष्म रक्तवाहिन्यादेखील कमी उच्छाद मांडत नाहीत. मधुमेहात डोळे, मज्जासंस्था किंवा मूत्रपिंडात होणारे दोष या सूक्ष्म रक्तवाहिन्यांचेच प्रताप असतात. मूत्रपिंडात गडबड झाली म्हणजे रक्तदाब वाढायला लागतो. कारण रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारी महत्त्वाची रसायने मूत्रपिंडात तयार होतात. हा मूत्रपिंडापासून वाढणारा रक्तदाब नियंत्रणात आणणे अवघड असते. काही काही वेळा तीन चार औषधे एकत्र वापरूनही तो आटोक्यात येत नाही. रक्तदाब वाढला म्हणजे त्या वाढलेल्या रक्तदाबावर मात करून शरीराला पुरेसे रक्त पुरवायचे काम हृदयाला करावे लागणार त्यातून हृदय लवकर थकणार आणि वेळेअगोदर राम म्हणणार.
याच मूत्रपिंडात आणखी एक महत्त्वाचे रसायन, महत्त्वाचा हार्मोन तयार होतो. ‘एरिथ्रोपिएटीन’ (ए१८३ँ१स्र््र३्रल्ल) हे त्याचे नाव. लाल रक्तपेशी तयार करण्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो. मूत्रपिंड निकामी व्हायला लागले तर एरिथ्रोपिटीनसुद्धा कमी प्रमाणात बनणार. साहजिकच रक्तातले हिमोग्लोबिन कमी होणार. कमी हिमोग्लोबिनसकट शरीराला ऑक्सिजन पुरवायचा म्हणजे पुन्हा हृदयाला अधिक काम पडणार हे सगळं लक्षात घेऊनच आम्ही डॉक्टर्स वागतो. माणसाचे मूत्रपिंड निकामी व्हायचा संशय आल्यावर हृदयाची कसून तपासणी करतो.
एकदा मूत्रपिंड खराब झाले म्हणजे प्रश्न वाढतच जातात. रक्तदाब वाढतो आणि वाढलेला रक्तदाब मूत्रपिंड आणखी खराब करतो. हे विषारी चक्र शेवटी पेशंटला संपवून टाकते. विशेष म्हणजे बहुतेक वेळेला माणसाच्या अंताचे कारण हृदयरोगच असते.
मज्जारज्जूंमध्येही या सूक्ष्म रक्तवाहिन्या आपली ‘काळी कांडी’ चालूच ठेवतात. मज्जातंतूंच्या पोषणात सूक्ष्म रक्तवाहिन्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांना पुरेसे पोषण मिळाले नाही म्हणजे हे मज्जातंतू मृत होतात. माणसाची संवेदनक्षमता कमी होते. माणसाबरोबर हृदयाचीही संवेदना कमी होते. अशांना हृदयरोगाचा झटका आला तरी त्यांच्या छातीत दुखेलच असे सांगता येत नाही. ‘सायलेंट हार्ट अ‍ॅटॅक’ (र्र’ील्ल३ ऌीं१३ अ३३ूं‘) म्हणतात ते यालाच. छातीतच दुखले नाही तर माणूस डॉक्टरांकडे जाईलच कशाला? त्यामुळे कुठलाही उपचार मिळण्याअगोदर ते बिचारे जीव गमावून बसतात. हृदयरोग तज्ज्ञांसमोर असे पेशंट एक आव्हान उभे करतात.
हृदयाचा वेग आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करण्याचे काम मज्जातंतूच करत असतात. त्यांना इजा झाली की झोपेतदेखील आपल्या नाडीचे ठोके जास्त पडतात. आरामात बसलेले असतानाही हृदय १००-१२० पेक्षा जास्त वेगाने चालत असेल तर तज्ज्ञांना दाखवलेले बरे ते यासाठीच ‘कार्डियाक ऑटोनॉमिक न्यूरोपथी’ हे वैद्यकापुढेच मोठे चॅलेन्ज असते. त्यामुळे तुमच्या पायांना घाम येणे बंद झाले असेल, पायावरचे केस गळून पडले असतील किंवा जेवल्यानंतर कमरेच्या वरच्या भागाला दरदरून घाम फुटत असेल तर कृपया गप्प बसू नका. लगोलग तज्ज्ञांना दाखवा. (उं१्िरूं अ४३ल्ल्रेू ठी४१स्र्ं३ँ८)
हृदयाचे आणि कोलेस्टेरॉलचे तर विळय़ा-भोपळय़ाचे नाते. त्यात मधुमेह आणि कोलेस्टेरॉल जिवाभावाचे मित्र वाढलेले वाईट एल.डी.एल. कोलेस्टेरॉल (छऊछ उँ’ी२३ी१’) कमी झालेले चांगले एच.डी.एल. कोलेस्टेरॉल आणि वाढलेले ट्रायग्लिसराईड ही त्रयी हृदयाच्या रक्तवाहिन्यांना घातक मधुमेहात ही त्रयी आपलेच घर असल्यासारखे नांदत असते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या एकापेक्षा अधिक रक्तवाहिन्यांमध्ये आपले बस्तान बसवते. कमी झालेले चांगले एच.डी.एल. वाढलेल्या वाईट एल.डी.एल.चा सामना करू शकत नाही. म्हणून मधुमेही पेशंटमध्ये एकापेक्षा अनेक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स करतात. त्या ब्लॉक्सची लांबीही जास्त असते. मग रुग्णांचा प्रश्न सोडवण्यासाठी हृदयविकार तज्ज्ञांना मारामार करावी लागते.
बरे हे काम फक्त हृदयाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत मर्यादित असले तरी समस्या थोडी कमी झाली असती. पण तसे नाही ना. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या, पायांच्या रक्तवाहिन्या, मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्या अशा अनेक महत्त्वाच्या वाहिन्यांवरही मधुमेह घाला घालतो. त्यातून मूत्रपिंड निकामी होणे, लकवा मारणे, पायाची बोटे कापावी लागणे यासारख्या गंभीर गोष्टीचा सामना करायची पाळी पेशंटवर येते.
यावर उपाय काय? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मुलाबाळांना मधुमेह होऊ न देणे हा सर्वात उत्तम मार्ग. त्यासाठी अगदी लहानपणापासून त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या ठेवायला, त्यांना मैदानी खेळांसाठी उद्युक्त करायला हवे. मधुमेह झाल्यानंतर नीटपणे आहार सांभाळून पुरेसा व्यायाम घेऊन आणि वेळेवर उपचार व तपासण्या करून त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. नुसते कोलेस्टेरॉल करण्याऐवजी लिपिड प्रोफाईल तपासायला हवे. वजन कमी करून हृदयावर पडणारा अतिरिक्त ताण हलका करायला हवा. रक्तदाब काबूत ठेवायला हवा. आपली रक्तदाबाची, कोलेस्टेरॉलची, मधुमेहावरची औषधे कुठल्या तरी बाबा-बुवाच्या सांगण्यावरून बंद करणे टाळायला हवे. विज्ञानाने सिद्ध केलेले मार्गच आपल्याला चोखाळायला हवेत. ‘दो दवा जिंदगी की’ म्हणत रक्त पातळ करणारे अ‍ॅस्पिरीन आणि कोलेस्टेरॉल सांभाळणारे स्टॅटीन आयुष्यभर घ्यायला हवे.
मधुमेह वाईट, पण त्यावर नियंत्रण ठेवणे अवघड नाही. अशक्य तर नाहीच नाही याची खूणगाठ एकदा घट्टपणे मनाशी बाळगली की मधुमेह आणि हृदयरोग या जुळय़ा भावंडांची ताटातूट करण्यात काहीच अडचण येणार नाही.

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे

– डॉ. गजानन रत्नपारखी

Story img Loader