अण्णा हजारेंच्या आंदोलनात तरुणाईने दिलेला भरघोस प्रतिसाद यापूर्वी जनतेने अनुभवला आहे. एकीकडे तरुणाईची ही काम करण्याची इच्छा आणि शक्ती, आणि दुसरीकडे देशात मोठय़ा संख्येने असलेला तरुणवर्ग या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून घ्यायचे राजकीय पक्षांनी ठरवले आहे. निवडणुकांच्या दृष्टीने याचा कसा फायदा होईल यासाठी विविध मार्ग आखले गेले. त्यामुळे तरुणांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांचे अधिकार मिळविण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. त्याबरोबरच समाजाभिमुख, समाजोपयोगी काम केल्याचं समाधान मिळत आहे. या अनुभवाचा त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकेल. शिवाय या तरुण रक्तामधूनच देशासाठी उद्याचा एक जबाबदार नेता मिळेल. विविध पक्षांबरोबर काम करणाऱ्या अशाच काही तरुण कार्यकर्त्यांशी संवाद झाला.
किरण साळुंखे (वय २५ वर्षे) ‘डिलोइट’ कंपनीत तांत्रिक सल्लागार म्हणून नोकरी करतो. त्याबरोबरच भाजपासाठी पर्यायाने नरेंद्र मोदींसाठी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ‘मिशन २७२ प्लस’ साठी काम करत आहे. किरणसारखे आणखीही तरुण आहेत, ज्यांचं उद्दिष्ट आहे, लोकसभेतील ५४६ जागांमधील २७२ जागा भाजपाला मिळवून देणं आणि भाजपाची निर्विवाद सत्ता प्रस्थापित करणं, जे २७२ प्लसचे ध्येय आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला स्वबळावर करणं जमलेलं नाही. किरण साळुंखे त्याच्या सहभागाबद्दल म्हणाला, ‘‘ही माझी कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर निवडणुकीसाठी काम करण्याची पहिलीच वेळ आहे. मी भाजपाला पाठिंबा देतो कारण अनेक वर्षे मी भाजपाच्या राज्यांचा विकास बघतोय. नरेंद्र मोदींनी गुजरातचा
गुजरातमध्ये बेरोजगारीचा दर केवळ ०.९% आहे. मोदींनी अवलंबलेली मूल्यमापन पद्धती राजकारण आणि समाजाच्या भविष्यासाठी अनुरूप आहे व मला ही पद्धत जास्त भावते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामासाठी जबाबदार ठरविल्यानेच समाजाचा विकास आणि अंतिम ध्येय साधता येऊ शकतं.’ असं किरण सांगतो.
भाजपाबरोबरच काम करणाऱ्या आणि घाटकोपर-मुलुंड या मतदारसंघाचा ‘लोकसभा मतदारसंघ दुवा’ ही जबाबदारी असलेल्या संजय गुमत यांच्याशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले की, ‘‘माझं किराणा मालाचं दुकान आणि इंटरनेट निगडित व्यवसाय आहे व ते सांभाळून मी नरेंद्र मोदींसाठी काम करत आहे. मी गुजराती आहे, त्यामुळे माझे गुजरातला बऱ्याचदा जाणं-येणं होत असतं. तिथे मी नरेंद्रजींनी गुजरातची केलेली प्रगती बघितली आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी मी स्वयंसेवी वृत्तीने काम करत आहे. आम्ही विविध रेल्वेस्थानकांवर जाऊन सदस्यत्वाचे फॉर्म भरून घेतले. मोदींच्या कामाविषयी लोकांना माहिती दिली. जानेवारीपासून रोज दोन तास मी या कामाला देत आहे. लोकांमध्ये जनजागृती करणं, त्यांच्या समाजाच्या
नरेंद्र मोदींप्रमाणे तरुणाईचं लक्ष वेधून घेतलं आहे आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी! ‘आप’बरोबर सध्या काम करणाऱ्या शरयू जाखोटिया (वय २४ वर्षे) हिच्याशी संवाद साधला तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी एमबीए करायला अमेरिकेत गेले होते. तेव्हा अण्णा हजारेंनी भारतात जनलोकपालसाठी खूप मोठय़ा प्रमाणावर आंदोलन केलं. त्यांना मोठय़ा प्रमाणात तरुणाईकडून मिळालेला पाठिंबा, अण्णा हजारेंचं उपोषण या सगळ्या बातम्या मी अमेरिकेत टेलिव्हिजनवर बघत होते आणि मी भारावून गेले. माझा या चळवळीला असलेला पाठिंबा दाखविण्यासाठी मी सोशल नेटवìकग साइटवर त्यांचे पेज लाइक केले. त्यांच्या वेबसाइटवरसुद्धा मी देशातील घडामोडींची माहिती मिळवत होते. नोव्हेंबर २०१२ मध्ये मी शिक्षण संपवून
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा