उथळ आणि मोठे कंद जास्त खोल पुरावेत. लागवडीसाठी थोडीशी सावलीची जागाही चालू शकते. मात्र पाणी साचून राहणारी जागा लागवडीस योग्य नसते; तेथे कंद कुजण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात कंदाला कोंब फुटल्यानंतर, पुढे आपल्यास काहीच काम करायची गरज नसते. पावसाला जर प्रलंबित खीळ पडली तर मात्र पाणी द्यावे लागते. सुरण ही अत्यंत कणखर वनस्पती आहे; तिला कसल्याही किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव सहसा होत नाही. एक मात्र लक्षात ठेवावे; ते म्हणजे, छोटा कंद लावल्यानंतर चांगला मोठा कंद तयार होण्यास साधारण तीन वष्रे लागतात. आपल्यास वाटेल की, तीन वष्रे थांबून एकच सुरण मिळवण्यापेक्षा दुसरी कोणतीही पालेभाजी, फळभाजी किंवा कंदभाजी लावून तीन ते चार महिन्यांतच पीक का घेऊ नये? तर याचे उत्तर म्हणजे इतर मोसमी भाज्यांची लागवड करण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. आणि मुख्य म्हणजे लागवड केलेल्या सुरणाच्या एका कंदापासून आपल्याला अनेक छोटे कंद दरवर्षी मिळत राहतात. म्हणजे, पहिल्या तीन वर्षांनंतर दरवर्षी आपल्यास काहीही मेहनत न करता सुरण मिळत राहतात. ते छोटे कंद काढून परत लावणे एवढेच काम आपल्याला करावे लागते. तयार झालेला सुरण अनेक महिने चांगला टिकून राहतो, हाही एक मोठा फायदा असतो. कधी कधी सुरणाला विचित्र आकाराचे, भले मोठे फूल लागते. या फुलाला एक प्रकारचा मंद पण घाण वास असतो. सुरणाच्या या वासाने माश्या आकर्षति होतात. या माश्याच परागीकरणाचे काम करतात.
नंदन कलबाग response.lokprabha@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा