आपण निळा गॉगल लावला तर निसर्ग कसा दिसेल? किंवा सारा निसर्गच क्षणभर निळा झाला तर कसा दिसेल? डोळ्यांना नीलभूल पडेल ना? इंग्रजीमधले नीलभूल घालणारे काही शब्द-
आमच्या चित्रकार मित्रानं एक वेगळंच निसर्गचित्र काढलं. संपूर्ण चित्र निळ्या रंगात रंगवलेलं. आकाश, ढग, डोंगर, झाडं, रस्ता, झोपडी सर्व काही निळं. वाचताना विचित्र वाटतंय ना? पण निळ्याच्या अनेक छटा आणि तलरंगात विविध तंत्र वापरून साधलेला त्रिमित परिणाम, यामुळे चित्र अगदी बघत राहावं असं झालंय. आपण निळा गॉगल लावला तर निसर्ग कसा दिसेल? किंवा सारा निसर्गच क्षणभर निळा झाला तर कसा दिसेल? याचं ते चित्र आहे. चित्राला इंग्रजी नाव देण्यासाठी शब्दार्थकोश पालथे घातले. दरम्यान कुणीतरी ‘नीलभूल’ हे सुंदर मराठी नाव सुचवलं आणि चित्राच्या नावासाठीचा शोध थांबला. आता डिक्शनर्यात धुंडाळलेले नील-शब्द अभ्यासार्थ तुमच्यापुढे मांडतो.
a bolt from the blue (बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू) – an event or news which is sudden and unexpected ; a complete surpise.
उदा. The news that their daughter got married to her teacher was a bolt from the blue for the parents.
between the devil and the deep blue sea- in a difficult situation where there are two equally unpleasent or unacceptable choices. (इकडे आड तिकडे विहीर)
उदा. A visit to the dentist is a choice between the devil and the deep blue sea- if you go you suffer and if you don’t go you suffer.
blue (ब्ल्यू) – a person who has played a particular sport for university; a title given to them.
(कॉलेजमध्ये विशेष कुणाशी न बोलणारा, थोडासा विक्षिप्त, दाढीवाला तरुण यायचा. माझ्या एका मित्रानं माहिती पुरवली की तो बुद्धिबळातला University blue आहे.)
blue eyed boy (ब्ल्यू आइड बॉय) – the favourite, especially of a person in authority;
उच्चपदस्थाचा लाडका.
उदा. Raghu is certain to be promoted. He’s manager’s blue-eyed boy
the blues (द ब्ल्यूज) – feeling of sadness.
उदा. 1) The Monday morning blues.
2) The big city blues.
(एका कारची जाहिरात. फोटोत कारची आलिशान आसनव्यवस्था, निळ्या रंगाच्या छटांनी केलेली सजावट दिसतेय. खाली कॅप्शन आहे. Blues…. for our rivals म्हणजे ही निळ्या सजावटीची कार इतकी सुंदर बनवलीय की आमच्या प्रतिस्पध्र्याना आता हळहळत बसायचंच काम उरणार.)
blue blooded (ब्ल्यू ब्लडेड) – from a royal family; राजघराण्यातला.
उदा. He never discloses it to anyone but my friend comes from the blue-blooded section of the society.
(स्पेनमधील राज्यकत्रे रंगानं गोरे आणि प्रजा मात्र सावळी, काळी होती. राजपरिवारातील लोकांच्या गोऱ्या त्वचेतून रक्तवाहिन्यांचा निळा रंग उठून दिसे. यावरून blue-blooded म्हणजे राजघराण्यातला असा शब्दप्रयोग आला.)
शेवटी एक ओशो-प्रवचनांश.
आकाश नीला है। आकाश अर्थात अमर्याद रिक्तता। इसी रिक्तता के कारण वह नीला दिखता है। भारतने राम और कृष्ण को नीला बनाया। ऐसा नहीं की उनकी त्वचा नीली थी । नीला उनकी अंतर्दशाका प्रतीक है। वे क्षुद्र व्यक्तिभावसे रिक्त है। वे ऐसी रिक्तता है- जिसमें समग्र प्रकटता है। वे ऐसे शून्य है- जिसमें पूर्णका अवतरण होता है। ध्यान इसी नीलता की खोज है। भीतर के नीले आकाश में खो जाओ। जो इस नीलतामें खो जाता है वही सबकुछ पा लेता है। आज इतना ही।