पाऊस हा आपल्या जीवनसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे पावसाशी संबंधित अनेक वाक् प्रचार आपल्याकडे आहेत. इंग्रजीतही पावसासंबंधी कोणते वाक् प्रचार आहेत याचा आढवा-

पावसाळा म्हणजे काय? ढगांची दाटी, इंद्रधनू, श्रावणधारा, वर्षांसहली, हिरवे हिरवेगार गालिचे, वाफाळलेली कॉफी, मेघदूत, धमाल, आनंद..
पावसाळा म्हणजे काय? चिखल, पूर, दूषित पाणी, कामाचा खोळांबा, साथीचे रोग, कोंदट हवा, दमट कपडे, कंटाळा, वैताग..
वरील दोन्ही उत्तरं बरोबरच आहेत, कारण दृष्टी तशी सृष्टी. जसं आणि जे बघू- तसं आणि ते दिसतं.. आता इंग्रजी भाषेचे विद्यार्थी म्हणून पावसाळ्याकडे पाहू. पुढील वाक्यं वाचा.
* नारायणाला टॉयफॉईड झाला. खूप अशक्तपणा आलाय. तेवढय़ात वडिलांना भटकं कुत्रं चावलं. त्यांची इंजेक्शनं होताहेत तोवर आई बाथरूममध्ये घसरून पडली अन् पाय मोडला. (it never rains but it pours)

* श्रीधरपंतांची नोकरी साधी. पगार बेताचाच. पण सुमतीबाईंनी काटकसरीनं संसार केला. घर तर चालवलंच, पण प प जोडून पडकाळासाठी म्हणून काही रक्कमही शिल्लक टाकली. (save for a rainy day)
* सकाळपासून पावसाचा रंग होताच. अंधारून आलं. विजा कडाडल्या आणि पाऊस ओतायला लागल्या. बाहेर पडणं शक्य नाही. मुसळधार पाऊस पडतोय. (rain cats and dogs).
* दामूआण्णांची तब्येत बरी नाही, पण तरी पहाटे चारला उठून, स्नान करून साधनेला बसले. काहीही होवो, त्यांच्या साधनेत खंड पडायचा नाही. (come rain or shine) 
* ‘‘अरे सुधीर, थांब, कॉफी ठेवते.’’
‘‘वैनी, प्लीज, आता नको. पुढल्या वेळी आलो की नक्की घेईन.’’ (take a rain check)

आता या साऱ्या पावसाळी वाक्प्रचारांचे अर्थ समजावून घेऊ.

* it never rains but it pours (pour= ओतणे) problems often seem to happen all at the same time.
उदा. First, it was the car breaking down, then the fire in the kitchen and now Raju’s accident. It never rains but it pours.

* save for a rainy day  – भविष्यातल्या गरजांकरता वस्तू, पसा साठवणे.
उदा. Don’t spend all the prize money at once, save some of it for a rainy day

* rain cats and dogs – rain very heavily; मुसळधार पाऊस पडणे.
उदा. 1) What a poor raincoat can do  ? It’s raining cats and dogs since morning.
(मुसळधार पाऊस. शहरभर पाणी तुंबलं. भटकी जनावरं बुडून मेली. दुसऱ्या दिवशी पाणी ओसरल्यावर कुत्र्या-मांजरांची प्रेतं रस्त्यावर सर्वत्र पडलेली, काल जणू कुत्र्या-मांजरांचाच पाऊस झाला. यावरून raining cats and dogs हा वाक्प्रचार आला असावा.)
*(come) rain or shine – काहीही झालं तरी ; हवामान काही असलं तरी.
उदा. He goes for a long walk every morning, come rain or shine.

take a rain check – to ask for a postponement, especially of an invitation.
उदा.  I am sorry. I can’t accept your invitation, but I’ll take a rain check on it.

Story img Loader