‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे..’ हे आपल्याला कळत असतं, पण वळत नसतं. अशा या मृत्यूबद्दलचे, मरणभान देणारे इंग्रजीमधले शब्द-
आपण जगतो आहोत. मनोराज्यं रचतो आहोत. वेगानं धावतो आहोत. पण ही सारी पळापळ स्मशानघाटाच्या दिशेनं चाललीय. रोज रोज आपण मृत्यूच्या जवळ सरकतो आहोत. जीवनातल्या अन्य अडचणीवर काही उपाय चालेल, पण इथे उपाय नाही. मृत्यूपुढे राव आणि रंक सारखेच हतबल आहेत. घडी भरली की तो हजर होतो आणि माणसाला खेचून नेतो. जगात या मृत्यूलाच सगळे घाबरतात. त्याला चुकवायचा प्रयत्न करतात, पण अशक्य! मृत्यूपासून कुणीही लपू शकत नाही. तो येतो आणि खेचून नेतो.. मित्रहो, इंग्रजीतल्या काही मरणशब्दांना आज धीरोदात्तपणे सामोरे जाऊया.
euthanasia (यूथनेइझिअ) – the practice of killing without pain a person who is suffering from a disease that cannot be cured; mercy killing; इच्छामरण.
उदा.
1) Although some people campaign for the right of euthanasia, it is still illegal in most countries.
2) The debate started with legal aspects of euthanasia and ended with moral differences.
cremation (क्रिमेशन) – the act of burning a dead body.
उदा. 1) The whole village gathered on the ghats (घाट)
for cremation of the teacher.
2) In his will, he stated that he desired the cremation of his body.
epitaph (एपिटाफ) – words that are written or said about a dead person, especially words on a gravestone.
उदा.
1) The epitaph read ‘Loving father of Emily and Jane.’
2) He is always ready to help people. ‘Yes, I’ll do it’ will be his epitaph.
the Grim Reaper (द ग्रिम रीप(र)) – an imaginary figure that represents death.
grim (ग्रिम)- unpleasant and depressing ; sick.
reap (रीप)- to cut and collect a crop.
(विळ्यानं धान्याची रोपं कापावीत तसा असुखावह रीतीने जीवन तोडून नेणारा मृत्यू म्हणजेच the Grim Reaper)
उदा.
1) When the Grim Reaper comes for you, there is no escape.
2) The child died so young. Can anyone ask the Grim Reaper, “Why?”
decease (डिसीस्)- मृत्यू; –
the death of a person.
deceased (डिसीस्ट्)- मयत; dead
उदा. 1)
1) Upon my decease, my children will inherit everything.
2) The deceased is survived by a wife and two children.
[decease (डिसीज)-मृत्यू आणि disease (डिझीझ)-आजार]
memento mori (ममेन्टो मॉऽरि) –
(लॅटीनमध्ये याचा अर्थ
remember, you must die)
– an object or symbol that reminds or warns you of death.
उदा. Her husband died in an air crash. An airplane has become a memento mori for her.
(एक बौद्ध भिक्षू मानवी कवटी नेहमी जवळ बाळगत असे. त्याविषयी कुणी विचारताच म्हणे, ‘‘हे मृत्यूचं प्रतीक (memento mori) मला जीवनात जागरूक रहायला मदत करते’’.)
सारी मनुष्यजात मरणाला घाबरते. त्यापासून दूर पळते, पण भारतीय योग्यांनी मात्र त्यात रस घेतला आणि जिज्ञासापूर्वक मृत्यूत प्रवेश केला. ‘आपुले मरण, पाहिले म्या डोळा। तो झाला सोहळा, अनुपम॥’ असं तुकोबा म्हणतात. आणि ‘मरो रे जोगी मरो । मरो, मरण है मीठा॥’ असा उपदेश गोरखनाथ करतात. शरीराच्या मृत्यूपूर्वीच घेतलेल्या या मनोलयाच्या अनुभूतीत त्यांना आपलं अमृतत्व गवसलं, म्हणूनच मरणशब्दांच्या बरोबरीने आज या अमृतपुरुषांचं स्मरण केलं.