रोजच्या व्यवहारामध्ये असे अनेक इंग्रजी शब्द आपल्याला समोरे येत असतात, ज्यांचा अर्थ आपल्याला माहीत नसतो. असे शब्द कानावर पडल्यावर शब्दकोश उघडून अर्थ शोधून तर पहा…
एका मित्राच्या घरी गेलो होतो. चहा आला. माझं लक्ष टी-पॉय वरच्या ग्रंथाकडे गेलं. नाव होतं- Concise Oxford Dictionary. मला प्रश्न पडला Concise म्हणजे काय? मित्राची बायको इंग्लीश मीडियमवाली. तिला विचारलं. तिनं (बहुधा इंग्रजीतून) खांदे उडवले. मित्रानं शहाणपणाचा सल्ला दिला, ‘‘शब्दार्थकोश उघडा आणि बघा.’’ मी लगेच डिक्शनरी खोलली. (डिक्शनरीच्या नावातलाच शब्द डिक्शनरीत बघून सुरुवात.) पण तेव्हापासून शब्द अडला की शब्दार्थकोश बघायची सवय लावून घेतली. आजूबाजूला आढळणारे काही शब्द आज डिक्शनरीच्या मदतीनं समजावून घेवू.
concise (कन्साइस्) – short with no unnecessary words; brief.
उदा. If you want to succeed in interview, make your answers clear and concise.
– – – –
शेजारच्या घरी गेलो. कुणीतरी पाहुणी आली असावी, कारण दारात एक स्टायलिश लेडीज चप्पल, त्यावर अक्षरं होती chic. त्या ऐटबाज चपलेच्या मालकिणीचं मुखदर्शनही न करता, गेल्या पावली माघारी परतलो आणि डिक्शनरी उघडली.
chic (शिक) – fashionable and elegant; stylish.
उदा. १) Margaret was looking very chic in blue.
२) A perfectly dressed woman with an air of chic that was unmistakably French.
(chic हा फ्रेंचमधून आलेला शब्द आहे.)
– – – –
Pedigree हा शब्द सध्या सर्वाच्या माहितीचा आहे कारण या नावाचं dog food बऱ्याच जणांची pedigree म्हणजे श्वान खाद्य अशीच समजूत झालीय. तेव्हा अंदाजपंचे अर्थ लावण्यापेक्षा डिक्शनरीदादांचा सल्ला घेऊ.
pedigree (पेडिग्री) – 1) The parents and other past family members of an animal or person.
उदा. A pedigree animal comes from a family that has been recorded for a long time and is considered to be of a very good breed.
2) The history and achievements of something or someone.
उदा. Founded in 1940, the school has excellent pedigree
– – – –
हात धुवायच्या बेसिनकडे एकदा नीट लक्ष देवून पहा. बेसिन बनवणाऱ्या कंपनीच्या नावाखाली लिहिलेलं असत vitreous.
vitreous (व्हिट्रिअस्) – made of or looking like glass.
उदा. The flooring was vitreous. It almost reflected everything.
– – – –
‘‘काय झालं? बाळ रडत होतं. ग्राईपवॉटर द्यायला सांग तिला.’’ ही जाहिरात प्रत्येकानं ऐकलेली असते. ग्राईपवॉटर बाळांना पाजतात हे माहिती असतं पण gripe म्हणजे काय?
gripe (ग्राइप्) – a complain about something.
उदा. He is always griping about the people in his office.
the gripes – sudden bad stomach pain.
gripe water – medicine that is given to babies when they have stomach pains.
– – – –
व्हिम म्हणजे भांडी धुवायचा साबण. पण vim शब्दाचा अर्थ काय?
vim (व्हिम्) – energy.
उदा. The young girl was not very healthy but full of vim.
रोजच्या व्यवहारात असे अनेक इंग्रजी शब्द आपल्याला भेटत असतात. या आजूबाजूच्या vocabulary ची जागरूकपणे नोंद घेऊन, डिक्शनरीच्या साहाय्याने त्याचे अर्थ समजावून घेणं, ही शब्दसंग्रह वाढवण्यासाठीची एक चांगली सवय आहे.