आज अभ्यासार्थ ज्या आंग्ल-पुराण-कल्पनांवरून आलेले शब्द घेतलेत, अगदी तशाच कल्पना आपल्या पुराणातही आढळतात. थोडक्यात काय तर पृथ्वी गोल आहे…

एका अपार्टमेंटसमोर दोन मुलं उभी. होळीचे दिवस. दोघांच्याही हातात टिमक्या. त्यातला एक, तोंडावर हात नेऊन ठो ठो करतोय. दुसरा म्हणतो, ‘‘तुम्ही इंग्लिश मीडियमवालेसुद्धा असेच बोंबलता होय?’’ (आता इंग्लिश मीडियम असलं म्हणून बोंबलणं काही वेगळं असतं का?) हे व्यंगचित्र आठवण्याचं कारण आज अभ्यासार्थ ज्या आंग्ल-पुराण-कल्पनांवरून आलेले शब्द घेतलेत, अगदी तशाच कल्पना आपल्या पुराणातही आढळतात.
१) महाभारताच्या युद्धापूर्वी गांधारीनं दुर्योधनाला दिगंबरावस्थेत आपल्या कक्षात बोलावलं. (कृष्णानं माळ्याचं रूप घेऊन एक पुष्प-वस्त्र कमरेला लावायला दिलं.) गांधारीची नजर पडताच दुर्योधन वज्रदेही झाला पण पुष्प-वस्त्रामुळे मांडीचा भाग कमजोर राहिला.
बाल अकिलीझला त्याच्या आईनं नदीत बुडवून काढलं, पण पायाचा तळवा आईच्या हातात राहिल्याने भिजला नाही आणि वज्रदेही अकिलीझचा तळवा कमजोर राहिला. यावरून Achilles’ heel असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे.
Achilles’ heel (अकिलीझ् हील)-weak point.
उदा. As a team they are strong on attack, but a defence might prove to be their Achilles’ heel.
२) एका परीटानं रावणाघरी राहून आलेल्या सीतेवर संशय घेतलेला समजताच, श्रीरामांनी तिचा त्याग केला. सीतेच्या शुद्धीची मनोमन खात्री असूनही, लोकमनात संशयाला जागा नको, म्हणून राजा रामाने हा कठोर निर्णय घेतला.
ज्युलिअस सीझरने व्यभिचाराच्या संशयावरून आपल्या बायकोला दिलेल्या घटस्फोटासंदर्भात, ‘Caesar’s wife must be above suspicion’ असे उद्गार काढले. त्यावरून Caesar’s wife हा शब्दप्रयोग रूढ झाला.
Caesar’s wife – a person who is required to be above suspicion.
उदा. The opposition leader said that a public servant must be like Ceasar’s wife and asked the minister’s resignation for his alleged involvement in the fraud.
३) दुर्वास ऋषी शेकडो शिष्यांसह भिक्षेला आले. द्रौपदीकडे खाद्यपदार्थ शिल्लक नाहीत. तिनं कृष्णाचा धावा केला. कृष्ण आला. घरातल्या थाळीला चिकटलेलं एक शीत खाऊन तृप्त झाला आणि द्रौपदीला अशी थाळी दिली की जी अक्षयपणे अन्नपुरवठा करेल.
बायबलमधील कथेनुसार येशू ख्रिस्ताने केवळ पाच रोटय़ा आणि दोन मासे एवढय़ाच सामग्रीत पाच हजार जणांना जेवू घातलं. यावरून  the feeding of the five thousand हा शब्दप्रयोग आलाय.
the Feeding of the Five  Thousand – a situation in which a lot of people need to be given food
उदा. I made beakfast for all my son’s friends- it was like Feeding of the Five Thousand
४) पांडवांचा अज्ञातवास. धर्मराज राजाचा सचिव बनलाय. सोंगटय़ांचा डावात राजा हरतो आणि चिडून फासा आपटतो. तो धर्मराजाच्या डोक्याला लागून रक्ताचे थेंब जमिनीवर पडणार एवढय़ात सरंध्री बनून वावरणारी द्रौपदी एका पात्रात ते रक्त धरते. (कारण धर्मराजाचं रक्त भूमीवर सांडल्यास प्रलय होणार, अशी कालवाणी असते.)
येशू ख्रिस्ताने मृत्यूपूर्वीच्या जेवणासाठी (last supper)वापरलेलं पात्र म्हणजे Holy Grail. याच पात्रात क्रुसावर चढवलेल्या येशूचं रक्त साठवण्यात आलं. प्रत्यक्षात हे पात्र कुठं होतं, देव जाणे. पण या Holy Grail च्या प्राप्तीसाठी अनेक युद्धं लढली गेली. इंग्रजी भाषेत मात्र हा शब्दप्रयोग अंतिम पण असाध्य असं ध्येय या अर्थानं रूढ झालाय.
the Holy Grail – a thing that you try very hard to find or achieve, but never will.
उदा. He is an honest social worker. But taking the responsibility of solving all problems of all people is like trying to get the Holy Grail.

Story img Loader