के या अक्षराने सुरु होणाऱ्या मालिकांचं मध्यंतरी पेवच फुटलं होतं. आज के या रोमन अक्षरापासून सुरू होणाऱ्या काही वैशिष्टय़पूर्ण इंग्रजी शब्दांविषयी..
एक होतकरू तरुण नशीब काढण्यासाठी मुंबईला गेला. आमचा हा मित्र नाटकं लिहायचा, बसवायचा, कविता करायचा. मुंबईत पोहोचला आणि बातमी लागली की एका मोठय़ा कंपनीला िहदी मालिकांसाठी लेखक हवेत. मित्रानं सहज फोन केला. दोन मिनिटं भेटीची वेळ मिळाली. स्वत: केकता कपूरनी ३५ सेकंदात स्टोरी सांगायला फर्मावलं आणि ‘तुम्हारा समय शुरू होता है- अब!’ असं म्हणत स्टॉपवॉच सुरू केलं. ‘३५ सेकंदांत स्टोरी?’ मित्र हादरला पण दीडच सेकंदात सावरला आणि इयत्ता पाचवीत पाठ केलेलं वाक्य घडाघडा म्हणून दाखवलंन. ‘काकूंनी काकांच्या काळ्या कोटातील कागदाचे कात्रीने कराकरा कापून कपटे केले’. आता हादरायची पाळी समोरच्या बाजूची होती. हा ‘क’चा कडकडाट ऐकून केकताजी शहारल्या, थक्क झाल्या, गहिवरल्या, आनंदल्या.. आमचा मित्र सध्या ४ मालिकांसाठी रतीब घालतोय.. सध्या (म्हणजे कलियुगात) यशाचा मार्ग K पासून सुरू होतो, असं दिसतंय. बघूया आपणही काहीतरी करून..
kaput (कपुट) – not working correctly; brokern.
उदा. 1) I want a mechanic. My T.V. has gone kaput.
2) The radio is half kaput. Sometimes it works and sometimes not. [बॉलीवूडच्या एका जोडीचे प्रेमसंबंध आहेत, आहेत अशी मीडियात हवा होती. आणि एक दिवस ते तुटले, अशी बातमी आली. शीर्षक होतं Kaput (फाटलं!)]
kitsch (किच) – चकाचक, झ्यांगप्यांग.
– works of art that are popular but are considered to have no real artistic value.
[िहदी फिल्म निर्माता, दिग्दर्शक करण जोहर यांच्या चित्रपटांवरील एका लेखाचं शीर्षक होतं ‘Kitsch, kitsch hota hai !’ (कुछ कुछ होता है । वर कोटी)]
उदा. 1) The whole house was decorated with kitschy plastic flowers.
2) Most of the things exhibited in the art gallery were kitsch.
kleptomania (क्लेप्टमेइनिअ)- चोरचळ.
– a very strong and uncontrollable desire to steal especially without any need or purpose.
– a mental illness in which you have a compulsive desire to steal things.
उदा. 1) For a rich, good looking lady like her, kleptomannia was the worst thing to happen.
2) Oh, I can’t believe. The retired professor was an old kleptomaniac.
knee-jerk (नी-जर्क)- produced automatically; without any serious thought.
CQF. 1) Whenever a bomb blast takes place, the government’s knee-jerk reaction is to warn Pakistan.
2) Without understanding the complexities of my illness, the doctor suggested me a knee-jerk medicine.
kudos (क्यूडॉस) – praise; honor; glory
– admiration or respect that goes with a particular achievement or position.
उदा. 1) Being a film actor he gets kudos wherever he goes.
2) The young college student received kudos for his poems.
आपल्या द्रष्टया संतांनी हा K महिमा ओळखून त्याविषयीचं सूचन आधीच करून ठेवलेलं आहे. Kल्याने होत आहे रे, आधी Kलेचि पाहिजे।