मनाविरुद्ध घडलं की संतापायचं आणि दुसऱ्याचा विचार आधी करणं ही दोन विरुद्ध टोकं. ‘स्व’ आणि ‘पर’ या विषयीचे काही शब्द आज अभ्यासासाठी.
आमचे एक काका, स्वभावानं चांगले पण मनाविरुद्ध काही घडलं की संतापायचे, आरडाओरडा करायचे. अशा वेळी काकू शांत राहायची. काकांचा पारा उतरला की म्हणायची, ‘‘अहो, जरा दुसऱ्याच्या बाजूनं विचार करून बघावा, म्हणजे एवढा राग नाही यायचा.’’ ‘दुसऱ्याचा विचार आधी’ हा काकूंचा मंत्र पण ‘मी म्हणतो तेच खरं’ हा काकांचा हट्ट. काकूंचा विचार परकेंद्री आणि काकांचा स्वकेंद्री. यावेळी ‘स्व’ आणि ‘पर’ विषयीचे काही महत्त्वाचे शब्द आपण अभ्यासासाठी घेऊ. लॅटिनमधून आलेल्या ego (I; स्व) आणिalter (other; पर) या शब्दांवर पुढील सर्व इंग्रजी शब्द आधारलेले आहेत.
आधी ego पासून बनलेले शब्द पाहू.
egoist – – ‘मी’ ही संकल्पना ज्याच्या डोक्यात सर्वात प्रमुख असते तो egoist.-
egotist – ‘मी’ हा शब्द ज्याच्या बोलण्यात प्रमुख असतो तो egotist.
(बहुतेक शब्दार्थकोशांनी egoism आणि egotism हे शब्द समानार्थी म्हणूनच दिलेत. पण दोन्ही शब्दांच्या अर्थातला फरक पुढीलप्रमाणे लक्षात ठेवा egotist मध्ये egoist पेक्षा जास्त t आहे.t = talking. . जो ‘मी’, ‘मी’, ‘मी’ करत बोलतो egotist) )
egoist / egotist म्हणजे स्वार्थी, अहंकारी माणूस.
उदा. Politicians are mostly egoists, interested only in promoting themselves.
egocentric- स्वकेंद्रित; thinking only about yourself and not about what other people need or want.
egomaniac – mental condition in which, one is interested only in oneself.; स्ववेडा.
आता alter वरून आलेले शब्द.
altruism – – परहितदक्षता; निस्वार्थीपणा; the fact of caring about the needs and happiness of other people more than your own.
उदा. Altruism is not my motive. I am running a business which benefits both me and my customers.
altercation – a noisy argument ; भांडण ; बाचाबाची.
उदा Try to avoid another altercation with your wife, she is unwell
alter ego (ऑल्टर ईगो) – a close friend who is very like yourself. (alter म्हणजे दुसरा आणि ego म्हणजे मी.alter ego म्हणजे ‘दुसरा मी’.) (आपला मित्र, बायको किंवा सहाय्यक, ज्याच्या तारा आपल्याशी जुळलेल्या असतात अशा व्यक्तीला alter ego म्हणता येईल.)
उदा. 1) I will not be there, but please talk to my wife, my alter ego.
2) The only alter ego for an egoist is his mirror image.
‘स्व’ आणि ‘पर’ च्या चच्रेनंतर रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेली आपपरभावा-पल्याडची गोष्ट. एक भिकारी कटोऱ्यात अन्न मागून आणतो. झाडाखाली बसून खायला लागतो. एक भुकेला कुत्रा जवळ घोटाळतो. भिकारी त्यालाही घास भरवतो. एक घास स्वत, एक घास कुत्र्याला. येणारे-जाणारे जमतात. कुत्र्याला भरवणारा वेडा बघून हसायला लागतात. भिकारी त्यांच्याकडे पहातो अन् म्हणतो, “Vishnu is eating food. Vishnu is feeding Vishnu. Why are you laughing Vishnu? Whatsoever is, is Vishnu.”