गर्भवती स्त्रियांसाठी चालवल्या जाणाऱ्या ‘मदर अ‍ॅण्ड बेबी’ या मासिकात मातृत्व, बाळ-बाळंतीण यासंबंधीच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर केला गेला आहे.

मातृत्व हा स्त्री-जीवनाचा एक सहजसुंदर आविष्कार. गर्भारपण, बाळंतपण आणि बालसंगोपन या विषयात आधुनिक वैद्यकशास्त्रानं प्रचंड संशोधन केलंय. इंग्रजी वृत्तपत्रं आणि स्त्रियांसाठीच्या मॅगझिन्समध्ये या विषयातल्या नव्या संशोधनासंबंधीचे लेख प्रकाशित होत असतात. अलीकडेच माझ्या पाहण्यात आलेल्या ‘मदर अ‍ॅण्ड बेबी’ या मासिकात, हसरी-गोबरी बाळं आणि तृप्त-आनंदी आयांचे फोटो पानोपानी सजावट म्हणून वापरलेत. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचे अनेक छोटेखानी लेख यात आहेत. वैद्यकीय परिभाषा आणि दुबरेधता टाळून हे लेखन केलेलं असलं तरी ते नीट समजण्यासाठी इंग्रजी शब्दसंग्रह चांगला हवा. या बाळ-बाळंतीण मासिकातले काही शब्द या वेळी आपल्या अभ्यासासाठी घेऊ या.
या मासिकात Baby bloopers नावाच्या सदरासाठी संपादकांनी share a funny incident about your baby असं आवाहन केलंय आणि अनेक आयांनी आपल्या खटय़ाळ बाळांच्या खोडय़ांचे प्रसंग मोठय़ा कौतुकानं कथन केलेत.

blooper – an embarrassing mistake in public.
उदा. The film ended with the bloopers while shooting.  (जॅकी चॅनच्या चित्रपटांत शेवटी असे ब्लूऽपर्स दाखवतात.)
नातेवाईक, मित्रपरिवारानं एकत्र जमून, हास्यविनोद, गाणी, खेळ अशा आनंदी वातावरणात, गर्भवतीला तिच्या आवडीचे पदार्थ खायला घालायचे, या कौतुकसोहळ्याला आपण डोहाळजेवण म्हणतो. इंग्रजीत त्यासाठी शब्दप्रयोग आहे- baby shower. 

baby shower
उदा. Friends from her office arranged a baby shower for Seema.
या मासिकात toddler आणि tot हे बालशब्द वारंवार आलेत.

toddler – a child who has only recently learnt to walk; दुडदुडय़ा बालक
उदा. She watched a group of toddlers running around in the garden.

v tot – a very young child.

उदा. I want to buy some toys for my tot.
लहानग्यांचे दात येतानाच्या समस्या, त्यांच्या दातांची निगा या विषयी tooth fairy special नामक खास विभाग आहे.

tooth fairy – दंतपरी.
(मुलाचा दात पडला की आईच्या सांगण्यावरून, दात उशाखाली ठेवून मूल झोपी जातं आणि रात्री टूथ फेअरी येऊन दात नेते आणि त्या जागी पसे ठेवून जाते.)
बाळंतपणात वाढलेलं पोट, प्रसूतीनंतर पूर्ववत कसं करावं, याविषयीच्या लेखाचं शीर्षक आहे- How to lose your Mummy Tummy.
tummy – the stomach or the area around the stomach.
उदा. Mum, my tummy hurts.
मासिकातल्या एका लेखाचं शीर्षक आहे- Bring home the bundle of joy. दुपटय़ात बांधलेलं, डोक्याला कुंची घातलेलं, फक्त डोळे, नाक आणि ओठ दिसताहेत, असं स्वत:शीच हसणारं लहान बाळ आठवा. यालाच bundle of joy असं म्हटलंय.

bundle of joy – आनंदाचं गाठोडं ; लहान मूल

शब्दभुलया : शहरातलं भव्य पॉलीक्लिनिक. एका मोठय़ा दालनाला अपारदर्शक काचेचा दरवाजा. त्यावर फलक लावलेला ‘Labour Room’. ही कसली खोली? ‘‘सोप्पं आहे. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना डबा खाणं, कपडे बदलणं, विश्रांती वगैरेसाठी ही लेबर रूम अर्थात- कामगार कक्ष.’’ Labour म्हणजे कामगार एवढय़ा सुतावरून कामगार कक्षचा स्वर्ग गाठलात ना?.. उतरा खाली. Labour चा पुढील अर्थ पहा. The period of time or the process of giving birth to a baby.  उदा. Jane was in labour for ten hours. म्हणजे गर्भवती, जिला कळा यायला लागल्यात, पण अद्याप प्रसूतीला वेळ आहे अशा स्त्रियांसाठीचं प्रतीक्षालय म्हणजे ही Labour room अर्थात कळा-गृह.

Story img Loader