पुन्हा अंटाक्र्टिकाला जाऊ तेव्हा फॉकलंड आयलंड्स व साऊथ जॉर्जिया या अत्यंत निसर्गरम्य बेटांना भेट द्यायचीच असं आम्ही ठरवलं होतं. त्या एकवीस दिवसांच्या सफरीतला हा पहिला टप्पा-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आम्ही आमची अंटाकर्ि्टकाची पहिली सफर २००५ साली केली होती. त्या वेळी जाताना वाटेवर अंटाकर्ि्टक पेनिनसुलाप्रमाणेच फॉकलंड आयलंड्स व साऊथ जॉर्जिया या ब्रिटिश बेटांनी आपल्या अनोख्या निसर्गसौंदर्याने आम्हाला फारच आकर्षित केले होते. तेव्हाच ठरवले होते की पुन्हा इथे यायचंच.
या सफरीसाठी जाणाऱ्या क्रूझेस उशवाया येथून निघतात. उशवाया हे अर्जेटिना देशाचे सर्वात दक्षिणेकडील शहर. काही सफरी कमी दिवसांच्याही असतात. काही सांतियागो, चिले येथूनही जातात. उशवाया हे दक्षिण अमेरिकेतील पॅतागोनिअन डोंगरराशीतील बिगल चॅनेलच्या काठावरील लहानसे टुमदार शहर. उशवाया सोडल्यानंतर आपण लगेचच ड्रेक पॅसेजमधे प्रवेश करतो. दक्षिण ध्रुवाजवळ भूभाग नसल्याने चिलेहून येणारे बिगल चॅनेल व मॅजेलान स्ट्रेट येथून येणारे पाणी केपहॉर्न येथे गोलाकार फिरत राहते, तसेच या ठिकाणी प्रशांत व अटलांटिक महासागरही एकमेकांत मिसळत असल्याने समुद्र नेहमीच खवळलेला असतो. ३० ते ४० फूट उंचीच्या लाटांचे तांडव सदैव चालूच असते.
अशा वेळी डेकवर न जाण्याची आपल्याला सक्त ताकीद असते. खिडक्यांची शटर्स बंदच ठेवलेली असतात. रेलिंगला धरूनच चाला, दरवाज्याच्या चौकटीवर हात ठेवून गप्पा मारू नका, अशा अनेक सूचनांचा भडिमार कॅप्टनकडून चालू असतो. सतत दोन दिवस रोलर कोस्टरमध्ये बसल्यासारखी गत असते. पूर्वी दक्षिणेकडील भूभागाच्या शोधार्थ निघालेल्या बऱ्याचशा बोटींना येथे जलसमाधी मिळालेली आहे. पण सोळाव्या शतकात इंग्लिश दर्यावर्दी सर फ्रान्सिस ड्रेक याने हा पट्टा व्यवस्थित पार पाडल्याने त्याला ड्रेक पॅसेज म्हटले जाते.
लाखो वर्षांपूर्वी पृथ्वी वेगवेगळ्या अवस्थांतून जाताना वातावरणात बदल होऊन भूरचनेत फरक पडत गेला आणि अजूनही हे बदल होतच आहेत. त्यामुळे काही भूखंड जोडले गेले तर काही विलग झाले. त्या वेळी अथांग जलाशयात काही ठिकाणी अलग झालेल्या तुकडय़ांमुळे फाटे पडून पाण्याचे लहानमोठे प्रवाह तयार झाले.
पूर्वी सागरी पर्यटनाच्या वेळी तसंच जगाच्या वेगवेगळ्या भागांतून व्यापारासाठी होणाऱ्या सागरी प्रवासात पोर्ट स्टॅनली येथे विश्रांती, बोटीची डागडुजी वगैरे कारणांसाठी हॉल्ट घेतला जात असे. इतका दूरचा पल्ला गाठेपर्यंत बोटींमध्ये बिघाड होणे साहजिकच होते. त्या वेळी दुरुस्त न होणाऱ्या बोटी तिथेच सोडल्या जात असत. त्यातल्याच काही बोटींवर आता तरंगते म्युझियम, तसंच रेस्टॉरंट केली गेली आहेत. काहींना किनाऱ्यावर जलसमाधी देऊन त्या भरावाचा वापर करून धक्का बांधला गेला आहे. भौगोलिक रचनेमुळे बेटावर मोठमोठय़ा उंच झाडांचा अभाव होता. त्यामुळे घरे बांधायला लाकूड नाही. विटा आणणे महाखर्चीक, त्यामुळे तिथे उपलब्ध असलेल्या सामग्रीतून घरबांधणी होई. घराच्या भिंती बुडणाऱ्या बोटींच्या लाकडांतून, तर पत्रे काढून छप्पर बांधले गेले आहे. अर्थात आकर्षक दिसण्यासाठी पत्रे रंगवायची पद्धत रुढ झाली व ती आजतागायत रूढ आहे.
येथील इस्ट आणि वेस्ट आयलंड्सवर सतराव्या शतकात इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश अशा वसाहती होऊन गेल्या. पैकी वेस्ट फॉकलंड येथे अगदीच तुरळक वस्ती म्हणजे नव्वद ते शंभर लोकच होते. आता तर तिथे मेंढय़ांसारखी जनावरेच आहेत. त्यामुळे तिथे फक्त वेस्ट एन्ड पॉइन्टवर ब्लॅक ब्रो आल्बट्रॉस व रॉक हॉपर पेंग्विन्सची वसाहत पाहायला गेलो. फॉकलंड भागातील छोटीछोटी बेटे काही बडय़ा असामींच्या मालकीची आहेत. वेस्ट पॉइंट हेदेखील रॉडी व लिली नेपियर या कुटुंबाच्या मालकीचे. प्रवाशांसाठी चहा- कॉफी, थोडा आराम यासाठी त्या घराचा वापर होतो.
मॅकरोनी पेंग्विन्स आमच्याकडे कुतूहलाने पाहत होते. त्यांच्या काळ्या तोंडाला कानाजवळ पिवळी पिसे असतात. पेंग्विन आणि आल्बट्रॉस यांचे जागेवरून भांडण चालले होते. ते दृश्य मस्तच होते. थोडक्यात म्हणजे आपल्याकडच्या नाक्यावरील बाचाबाचीसारखी मजा होती. पेंग्विनचे घर दगडांचे असते. त्यांच्यातही चोरी करायचा उद्योग होताच. एक मॅकरोनी पेंग्विन घरासाठी एकेक दगड जमवत होता, तर दुसरा त्याची पाठ वळते न् वळते तो दगड लंपास करीत होता. पहिला आल्यावर हा चोरी करून वर आपण त्या गावचेच नव्हे असा उभा.
क्रूझ शिप असल्याने राहणे अर्थातच शिपवरच. आमची वेस्ट पॉइंटची भेट आटोपून बोटीवर परतलो. दुसऱ्या दिवशी फॉकलंड आयलंड्स येथील इस्ट आयलंड्सवर पोर्ट स्टॅनलीच्या रंगीबेरंगी पत्र्यांच्या छपरांच्या घरांनी स्वागत केले. हे दोन अडीच हजार वस्तीचे गाव. पाश्चिमात्य देशांतले लहान गावदेखील आपल्या लहानशा शहरासारखे. सर्वसुखसोयींनी सज्ज. इथे इंग्रज दर्यावर्दीनी सतराव्या शतकात पहिले पाऊल ठेवले असे म्हणतात. त्याच्या पुढेमागे दुसऱ्या टोकावर फ्रेंच लोक होते. पण दोघांनाही एकमेकांचा पत्ता नव्हता. फ्रेंचांनी त्या भागाला सेंट मालो असे नाव दिले. ते त्यानंतर आलेल्या स्पॅनिश राज्यकर्त्यांच्या सुपूर्द केले. त्यांनी त्या भागाचे माल्वीनाज असे नामकरण केले. बरेच लोक आले गेले असा प्रकार असल्याने मालकी हक्क कोणाचा याबाबत बरेच प्रश्न होते.
१८८२ मध्ये अर्जेटिनाने फॉकलंड आयलंड्स येथे आपलाच अधिकार असल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या लढाईत इंग्लंडचा जय झाला. पण त्या पराजयाचे दु:ख अर्जेटिनामधे अजूनही आहे. त्यामुळे त्यांचे व ब्रिटिश लोकांचे अजिबात सख्य नाही. १८९२, १९८२ मधील लढाईत ज्या ब्रिटिश जवानांना वीर मरण आले त्यांच्या स्मरणार्थ किनाऱ्यावर ठिकठिकाणी लहानमोठी स्मारके आहेत. शिवाय दोन्ही जागतिक महायुद्धांमध्येही या ठिकणी बरीच हानी झाली.
इथल्या म्युझियममध्ये अगदी १८, १९ व्या शतकापासूनच्या वस्तू पाहायला मिळतात. साधारण १९५० ते ७० या काळात आपल्याकडे काही हायक्लास रेस्टॉरंट्समध्ये पैसे मशीनमध्ये घालून आपल्याला हवे ते गाणे ऐकता येत असे. तसा घडय़ाळासारखी मोठी तबकडी असणारा ज्युक बॉक्स १८९५ साली इथल्या ग्लोब रेस्टॉरंटमध्ये ठेवण्यासाठी इंग्लंडमधून आणला होता. पण जर्मनी व अर्जेटिनाबरोबर झालेल्या लढाईमध्ये त्याची थोडी तोडफोड झाली होती. पण एका घडय़ाळदुरुस्ती करणाऱ्याने तो रिपेअर करून दिला. तो अजूनही चालू अवस्थेत पाहायला मिळतो. तसेच अगदी सुरुवातीच्या काळातले शिवणयंत्र, वॉशिंग मशीन, हॉटेल अथवा बारमध्ये वापरला जाणारा टायपिंग मशीनच्या आकाराचा कॅल्क्युलेटर अशा अनेक गोष्टी तिथे पाहावयास मिळतात. त्याच सुमारास बांधलेले अँग्लीसन ख्राईस्ट चर्चही वेगळ्याच धर्तीचे आहे. आत फक्त प्रवेशदारावरच स्टेंड ग्लास विंडोज आहेत. आल्टर लाकडी कमानींनी सुशोभित केला आहे. आत फोटोंचे अवडंबर नाही, पण भिंतींवर इथे झालेल्या युद्धांमध्ये कामी आलेल्यांच्या नावे झेंडे व संदेश आहेत.
जिप्सी कोव्ह येथे पोहोचल्यावर खालचा पांढऱ्याशुभ्र वाळूचा किनारा उंचावरून छानच दिसत होता. त्यावर माणसांव्यतिरिक्त मेजालिनिक पेंग्विन्स व स्कीमर बर्ड यांचा मुक्त विहार चालू होता. पुढे लहानमोठे चढ झाल्यावर आम्ही समुद्रातील उंच कडय़ावर असलेल्या श्ॉगरॉक पक्ष्यांच्या कॉलनीकडे गेलो. हे श्ॉग कारमोरांट्ससारखेच दिसतात, पण पांढऱ्याशुभ्र अंगाला काळे पंख व डोक्यावर लहानसा तुरा असतो. दुरून पुष्कळ वेळा जेंटू पेंग्विन्स म्हणून आपली फसगत होते. कपारीवर टर्की व्हल्चर्स आपले लांबरुंद पंख फडफडवत एका कपारीवरून दुसरीकडे उडत होते. मध्येच जेंटू पेंग्विन डीडल डूच्या झुडपातून आमच्याकडे त्रासिक मुद्रेने पाहत होते. हा डोंगरावरचा आसमंत फूटभर उंचीच्या टसीक ग्रास, डीडल डू यांनी भरलेला असल्याने चालताना मध्येच पाय आतमध्ये जायचा. शिवाय टसीक ग्रास टोकदार असल्याने जरा टोचतच होते. यावर नखाएवढी लालपिवळ्या रंगांची फुले आणि हिरवट कमळासारखी दिसणारी वनस्पती होती.
जिप्सी कोव्ह येथून परतल्यावर किनाऱ्यावर फिश तसंच चिप्सचा यथेच्छ समाचार घेऊन सागर किनाऱ्याच्या फेरफटक्यासाठी गेलो. तिथे केल्प्स पक्षी शिंपल्यातले मांस खाण्यासाठी कसे प्रयत्न करतात ते दिसले. समुद्रकिनाराच असल्याने लहानमोठे शंख, शिंपल्या खडकावर चिकटून असतात. हे पक्षी ते ओढून तर काढतातच, पण बरोबर चोच पाण्यात घालून आणखी काही मिळते का ते पाहतात. चोचीत शिंपला पकडल्यावर उंचावर नेऊन तो जमिनीवर टाकतात. एका प्रयत्नात फुटला तर ठीक, नाहीतर शिंपला फुटेपर्यंत हार मानत नाहीत. एक शिंपला खाऊन फस्त झाल्यावर दुसऱ्याच्या शोधात. तीनचार पक्ष्यांची जणू शर्यतच होती. शिंपला फोडण्याचा प्रयत्न सफल होईपर्यंत आपल्या मालावर लक्ष ठेवण्याचे काम मात्र ते चोख बजावत होते.
या गावात त्या काळातले अत्यंत आकर्षक असे गव्हर्नमेंट हाऊस आहे. या टुमदार वास्तूच्या मागच्या बाजूला तीनमजली इमारत आहे. समोरचे गार्डन आणि त्यातली फुलझाडांची रचना, बरोबरीने समोरील अथांग सागर.. हे सगळं चित्रकारांना आव्हान देणारंच. सर्वच घरांसमोर पिवळ्या रंगाच्या फुलांनी नटलेले रेखीव अंगण. मागील बाजूला महायुद्धाच्या काळातला एअर पोर्ट आहे. चिलेहून आठवडय़ात एकदा प्रवासी वाहतूक करणारी लहान विमाने येतात. सतराव्या शतकात सुरू झालेले हॉटेल मालविनाज अगदी मोठय़ा दिमाखात उभे आहे.
फॉकलंड आयलंड्सची भेट ही ड्रेक पार केल्यानंतरचा श्रमपरिहार, तसंच पुढच्या दीर्घ प्रवासासाठी फ्रेश व्हायला उपयुक्त आहे.