– रश्मी माळवी, २०.
रश्मी, फुटवेअरमध्ये कम्फर्ट की स्टाईल निवडायची, असा प्रश्न प्रत्येक मुलीला पडतोच. कित्येकदा स्ट्रीट शॉपिंग करताना रंगीत, स्टाईलिश चपला आपण विकत घेतो, पण बस, गाडीने फिरायचे असेल तर ठीक आहे, दिवसभर चालायचे असेल, तर मात्र या चपला दगा देतात. ब्रँडेड चपलांचंही हे दुखणं आहे. त्यामुळे महागडय़ा चपला घेतल्या की ही समस्या सुटते, असं अजिबात नाही. उलट त्यांची काळजी जास्त घ्यावी लागते. तुझं फिरतीचं काम असेल, तर चप्पल निवडताना त्याच्या सोलकडे जास्त लक्ष दे. सध्या जाडय़ा सोलच्या बॅलरिना मार्केटमध्ये पाहायला मिळतात, त्या तू नक्कीच वापरू शकतेस. आणि बॅलरिनामध्ये स्टाईलची हमी १००% असते. सो नॉट टू वरी.. यशिवाय सध्या उंच सोलच्या रबरी चपला पहायला मिळतात. या चपलांवर स्टड्स, स्टोन्स, गोल्ड-सिल्व्हर टिकल्या, फ्लोरल डिझाईन असतं. या चपला तुझ्या डेनिम किंवा चुडीदार कुर्ता दोन्ही लुक्सवर मॅच होतात. त्यामुळे त्याही घालून बघ. तुला स्पोर्टशूज आवडतं नसतील तर, स्निकर्स वापरून बघ. त्या कम्फर्टेबल तर असतात, पण पाय उबतही नाहीत. बॅलरिनामध्येसुद्धा स्निकर स्टाईल पाहायला मिळते. ती सुद्धा ट्राय कर.
– प्रेरणा नाईक, २५.
प्रेरणा, महत्त्वाचं म्हणजे तू कोणत्या फॅब्रिकचा स्कार्फ निवडते आहेस ते बघ. शिफॉन, जॉर्जेट, सिल्कचा स्कार्फ तुला हेव्ही वाटणार नाही. त्यामुळे गळा आवल्यासारखे वाटत नाही. सगळ्यात सोपं म्हणजे मानेभोवती स्कार्फ घेतल्यावर त्याला खालच्या बाजूने एक अलगत गाठ मार, म्हणजे स्कार्फ उडणारही नाही आणि स्टाईलिशसुद्धा दिसेल. यशिवाय स्कार्फ ओढणीसारखा गळ्याभोवती टाक, नंतर स्कार्फची दोन्ही टोकं पुढे आण. गळ्याभोवतीच वर्तुळ तुला हवं तितकं घट्ट किंवा सूटं सोडू शकतेस. गळ्याभोवती स्कार्फची गाठ बांधून त्याचं एक टोकं पुढे आणि एक मागे टाकून साईड पार्टिशन देऊ शकतेस. स्कार्फला खालच्या बाजूला एकाऐवजी ठरावीक अंतराने दोन गाठी मारून वेगळी स्टाईल करता येईल. गाठीचेही वेगवेगळे प्रकार ट्राय करता येतात. गळ्याभोवती रिबीन गाठ पण छान दिसते. प्रवासात स्कार्फ उडतो, त्यावेळी हवंतर टू स्कार्फ बॅगेच्या हँडलला बांधून ठेवू शकतेस, ते ही एक स्टाईल स्टेटमेंट असतं. नंतर इच्छितस्थळी पोहचल्यावर स्कार्फ गळ्यात घाल. एक वेगळा प्रयोग म्हणून स्कार्फ डेनिमला बेल्टच्या जागी बांधून बघ. अर्थात तेव्हा तुझा टय़ुनिक छोटा असला पाहिजे.
आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत