हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपल्याकडे सिनेमात हिरो आणि हिरोइन यांची पेअरिंग करेक्ट असली की पिक्चर हिट, असं समजलं जातं. कपडय़ांचं पण तसंच आहे. अॅक्सेसरीज आणि कपडे याचं पेअरिंग जुळलं की लूक हिट होतोच. पूर्वी स्टायलिश दिसायचं, चारचौघांत मिरवायचं तर फक्त छान कपडे असले की बास, ‘हे पुरेसं आहे..’ असं म्हटलं जायचं. फारतर रोज कॉलेज किंवा ऑफिसला जायला एक बॅग, एक चप्पल आणि समारंभांसाठी एक बॅग, एक चप्पल इतकंच काय कौतुक असायचं. पण आता ‘एका बॅगेवर कुणाचं भागतंय? आपल्याला व्हरायटी लागते बॉस..’ वेगवेगळ्या रंगाच्या, स्टाइलच्या कपडय़ांवर वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स, शूज, नेकलेसेस, बॅन्गल्स, इअररिंग्स आपल्याला लागतात. आणि ते गरजेचं पण असतं. पण कधी काय घालायचं, हा प्रश्न नेहमीच असतो ना. कित्येकदा कपडय़ांवर आपण चुकीच्या अॅक्सेसरीज घालतो आणि आपलीच फसगत होते. त्यात आपल्या घरचे ‘बडे लोग’ याने काय फरक पडतो असं तोंड करतात. ‘पर फर्क पडता है.’ आणि त्यांना पटवून द्यायचं असेल तर फक्त त्यांना विचारा, ‘कधी चुकून पावभाजीच्या भाजीत पावभाजीऐवजी चाट मसाला पडला तर, चालेल का?’ अॅक्सेसरीजचं पण तसंच असतं. योग्य कपडय़ांवर योग्य अॅक्सेसरीज घालणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आज आपण याचबाबत थोडं बोलूयात. आणि मुलांनो ‘यात आपलं काम नाही’, असं म्हणून हात झटकू नका, तुम्हालाही हे जाणून घेणं गरजेचं आहे.
सुरुवात करूयात शूजपासून. कारण घरातून बाहेर पडताना इतर काही नसलं तरी शूज तुमच्याकडे नक्की असतात. आणि दर वेळी आपण गोंधळतो, ‘हिल्स कधी घालायच्या आणि फ्लॅट्स?’ सर्वात प्रथम एक साधा रूल पाळा. हिल्स प्रवासात कधीच वापरू नयेत आणि त्यातही जर रोज तुम्हाला ट्रेन आणि बसचे धक्के खात कॉलेज किंवा ऑफिस गाठायचं असेल तर अजिबातच नाही. कारण, या धावपळीत आपल्या बुटांच्या हिल्सची असमान झीज होते आणि मग अडखळणं, हिल्स तुटणं, पाय मुरगळणं अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं. खास करून पेन्सिल हिल्स. या हिल्स अशा वेळी बहुतेकदा दगा देतात. तुम्हाला कदाचित माहात नसेल, पण हिल्स शूज मुलींसाठी नसतातच. हे शूज पहिल्यांदा बनवले गेले पुरुषांसाठी आणि ते पण पर्शियन घोडेस्वारांसाठी. त्यांचे घोडय़ाच्या रिकिबीत पाय नीट बसावेत म्हणून. तिथून ते मुलींपर्यंत पोहोचले. असोत. पण प्रवासात फ्लॅट बॅलरीनाज, चप्पल्स, स्निकर्स किंवा गरज असेलच तर हिल्समध्ये वेजेस घालणं कधीही योग्यच. शक्यतो तुमच्या पार्टीवेअर ड्रेसेसवर हिल्स घालणं कधीही उत्तम. तसंच स्किनी जीन्स आणि शॉर्ट स्कर्ट्सवर हिल्स उत्तम. जर तुमची उंची कमी असेल तर, ‘टी-स्ट्राइप’ हिल्स घालू नका. त्याने उंची अजून कमी दिसते. ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी ‘प्लॅटफॉर्म’ हिल्स घालाव्यात जेणेकरून बॅलेन्स सांभाळता येतो. ‘पॉइंटेड’ हिल्स फॉरमल वेअरवर घालणेच योग्य. फ्लॅट्समध्ये कॅज्युअल लुक हवा असेल तर बॅलरीनाज आणि स्पोर्टी लूकसाठी स्निकर्स उत्तम. पण पार्टीवेअर ड्रेसवर फ्लॅट्स घातलंस तर ड्रेसचा लूक जातो. बॅकपेक्षा न्यूड शेड, ग्रे, पेस्टल शेड्स शूज निवडा. बहुतेक ड्रेसवर ते मॅच होतात. एक ब्राऊन, गोल्डन आणि लाल रंगाची हिल्स तुमच्याकडे असणं कधीही उत्तम. मुलांनीसुद्धा स्निकर्स शॉर्ट्स, बर्मुडाज किंवा जीन्सवर घालाव्यात. ट्राऊझर्सवर शूज उत्तम. चप्पल्स घालणं टाळाच. पण सध्या स्टायलिश कोल्हापुरी स्टाइल चप्पल्स येतात, त्या मात्र तुम्ही कुर्त्यांवर घालू शकता.
आता विचार बॅग्सचा. तुमचा ड्रेस जितका असेल तितकी तुमची बॅग मोठी असेल तर उत्तम. टोट, मॅसेंजर किंवा स्ट्रक्चर बॅग वापरू शकता. मिनी स्कर्ट, वन पीस ड्रेस, शॉर्ट्सवर स्लींज, क्लच, सॅडल बॅग उत्तम. खरं तर जीन्स व्हर्सटाईल असते, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स, शूजच्या कॉम्बिनेशन्स त्याच्यासोबत तुम्ही ट्राय करू शकता. पण सोबत तुम्ही कोणता टय़ुनिक घालताय हे पाहणं गरजेचं आहे. प्रिंटेड बॅग्स युनिव्हर्सल असतात. कोणत्याही शेड्सबरोबर त्या सहज मॅच होतात. पण शक्यतो बॅग आणि तुमच्या कपडय़ांचा कलर कॉन्ट्रास असू द्यात. मुलांसाठी पण आजकाल टोटपासून ते मॅसेंजर किवा स्ट्रक्चर बॅगपर्यंत वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे नेहमीची बॅगपॅक वापरण्याऐवजी या बॅग्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता. स्पेशली ऑफिसला जाताना या बॅग्स छान इम्प्रेशन देतात आणि तुम्ही तुमच्या लूकबद्दल जागरूक आहात हे दाखवतात.
तुमचा ड्रेस जर न्युट्रल शेड्स, सिंगल कलर किंवा सटल प्रिंट्सचा असेल तरच अॅक्सेसरीजचा विचार करा. आधीच ड्रेस एम्ब्रॉयडरी, हेवी प्रिंट्सनी भरला असेल तर अजून हेवी ज्वेलरीची गरज नसते. ज्वेलरीची मजा थोडक्यातच असते. रोजच्या वापरात इअररिंग्स, नेकलेस, बॅन्गल्स सगळंच एकत्र घालायचा अट्टहास नका करू. सिंगल फोकस ठेवा. इअररिंग्ससोबत छान कडं घालू शकता. जर टी-शर्ट किंवा बोट नेक ड्रेस असेल तर स्कार्फ घालू शकता. स्कार्फ घालतानाही तुमच्या ड्रेसचा गळा कसा आहे हे आधी बघून घ्या. कॉलर नेकवर हेवी सिल्क स्कार्फ घेतला तर गळफास लावल्यासारखं दिसतं ते. त्यामुळे कॉलर नेकवर स्कार्फ नकोच आणि हवाच असेल तर जॉर्जेटचा स्कार्फ वापरू शकता. बोटनेक, व्हीनेक किंवा डीपनेक कुर्ता किंवा ड्रेसवर स्कार्फ छान दिसतात. नेकलेससाठी पण हाच नियम लागू पडतो. हेवी नेकलेस बोटनेक, व्हीनेक किंवा डीपनेक कुर्ता किंवा ड्रेसवर छान दिसतात. कॉलर नेकवर तुम्ही पेन्डेंट्स वापरू शकता. शर्ट कॉलर असल्यास गळ्यात नेकलेस घालण्याऐवजी कॉलरच्या आत नेकलेस घालता येतो. तुमच्या ड्रेसच्या स्लिव्हस जितक्या छोटय़ा तितक्या जास्त बॅन्गल्स तुम्ही घालू शकता. स्लिव्हलेस ड्रेससोबत बॅन्गल्स छान दिसतात. सध्या उन्हाळा आहे तर हॅट्स मस्ट आहेत, पण तुमच्या ड्रेसच्या लूकप्रमाणे हॅट निवडा. जेणेकरून तुमच्या लुकला धक्का पोहोचणार नाही. कधी कधी चुकीची हॅट घालून आपण लूक बिघडवतो.
मुलांच्या अॅक्सेसरीजमध्ये पण आजकाल खूप व्हारायटी पाहायला मिळते. त्यामुळे तुम्हीसुद्धा, इअर स्टड, पेन्डेंट, ब्रोच ट्राय करायला हरकत नाही. जॅकेट्सवर ब्रोचेस मस्त दिसतात. फंकी लुक असो किंवा एलिगंट वेगवेगळ्या ब्रोचेसनी तुमचा लुक हटके आणि स्पेशल दिसतो.
मुलं असोत किंवा मुली, दोघांसाठी मस्ट हॅव असणारी आणि अडचणीत तुमच्या मदतीला धावून येणारी अॅक्सेसरी म्हणजे बेल्ट. मुली शर्ट किंवा टय़ुनिक जीन्समध्ये ‘इन’ करून छान मोठा बेल्ट मिरवू शकतात. ड्रेसवर पण बेल्टनी वेगळा लुक मिळतो. मुलांसाठी तर बेल्ट ऑल टाईम हिट आहे. त्यामुळे ही एक अॅक्सेसरी आहे जिच्याकडे तुम्ही कधीच दुर्लक्ष करू शकत नाही.
थोडक्यात काय ‘खाने में जैसा सही तडका जरुरी है, वैसेही सही कपडों के साथ सही अॅक्सेसरी होना जरुरी है.’