आधीच फॅशन करण्याबाबत जागरूक असणाऱ्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी आणि त्यातही फॅशनच्या दुनियेत कशाला काय म्हणतात याबाबत बरोबर माहिती असणाऱ्यांची संख्या आणखी कमी. त्यामुळे
‘नावात काय आहे?’ असा विचार शेक्सपिअरने केला आणि सध्या हा विचार कोणाला किती पचनी पडतो हा खरा प्रश्न आहे. कारण आजच्या घडीला कोणी आपलं नावं जरी चुकीचं घेतलं तर त्या बिचाऱ्याला एक मोठं लेक्चर ऐकायला मिळणार हे नक्की. फॅशनच्या बाबतीतसुद्धा हा नियम लागू पडतो. एकतर हे फॅशनचं खूळ मूळचं फ्रान्सचं. फ्रेंच लोक त्यांच्या उच्चारांबाबतच मुळातच किती जागरूक असतात याबद्दल कितीतरी किस्से प्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते लोक जेव्हा फॅशनबद्दल बोलतात तेव्हा हीच (अति)जागरूकता दिसून येते. आपल्याकडे मेदू वडय़ाला मेंदू वडा म्हटलं तरी वेटर डिश आणून देतो. त्यामुळे आपल्याला तसा काही फरक पडत नाही. पण फॅशनच्या नावांबद्दल काही गमती आहेत, कित्येक गोष्टींना आपण आपल्याच नकळत
सुरुवात करूया तुमच्या-आमच्या आवडत्या ‘टॉप्स’पासून. कॉलेजची तरुणी असोत किंवा ऑफिसला जाणारी युवती शॉपिंगची लिस्ट काढली की पहिलं नाव येतं टॉप्सचं. एकदा डेनिम घेतली की, किती टॉप्स घ्यायचे हा हिशोब आपण लावायला लागतो. पण जर तुम्हाला कळलं की टॉप्स हा शब्दच फॅशनमध्ये नाही उलट ज्या कपडय़ांना आपण टॉप्स म्हणतो त्यांना या नावाने संबोधणे म्हणजे घोर पापच आहे. का? तर आधी ‘टॉप’ या शब्दाचा अर्थ काय ते सांगा पाहू. इंग्रजीमध्ये टॉप म्हणजे ‘वरची बाजू’. शरीराच्या दृष्टीने पाहायचं झालं तर ‘शरीराचा वरचा भाग’. म्हणजे दरवेळी आपण जेव्हा ‘टॉप्स खरेदी करायचे आहेत’ असं म्हणतो तेव्हा आपल्या म्हणण्याचा शब्दश अर्थ ‘शरीराचा वरचा भाग’ विकत घ्यायचाय असा होतो. असंच तुम्हाला म्हणायचं असतं का? नाही ना.. आपल्या बोलीभाषेतील टॉप्सना फॅशनच्या भाषेत खूप वेगवेगळी नावं आहेत. शक्यतो त्यांना ‘टय़ुनिक्स’ म्हटलं जातं. पण शक्यतो शॉर्ट लेन्थच्या टय़ुनिक्सना टीशर्ट किंवा शर्ट्स म्हणतात. टय़ुनिक्स साधारणपणे गुडग्यापर्यंतच्या उंचीचे असतात. कुर्तीज हासुद्धा टय़ुनिकचाच एक प्रकार.
तुमची लाडकी डेनिम किंवा ट्राऊझर याच गोष्टीची शिकार आहे. डेनिम विकत घेताना तुम्ही काय म्हणता? ‘मला ना जीन्स घ्यायची आहे.’ किंवा ‘एक पँट घ्यायची आहे.’ बरोबर ना! आता यात आपलं काय चुकतं हे मी सांगत नाही. तुम्हीच ओळखा. मूळात डेनिम हा एक पेहरावाचा प्रकार नसून तो एका कपडय़ाचा प्रकार आहे. त्यामुळे डेनिम घेणं म्हणजे डेनिम हा कपडा विकत घेणं. त्यातही अनेक जण डेनिम विकत घ्यायची आहे असं म्हणतात ते काही चूक नाही. पण ते कोणत्या संदर्भात बोलतो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एक तर तुम्ही ‘वन पेअर ऑफ डेनिम’ असं म्हणा किंवा ‘एक जीन्स पँट’ असं म्हणू शकता. असं का तर, एक डेनिम म्हणजे फक्त एका पायात घालण्यापुरता भाग आणि आपल्याला पाय असतात दोन. त्यामुळे आपल्याला दोन डेनिम लागतील. म्हणजेच एक जोड किंवा एक पेअर. म्हणून पेअर ऑफ डेनिम बोलण्यात येतं. तसंच पँट म्हटल्यावर जोडी हाच अर्थ अपेक्षित असतो. त्यामुळे एक पँट म्हणणं पण बरोबर ठरतं.
कित्येकदा जॅकेट्स, श्रग्स, कोट्स यातही आपण गोंधळ करतो. श्रग्स हे जर्सी कापडाचे असतात आणि त्याचं काम फक्त स्टाइल म्हणून असतं. तर जॅकेट्स हे डेनिम, लेदर कापडांचे असतात. कोट्स, ब्लेझर वुलन कापडाचे असतात, पण ब्लेझर कोट्सपेक्षा जरा पातळ असतात. त्यामूळे कोट्स शक्यतो थंडीत बाहेर जाताना वापरतात.
हाच घोळ आपण पर्स आणि बॅगमध्ये करतो. मुळात पर्स हा फॅशनसाठी मिडल क्लास शब्द आहे. त्यामुळे तो उच्चारणे महापापच. पण त्यातही तुम्ही थोडय़ा मोठय़ा आकाराच्या हँडबॅग्सना पर्स म्हणू शकता. हँडबॅग्समध्ये स्लिंज, टोट असे प्रकार आहेत. पण जरी हँडबॅगचा प्रकार माहीत नसेल तरी त्यांना पर्स म्हणणे टाळाच. (त्यातही आपण लेडीज व्हॉलेट्सना पण पर्सच म्हणतो.)
मुलींनो आता सांगा, शूजमधील हिल्सचा प्रकार तुम्हाला आवडतच असेल. पण समजा, तुमच्यासमोर चार वेगवेगळ्या प्रकारच्या हिल्स ठेवल्या तर तुम्ही त्यांची नक्की नावे सांगू शकाल का? नाही ना? हिल्स इज द हिल्स, त्यात काय वेगळं असतं? हाच विचार कित्येकजण करतात. पण असं नाही आहे. प्रत्येक हिलला वेगवेगळं नाव असतं. पेन्सिलसारख्या निमुळत्या हिल्सच्या सँडल्सना ‘पॅटफॉर्म हिल्स’ म्हणतात तर, वेजेस हिल्स बऱ्यापैकी जाडय़ा असतात. आणि १-२ इंचाच्या हिल्सना ‘किटन हिल्स’ म्हणतात. याखेरीजही हिल्सचे काही वेगवेगळे प्रकार आहेत.
सर्वात मोठा घोळ आपण करतो ते डिझाइनर कपडय़ांबाबत. आपण कपडे ब्रॅण्डचे घेतले आहेत की डिझायनरचे यात कित्येकजण घोळ करतात. डिझाइनर कपडय़ांवर त्या डिझाइनरचं नाव असतं. अनिता डोंगरे ही डिझाइनर असली तरी तिच्या नावाने येणारे कलेक्शन आणि ‘ग्लोबल देसी’ या तिच्या ब्रॅण्डचं कलेक्शन वेगळं असतं. त्यामुळे दरवेळी प्रत्येक गोष्ट ब्रॅण्डच्या नावाने खपवू नका.
आता आपण काही ब्रॅण्डच्या नावाची उदाहरणं घेऊयात. फॅशनच्या जगतात CHANEL हा ब्रॅण्ड सर्वात जुना आणि नावाजलेला आहे. पण आपण या फ्रेंच ब्रॅण्डचे नाव अनेकदा चुकीचे घेतो. इंग्रजीत जरी ‘चॅनल’ असा त्याचा उच्चार होतं असेल तरी त्याचा खरा फ्रेंच उच्चार ‘शनेल’ असा आहे. तीच गल्लत DIOR या ब्रॅण्डच्या नावाबरोबर होते. त्याचा उच्चर ‘डिओर’ नसून ‘दिओर’ असा आहे. थोडक्यात, थोडंसं सांभाळून घेतल्यास आपणही अशा छोटय़ा छोटय़ा चुका नक्कीच सुधारू शकतो.