मला जॅकेट्स, श्रग घालायला आवडतात, पण आपल्याकडे उष्ण वातावरण असल्यामुळे असे कपडे घातल्याने गरम होतं. अशा वेळी काही करता येईल का? तसंच जॅकेट्स, श्रग वेगवेगळ्या कपडय़ांवर घालता यावेत म्हणून काळा, पांढरा, राखाडी, नेव्ही अशा मर्यादित रंगांत घेतले जातात. वेगवेगळ्या रंगांच्या जॅकेट्स, श्रगसोबत स्टायलिंग कसं करता येईल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

– मनीषा नाईक, २४.

मनीषा कपडय़ांमध्ये लेअरिंग दिसायला मस्त दिसतंच, पण त्यामुळे तुम्हाला कपडय़ांचे पर्यायसुद्धा मिळतात. अर्थात तू म्हणतेस त्याप्रमाणे आपल्याकडे उष्ण वातावरण असल्याने आपल्याला लेअरिंगचे फारसे पर्याय मिळत नाहीत. पण म्हणून लेअरिंग करताच येत नाही असं मुळीच नाही. श्रग तर आपल्याकडच्या वातावरणाला उत्तम आहेत. नेट, लेस कापडाचे श्रग तू नक्की वापर. कॉटन टॉप, लूझ गंजी, टी-शर्ट्सवर हे श्रग मस्त दिसतात. जॅकेट्स म्हटल्यावर लेदर, डेनिम अशा जाड कापडाचे जॅकेट्स डोळ्यासमोर येतात. पण सध्या कॉटनचे प्रिंटेड जॅकेट्स बाजारात आले आहेत. ते सध्या, प्लेन टी-शर्टवरसुद्धा छान दिसतात. ओव्हरसाइज शर्ट्स जॅकेट्ससाठी उत्तम पर्याय आहेत. जॅकेट्सप्रमाणे तेही टॉपपासून वन पीस ड्रेसपर्यंत सगळ्यावर घालता येतात. त्यामुळे ते तुझ्या वॉर्डरोबमध्ये असू देत. शॉर्ट जॅकेट्ससुद्धा अशा वेळी तू वापरू शकतेस. तू म्हटल्याप्रमाणे या जॅकेट्स, श्रगची निवड करताना आपण बेसिक रंगच निवडतो. पण कॉन्ट्रास्ट ड्रेसिंगचं गणित लक्षात ठेवलंस तर वेगवेगळ्या रंगांचे श्रग तुला घालता येतील. तसेच प्रिंटेड जॅकेट्स कधीही उत्तम. ते वेगवेगळ्या स्टाइलच्या कपडय़ांवर उठून दिसतात.

एरवी हँडबॅग निवडताना आकार आणि रंग यापलीकडे फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे कित्येकदा छोटय़ा दिसणाऱ्या हँडबॅगसुद्धा वापरताना जड वाटतात. त्यामुळे हँडबॅग निवडताना कोणती काळजी घ्यावी?
 – यशोधरा पाटील, २३.

प्रत्येक स्त्रीला तिची हँडबॅग लाडकी असते. अगदी छोटय़ाशा पिनेपासून ते गरजेला लागणाऱ्या स्कार्फपर्यंत वेगवेगळ्या वस्तू या हँडबॅगमध्ये सामावलेल्या असतात. त्यामुळे यशोधरा तू म्हणतेस तसंच नवीन हँडबॅग घेताना तिचा आकार आणि रंग याकडे आपण सगळ्यात आधी लक्ष देतो. त्यानंतर तिच्या लुककडे लक्ष जातं. पण हँडबॅग खरेदी करताना यापलीकडे अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. सगळ्यात आधी ही हँडबॅग तू डाव्या खांद्यावर घेणार की उजव्या हे तपासून घे. त्यानुसार हँडबॅगची चेन तुझ्या हाताजवळ असली पाहिजे. ती मागच्या बाजूस गेली तर प्रत्येक वेळी बॅगेतून काही काढताना कसरत करावी लागते. त्याशिवाय ट्रेन किंवा गर्दीतून प्रवास करताना मागच्या मागे गोष्टी लंपास होण्याची शक्यता ही असतेच. तसंच चेन उलटय़ा बाजूला गेली म्हणजे हँडबॅगची मुख्य डिझाइन लपली जाते. त्यामुळे ही दक्षता पहिल्यांदा घे. दुसरं म्हणजे हँडबॅग घेण्याची पद्धत आणि हँडलचा आकार याकडे लक्ष दे. तू खांद्यावर हँडबॅग घेणार असशील तर हँडल मोठं असलेलं उत्तम. त्यामुळे काखेत घाम जमा होत नाही. अति लांब हँडल असलेल्या बॅगेत जास्त सामान भरल्यास खांदा दुखू शकतो. तसेच हे हँडल्स हलके असल्याने तुटायची शक्यताही असते. कित्येकदा मेटल हँडल्सच्या हँडबॅग वापरायच्या दृष्टीने सोयीच्या नसतात. तुझी गरज आणि बॅगेतील कप्प्यांची संख्यादेखील नीट तपास. कित्येकदा बॅगेला आपल्या गरजेपेक्षा कमी कप्पे असतात. मग वापरताना पंचाईत होते.

आवाहन

फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.

मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com