सत्यजित रे यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या फेलुदाच्या रहस्यकथा मुलांनाच नव्हे, तर मोठय़ांनाही भुरळ पाडणाऱ्या आहेत. रोहन प्रकाशनने मराठीत आणलेल्या फेलुदा कथांविषयी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एके काळची मराठी मुलं जशी भा. रा. भागवतांचा काहीही झालं की ट्टॉक म्हणणारा फास्टर फेणेच्या साहसकथा वाचत मोठी झाली तशीच बंगाली मुलं सुप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांचा फेलुदा आणि त्याच्या रहस्यकथा वाचत मोठी झाली. सत्यजित रे यांचे सिनेमे जसे वेगळे, खिळवून ठेवणारे तसाच त्यांचा फेलुदाही. फेलुदाच्या बारा कथा असलेल्या ‘फॅण्टॅस्टिक फेलुदा रहस्यकथा’ हा चार पुस्तकांचा संच रोहन प्रकाशनने नुकताच प्रसिद्ध केला आहे. नुकतेच दिवंगत झालेले प्रसिद्ध पत्रकार अशोक जैन यांनी तो इंग्रजीतून अनुवादित केला आहे. सत्यजित रे यांनी एकूण ३५ फेलुदाकथा लिहिल्या आहेत. या संचातल्या कथा या फेलुदाच्या गुप्तहेर बनण्याच्या प्रवासातल्या सुरुवातीच्या काळातल्या कथा आहेत. कुमारवयीन मुलांसाठी असलेल्या या कथा वाचताना मोठी माणसंही आपलं प्रौढपण विसरून लहानांहून लहान होऊन जाऊ शकतात एवढी ताकद या कथांमध्ये आहे.
या रहस्यकथांचा नायक आहे, फेलुदा म्हणजे प्रदोष चंद्र मित्तिर आणि त्याचा चुलतभाऊ कम साहाय्यक तपेश किंवा तोपशे हा नेहमी त्याच्याबरोबर असतो. फेलुदा हा अतिशय बुद्धिमान, साहसी असा गुप्तहेर. त्याची स्मरणशक्ती अफाट आहे. त्याची निरीक्षणशक्ती अफलातून आहे. त्याला टायमिंगचं अचूक भान आहे. कोणती गोष्ट कधी करावी, कधी करू नये, कुणाशी काय बोलावं, काय बोलू नये, कोण कधी कसा वागू शकतो, काय करू शकतो या सगळ्याचं त्याला अचूक ज्ञान आहे. आपल्या या गुणांच्या आधारे तो कोणत्याही गुन्ह्यचा अचूक तपास करू शकतो. त्याचा आदर्श आहे शेरलॉक होम्स. शेरलॉक होम्सप्रमाणे फेलुदाही असंच मानतो की, निरीक्षण आणि लहानलहान तपशील लक्षात घेतल्याशिवाय कोणीही गुप्तहेर असल्याचा दावा करू शकत नाही आणि आपल्या या अफाट निरीक्षण- शक्तीच्या जोरावर आणि हुशारीच्या बळावर तो गुन्ह्यचं रहस्य असं काही उकलतो की बस..
शेरलॉक होम्सच्या कथा ज्याप्रमाणे आपल्याला त्याचा सहकारी डॉ. वाटसन सांगतो त्याप्रमाणे फेलुदाच्या गोष्टी आपल्याला त्याचा साहाय्यक कम चुलतभाऊ तोपशे सांगतो. फेलुदा आणि तोपशे या जोडगोळीबरोबर नेहमी लालमोहन गांगुलीही असतात. या कथांमध्ये लालमोहन गांगुली हे जटायू या नावाने रहस्यकथा लिहिणारे लेखक आहेत आणि समाजामध्ये त्यांच्या रहस्यकथा अतिशय लोकप्रिय आहेत. प्रत्यक्षात लालमोहनबाबू मात्र काहीसे भित्रे, धांदरट वाटावेत असे आहेत. त्यांना फेलुदा आणि तोपशेबरोबर सगळीकडे फिरायचं असतं, कारण फेलुदाच्या कामातून त्यांना त्यांच्या रहस्यकथांचा मालमसाला मिळतो. ते बरोबर आल्यामुळे सगळीकडे फिरण्यासाठी त्यांची कार उपलब्ध होते हा फेलुदा आणि तोपशेचा फायदा. अर्थात तेवढाच फायदा म्हणून ते लालमोहनबाबूंना सोबत घेतात असं नाही, तर या त्रिकुटाचा खरोखरच एकमेकांवर जीव आहे. सिधूकाका हीदेखील आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा. हे सिधूकाका फेलुदाला नेहमी त्याला हव्या असलेल्या गोष्टींचा अचूक संदर्भ पुरवतात, कारण त्यांच्याकडे सर्व वर्तमानपत्रांची कात्रणे आहेत आणि मुख्य म्हणजे त्या कात्रणांमध्ये काय काय आहे, हे तल्लख स्मरणशक्तीमुळे त्यांच्या चांगलेच लक्षात आहे.
फेलुदा, तोपशे आणि लालमोहनबाबू हे त्रिकूट सतत एखाद्या रहस्याच्या तपासाच्या मागे आहे. एक तर लोक त्यांना बोलावून एखादं रहस्य उलगडण्यासाठी त्यांची मदत मागतात किंवा हे तिघं आपोआपच अशा ठिकाणी पोहोचतात जिथे काही तरी गुन्हा घडतो आणि यांची मदत मागितली जाते. मग त्या गुन्ह्यमागच्या रहस्याच्या तपासासाठी फेलुदा वेगवेगळी माहिती जमवायला लागतो. तोपशे आणि लालमोहनबाबू त्या कामात त्याला आपल्या परीने मदत करतात; पण शेवटी फेलुदा त्या रहस्याची उकल कशी करतो याचा वाचकांप्रमाणे त्यांनाही आधी अंदाज येत नाही. एखादं रहस्य उलगडण्याच्या या प्रक्रियेत मग एखाद्या ठिकाणची अगदी हाँगकाँगचीदेखील सफर, वेगवेगळ्या लोकांना भेटणं, त्यांच्याकडून मिळणारी विविध प्रकारची माहिती या सगळ्यात आपणही गुंतून जातो. फेलुदाच्या कथांमधला काळ हा साठ ते ऐंशीच्या दशकातला आहे, पण गंमत म्हणजे यातली कुठलीही कथा वाचताना आपण सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वीच्या कथा वाचतो आहोत असं वाटत नाही. इतका ताजेपणा त्या कथांमध्ये आहे. यामागचं कारण यातल्या मानवी व्यक्तिरेखांमध्ये असलेलं कालातीत राहण्याचं सामथ्र्य असं म्हणता येईल. अर्थात या व्यक्तिरेखांचं हे सामथ्र्य हे लेखकाचं सामथ्र्य आहे.
फेलुदाच्या कथांमधली एक गंमत म्हणजे प्रत्येक कथानकामध्ये एक तरी व्यक्तिरेखा ऐतिहासिक चीजा, किमती वस्तू किंवा टपाल तिकिटं अशी कशाची तरी संग्राहक आहे. प्रत्येक कथानकामध्ये येणारे पोलीस इतर गुप्तहेर कथांमधले पोलीस त्या त्या गुप्तहेराचा करतात तसा फेलुदाचा दुस्वास करत नाहीत. उलट ते फेलुदाचं कौशल्य, त्याची बुद्धिमत्ता जाणणारे, त्याच्या या गुणांची कदर करणारे आहेत. फेलुदाच्या या गोष्टी एखादी घटना घडवतात, तिच्यामागचं रहस्य ताणून धरत, गडद करत वाढवत नेतात आणि मग एखाद्या शल्यविशारदाच्या कौशल्याने फेलुदा त्यातली गुंतागुंत हळुवारपणे सोडवून दाखवतो. ते वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की, अरे, हा क्ल्यू आपल्या आधीच कसा लक्षात नाही आला.. त्यामुळे एखाद्या बुद्धिमान माणसाच्या बुद्धीचे वेगवेगळे पैलू उलगडत जावेत तसा फेलुदा आपल्यासमोर वेगवेगळ्या गोष्टींमधून उलगडत जातो. टीव्हीवरच्या भडक, बटबटीत गुन्हेविषयक मालिका कुमारवयीन मुलं बघत असतातच, त्यांची फेलुदाशी कधीच तुलना होऊ शकत नाही, पण त्या अभिरुचीचा अपरिहार्यपणे भाग बनून वाढत असलेल्या आजच्या मुलांनापण आपल्या आसपासच्या व्यक्तिरेखा, निसर्ग, आसपासचा परिसर यांच्यासह भेटणारा फेलुदा अधिक खरा आणि जिवंत वाटेल.
‘चालत्या प्रेताचं गूढ’ या कथासंग्रहात ‘कुलूपबंद पेटी’, ‘चालत्या प्रेताचं गूढ’ तसंच ‘रहस्यमय भाडेकरू’ या तीन कथा आहेत. त्यात ‘कुलूपबंद पेटीचं गूढ’ या कथेत कालीकिंकर नावाचे वृद्ध गृहस्थ फेलुदाला बोलावून घेतात आणि त्यांच्याकडच्या एका पेटीचा कोडवर्ड सोडवायला सांगतात. हा कोडवर्ड एका वाक्यात गुंफलेला असतो आणि त्या वाक्याचा अर्थ लावून तो सोडवायचा असतो. मुख्य म्हणजे तो सोडवल्याच्या बदल्यात फेलुदाला त्यांच्याकडची रहस्याच्या तपासासंदर्भातली जुनी, महत्त्वाची पुस्तकं द्यायचं ते कबूल करतात. फेलुदाने तो कोडवर्ड शोधायच्या आतच कालीकिंकर बाबूंचा खून होतो आणि मग तो कोडवर्ड आणि त्यांच्या खुनाचं गूढ या दोन्ही गोष्टी फेलुदा शोधून काढतो. ‘चालत्या प्रेताचं गूढ’ या कथेत फेलुदा जीवनलाल मलिक यांच्या वडिलांच्या खुनाचं रहस्य तर शोधून काढतोच, शिवाय आत्म्यांशी बोलण्याचा दावा करणाऱ्यांचे बुरखेही फाडून काढतो, तर ‘रहस्यमय भाडेकरू’ या कथेत निहार दत्ता हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांना प्रयोगशाळेत काम करताना अपघात होऊन अंधत्व आलंय. त्यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झालाय. तो शोध घेण्यासाठी फेलुदा तिथे गेलेला असतानाच निहार दत्ता यांच्या संशोधनाची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत. शिवाय तिथे राहणाऱ्या दोनपैकी एका भाडेकरूचा खून झालाय. त्याचा तपास फेलुदा लीलया कसा लावतो ते वाचायला मिळतं.
‘टिंटोरेट्टोचा येशू’ या कथासंग्रहात ‘नेपोलियनचं पत्र’ नावाची एकदम मस्त कथा आहे. या कथेत पार्वतचरण हे जुन्या वस्तूंचे संग्राहक आहेत. त्यांचा छोटा नातू फेलुदाला बाजारात भेटतो. तो पिटुकला फेलुदाचा चाहता आहे. तो फेलुदाला सांगतो की, त्याच्या घरातल्या पिंजऱ्यातून त्याचा आवडता पोपट गायब झाला आहे आणि फेलुदाने त्या पोपटाचा शोध घ्यावा. त्या लहानग्याची ती विनंती फेलुदाच्या हृदयाला भिडते. त्याच्या मदतीसाठी फेलुदा त्याच्या घरी जातो तेव्हाच त्याच्या आजोबांचा खून होतो आणि त्यांच्या संग्रहातलं नेपोलियनचं दुर्मीळ पत्रंही गायब होतं. पोपट गायब होणं, हा खून आणि दुर्मीळ पत्राची चोरी या तिन्ही घटनांची संगती लावत फेलुदा त्यातलं रहस्य उलगडून दाखवतो. याच संग्रहात असलेल्या ‘टिंटोरेट्टोचा येशू’ या कथेत चित्रकारांची दुनिया आपल्यासमोर उलगडते. चित्रकार चंद्रशेखर यांना जगप्रसिद्ध चित्रकार टिंटोरेट्टोचं एक चित्र भेट मिळालेलं असतं. त्याची किंमत काही लाखांमध्ये असते. चंद्रशेखर यांच्या मुलाचा त्या चित्रावर वारसा हक्क असतो. ते मिळविण्यासाठी तो मुलगा आपल्या चुलत भावाकडे येतो. तेव्हाच घरातल्या म्हाताऱ्या कुत्रीचा खून होतो आणि चित्रही बनावट असल्याचं कळतं. या सगळ्याचा तपास घेत फेलुदा हाँगकाँगला कसा पोहोचतो आणि तपास कसा घेतो याची उत्कंठावर्धक कथा यात आहे.
‘अनुबीसचं रहस्य’ या कथासंग्रहात चार कथा आहेत. त्यात ‘दार्जिलिंगचा धोका’ या कथेत किमती वस्तूंचे संग्राहक राजबाबूंना कुणी तरी धमकीचं पत्र पाठवून घाबरवून सोडत असतं. तर ‘कैलास चौधरींचं रत्न’ या कथेत चौधरींकडे असलेल्या मौल्यवान रत्नाची एका निनावी पत्राद्वारे मागणी केली गेलेली असते. ‘अनुबीसचं रहस्य’ या कथेत किमती वस्तूंचे संग्राहक नीलमणीबाबूंना आलेलं इजिप्शियन चित्रलिपीतलं पत्र, दुसऱ्या संग्राहकाकडची चोरीला गेलेली इजिप्शियन मूर्ती यांचा छडा फेलुदा लावतो, तर ‘किल्ली’ या कथेत तो राधारमण या बुद्धिमान, विक्षिप्त अशा संगीतवाद्य संग्राहकाच्या शेवटच्या शब्दांमागचं गूढ उकलतो. ‘केदारनाथची किमया’ या संग्रहात तीन कथा आहेत. त्यात ‘गायब झालेले अंबर सेन’ या कथेत फेलुदाला हरवून दाखवण्याचा दावा करणाऱ्या, त्यासाठी गायब झालेल्या अंबर सेन यांच्या आयुष्यातलं अनपेक्षित रहस्य फेलुदा उलगडून दाखवतो, तर ‘जहांगीरच्या सुवर्णमुद्रा’ या कथेत फेलुदा शंकरप्रसाद चौधरींकडे असलेल्या आणि चोरीला गेलेल्या तीनपैकी एका सुवर्णमुद्रेची चोरी शोधून काढतो, तर ‘केदारनाथची किमया’ या कथेत फेलुदा केदारनाथ पर्वतातल्या एका संन्याशाकडे असलेल्या रत्नजडित पेंडंटची, त्यातून घडत गेलेल्या घडामोडींची गोष्ट आहे.
या कथा वाचताना जाणवतं की, सत्यजित रे वाचकाला इतक्या विविध ठिकाणी फिरवून आणतात, त्याला इतकं वेगवेगळं जग दाखवतात, इतकी विविध प्रकारची माहिती देतात, की तो फक्त फेलुदाच्याच नाही, तर या कथांच्या भोवती गुंफलेल्या पर्यावरणाच्याही प्रेमात पडतो. या कथा वाचताना राहून राहून असं वाटत राहतं की, शेरलॉक होम्स जसा पडद्यावर आला तसाच फेलुदाही यायला हवा.
‘फॅण्टॅस्टिक फेलुदा रहस्यकथा’
(चार पुस्तकांचा संच)
अनुवाद- अशोक जैन
प्रकाशक- रोहन प्रकाशन
किंमत- ४०० रुपये (पूर्ण संच)