सेसमे हनी टोफू
साहित्य
१५० ग्राम टोफू
१ ते दीड चमचा भाजलेले तीळ
१ मध्यम लाल भोपळी मिरची
१ लहान कांदा
७-८ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ इंच आलं, उभे पातळ काप (मॅचस्टीकसारखे)
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा मध
दीड टिस्पून सोया सॉस
१/२ चमचा व्हिनेगर
चवीपुरते मीठ
तेल
कृती
१) भोपळी मिरचीचे चौकोनी तुकडे करावे. हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी. कांदा उभा पातळ चिरून घ्यावा.
२) टोफूचे मध्यम चौकोनी तुकडे करावे. तव्यावर थोडे तेल घालून टोफू थोडा लालसर करून घ्यावा.
३) कढईत १ चमचा तेल गरम करावे. त्यात लसूण आणि आलं परतावे. नंतर हिरवी मिरची घालावी आणि कांदा परतून घ्यावा. लाल भोपळी मिरची थोडीशी परतावी.
४) सोया सॉस घालून मिक्स करावे. लगेच फ्राइड टोफू घालून मिक्स करावे.
५) चवीपुरते मीठ आणि व्हिनेगर घालावे.
६) भाजलेले तीळ गरजेनुसार मिक्स करावे. आच बंद करून मध घालावे. हलकेच मिक्स करावे. गरमच सव्र्ह करावे.
पनीर सँडविच पकोडा
साहित्य
२०० ग्राम पनीर
तळण्यासाठी तेल
चटणीसाठी :
१ वाटी पुदिना
२ वाटय़ा कोथिंबीर
१ लहान कांदा
४-६ हिरव्या मिरच्या
२ चमचे लिंबाचा रस
१/४ चमचा चाट मसाला
२ चिमटी मिरपूड
चवीपुरते मीठ
कव्हरसाठी :
१ वाटी बेसन
२ चमचे कॉर्न फ्लोअर
१/४ चमचा लाल तिखट
चिमुटभर सोडा
थोडेसे मीठ
कृती
१) पनीरच्या १ सेंमी जाडीच्या चौकोनी कापटय़ा कराव्यात. स्वच्छ कपडय़ावर ठेवून त्यातील पाणी टिपून घ्यावे.
२) चटणीसाठी पुदिना, कोथिंबीर, कांदा, हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस, मिरपूड, चाट मसाला आणि मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक वाटावे. वाटताना पाणी घालू नये.
३) कव्हरसाठी बेसन, कॉर्न फ्लोअर, तिखट, सोडा आणि मीठ घालून मिक्स करावे. पाणी घालून घट्टसर भिजवावे.
४) पनीरचे चौकोन कापून एका कापावर चटणी लावावी. वर दुसरा काप ठेवून सँडविच करावे. अशा प्रकारे सर्व पनीरच्या कापांना चटणी लावून घ्यावे.
५) तेल गरम करावे. भिजवलेल्या पिठात पनीरचे सँडविच बुडवून तेलात सोडावे. गोल्डन होईस्तोवर तळून घ्यावे.
६) पेपरवर काढून ठेवावे. सुरीने तळलेले पकोडे त्रिकोणी आकारात कापावे.
लगेच सव्र्ह करावे.
पनीर अनार कबाब
साहित्य
कव्हरसाठी :
२ बटाटे, उकडलेले
१ लहान कांदा, सोलून
१ लहान चमचा आलं आणि लसूण बारीक चिरून
१ चमचा तेल, पाव चमचा हळद
१ ते २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१/४ चमचा गरम मसाला
१/२ चमचा चाट मसाला
१ चमचा धणे-जीरेपूड
ब्रेड क्रम्ब्ज
चवीपुरते मीठ
सारण :
१ वाटी कुस्करलेले पनीर
२-३ चमचे डाळिंबाचे दाणे
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
१/४ चमचा साखर
किंचित मीठ
ल्ल इतर साहित्य :
थोडे तेल
भाजलेला जाड रवा
कृती
१) बटाटा कुस्करून घ्यावा. कढईत १ चमचा तेल गरम करून त्यात आलं-लसूण, मिरच्या आणि कांदा परतून घ्यावा. कांदा लालसर झाला की हळद, गरम मसाला, चाट मसाला, धणे-जिरेपूड आणि मीठ घालून मिक्स करावे. त्यात कुस्करलेला बटाटा घालून छान एकजीव करावे. हे मिश्रण गार होऊ द्यावे.
२) गार झाल्यावर ३-४ चमचे ब्रेड क्रम्ब्ज घालून मळून घ्यावे.
३) सारणासाठी पनीर, हिरवी मिरची, साखर, मीठ आणि डाळिंबाचे दाणे घालून हलकेच मिक्स करून घ्यावे.
४) बटाटय़ाच्या मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करून घ्यावे. चपटे करून त्यात सारण भरावे. काळजीपूर्वक बंद करावे. थोडे चपटे करून घ्यावे. रव्यामध्ये घोळवून तव्यावर थोडेसे तेल घालून शालो फ्राय करून दोन्ही बाजू खरपूस करून घ्याव्यात.
वैदेही भावे