चिली गार्लिक टोफू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य :
१५० ग्राम टोफू
१ चमचा कॉर्न स्टार्च
४ चमचे तेल
१ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा आले पेस्ट
२ चमचे रेड चिली गार्लिक पेस्ट
१/४ वाटी पाती कांद्याचा हिरवा भाग, बारीक चिरून
१/४ वाटी कांदा, मध्यम आकाराचे तुकडे (कांद्याच्या पाकळ्या विलग करा.)
१/४ वाटी भोपळी मिरची, मध्यम तुकडे
१ चमचा सोयासॉस
१/२ चमचा व्हिनेगर
चवीपुरते मीठ

कृती :
१) टोफू हलक्या हाताने प्रेस करून त्यातील थोडे पाणी काढून टाकावे. खूप जास्त प्रेस करू नये त्यामुळे टोफू कुस्करला जाऊ शकतो. टोफूचे १ इंचाचे तुकडे करावेत. त्यावर कॉर्न स्टार्च भुरभुरावा आणि हलकेच मिक्स करावे.
२) एक मध्यम पॅन घेऊन त्यात १ चमचा तेल घालावे. त्यात टोफू शालोफ्राय करून घ्यावा. सर्व बाजू थोडय़ा ब्राउन करून घ्यावात. शालोफ्राय करून झाले की टोफू प्लेटमध्ये काढून ठेवावा.
३) त्याच पॅनमध्ये अजून १ चमचा तेल घालावे. त्यात आले-लसूण पेस्ट परतावी. सोया सॉस, भोपळी मिरची आणि कांदा घालून एक मिनिटभर परतावे. मीठ घालावे. कांदा आणि भोपळी मिरची क्रिस्पी राहिल्या पाहिजेत.
४) १ चमचा कॉर्न स्टार्च आणि ३ ते ४ चमचे पाणी घालून मिक्स करावे. हे मिश्रण पॅनमध्ये घालावे. चिली गार्लिक पेस्ट आणि व्हिनेगर घालावे. मिक्स करावे.
५) आता शालोफ्राय केलेला टोफू घालावा. हलकेच मिक्स करून मिनिटभर शिजवावे. प्लेटमध्ये सव्‍‌र्ह करावे. सव्‍‌र्ह करताना पाती कांद्याची चिरलेली पात घालून सजवावे.
टिपा :
१) वरील रेसिपी ड्राय टोफूची आहे. थोडी ग्रेव्ही हवी असेल १ चमचा कॉर्न स्टार्च १/२ वाटी पाण्यात घालून मिक्स करावे. चिली गार्लिक पेस्टसोबत हे मिश्रणही घालावे. बाकी सर्व कृती सेम. या ग्रेव्हीबरोबर थोडा साधा पांढरा भातही सव्‍‌र्ह करू शकतो.

टोफू फ्राइड राइस

साहित्य :
दीड वाटी जस्मिन राइस
३ चमचे तेल
३ ते ४ मोठय़ा लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा सोयासॉस
१ चमचा चिंचेचा कोळ
१ चमचा साखर
१/२ वाटी भोपळी मिरची (उभी चिरलेली)
१/२ वाटी कांदा (पातळ उभा चिरलेला)
१ वाटी भरून टोफू (१ इंच चौकोनी तुकडे)
३/४ वाटी बेसिलची पाने
१ लहान गाजर (चौकोनी तुकडे)
१/४ वाटी मटार (ऐच्छिक)
चवीपुरते मीठ

कृती :
१) जस्मिन राइस धुऊन घ्यावा. अडीच वाटय़ा पाणी गरम करावे त्यात थोडे मीठ घालावे. पाणी उकळले की त्यात धुतलेला जस्मिन राइस घालून गॅस मध्यम करावा. वर झाकण ठेवून भात मोकळा शिजवून घ्यावा.
२) टोफूचे तुकडे कमी तेलावर शालोफ्राय करून घ्यावेत.
३) लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात. तेल गरम करून त्यात लसूण मिरचीचे वाटण घालून परतावे नंतर गाजराचे तुकडे घालून ३० सेकंद परतावे.
४) त्यात भोपळी मिरची, कांदा घालून फक्त १० सेकंद परतावे. कांदा आणि भोपळी मिरचीचा करकरीतपणा तसाच राहिला पाहिजे. लगेच भात, चिंचेचा कोळ, साखर, सोयासॉस आणि लागल्यास मीठ घालावे आणि नीट मिक्स करावे. घातलेले जिन्नस भाताला सारखे लागले पाहिजेत.
५) भात नीट मिक्स केल्यावर बेसिलची पाने आणि शालोफ्राय केलेला टोफू घालून अलगद मिक्स करावे आणि लगेच सव्‍‌र्ह करावे.

टोफू पराठा

साहित्य :
१५० ते २०० ग्राम टोफू
१ गाजर किसलेले
दोन वाटय़ा कणीक (गरजेनुसार कमी-जास्त लागू शकते.)
दही
१/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३ ते ४ हिरव्या मिरच्या, एकदम बारीक चिरून
१/२ चमचा धणेजिरे पूड
१/४ चमचा हळद
चवीपुरते मीठ
पराठे भाजण्यासाठी तेल किंवा बटर

कृती :
१) टोफू हलक्या हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाकावे. परातीत किंवा खोलगट भांडय़ात घेऊन टोफू कुस्करून घ्यावा.
२) त्यात कणीक घालून हलकेच मिक्स करावे. नंतर किसलेले गाजर, मिरच्या, धणे जिरेपूड, हळद, मीठ आणि कोथिंबीर घालून चांगले मळावे आणि गरजेप्रमाणे दही घालून पराठय़ासाठी कणीक मळून घ्यावी. खूप घट्ट मळू नये त्यामुळे पराठे कोरडे होऊ शकतात.
३) मळलेले पीठ १० मिनिटे झाकून ठेवावे. नंतर तेलाचा हात घेऊन २ ते अडीच इंचाचे समान गोळे बनवावे. कोरडी पीठ लावून पराठे लाटावेत आणि मध्यम आचेवर पराठे भाजून घ्यावेत. पराठे भाजताना कडेने थोडे तेल किंवा बटर घालावे त्यामुळे खमंग स्वाद येतो आणि पराठे मऊ राहतात.
वैदेही भावे