स्टफ पोटॅटो बोट्स
साहित्य:
४ बटाटे (कच्चे)
तळण्यासाठी तेल
स्टफिंगसाठी
२५० ग्राम पनीर
१/२ चमचा चाट मसाला
थोडंसं मीठ
इतर साहित्य :
१/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून घ्यावं.
१-२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून.
१/२ वाटी कांदा, बारीक चिरून.
१/४ वाटी टॉमेटो, मध्यम फोडी.
बारीक शेव, सजावटीसाठी
थोडी हिरवी चटणी (ऐच्छिक)
कृती :
१) पनीर कुस्करून घ्यावं. मंद आचेवर नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात पनीर घालावं. काही सेकंदच परतावं. आच बंद करावी. पनीरला थोडं पाणी सुटेल ते काढून टाकावं. नंतर थोडंसं मीठ आणि चाट मसाला घालावा. चिरलेली कोथिंबीर घालावी. मिक्स करावं.
२) बटाटे मधोमध उभे कापून दोन सारखे भाग करावेत. साल काढू नये. चमच्याने बटाटे मध्यभागी कोरून थोडा वाटीसारखा आकार करावा.
३) तेल गरम करावं. त्यात मध्यम आचेवर बटाटे तळून घ्यावेत. आच मोठी ठेवू नये त्यामुळे बटाटे नीट तळले जात नाहीत, कच्चे राहतात.
४) बटाटे थोडे लालसर तळून घ्यावेत. गरम असतानाच त्यात पनीरचं स्टफिंग भरावं. वर स्वीटकॉर्न, थोडीशी मिरची, कांदा, टोमॅटो, हिरवी चटणी आणि थोडी शेव घालावी. थोडी कोथिंबीर घालून टोमॅटो केचपबरोबर सव्र्ह करावं.
टीप :
स्टफिंग म्हणून पनीरबरोबर इतर भाज्यासुद्धा वापरू शकतो तसंच सजावटीला डाळिंब घातलं तरी आंबटगोड चव येईल आणि दिसायलाही छान दिसेल.
ऑरेंज बीट सलाड
सलाड ड्रेसिंगसाठी
१/४ वाटी ऑरेंज ज्यूस
१ चमचा मध
२ चिमटी मिरपूड
२-३ चिमटी मोहोरी पावडर (पिवळी)
चवीपुरतं मीठ
१ चमचा ऑलिव्ह ऑइल
कृती :
१) संत्री सोलून घ्यावीत. आतील फोडीही सोलाव्यात पण काळजी घ्यावी की त्या अख्ख्या राहतील, बिया काढून टाकाव्यात.
२) बीट उकडून घ्यावं. सालं काढून मध्यम आकाराच्या उभ्या फोडी कराव्यात.
३) प्लेटमध्ये बीट आणि संत्र्याच्या फोडी अॅरेंज कराव्यात. त्यावर गरजेपुरतंच सलाड ड्रेसिंग घालावं. सलाड सव्र्ह करावं किंवा थोडं थंड करून सव्र्ह करावं.
प्लेटमध्ये बीट आणि संत्र्याच्या फोडी अरेंज कराव्यात. त्यावर गरजेपुरतंच सलाड ड्रेसिंग घालावं. सलाड सव्र्ह करावं किंवा थोडं थंड करून सव्र्ह करावं.
चेरी टोमॅटो बेसिल स्पगेटी
साहित्य :
१०-१५ चेरी टोमॅटो
२ ते ३ मोठय़ा लसूण पाकळ्या, चिरून
१ वाटी बेसिलची पानं, अख्खीच ठेवावीत.
१५० ग्राम स्पगेटी नुडल्स
२ ते ३ चमचे ऑलिव्ह ऑइल
मीठ आणि मिरपूड चवीनुसार
इटालियन हब्र्ज
चिली फ्लेक्स
चीज (शक्य असल्यास पार्मेजान चीज वापरावं)
कृती :
१) पातेल्यात पाणी उकळत ठेवावं. १ ते दीड चमचा मीठ घालावं. स्पगेटी नुडल्स उकळत्या पाण्यात सोडून शिजवून घ्याव्यात (पाकिटावर दिलेल्या कृतीनुसार.) चाळणीत काढून त्यावर गार पाणी सोडावं. निथळत ठेवून द्याव्यात.
२) नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण परतावी. त्यावर चेरी टामॅटो घालून मध्यम आचेवर परतावं. टोमॅटोची स्कीन थोडी सुरकुतली की बेसिलची पानं घालावीत. १५-२० सेकंद परतून शिजलेल्या नुडल्स घालाव्यात.
३) मीठ मिरपूड इटालियन हब्र्ज आणि चिली फ्लेक्स घालून हलकेच मिक्स करावं.
४) चीज घालून टॉस करावं. लगेच खायला द्यावं.