चायनीज पिझ्झा
कृती:
१) मंचुरियन बॉल्ससाठी कोबी, भोपळी मिरची, लसूण, आले आणि थोडे मीठ एकत्र करून मायक्रोवेव्हमध्ये अर्धवट वाफवून घ्यावे.
२) थोडे निवले की पिळून त्यातील पाणी काढून ठेवावे. भाजीमध्ये आधी सोया सॉस आणि १ चमचा मैदा घालावा. नंतर कॉर्न फ्लोअर थोडे थोडे मिक्स करून गोळे बांधता येतील इतपतच पीठ घालावे. जास्त घातले तर तळल्यावर आतून कच्चे लागतात.
३) छोटे छोटे गोळे करून तेलात मंद आचेवर तळून घ्यावे. पेपरवर काढून ठेवावे. एका बॉलचे अर्धे अर्धे तुकडे करावे.
४) ग्रेव्हीसाठी कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण- आले परतावे. त्यात बेबी कॉर्न, बारीक चिरलेला कांदा, थोडेसे मीठ आणि उभी चिरलेली भोपळी मिरची परतावी. सोया सॉस घालावा. १ वाटी पाणी (भाज्यांचे पाणी यातच घालावे) घालावे. कॉर्न फ्लोअरचे मिश्रण ढवळून कढईत घालावे. तळलेले बॉल्स आणि व्हिनेगर घालावे. मंद आचेवर १-२ मिनिटे उकळी काढावी. ग्रेव्ही थोडी दाट असावी. लागल्यास १/२ चमचा कॉर्न फ्लोअर वाढवू शकतो.
५) पिझ्झा बेसवर थोडासा शेजवान सॉस पसरवावा. त्यावर मंचुरियन ग्रेव्ही आणि बॉल्स पसरवावे. वरून थोडे चीज पेरून ग्रील करावे. पाती कांद्याने सजवून सव्र्ह करावे.
साहित्य :
२ पिझ्झा बेस
१ ते दीड चमचा शेजवान सॉस (शेजवान चटणी)
१/२ वाटी किसलेले चीज
१ काडी कांद्याची पाती, बारीक चिरून
मंचुरियनसाठी बॉल्ससाठी
१ वाटी एकदम बारीक चिरलेली कोबी
१/२ वाटी बारीक चिरलेली भोपळी मिरची
१ चमचा बारीक चिरलेली लसूण
१ चमचा बारीक चिरलेले आले
१/४ चमचा सोया सॉस
साधारण १/४ वाटी कॉर्न फ्लोअर
१ चमचा मैदा
चवीपुरते मीठ
मंचुरियन बॉल्स तळण्यासाठी तेल
मंचुरियन ग्रेव्हीसाठी
१ चमचा तेल
दीड चमचा लसूण, बारीक चिरून
दीड चमचा आले, बारीक चिरून
२ चमचे कांदा, बारीक चिरून
३-४ बेबी कॉर्न, थोडे जाडसर चिरून
१/४ वाटी भोपळी मिरची, पातळ उभी चिरून
१ चमचा कॉर्न फ्लोअर + १/४ वाटी पाणी
१/२ चमचा सोया सॉस, १/४ चमचा व्हिनेगर
साहित्य :
२ ते ३ पिझ्झा बेस
२ भोपळी मिरच्या, चिरून
३ मध्यम कांदे, चिरून
२ मध्यम टोमॅटो, चिरून
१ चमचा पावभाजीचा मसाला
चवीपुरते मीठ
१ वाटी किसलेले चीज (शक्यतो पिझ्झाचे स्पेशल चीज वापरावे)
टोमॅटो केचप गरजेनुसार
बटर
तेल
कृती :
१) १ चमचा तेल आणि २ चमचे बटर कढईत गरम करावे. त्यात कांदा घालून तो चांगला परतावा.
२) भोपळी मिरची आणि मीठ घालून परतावे. मंद आचेवर थोडा वेळ वाफ काढावी. मिरची शिजली की टोमॅटो घालून छान मिक्स करावे.
३) टोमॅटो पूर्ण शिजवून मिश्रण कोरडे करावे. पावभाजी मसाला आणि थोडेसे लाल तिखट घालून मिक्स करावे. चव पाहून लागल्यास मीठ घालावे.
४) त्यावर टोमेटो केचप लावावा. लागेल तेवढी भाजी पसरवावी. वरून किसलेले चीज घालावे. पिझ्झा ग्रील करून चीज मेल्ट करून घ्यावे.
टिप
बटाटा आणि मटारमुळे थोडी गोडसर चव येते. म्हणून कांदा, भोपळी मिरची आणि टोमॅटो वापरूनच भाजी बनवावी.
साहित्य :
२ मध्यम पिझ्झा बेस
पाऊण वाटी मॅकरोनी
१/२ वाटी मोझरेला चीज
२ चमचे भरून चेडार चीज
पर्मिजान चीज
व्हाइट सॉससाठी
२ सपाट चमचे मैदा
२ चमचे बटर
दोन ते अडीच वाटय़ा दूध
मीठ, मिरपूड चवीनुसार
इतर साहित्य :
ब्रेड क्रम्ब्ज
टोमॅटो केचप
बटर (पिझ्झा बेसला लावण्यासाठी)
इटालियन मिक्स हब्र्ज
कृती :
१) उकळत्या पाण्यात १ चमचा मीठ आणि मॅकरोनी घालाव्यात. मऊ शिजेस्तोवर शिजवाव्यात. पाणी काढून टाकावे. थंड पाणी घालून तेही निथळून टाकावे.
२) कढईत बटर मंद आचेवर गरम करावे. त्यात मैदा घालून हलकासा परतावा. दूध घालून ढवळत राहावे. गुठळ्या होऊ देऊ नयेत.
३) सॉस थोडा दाट झाला की मीठ मिरपूड घालावी. आच बंद करून चीज मिक्स करावे. मॅकरोनी घालून मिक्स करावे.
४) पिझ्झा बेसला थोडे बटर लावून घ्यावे. त्यावर टोमॅटो केचप पसरवून घ्यावा. मॅकरोनीचे मिश्रण त्यावर पसरवावे. वरून ब्रेड क्रम्ब्ज पेरावे. वरून थोडा गोल्डन होईस्तोवर ग्रील करून घ्यावा. वरून रेड चिली फ्लेक्स घालावे.
टीप :
चेडार चीज सहज मिळत नाही. त्यामुळे ते न घालता बाकी चीज वापरले तरी चालेल.
(खालील टीप वरील सर्व पिझ्झा रेसिपीजसाठी लागू होते.)
जर पिझ्झा बेस थोडा कुरकुरीत करायचा असेल तर पिझ्झा ग्रील केल्यावर लगेच बटर लावलेल्या तव्यावर ठेवावा.
मंद आचेवर २ मिनिटे कुरकुरीत होऊ द्यावा. कट करून सव्र्ह करावा.