साहित्य :
१/२ वाटी पुदिन्याची पाने
१/२ वाटी साखर
१/२ वाटी पाणी
थंडगार क्लब सोडा (काबरेनेटेड वॉटर)
कृती:
१) पुदिन्याची पाने खलबत्त्याने कुटून घ्यावीत. त्यात थोडे पाणी घालून कुस्करून घ्यावीत. त्यातील रस वेगळा काढावा. पाने व्यवस्थित पिळून जास्तीत जास्त रस काढावा.
२) साखर आणि पाणी मिक्स करून २ मिनिटे उकळून त्याचा पाक बनवावा. पाक पूर्ण थंड होऊ द्यावा.
३) पुदिन्याचे पाणी, साखरेचा पाक आणि क्लब सोडा एकत्र करून ग्लासमध्ये सव्र्ह करावा. सव्र्ह करण्यापूर्वी पुदिन्याच्या पानांनी सजवावे.
टिपा :
१) साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करावे.
२) नुसती साखरसुद्धा वापरू शकतो. पण पाक केल्याने चवीत बराच फरक पडतो.
३) आवडत असल्यास लिंबाचा थोडा रस किंवा आल्याचा आणि लिंबाचा मिळून असा रस वापरू शकतो.
साहित्य :
२० ते २५ मोठी पूर्ण पिकलेली जांभळं
साखर
१ ते २ चमचे लिंबाचा रस
मीठ
कृती :
१) स्वच्छ धुतलेली जांभळं एका पातेल्यात घ्यावीत. अगदी थोडेसे पाणी घालावे. जांभळे कुस्करून त्यातील बिया काढून टाकाव्यात.
२) मध्यम आचेवर जांभळे ३-४ मिनिटे शिजवावीत. यामुळे रंग थोडा गडद होईल. नंतर थंड होऊ द्यावे. मिक्सरमध्ये बारीक वाटावे. गाळून त्यातील रस काढून घ्यावा.
३) हा रस जितका असेल त्याच्या दुप्पट साखर एका पातेल्यात घ्यावी. साखर भिजेल इतके पाणी घेऊन त्याचा पाक करायला घ्यावा. गोळीबंद पाक करावा.
४) पाकात लिंबाचा रस घालावा. पाक थोडा निवू द्यावा. नंतर त्यात जांभळाचा रस घालून मिक्स करावे.
५) गरजेइतके पाणी घालून थोडे मीठ घालावे. गार सव्र्ह करावे.
टीप :
जास्त जांभळं घेऊन त्याचे वरीलप्रमाणे सरबत तयार करून फ्रीजमध्ये तयार करून ठेवावे. गरजेप्रमाणे वापरता येईल.
साहित्य :
तीन वाटय़ा सोया मिल्क
र्अध केळं
२ चमचे कोको पावडर
१/४ चमचा चॉकलेट इसेंस
साखरेचा पाक गरजेनुसार
गर्निशिंगसाठी – किसलेले चॉकलेट आणि थोडे क्रीम
कृती :
१) निम्मे सोया मिल्क आईस क्युब ट्रेमध्ये घालून गोठवून घ्यावे.
२) मिक्सरमध्ये सोया मिल्कचे क्युब, केळं, कोको पावडर, साखरेचा पाक, चॉकलेट इसेंस आणि सोय मिल्क असे सर्व मिश्रण छान घुसळून घ्यावे.
३) ग्लासमधे ओतावे. क्रीम आणि किसलेले चॉकलेट घालून सजावट करावे. लगेच सव्र्ह करावे.
टीप :
कोको पावडरऐवजी चॉकलेट मेल्ट करून वापरण्यासही हरकत नाही. त्यावेळी शुगर सिरप कमी वापरावे.
साहित्य :
४ ते ६ वॅनिला आईस्क्रीम स्कूप
३ ग्लास मिक्स फ्रूट ज्यूस (आवडीचा कुठलाही ज्यूस चालेल)
सजावटीसाठी
अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे
२ चमचे काजू, बदाम, पिस्ता यांचे काप
कृती :
१) ४ काचेचे सव्र्हिंग ग्लास घ्यावे. प्रत्येक ग्लासमध्ये आधी एकेक वॅनिला आईस्क्रीम स्कूप घालावा.
२) त्यावर ग्लास भरेपर्यंत फ्रूट ज्यूस घालावा. ज्यूस घातल्यावर तळाला असलेले आईस्क्रीम वर तरंगेल.
३) डाळिंबाचे दाणे आणि ड्राय फ्रूट्सनी सजवून लगेच सव्र्ह करावे.
साहित्य :
२ वाटय़ा पाइनॅपल ज्यूस
१ ते दीड वाटय़ा नारळाचे दूध
१ वाटी घट्ट दही
१/४ चमचा पाइनॅपल इसेंस
साखरेचा पाक, गरजेनुसार
कृती :
१) पाइनॅपल ज्यूस आइस क्युब ट्रेमध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवावे.
२) ज्यूस गोठला की मिक्सरमध्ये क्युब्ज, नारळाचे दूध, दही, पाइनॅपल इसेंस आणि साखरेचा पाक घालून मिक्सरमध्ये फिरवावे.
सव्र्हिंग ग्लासमध्ये सव्र्ह करून पाइनॅपल पिसेसने गर्निश करावे.
वैदेही भावे